ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक » मुलं पळवणारी म्हातारी

मुलं पळवणारी म्हातारी

भाऊ तोरसेकर |

मागील आठवड्यात विशाखापट्टणम विमानतळावर जगनमोहन या विरोधी पक्षनेत्यावर चाकूहल्ला झाला होता. विमानतळावर कडेकोट बंदोबस्त असतो आणि तिथे प्रवेश करणार्‍या प्रत्येकाची कसून तपसणी होत असते. प्रवाशांना आपल्या सामानातही काही धारदार वस्तू न्यायला प्रतिबंध आहे. अशा जागी जगनमोहन यांच्यावर झालेल्या हल्ल्याने खळबळ माजणे सहाजिकच आहे. पण तो हल्ला कुणा प्रवाशाने केलेला नव्हता, तर विमानतळावर खानपानाची जी दुकाने, सुविधा आहेत, तिथली वस्तू वापरून एका कर्मचार्‍याने केलेला तो हल्ला होता. त्याचा हेतूही समोर आलेला नसताना त्यावरून राजकारण सुरू झाले. जगनमोहन रेड्डी हे आंध्र विधानसभेचे विरोधी नेते आहेत आणि आगामी निडणुकीतील आव्हानवीर असल्याने त्यांनी व त्यांच्या पक्षाने अशा हल्ल्याचे भांडवल करणे स्वाभाविक आहे. तात्काळ त्यांच्या पक्षाने मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंवर आरोप केला. सत्तेची खुर्ची डगमगू लागली, म्हणून हल्ला केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि मुख्यमंत्री कमालीचे गडबडून गेले. अर्थात असा मूर्खपणा नायडूंसारखा मुरब्बी अनुभवी राजकारणी अजिबात करणार नाही. त्यातून राजकीय लाभ होण्यापेक्षा नुकसानच अधिक संभवते, हे नायडूंना समजते. पण जखम किरकोळ असली तरी राजकीय संधी मोठी असल्याचे जगनमोहन यांनाही नेमके समजते. म्हणून हल्ला किरकोळ असूनही त्यांनी मोठे नाटक रंगवले. त्यामुळेच चंद्राबाबू पुरते गोंधळून गेले आहेत. त्यांची नंतरची प्रतिक्रिया तर खूपच उतावळी व भेदरलेली दिसते. कारण हल्ल्याला एक आठवडा उलटण्यापूर्वीच नायडू यांनी थेट राहुल गांधींना शरण जाण्यापर्यंत माघार घेतली आहे. हातात असलेले राज्य जाण्याच्या भयाने पछाडल्याची ती खूण आहे. अन्यथा अचानक उठून नायडू दिल्लीत आले नसते वा त्यांनी पवारांपासून फ़ारूख अब्दुल्लांपर्यंत सर्वांना शाली पांघरण्याचा सोहळा केला नसता.
अर्थात त्याचे कारण नुसता जगनमोहन यांच्यावर झालेला हल्ला इतकेच नाही. लागोपाठ दोनतीन मतचाचण्या आल्या, त्यात नायडूंचा पक्ष मागे पडून जगमोहन यांचा स्थानिक पक्ष पुढे आल्याचे इशारे मिळत आहेत. आपल्या एकट्याच्या बळावर आंध्रची सत्ता टिकवणे अशक्य असल्याची चाहूल चंद्राबाबूंना लागलेली आहे. त्यातही अजिबात नवे काही नाही. २०१४ सालातही त्यांना तशी खात्री पटलेली होती, म्हणून त्यांनी आजच्याप्रमाणेच तेव्हा नरेंद्र मोदींना शाल पांघरली होती आणि निवडणुकांपूर्वी काही दिवस भाजपाशी तडजोड व आघाडी केलेली होती. किंबहुना त्यामुळेच त्यांना सत्ता मिळवणे व मतविभागणी टाळून लोकसभेत अधिक उमेदवार निवडून आणणे शक्य झाले होते. भाजपाची तेव्हाची किंवा आज आंध्रातली ताकद फारशी मोठी नाही. पण मोठ्या पक्षाच्या काठावरच्या उमेदवारांना जिंकून देण्याइतकी मते भाजपाकडे नक्कीच आहेत. त्यामुळे़च २०१४ मध्ये नायडूंचा तेलगू देसम पक्ष बाजी मारून गेलेला होता. अन्यथा जगनमोहन यांच्या पक्षाने तेव्हाच सत्ता मिळवली असती आणि नायडूंना आणखी पाच वर्षे मिळून पंधरा वर्षांचा वनवास सोसावा लागला असता. किंबहुना आज जी नाटके नायडू करीत आहेत, त्याच्याच परिणामी त्यांचा राजकीय वनवास २००४ सालातच सुरू झालेला होता. तेव्हाही गुजरात दंगलीचे दोषी म्हणून मोदींनी राजीनामा द्यावा, किंवा भाजपाने त्यांना हटवावे अशा मागणीसाठी नायडू एनडीएतून बाहेर पडले होते. मात्र त्याची किंमत त्यांना पुढल्या निवडणुकीत मोजावी लागली आणि आंध्रच्या राजकारणातून नायडू कुठल्या कुठे फेकले गेले. त्यांना राजकारणातून संपवणारे राजशेखर रेड्डी अपघातात मरण पावल्यानंतर सहानुभूतीने त्यांचा पुत्र जगनमोहन राजकारणात यशस्वी झाला. त्यांनी आता काँग्रेसचा सगळा मतदार आपल्या खात्यात जमा करून घेतला आहे. त्यात काँग्रेसचे पुरते दिवाळे वाजून गेले आहे आणि नायडू त्याच काँग्रेसच्या झिरो बॅलन्स खात्यात आपला मतदार भरायला निघाले आहेत.
साडेतीन दशकांपूर्वी राजीव गांधी राजकारणात आल्यानंतर प्रथमच हैद्राबादला गेलेले होते. त्यांच्या स्वागताला काँग्रेसचे मुख्यमंत्री टी. अंजय्या विमानतळावर आलेले असताना उपस्थितांसमोरच राजीवनी त्यांना अपमानित केले. राज्याचा कारभार सोडून लाळघोटेपणा करायला इथे कशाला आलात, अशा आशयाने काहीतरी राजीव बोलले आणि अंजय्यांना रडू ़फुटले होते. तो तेलगू अस्मितेचा अपमान असल्याचा डांगोरा स्थानिक लोकप्रिय एनाडू दैनिकाने पिटला होता. त्याच दैनिकचे मालक व संपादक रामोजी राव यांनी मग लोकप्रिय अभिनेता रामाराव यांना पुढाकार घ्यायला लावला आणि त्यातून खराखुरा काँग्रेसशी टक्कर देऊ शकणारा तेलगू देसम पक्ष तिथे जन्माला आला. त्याने १९८२ सालात काँग्रेसला पाणी पाजून सत्तांतर घडवून आणले होते. ती तेलगू अस्मिता इतकी प्रखर होती, की १९८४ साली इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यावर देशभरात मतदारांनी काँग्रेसला भरभरून मते दिलेली असताना, एकटा आंध्रप्रदेश काँग्रेसच्या विरोधात ठाम उभा राहिला होता. त्याचेही कारण होते. इंदिरा गांधी यांनी रामारावांच्या बिगर काँग्रेस सरकारमध्ये फाटाफूट घडवून लोकप्रिय मुख्यमंत्र्याला पदच्युत केले होते. त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली. शंभर दिवसात पुन्हा रामारावांना मुख्यमंत्री करावेच लागले. पण इंदिरा हत्येनंतरही मतदार काँग्रेसच्या विरोधात गेला. देशात सर्वत्र विरोधकांचा धुव्वा उडत असताना तेलगू देसम हाच लोकसभेतील दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष झाला होता. त्याला ४२ पैकी ३० जागा मिळाल्या होत्या. आज त्याच पक्षाचे म्होरके चंद्राबाबू नायडू त्याच राजीव गांधींच्या पुत्राला राहुल गांधींना शाल पांघरायला जाऊन पोहोचले. त्यातून त्यांची दिवाळखोरी लक्षात येऊ शकते. कारण तेलगू देसम हा तथाकथित पुरोगामी पक्ष नव्हता वा नाही. काँग्रेस विरोध हे तेलगू देसम पक्षाचे गुणसूत्र वा डीएनए आहे.
नायडूंचा मोदी विरोध आपल्या जागी आहे. पण त्यासाठी त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करणे, ही निव्वळ आत्महत्या आहे. हेच विविध राज्यातल्या प्रादेशिक पक्षांनी केले आणि त्यांची शोकांतिका आपण पाहातच आहोत. महाराष्ट्रात सेना-भाजपा युतीला रोखण्यासाठी इथले पारंपारिक काँग्रेस विरोधी पक्ष १९९९ सालात काँग्रेसच्या कच्छपि लागले आणि त्यांचे नामोनिशाण आज शिल्लक राहिलेले नाही. तेच अलिकडे बंगालमध्ये डाव्या आघाडीचे होऊन गेले. ममतांच्या विरोधात काँग्रेसशी आघाडी केलेल्या डाव्यांच्या सुपडा साफ झालेला आहे. बिहार, उत्तरप्रदेशात भाजपाला रोखण्यासाठी मुलायम, मायावती वा लालूंची पाठराखण करताना काँग्रेस नामशेष होऊन गेलेली आहे. कर्नाटकात भाजपाला रोखण्याच्या नादात देवेगौडांचे जनता दल संपून गेले. थोडक्यात हे पुरोगामी राजकारणाचे थोतांड सुरू झाल्यापासून मागील दोन दशकात काँग्रेस ही मुले पळवणारी म्हातारी झाली आहे. त्या पक्षात इतर लहानसहान प्रादेशिक वा अन्य पुरोगामी पक्षातून पळवलेली मुले आता खानदान म्हणून मिरवताना दिसतील. दत्तक घेतलेली वा पळवलेली ही परक्यांची मुले आज काँग्रेसचा वारसा तावातावाने बोलताना दिसतात. चंद्राबाबू नायडूंना मात्र पळवून न्यावे लागलेले नाही. ते आपणच या राजकीय म्हातारीच्या पोतडीत जाऊन घुसले आहेत. भाजपाचा बागुलबुवा उभा करण्याच्या नादात त्यांनी आपल्या पक्षाला आता काँग्रेसचे पुनरूज्जीवन करण्यासाठी पक्षाचा बळीच द्यायचा निर्णय घेतला आहे. आज जगनमोहन यांना रोखण्याची नामुष्की त्यांच्यावर आली, कारण त्यांनी काही महिन्यांपूर्वी एनडीएची साथ सोडली आहे आणि जगनमोहनचे आव्हान पेलण्यासाठी आता काँग्रेसच्या पायावर लोळण घेतली आहे. त्यातून तेलगू देसमला पुन्हा सत्ता वा यश मिळण्याची बिलकुल शक्यता नाही. पण काँग्रेसने जगनमोहनसाठी गमावलेल्या मतदाराची भरपाई तेलगू देसमच्या खात्यातून होईल आणि नंतरच्या राजकीय लढाईत नायडूंचा पक्ष महाराष्ट्रातल्या शेकापसारखा दुबळापांगळा होऊन जाईल.

https://tarunbharat.org/?p=67037
Posted by : | on : 4 Nov 2018
Filed under : उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक (453 of 1519 articles)


देसम्चे सर्वेसर्वा आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी, काँग्रेस पक्षाशी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हातमिळवणी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल ...

×