ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » उपलेख, तरुण विजय, संपादकीय, स्तंभलेखक » मोदींच्या आक्रमकतेचे रहस्य!

मोदींच्या आक्रमकतेचे रहस्य!

तरुण विजय |

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, तथ्यांच्या आधारावर विरोधकांचा खोटेपणा आणि कारस्थान उद्ध्वस्त करा, असे जे आवाहन केले त्याचे कारण काय होते? पूर्वांचलापासून गुजरात आणि लेहपासून पोर्ट ब्लेअरपर्यंत परिवर्तनाचे एवढे जबरदस्त आयाम साकार झाले असताना, सोबतच जे थेट लाभार्थी आहेत त्यांच्याबाबत सामान्य जनतेपर्यंत हवा तेवढा संदेश पोचलेला नाही. परिणाम असा झाला की, विरोधकांच्या शंभरदा तेच ते खोटे बोलण्यामुळे देशात वास्तविक जे परिवर्तन झाले आहे, त्यावर काहीशी काजळी आली आहे. काही दिवसांपूर्वी मी अरुणाचल प्रदेशातील नाहरवगुन येथून गुवाहाटी राजधानी एक्सप्रेसने आलो. सोबत मिझोरमचे एक अधिकारी होते. त्यांनी सांगितले की, केंद्र आणि इस्रायलसोबत झालेल्या करारामुळे मिझोरममध्ये फळांचा रस तयार करणारा उत्तर पूर्वांचलातील सर्वात मोठा कारखाना उघडला गेला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि इस्रायलच्या राजदूतांनी त्याचे उद्घाटन केले. हजारो शेतकर्‍यांचे आधी फळफळावळ बर्बाद व्हायचे. पण, आता त्यांच्या फळांना दुप्पट भाव मिळत आहे. अरुणाचलला राजधानी दिल्लीशी जोडणे ही बाब एखाद्या क्रांतीपेक्षा कमी नाही. उत्तर पूर्वांचलातील विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात माझी भेट अंजलु बिस्वमुत्तारी या विद्यार्थ्यासोबत झाली. १६ वर्षांचा तेजस्वी गायक. आईवडील शेती करतात. घरी दोन भाऊ, एक बहीण. अंजलुला अनु. जमाती मंत्रालयाकडून शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे तो डेहराडूनला शिक्षणासाठी जात होता. आईवडिलांजवळ एवढाही पैसा नव्हता की, रेल्वेचे तिकीट निघू शकेल. पण, मुलाचे भविष्य उज्ज्वल होणार या आशेने त्यांनी पाठविले. असे अनेक विद्यार्थी आहेत, जसा जयंतो चकमा, ज्याला मिझोरममधील आपल्या गावी जाण्यासाठी पाच दिवस लागतात. मिजोरमच्या लुंगलई गावात त्याचे घर आहे आणि बासाच्या घरात त्याचे आईवडील आणि तीन भाऊ राहतात. जयंतो चकमा याला शिक्षणासाठी दिल्लीला जाण्याची शिष्यवृत्ती डॉ. जितेंद्र सिंह यांच्या मिझोरम दौर्‍यात शिक्षण योजनांच्या उद्घाटनानंतर लगेच मिळाली. वास्तविक पाहता, १९४७ नंतर जेव्हा उत्तर पूर्वांचल आसाम आणि नेफा म्हणूनच ओळखला जात होता, पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी नियम केला की, केंद्रीय मंत्री महिन्यातून एकदा उत्तर पूर्वांचलाचा दौरा करतील. ते केवळ राजधानीत जाणार नाहीत, तर अगदी दूरवरच्या गावांपर्यंत जाऊन समस्या सोडवतील. उत्तर पूर्वांचलाबाबत आसामचे प्रसिद्ध संपादक बेजबरुआ म्हणत होते की, तुमच्या लोकांचा देश केवळ दिल्ली ते कामाख्यापर्यंतच राहायचा. त्या उत्तर पूर्वांचलाला त्यांच्या पायाशी पंतप्रधान मोदींनी आणले. आज कुणीही असे म्हणत नाही की, पूर्वांचलात केंद्रीय मंत्री सकाळी येतात आणि सायंकाळी परत जातात. असा कोणताही मंत्री नाही जो तीन-तीन दिवस पूर्वांचलातील राज्यांच्या अगदी छोटछोट्या गावापर्यंत गेला नसेल. हा बदल राष्ट्रीय एकतेच्या क्रांतिकारी विकासाची प्रतिष्ठापना नाही तर काय आहे?
आमची अडचण अशी आहे की, गवताच्या पेंडीला आग लावून जो धूर बाहेर काढला जातो, त्या धुरात समोरची इमारतही आम्हाला दिसेनासी होऊन जाते आणि लहानापासून मोठे काम डोळ्यांना दिसत नाही. आम्हाला स्वत:लाच माहीत नाही की, आमच्या जीवनात गेल्या काही दिवसांत जे बदल आले आहेत, त्याची चर्चा किंवा त्याचे श्रेय देण्याच्या बाबतीतही आम्ही आळस करतो. आधी अडीच ते पाच लाखापर्यंत दहा टक्के आयकर लागायचा, आता तो पाच टक्केच भरायचा आहे. कोण बोलले? २०१४ च्या आधी मोबाईट डाटाचा दर २६९ रुपये प्रती जीबी होता. मोदी सरकारने तो १९ रुपयांवर आणला. आधी मोबाईल फोनचा दर ५१ पैसे प्रतिमिनिट होता. तो आता १७ पैसे आहे. महिन्याला अवघ्या एका रुपयात अपघात विमा प्रीमियम, आधी १७ अप्रत्यक्ष कर होते आता फक्त एक जीएसटी. आधी देशात ३८.७ टक्के भागात स्वच्छता होती, ती आता ९२ टक्के झाली आहे. या विषयावर कोण बोलले? जर आयकर भरणार्‍यांची संख्या दुप्पट होत असेल (३.७९ कोटीवरून ६.८ कोटी) तर याचा अर्थ हा आहे की, आणखी शाळा, इस्पितळे, रस्ते निर्माण. अडचण ही आहे की, मला सर्व सोयीसवलती तर हव्या आहेत, पण जेव्हा माझ्या मुलाला आपल्याच शहरात मनपसंत नोकरी मिळाली नाही तर आम्हाला असे वाटते की, काय बदल झाला? मला तर काहीच मिळाले नाही. टपाल कार्यालयांमध्ये बँकिंगची सुविधा कुणाला मिळाली? प्रथमच एका घरी एक बँक खाते उघडले तरी फायदा कुणाचा झाला? थेट खात्यांमध्ये सामान्य गरीब माणसाला अनुदान आणि कर्जाची रक्कम पोहोचायला लागली आणि मधल्या दलालांचे शुक्लकाष्ठ संपले, तर याचा फायदा कुणाला झाला? ज्यावेळी गॅसजोडणी मिळावी म्हणून लांबच लांब रांगा आता का विसरले, जेव्हा गॅसजोडणीसाठी खासदार, आमदार यांचे कुपन मिळण्याची धडपड करावी लागे. आता तर सरकारच तुमच्या दारी गॅस कनेक्शन आणून देत आहे तर माझ्या बंधू, थोडेतरी समाधानाने आनंद व्यक्त कर. आयुष्यमान योजना काय केवळ एक पोस्टर आहे? कोट्यवधी जनतेच्या घरापर्यंत पाच लाख रुपयांच्या वैद्यकीय चिकित्सेचा लाभ पोहोचविणे हे जगाच्या कोणत्या देशाने आजपर्यंत कधी केले आहे का? हे त्यांना विचारले पाहिजे, ज्यांच्या कुटुंबीयांला, प्रियजनाला महागड्या उपचाराअभावी आपले डोळे कायमचे मिटण्यास बाध्य व्हावे लागत होते. ज्याला कुणाला हा विदारक आणि दु:खदायक अनुभव आला असेल, त्यालाच आयुष्यमान योजना किती जीवनदायी आहे, याची अनुभूती झाली असेल.
आज देशातील दीडशेपेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघांत उसाच्या शेतीचा प्रभाव आहे. पंतप्रधान मोदी यांनी उसाच्या खरेदीचे दर तर वाढविलेच, सोबतच उसापासून इथेनॉल तयार करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली. याच इथेनॉलवर देशात विमान उडविण्याचा यशस्वी प्रयोग झाला. इथेनॉलवर डेहराडून ते दिल्ली असा पहिला विमानप्रवास घडला तेव्हा ती उपलब्धी डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वत: उपस्थित होते. इथेनॉलचे जे उत्पन्न आधी केवळ ४० कोटी लिटर होते, त्यात पंतप्रधान मोदी यांनी वैयक्तिक लक्ष घातल्यामुळे ते आज १४० कोटी लिटर एवढे झाले आहे! हा खरे पाहता एक जागतिक विक्रम आहे. आधीच्या काळी अन्नधान्याच्या महागाईचे दर १६.६ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते, ते आता केवळ १.७३ टक्के एवढेच आहेत. जी अर्थव्यवस्था आधीच्या राजवटीत सर्वाधिक घसरण झालेली म्हणून सांगितली जायची, तीच अर्थव्यवस्था आज जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून नावाजली जात आहे. नवनवीन योजनांमुळे आलेले मूलभूत परिवर्तन आणि केवळ एका वर्षात ७० लाख रोजगारांचे सृजन होणे हाही एक विक्रमच म्हणावा लागेल. स्टार्ट अप आणि मुद्रा योजनेमुळे लक्षावधी रोजगारांना काम मिळाले, सोबतच उद्योग सुरू करणारे युवक आज छोटछोटे रोजगार देणारे युवा मालकही बनले आहेत. ही मोठी उपलब्धी नाही का?
चांगले रस्ते सर्वांनाच हवेहवेसे वाटतात. आधीच्या काळी दिल्ली ते गढ-मुक्तेश्‍वरपर्यंत जायलाच चार ते पाच तास लागायचे. आता चारच तासात जाणे-येणे करून, गंगास्नान आटोपून भाविक परत येऊ लागले आहेत. आधीच्या राजवटीत दिवसाला केवळ १२ किलोमीटर रस्ते तयार व्हायचे, ते आता दिवसाला २७ किलोमीटर तयार होत आहेत. मोदी सरकारने तर रस्तेनिर्माणाचे असाधारण, अद्भुत असे जाळेच विणले आहे. अगदी लहान लहान योजनांच्या माध्यमातून मोठमोठी झेप घेताना मोदी सरकार दिसत असून, एका नव्या विकसित देशाच्या निर्माणाचे दृश्य सर्व जण पाहात आहेत. या सर्व विकासकामांच्या उत्तरात जातीयवाद किंवा कृत्रिम महागाईच्या कितीही गप्पा केल्या, तरी त्या तळहातावर राईचे झाड उगवण्यापेक्षाही अधिक हास्यास्पद दिसत आहेत. मोदी आणि शाह यांच्या चेहर्‍यावर विजयाची दमक आणि उचललेल्या पावलांच्या आक्रमकतेचे रहस्य या कामांमध्ये दडले आहे, ज्यांची एखाद्या वादळासारखीच अनुभूती केली जाऊ शकते. कुछ बात है की, हस्ती मिटती नही हमारी… सारखी रचना आज जी विकासाची कामे दिसत आहेत, त्यामुळेच सत्य सिद्ध होताना दिसत आहे.

https://tarunbharat.org/?p=62100
Posted by : | on : 17 Sep 2018
Filed under : उपलेख, तरुण विजय, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, तरुण विजय, संपादकीय, स्तंभलेखक (422 of 1336 articles)

Rss G
सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता आलेख एवढ्याचसाठी मांडला आहे की, १९२५ च्या विजयादशमीपासून तर परवा ११ सप्टेंबर ...

×