पाकच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त

पाकच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त

►लष्कराने जारी केला व्हिडीओ, श्रीनगर, २३ फेब्रुवारी – संघर्षविरामाचे…

पाक, बांगलादेशात जाऊन पक्ष स्थापन करा

पाक, बांगलादेशात जाऊन पक्ष स्थापन करा

►कटियार यांचा ओवेसींवर प्रहार, नवी दिल्ली, २३ फेब्रुवारी –…

गीतांजली समूहाची १२०० कोटींची संपत्ती जप्त

गीतांजली समूहाची १२०० कोटींची संपत्ती जप्त

►आयकर विभागाची कामगिरी ►नीरव मोदीला जोरदार दणका, नवी दिल्ली,…

आता शिक्षकांनाच बंदुका द्याव्यात : ट्रम्प

आता शिक्षकांनाच बंदुका द्याव्यात : ट्रम्प

►गोळीबाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी उपाय, वॉशिंग्टन, २२ फेब्रुवारी –…

इम्रान खान तिसर्‍यांदा लग्नाच्या बेडीत

इम्रान खान तिसर्‍यांदा लग्नाच्या बेडीत

कराची, १९ फेब्रुवारी – पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार…

पाकच्या कारवाईने हाफिझ सईद चवताळला

पाकच्या कारवाईने हाफिझ सईद चवताळला

►नजरकैदप्रकरणी न्यायालयात जाणार, लाहोर, १६ फेब्रुवारी – पाकिस्तानने बेकायदेशीरपणे…

आता राज्यात पाच नाही, सहा लाख कोटींची कामे!

आता राज्यात पाच नाही, सहा लाख कोटींची कामे!

►४ लाख २७ हजार ८५५ कोटींची कामे मार्गी ►केंद्रीय…

बायोमेट्रिक कार्डधारकांनाच मिळणार स्वस्त दरात धान्य : हायकोर्ट

बायोमेट्रिक कार्डधारकांनाच मिळणार स्वस्त दरात धान्य : हायकोर्ट

मुंबई, २३ फेब्रुवारी – आधारकार्ड शिधापत्रिकेशी जोडणे अनिवार्यच असल्याचे…

सोहराबुद्दिन शेख दाऊदचाच हस्तक

सोहराबुद्दिन शेख दाऊदचाच हस्तक

►पळून जात असल्याने चकमकीत मारला गेला ►आताची सीबीआय तटस्थ…

काँग्रेसमुक्त भारत, काळाची गरज!

काँग्रेसमुक्त भारत, काळाची गरज!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | काँग्रेस राजवटीत शिक्षणक्षेत्रात…

काँग्रेसला काय धाड भरलीय?

काँग्रेसला काय धाड भरलीय?

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | शेखर गुप्ता…

राष्ट्रद्रष्टे : श्रीगुरुजी

राष्ट्रद्रष्टे : श्रीगुरुजी

॥ विशेष : डॉ. कुमार शास्त्री | श्रीगुरुजी आध्यात्मिक…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » मोदी विरोधकांचा ‘नोटशूळ!’

मोदी विरोधकांचा ‘नोटशूळ!’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अचानक पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा एक ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतला. या देशातील सर्वसामान्य माणसांनी या निर्णयाचे मनापासून स्वागत केले. मात्र ज्यांना हिंदुत्व, मोदी, भाजपा, संघ अशा शब्दांचा फोबिया आहे, अशी मंडळी अस्वस्थ झाली आहेत. त्यांचा ‘नोटशूळ’ पेटून उठला आहे. मोदींची लोकप्रियता वाढली, की यांना कसलातरी शूळ उठत असतो. त्यासाठी ते काहीतरी कारणे शोधतात. ओढूनताणून मोदी यांना विरोधासाठी विरोध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात आणि आपले हसे करून घेतात. यामध्ये जसे काही राजकारणी आहेत तसे काही विचारवंतही आहेत. जन्मभर ज्यांनी पोथीनिष्ठपणे हिंदुत्वाला विरोध केला त्यांना, हिंदुत्वाचा भारतात विजय होतो, ही गोष्ट पचलेलीच नाही. त्यांना कायमच मळमळत असते. दादरी, जेएनयू, रोहित वेमुला, फिल्म इन्स्टिट्यूट अशा कोणत्याही निमित्ताने ते किंचाळून उठतात. भडाभडा मोदीद्वेष, हिंदुत्वविरोधाच्या ओकार्‍या काढतात. आता नोटांच्या प्रकरणातही ही मंडळी किंचाळत उठली आहेत. नोटा रद्द करण्याचा निर्णय असा अनपेक्षित होता की, त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी आणि कसा विरोध करावा, हे या सर्व मोदी विरोधकांना समजेनासे झाले होते. वास्तविक असे निर्णय हे अनपेक्षितच घ्यावे लागतात. नोटा रद्द करणार, हे आधी सांगून केले असते तर त्याचा अपेक्षित परिणाम काहीच झाला नसता. कॉंग्रेसने तर अगदीच हास्यास्पद विरोध नोंदविला आहे. विरोधी पक्षाने काहीतरी खुसपट काढून विरोध केलाच पाहिजे, अशा पठडीतला तो विरोध आहे. म्हणे की शेतकर्‍यांची शेतातील पिके घरात आली आहेत. अशा वेळी शेतकर्‍यांना या नोटा रद्द करण्याचा त्रास होणार नाही काय? शेतातील माल घरात आला तर तो माल विकून शेतकर्‍यांना पैसे घ्यायचे आहेत, द्यायचे नाहीत. त्यामुळे त्यांना नोटांचा प्रश्‍न कसा येईल? शेतकर्‍यांना आयकराचा काहीच मुद्दा नाही. ते आपल्या खात्यात त्यांच्याकडे असलेले पैसे सहज भरू शकतात. त्यांनी दुसरा मुद्दा उपस्थित केला आहे तो लग्नसराईचा. नोटा रद्द झाल्याने लग्नसराईला काहीच अडचण येणार नाही. उलट ज्या दिवशी नोटा रद्द झाल्या त्या दिवशी लोकांनी सोने खरेदीला रांगा लावल्या होत्या. कधीही हा निर्णय जाहीर केला असता, तर कोणता तरी सण, उत्सव, लग्नसराई असे काहीतरी येणारच. याचा विचार करत सरकार जर निर्णय घेऊ लागले, तर निर्णय घेताच येणार नाही. कॉंग्रेसने तिसरा प्रश्‍न विचारला आहे की, काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी जर हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द केल्या, तर मग दोन हजाराच्या नोटांनी पुन्हा काळा पैसा तयार होणार नाही कशावरून? हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द झाल्याने ज्यांनी भ्रष्टाचार करून, गैरमार्गाने घरात, कर न भरता कोट्यवधी रुपये या नोटांच्या स्वरूपात जमा केले आहेत ते एकतर बँकांमध्ये येतील नाहीतर बाजारातून नष्ट होतील. दहशतवादी यंत्रणेने भारतीय बाजारपेठेवर दुष्परिणाम करण्यासाठी बनावट नोटांचे जे रॅकेट चालविले आहे त्याला या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाने सपशेल पराभूत केले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला यामुळे एक वळण मिळणार आहे. अनेक काळाबाजारवाले, अनेक भ्रष्टाचारी यांना प्रचंड दणका बसणार आहे. जर देशातील काळ्या पैशाची कॉंग्रेसला इतकी चिंता होती, तर देशात सर्वाधिक काळ सत्तारूढ असलेल्या कॉंग्रेसने त्यांच्या कार्यकाळात एकदाही या मोठ्या नोटा रद्द करण्याचा निर्णय का घेतला नव्हता ? कोणते हितसंबंध त्यांना निर्णय घेण्यापासून रोखत होते? आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे देशात सर्वदूर स्वागत होत असताना कॉंग्रेसला त्याचाच तर ‘नोटशूळ’ उठलेला नाही? या नोटा रद्द करण्याला दुसरा विरोध केला आहे तो मायावती यांनी. गेल्या लोकसभेत जी मोदीलाट आली त्यामुळे ज्यांची वाताहत झाली आणि त्या धक्क्यातून जी मंडळी अजून सावरलेली नाहीत त्यामध्ये मायावती एक आहेत. उत्तरप्रदेशात सत्ता गाजविणार्‍या आणि सोशल इंजिनीअरिंग आपल्याच हातात आहे, अशा तोर्‍यात असलेल्या मायावतींना मोदीलाटेने असा काही तडाखा दिला की, त्यांचा एकही खासदार उत्तरप्रदेशातून विजयी झाला नाही. त्यामुळे चवताळलेल्या मायावती आता पुन्हा उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत पानिपत होऊ नये यासाठी जंग पछाडत आहेत. मोदी यांच्यावर इमानेइतबारे टीका करणे हा त्यांच्या राजकीय धोरणाचाच भाग आहे. त्यामुळे मोदी यांचा नोटा रद्द करण्याचा निर्णय कितीही चांगला असला, तरी मायावती त्याला विरोध करतच राहणार. त्या म्हणतात की, मोदी यांच्या या निर्णयामुळे आणिबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. वास्तविक आणिबाणीत सर्वसामान्य माणसाला दहशत होती, या निर्णयाने सामान्य माणूस आनंदी आहे. निवडणुकीत लोकांचे लक्ष वळविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. वास्तविक काळ्या पैशाचा प्रश्‍न मोदी यांनी आज मांडलेला नाही. लोकसभेच्या निवडणुकीपासून या विषयाची चर्चा चालू आहे. निवडणुकीत दिलेल्या वचनांच्या पूर्ततेचा तो एक भाग मानला पाहिजे. मायावती यांना देशातील बहुजन, सामान्य जनता म्हणजे ज्यांच्याकडे बेहिशेबी पाचशे आणि हजारांच्या नोटा आहेत अशी जनता वाटते की काय? झोपडीत राहणारी, काबाड कष्ट करणारी, मोलमजुरी करणारी जनता ही बहुजन, सामान्य जनता नाही की काय? कारण आणिबाणीसारखी परिस्थिती या सामान्य माणसांच्या जीवनात आलेली नसून बेकायदेशीर पैसे जमा करणार्‍या बड्या लोकांवर आली आहेे. त्यामुळे मायावतींचा विरोध हा मोदीविरोधाचा निव्वळ ‘नोटशूळ’च आहे. डाव्या विचारांची लाल झापडे लावलेले काही विद्वानही या निर्णयाला चुकीचे ठरविण्यासाठी कुतर्क लढवू लागले आहेत. चोवीस तासांत आपल्या मांडणीला आपणच खोटे ठरविणारे नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला पण… परंतु… लावत आपला विरोध आणि नोटशूळ प्रकट करू लागले आहेत. मात्र, या निर्णयाने या देशातील विचारी, सुज्ञ सामान्य माणूस आनंदी आहे. या निर्णयाने जनतेकडून अवैध मार्गाने, अधिकारांचा दुरुपयोग करत ओरबाडून घेऊन ज्यांनी अमर्याद पैसा गोळा केला होता आणि कर न भरता तो दडवून ठेवला होता त्यांना दणका बसला आहे. दहशतवाद्यांना फटका बसला आहे. ज्या गोष्टीने सामान्य माणसाला आनंद झाला आणि बदमाश, अप्रामाणिक लोकांना दणका बसला त्या निर्णयाला नोटशूळ प्रकट करत विरोध करणार्‍यांची नियत काय आहे, हे वेगळे कुणी सांगण्याची गरजच नाही!

शेअर करा

Posted by on Nov 11 2016. Filed under अग्रलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अग्रलेख, संपादकीय (917 of 957 articles)


मुक्त विचार : किरण शेलार | जागतिक राजकारणाच्या पटलावर घडणार्‍या घटनांचे परिणाम व पडसाददेखील जागतिकच असतात. दूरगामी व तत्काळ अशा ...