राष्ट्रपतींचे भाषण पक्षपाती; कॉंग्रेसचा आरोप

राष्ट्रपतींचे भाषण पक्षपाती; कॉंग्रेसचा आरोप

नवी दिल्ली, २६ जुलै – देशाचे १४ वे राष्ट्रपती…

‘त्या’ पाच जवानांची जन्मठेप रद्द

‘त्या’ पाच जवानांची जन्मठेप रद्द

►माछिल चकमक प्रकरण ►सशस्त्र दल लवादाचा निर्णय, नवी दिल्ली,…

सैन्याला पूर्ण मोकळीक द्या

सैन्याला पूर्ण मोकळीक द्या

►वीरमाता तृप्ता थापर यांचे आवाहन, नवी दिल्ली, २६ जुलै…

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

►डोकलामवर चर्चेची दर्शवली तयारी, बीजिंग, २५ जुलै – सिक्कीम…

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

►भारताने चूक सुधारावी, चीनची दर्पोक्ती, बीजिंग, २४ जुलै –…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

►शेतकर्‍यांना सुखी ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील ►आमदार डॉ. बोंडेंनी मांडला…

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

►२ आठवड्याची न्यायालयीन कोठडी, सातारा, दि. २५ जुलै –…

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

►३३ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, मुंबई, २४ जुलै…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:05 | सूर्यास्त: 19:01
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » ‘यादवी’चा भडका!

‘यादवी’चा भडका!

उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री अखिलेश यादव, नेताजी मुलायमसिंह यादव, त्यांचे भाऊ रामगोपाल आणि शिवपाल यांच्यात आगामी मुख्यमंत्री कोण, या विषयावर आधीच आतून आग धुमसत असतानाच, रविवारी या यादवीचा भडका उडाला. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी, काका शिवपाल यादव यांच्यासह चार मंत्र्यांना डच्चू दिला, तर तिकडे मुलायमसिंह यादव यांनी आपले बंधू रामगोपाल यादव यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून पक्षातूनच निलंबित केले! समाजवादी पक्षात पुन्हा प्रवेश केलेले अमरसिंह यांच्या निकटच्या समजल्या जाणार्‍या जयाप्रदा यांची उत्तरप्रदेश फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलच्या अध्यक्षपदावरून अखिलेश यांनी हकालपट्‌टी केली. जे कुणी दलाल अमरसिंह समर्थक आहेत, त्यांना पक्षातून काढण्याचा इशारा अखिलेश यादव यांनी दिला आहे. एवढ्या सर्व घडामोडी एकट्या रविवारी घडल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले नसते तरच नवल. यादव कुटुंबातील सर्व प्रमुख सदस्यांनी एकदुसर्‍यावर आरोप करतानाच, चिखलफेकही केली. रामगोपाल यादव यांनी भाजपासोबत छुपी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप शिवपाल यांनी केला आहे; तर पक्ष तोडणार्‍यांची मुळीच गय केली जाणार नाही, असा आरोप अखिलेश यादव यांनी, शिवपाल यादव यांची मंत्रिमंडळातून हकालपट्‌टी करताना केला आहे. वाचकांना स्मरतच असेल की, अगदी गेल्या महिन्यात शिवपाल यादव यांचे प्रदेश पक्षाध्यक्षपद काढून घेतल्यापासून व त्यांच्याकडे असलेली पाच महत्त्वाची खाती मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काढून घेतल्यापासून काका-पुतण्यामधील दरी आणखीच रुंदावत चालली होती. शिवपाल यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला होता. पण, नंतर नेताजींनी हस्तक्षेप केल्यामुळे पुन्हा सर्व खाती शिवपाल यादव यांना बहाल करण्यात आली होती. यादव कुटुंबीयांमध्ये इतकी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे की, या कुटुंबामध्येच वेगवेगळे गट तयार झाले आहेत. रामगोपाल यादव हे अखिलेशसोबत आहेत, तर शिवपाल मुलायमसिंह यांच्यासोबत आहेत. अगदी काही दिवसांपूर्वी, आम्ही अखिलेेश यांच्या नेतृत्वातच निवडणुका लढवू, असे म्हणणारे शिवपाल आज म्हणाले, आम्ही मुलायमसिंह यांच्या नेतृत्वात निवडणूक लढू. एका बाबीमुळे हे सर्व महाभारत सुरू असण्याचे कारण म्हणजे, आगामी विधानसभा निवडणुकीत जर समाजवादी पक्षाची पुन्हा सत्ता आली, तर मुख्यमंत्री कोण? त्याची धुसफूस अखिलेश आणि शिवपाल यादव यांच्या गटात सुरूच होती. त्यात नेताजी मुलायमसिंह यांच्या विधानाने प्रचंड गोंधळ निर्माण केला. पुन्हा सत्ता आली तर विधिमंडळ पक्षनेता आमदार ठरवतील, असे नेताजी म्हणून गेले आणि अखिलेशसह त्यांच्या गटात प्रचंड अस्वस्थता पसरली. २०१२ ची निवडणूक पक्षाने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात लढविली होती आणि अखिलेश यांनी सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर अखिलेश यांनी अनेक विकासकामे हाती घेतली आणि पक्षात एक नवा जीव ओतला. यावेळी अखिलेश मुख्यंमत्रिपदी राहणार की नाही, या विचाराने अखिलेश गटाने कंबर कसली. आपण एवढी मेहनत घेऊन उत्तरप्रदेशात एक चांगले वातावरण निर्माण केले आणि आता मात्र आपल्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रयत्न पाहून, त्यांनी मग एकामागून एक निर्णय घेण्याचा सपाटा चालविला. दरम्यानच्या काळात अनेक अशा घटना घडल्या, ज्यामुळे समाजवादी पक्षाच्या प्रतिमेला तडे जाऊ लागले. मथुरेतील जवाहरबाग येथे सशस्त्र टोळ्यांचे साम्राज्य प्रस्थापित करणारा रामवृक्ष यादव याच्या ठिकाणांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आणि त्यात रामवृक्ष यादव हा जळून मेला. या रामवृक्ष यादवच्या टोळीकडून ४७ बंदुका, ७ रायफली आणि १७९ हॅण्डग्रेनेड जप्त करण्यात आले होते. याच टोळीने एका पोलिस अधीक्षकासह दोन वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचा खून केला होता. त्यानंतर पोलिसांनी चोहोबाजूंनी रामवृक्षच्या जवाहरबागेला वेढा घालून टोळीतील सदस्यांना ठार मारले. या रामवृक्षला अखिलेश सरकारचा आशीर्वाद असल्याचा आरोप त्या वेळी झाला होता. सार्‍या प्रसिद्धिमाध्यमांनी अखिलेश सरकारवर, गुन्हेगारांना संरक्षण देणारे सरकार म्हणून टीका केली होती. दुसरी घटना कुख्यात गुन्हेगार मुख्तार अन्सारी याचा पक्ष कौमी एकता दलाचे समाजवादी पक्षात विलीनीकरणावरून घडली. मुख्तार अन्सारी याच्यावर, उत्तरप्रदेशात गुंडांच्या टोळ्या चालवून हत्या, खंडणी, जमिनी बळकावणे असे अनेक गुन्हे दाखल असताना आणि तो कारागृहात असताना, त्याला जवळ करण्याची बाब अखिलेशला मुळीच पचनी पडली नाही. विशेष म्हणजे मुख्तार अन्सारीचा पक्ष समाजवादी पक्षात विलीन करण्याचा निर्णय मुलायमसिंह यादव यांनी घेतला होता. पण, अखिलेशला हा निर्णय मान्य नव्हता. मुख्तारला सपात आणण्याच्या निर्णयात शिवपाल यादव यांची भूमिका असल्याचे निदर्शनास आल्याने मुलायम, अखिलेश आणि शिवपाल यांच्यात खडाजंगी झाली. तेव्हापासून अखिलेश, आपले पिता मुलायमसिंह यांच्यावर रागावले होते. त्या वेळीही समाजवादी पक्ष हा गुन्हेगारांचा पक्ष झाल्याची टीका माध्यमांनी केली होती. ही टीका अखिलेशच्या जिव्हारी लागली होती. त्यातच पक्षाध्यक्ष शिवपाल यादव यांनी सात युवा नेत्यांना पक्षातून काढले व अखिलेशच्या मागे भक्कमपणे उभे राहणारे रामगोपाल यांच्या, विधानपरिषद सदस्य असलेल्या पुतण्याला पक्षातून काढून टाकले. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि सीबीआयमार्फत चौकशी सुरू असलेले शिवपालसमर्थक गायत्रीप्रसाद प्रजापती यांची मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्‌ी केली. पण, शिवपाल यांनी मुलायमसिंह यांचे मन वळविले आणि मंत्रिमंडळ विस्तारात प्रजापती यांना पुन्हा कॅबिनेट मंत्री करण्यात आले. आणखी बर्‍याच छोट्यामोठ्या घटना घडल्या. त्यामुळे अखिलेश यांनी आता आरपारची लढाई लढण्याचा निर्धार केलेला दिसतो. तिकडे शिवपाल यादव यांनी अखिलेशविरोधात मोहीम उघडली आहे, तर रामगोपाल यांनी शिवपालविरोधात आरोपांची मालिका आरंभिली आहे. शिवपाल म्हणतात, रामगोपाल यांनी भाजपासोबत छुपी हातमिळवणी केली आहे, तर अखिलेशने शिवपाल यांच्यावर राग काढीत, आम्ही कोणत्याही स्थितीत पक्ष फुटू देणार नाही, असे विधान केले आहे. याचा अर्थ, शिवपाल हे अखिलेशच्या विरोधात उभे ठाकले आहेत आणि त्यांना मुलायम यांचा पाठिंबा दिसतो. कारण, रविवारी मुलायम यांच्या घरी बैठकांवर बैठका सुरू असताना, मुलायम यांनी अखिलेशला केलेले फोनसुद्धा त्याने उचलले नाही. यावरून हा वाद किती पराकोटीला पोहोचला आहे, याची कल्पना येईल. अखिलेश यांच्या गटाने आतापासूनच कंबर कसली असून, काहीही झाले तरी निवडणुका अखिलेश यांच्याच नेतृत्वात होतील, असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आता या सगळ्या पार्श्‍वभूमीवर नेताजी मुलायम काय भूमिका घेतात, याकडे सर्व राजकीय निरीक्षक आणि प्रसिद्धिमाध्यमांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under अग्रलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अग्रलेख, संपादकीय (525 of 533 articles)


दिल्ली दिनांक : रविंद्र दाणी २०१७ मध्ये होऊ घातलेली उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक अपेक्षेपेक्षा अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील ही ...