संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २४ जून – संसदेचे पावसाळी…

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना

नवी दिल्ली, २४ जून – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज…

मानसरोवर भाविकांना चीनने प्रवेश नाकारला

मानसरोवर भाविकांना चीनने प्रवेश नाकारला

►रस्ता खराब असल्याचे कारण पुढे केले, गंगटोक, २४ जून…

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

►३६ विकसित देश घेणार झाडाझडती ►मुंबई हल्ल्यानंतर टाकले होते…

भारत हा सद्‌वर्तनी, सद्‌गुणी लोकांचा देश

भारत हा सद्‌वर्तनी, सद्‌गुणी लोकांचा देश

►डोनाल्ड ट्रम्प यांनाही सत्यता मान्य, वॉशिंग्टन, २४ जून –…

भारताला मिळणार २२ गार्डियन ड्रोन्स

भारताला मिळणार २२ गार्डियन ड्रोन्स

►पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा, नवी दिल्ली, २३ जून –…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

►परिवहन विभागाची हायकोर्टात माहिती, मुंबई, २४ जून – शाळेऐवजी…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:05 | अस्त: 19:19
अयनांश:
Home » उपलेख, मंथन : बाळ अगस्ती, संपादकीय, स्तंभलेखक » या दिवाळीच्या लक्ष दिव्यांचा संदेश

या दिवाळीच्या लक्ष दिव्यांचा संदेश

देशात गरिबी, बेरोजगारी, दारिद्र्य या समस्या आहेत. शेतकरी हा या देशाचा आधारस्तंभ आहे. मात्र, तो वरचेवर आत्महत्या करू लागला आहे. या सगळ्यांवर मात करता येईल. कुठे चुकले ते तपासता येईल. त्यात सुधारणा करता येतील. लॉर्ड मेकॉले यांनी केलेल्या संकल्पाप्रमाणे या देशात कातडीने काळे पण रंगाने इंग्रज असे लोक तयार झाले आहेत काय? या प्रश्‍नाचा जरा शोध घ्यावा लागेल. त्यावर तोडगा काढावा लागेल. कठोरपणे काही गोष्टी मोडून काढाव्या लागतील. भ्रष्टाचार, समाजावर प्रेम करण्याऐवजी शोषण करण्याची वृत्ती यात बदल करावा लागेल. यासाठी जागृतीची चळवळ, संघर्ष करून नव्हे तर प्रेमाने सेवेच्या आधारावर पुढे न्यावी लागेल. अंधाराचा पराभव करायचा असेल तर अंधारात तलवार फिरवून अंधाराचा शिरच्छेद करता येत नाही, अंधाराला पळी तापवून चटके देता येत नाहीत, अंधाराला खोर्‍याने उपसून खोलीबाहेर फेकून देता येत नाही. अंधाराचा पराभव जर करायचा असेल तर त्यासाठी एक पणती पेटवावी लागते. हा तेजाची उपासना करणारा देश आहे. अंधाराचा संकल्प करणारा नव्हे. एक पणती आपल्या अंतर्मनात पेटवावी लागेल.

दीप बुझे पश्‍चिमी गगन के
व्याप्त हुआ बर्बर अंधियॉंरा
किन्तु चीरकर तम की छाती
चमके हिंदुस्थान हमारा
अशा अटलजींच्या कवितेतील काही ओळी दिवाळी म्हटलं की आठवतात. ही कविता जरी खूप आधी लिहिली असली तरी ती मला आठवली होती अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला तेव्हा. पाश्‍चिमात्य देशात केवळ दहशतवादी हल्ल्यामुळे गगनचुंबी इमारतीतीलच नव्हे, तर आत्मज्ञानाचेही दिवे विझलेले आहेत. बर्बर अँधियारा व्याप्त आहे. अशा परिस्थितीत लक्ष दिव्यांनी उजळून निघालेला हिंदुस्थान अंधाराची छाती चिरून भविष्यात जगाला उन्नतीचा प्रकाशमान मार्ग दाखवेल, यात शंका नाही. एकीकडे अटलजींच्या कवितेतील हा विश्‍वास पुन्हा एकदा मनात जागवत असताना मनात अनेक प्रश्‍नांचीही मालिका दीपमालिकेसोबत उभी राहाते आहे. दिवाळी साजरी करताना या प्रश्‍नांची उत्तरे शोधणारे जागृत, तेजःपुंज मनाची तयारी आपल्याला करावीच लागणार आहे.
दिवाळीच्या या दीपमालिकेभोवती फेर धरून नाचणार्‍या अंधारापैकी एक अंधार आहे तो दहशतवादाचा. भारताला जाणवणारा हा दहशतवाद आता जगाच्या कानाकोपर्‍यात अक्राळविक्राळ जबडा उघडून, दात उचकटून विकट हास्य करत भीती दाखवत आहे. दहशतवादाचे आव्हान केवळ भारतापुरते नाही असे भारतातील नेतृत्व आधीपासून सांगत असताना जगाला ते त्यावेळी जाणवले नव्हते. आता जेव्हा निरागस मुलांचे, निरपराध नागरिकांचे गळे चिरले जात आहेत तेव्हा जगाला या दहशतवादाची जाणीव होऊ लागली आहे. व्हाईट हाऊसला हादरे बसू लागले तेव्हा भारताचे म्हणणे पटू लागले आहे. पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवाद्यांचे जणू अभयारण्य आहे अशा पद्धतीने दहशतवादी तेथे प्रशिक्षण घेत आहेत. भारतात घुसून हाहाकार माजविण्याचे नियोजन करत आहेत. मात्र, भारतीय सैन्याने इतिहासात पहिल्यांदा सरकारची भक्कम पाठराखण असल्याने सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. कसलीही ओरड, जगात तक्रार करायला ना दहशतवाद्यांना काही वाव ठेवला ना पाकिस्तानला काही संधी दिली! उलट शिक्षकाने छडी मारल्यावर हाताला कितीही लागले असले तरी व्र्रात्य पोरे जणू आपल्याला काहीच लागले नाही असा आव आणतात तसे पाकिस्तान सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही अशा पद्धतीने प्रचार करत आहे. वास्तविक अशा वेळी आपल्या जवानांना पाठिंबा देणे हे जनतेचे कर्तव्य असते. लष्कर केवळ मनगटाच्या जोरावर लढत नसते, तर त्यामागे असलेल्या मनाची दृढता त्यांना विजयी ताकद देत असते. ही विजयी ताकद देणारी दृढता देशातील जनतेच्या पाठबळाने उत्पन्न होत असते. मात्र, सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर निखळ राजकीय कारणासाठी कसलीही लायकी नसलेल्या कॉंग्रेसच्या संजय निरुपमपासून ते त्यांचेच तसेच नेते असलेल्या राहुल गांधींपर्यंत मंडळींनी लष्कराच्या कारवाईवर शंका घेणारी वक्तव्ये केली. घर का भेदी लंका ढाय अशा पद्धतीने हे घरचे भेदी देशाचा पराभव करू शकत नाही. ते करण्याची या नतद्रष्ट लोकांची तयारी आहे. यांना कायमची अद्दल घडली पाहिजे. सर्वसमान्य जनतेने तसा या दीपावलीत दृढ निर्धार केला पाहिजे. देशाच्या हिताच्या मुळावर उठलेली देशातील ही पिलावळ अशी पराभूत केली पाहिजे की पुन्हा देशाच्या लष्कराच्या सामर्थ्यावर शंका घेण्याची यांची हिंमत होता कामा नये.
भारतातील दहशवादाचा आणि विघटनवादाचा आपोआप पराभव होतो आहे. ईश्‍वर हा सत्य संकल्पाचा दाता आहे हे विधान जणू तंतोतंत खरे ठरावे अशा प्रकारे घटना घडत आहेत. काश्मीरच्या खोर्‍यात अशांततेची बिजे पेरणार्‍या पाकिस्तानला गुलाम काश्मीरमध्ये आजवर जे पेरले ते उगवताना दिसत आहे. पाकव्याप्त असलेल्या गुलाम काश्मीरमध्ये काश्मिरी लोकांना पाकिस्तानी सैन्याने, दहशतवाद्यांनी गुलामासारखे वागविल्याने तेथे आता पाकिस्तान मुर्दाबादचे नारे सुरू झाले आहेत. त्याचा परिणाम काश्मीरमध्ये फुटीरतावादी कारवाया करणार्‍या नतद्रष्ट लोकांना सर्वसामान्यांचा पाठिंबा ओसरण्यात होणार आहे. गुलाम काश्मीरमधील काश्मिरी लोकांचे जे हाल होत आहेत, आधी शिया मुस्लिमांचे आधी आणि आता तेथील सुन्नी मुस्लिमांचे जे हाल होत आहेत तसे हाल होणार असतील तर मग भारतापासून वेगळे कशाला व्हायचे? असा प्रश्‍न तेथील सामान्य जनता, अतिरेक्यांनी फूस लावलेले तरुण यांच्या मनात उभा राहात आहे. काश्मीर हे पाकिस्तानला बुमरँग  होणार आहे. भारतीय जनतेने काश्मीर प्रश्‍नाचा नीट अभ्यास करून काश्मिरींच्या मागे उभे राहिले पाहिजे.
अंधाराचे एक मोठे आव्हान आहे ते संकुचित अस्मितांचे. भारतात जातीय अस्मितांचे वादळ घोंघावत चालले आहे. सध्या महाराष्ट्रात तोच प्रकार गावागावात दिसतो आहे. गुन्हेगारीला, महापुरुषांना जातीचे रंग लावून जातवार अस्मिता जाग्या करत झुंडीच्या झुंडी निघाल्या आहेत. या देशातील समाज संघटित न होता विघटितच झाला पाहिजे, असे चिंतणार्‍या शक्ती या विघटनाला खतपाणी घालण्यासाठी वाट्‌टेल ते करायला तयार आहेत. यापासून सावध राहिले पाहिजे. आपापल्या जातीत अशा प्रकारच्या संकुचित अस्मिता जाग्या होत असतील, तर त्या थोपविण्याची जबाबदारी आपली आहे. लाट आली म्हणून प्रवाहाबरोबर वाहत जाण्याची सोपी आणि तात्कालिक आकर्षक वाटणारी घातक इच्छा आपल्या मनात जागी होता कामा नये. राष्ट्रभक्ती ही जात, पंथ, गाव, प्रान्त, भाषा अशा सर्व अस्मितांपेक्षा मोठी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
राष्ट्रभक्ती ले हृदय में, हो खडा यदि देश सारा
संकटों पर मात कर, यह राष्ट्रविजयी हो हमारा
हे विजयाचे सूत्र आहे ते कायम लक्षात ठेवले पाहिजे.
देशात गरिबी, बेरोजगारी, दारिद्य्र या समस्या आहेत. शेतकरी हा या देशाचा आधारस्तंभ आहे. मात्र, तो वरचेवर आत्महत्या करू लागला आहे. या सगळ्यांवर मात करता येईल. कुठे चुकले ते तपासता येईल. त्यात सुधारणा करता येतील. लॉर्ड मेकॉले यांनी केलेल्या संकल्पाप्रमाणे या देशात कातडीने काळे पण रंगाने इंग्रज असे लोक तयार झाले आहेत काय? या प्रश्‍नाचा जरा शोध घ्यावा लागेल. त्यावर तोडगा काढावा लागेल. कठोरपणे काही गोष्टी मोडून काढाव्या लागतील. भ्रष्टाचार, समाजावर प्रेम करण्याऐवजी शोषण करण्याची वृत्ती यात बदल करावा लागेल. यासाठी जागृतीची चळवळ संघर्ष करून नव्हे, तर प्रेमाने सेवेच्या आधारावर पुढे न्यावी लागेल. अंधाराचा पराभव करायचा असेल तर अंधारात तलवार फिरवून अंधाराचा शिरच्छेद करता येत नाही, अंधाराला पळी तापवून चटके देता येत नाहीत, अंधाराला खोर्‍याने उपसून खोलीबाहेर फेकून देता येत नाही. अंधाराचा पराभव जर करायचा असेल तर त्यासाठी एक पणती पेटवावी लागते.
हा तेजाची उपासना करणारा देश आहे. अंधाराचा संकल्प करणारा नव्हे. एक पणती आपल्या अंतर्मनात पेटवावी लागेल. ही पणती आत्मभानाची, देशभक्तीची, स्वाभिमानाची, राष्ट्रीय अस्मितेची असेल. या पणतीच्या भोवती आयुर्विम्याच्या लोगोप्रमाणे आपले दोन्ही हात संरक्षणासाठी धरावे लागतील. हे हात केवळ पाच बोटांची आकृती असलेले नव्हे तर हे हात सेवेचे हात असतील. हा समाज माझा आहे आणि हा देश माझा आहे. या देशाचे आणि या समाजाचे जे प्रश्‍न आहेत ते माझे प्रश्‍न आहेत असे मानून या समाजासाठी, देशासाठी पडेल ती सेवा आपापल्या परीने करण्यासाठी निरपेक्ष मनाने तयार व्हावे लागेल.
आभाळ फाटले तेथे
आम्ही आकाश होऊ
अंधार मातला तेथे
जीवनप्रकाश देऊ
हा संकल्प मनामनात जागवावा लागेल. या संकल्पाच्या आधारे आपण उभे राहू तर येणारा काळ आपला आहे. जगातील जीवनरचना करण्याचे सर्व प्रयत्न पराभूत झाले आहेत. जगात बर्बर अंधःकार पसरतो आहे. अशावेळी जगाचे लक्ष मार्गदर्शनासाठी आपल्याकडे लागले आहे. जगातल्या मानवतेला पावन करणारे जीवनदर्शन आपल्याकडे आहे पण ते शब्दात, पुस्तकात, भाषणात सांगून उपयोगाचे नाही. जगातील मानवतेला पावन करणारे हे जीवनदर्शन प्रत्यक्ष जगून दाखवावे लागणार आहे. हे जीवनदर्शन दाखविण्यासाठी सज्ज होणे हाच दीपावलीचा संदेश आहे.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under उपलेख, मंथन : बाळ अगस्ती, संपादकीय, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उपलेख, मंथन : बाळ अगस्ती, संपादकीय, स्तंभलेखक (843 of 865 articles)


संघ परिवार, भाजपा इत्यादी तथाकथित उजव्या विचारसरणीशी लढण्यासाठी सेक्युलर मंडळी ज्या बुरुजांकडे मोठ्या आशेने बघत होती, त्यातील आणखी एक बुरूज ...