ads
ads
राहुल गांधींचे आरोप खोटे

राहुल गांधींचे आरोप खोटे

►दसाँ एव्हिएशनच्या सीईओचे स्पष्टीकरण ►रिलायन्स कंपनीला आम्ही निवडले, नवी…

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

►नॅशनल हेरॉल्ड इमारत रिकामी करण्याचे प्रकरण, नवी दिल्ली, १३…

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर – भारतातून दरवर्षी सुमारे १…

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

►रोहिंग्या प्रकरण ►नऊ वर्षांपूर्वी दिला होता पुरस्कार, नेईपिडॉ, १३…

स्टॅन ली यांचे निधन

स्टॅन ली यांचे निधन

►स्पायडर मॅन, हल्क यांचे जनक, न्यू यॉर्क, १३ नोव्हेंबर…

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

मुंबई, १३ नोव्हेंबर – अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी…

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

►कुणी ‘ब्र’ देखील काढला नाही : मुनगंटीवारांचा दावा, मुंबई,…

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

►कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण, मुंबई, १३ नोव्हेंबर – कोरेगाव…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:
Home » उपलेख, श्रीनिवास वैद्य, संपादकीय, स्तंभलेखक » राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…

राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…

श्रीनिवास वैद्य |

राज्यातील भाजपा युती सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली म्हणून, तरुण भारतच्या वतीने काही मान्यवरांच्या मुलाखती ारहराींल.लेा या वेवसाईटवरून लाईव्ह प्रसारित करण्यात येत आहेत. त्यात नुकतीच अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत प्रसारित झाली. त्यात त्यांनी २०१४ साली केंद्रात भाजपाचे राज्य आल्यानंतर देशात काय बदल झाला ते सांगताना, एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, २०१४ नंतर या देशातील सर्वसामान्य जनतेचा राजकीय व्यवस्थेवरील विश्‍वास वाढला आहे. या एका वाक्यात फार मोठा आशय आहे. लोकशाही राज्यव्यवस्था स्वीकारलेल्या देशात जर जनतेचा त्या व्यवस्थेवरच विश्‍वास नसेल, तर ती आणिबाणीची परिस्थिती समजायला पाहिजे. अशी अवस्था येणे, हे त्या लोकशाही व्यवस्थेचे अपयश नसून, या लोकशाही व्यवस्थेमुळे सत्तेत आलेल्या राजकीय पक्षाचे दारुण अपयश असते आणि या अशा अपयशाचे शंभर टक्के धनी सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस पक्ष आहे. राष्ट्रीय प्रसारमाध्यमांवर, गळ्याच्या शिरा ताणून वाट्‌टेल तसे बोलणारे असोत, वा साळसूदपणाचा आव आणून मोठ-मोठ्या वृत्तपत्रांत लेख लिहून दुसर्‍याला अनाहूत अक्कल पाजणारे असोत, की या देशाला स्वातंत्र्य आमच्या पक्षाने मिळवून दिले, या देशात लोकशाहीची, प्रागतिक मूल्ये आमच्या नेत्यांनी रुजवली, अशी ठेकेदारीची भाषा बोलणार्‍या तमाम कॉंग्रेसी नेत्यांनी याची दखल घेतली पाहिजे. त्यांनी याचा जाब द्यायला हवा की, जर तुमच्या पक्षाने या देशात लोकशाहीची मूल्ये रुजवलीत, तर मग जनतेचा राजकीय व्यवस्थेवरील विश्‍वास कसा काय उडाला? मतदान करून एखादा राजकीय पक्ष सत्तेत बसविणे, एवढे झाले की संपले का लोकशाहीचे काम? घटनाकारांना इतकेच अभिप्रेत होते का? किती दिवस तुम्ही, प्रत्येक वेळी लाल बहादूर शास्त्रींचे उदाहरण देणार?
मध्यंतरी, दिवंगत विलासराव देशमुख यांचे सुपुत्र व अभिनेते रितेश देशमुख यांनी कुठल्याशा निमित्ताने सांगितले होते की, देशातील अन्नधान्याचा तुटवडा बघता, भारतीय जनतेने आठवड्यातून एक दिवस उपवास करण्याचे लाल बहादूर शास्त्री यांनी आवाहन केले होते. माझी आई आजही तो उपवास करीत असते. जनतेचा राजकीय व्यवस्थेवर असलेल्या विश्‍वासाचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. एक राजकीय नेता, जो पंतप्रधान आहे, जनतेला एक दिवस उपाशी राहण्याचे आवाहन करतो आणि जनताही त्याला मनापासून प्रतिसाद देत, अन्नत्याग करते, ही विलक्षण घटना आहे. त्यानंतरच्या कुठल्या कॉंग्रेसी नेत्याने हा चमत्कार करून दाखविला आहे, ते कॉंग्रेसने सांगावे. उलट, कॉंग्रेस आणि तिच्या पिलावळीतील पक्षांनी असा काही राज्यकारभार करून दाखविला की, दिवसेंदिवस जनतेचा या राजकीय व्यवस्थेवरचा विश्‍वास कमी कमी होत गेला. तो इतका रसातळाला गेला की, कुठलाही राजकीय नेता हा भ्रष्टाचारी व चारित्र्यहीन असतो, अशी ठाम समजूत जनतेची झाली. राज्यकर्त्यांनाही त्याचे काही वाटेनासे झाले. देशाची आर्थिक प्रगती किती झाली, सामाजिक सुधारणा किती झाल्यात, या गोष्टींवर वादविवाद होतील; पण राजकीय नेते, राजकीय पक्ष आणि राजकीय व्यवस्था यांची ही इतकी ढासळलेली प्रतिमा निर्माण करण्याचे ९९ टक्के श्रेय कॉंग्रेसलाच द्यावे लागेल.
२०१४ साली सत्तेत आलेल्या भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही प्रतिमा पुसण्याचे फार मोठे कार्य केले आहे. ते एका उदाहरणावरून स्पष्ट होईल. देशात एलपीजी सिलेंडर अनुदानित किमतीवर मिळते. अनुदानाची रक्कम केंद्र सरकार वहन करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केले की, ज्यांना शक्य आहे त्यांनी हे अनुदानित सिलेंडर घेण्याचे नाकारावे. पूर्ण किंमत देऊन सिलेंडर विकत घेण्याचे स्वीकारावे. हे जे त्यागलेले अनुदानित सिलेंडर आहे, ते अत्यंत गरजू कुटुंबाला देण्यात येईल. आपल्या सरकारवर लोकांचा किती विश्‍वास आहे, याची ही नरेंद्र मोदी यांची एक प्रकारे चाचपणी होती. सुमारे १ कोटी १० लाख (२०१६ चे आकडे) लोकांनी ही सब्‌सिडी सोडली. हे उगीच नाही घडले. जबरदस्ती नसताना लोकांनी आपणहून सब्‌सिडी सोडली. ही घटना सर्वसामान्य जनतेचा सरकारवर किती विश्‍वास आहे, हे दर्शविते. कुठल्या कॉंग्रेस नेत्यात ही धमक आहे ते सांगावे. राजकीय व्यवस्थेवरचा विश्‍वास असा हळूहळू परत कायम करण्याचे काम मोदींचे सरकार करीत आहे. त्याचे दुसरे चपखल उदाहरण म्हणजे नोटबंदी.
महाराष्ट्रातही लोकांचा राज्य शासनावरचा विश्‍वास उडाला होता. १५ वर्षांचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे सरकार म्हणजे राज्याच्या इतिहासाला लागलेला फार मोठा डाग आहे. २०१४ साली राज्यातही भाजपाचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. त्यांनीदेखील आपल्या पारदर्शी आणि जनताभिमुख कारभारातून राजकीय व्यवस्थेवर जनतेचा विश्‍वास पुन्हा बसावा म्हणून प्रयत्न सुरू केलेत. आमच्या कार्यकाळात आम्ही किती आर्थिक प्रगती करतो, यापेक्षा लोकशाही व्यवस्थेवर जनतेचा विश्‍वास किती आहे, याची काळजी सत्ताधार्‍यांनी केली पाहिजे. सरकार येतील-जातील, पण ही लोकशाही व्यवस्था या देशात तिच्या खर्‍या स्वरूपात रुजणे, हे अधिक महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. ते तसे नसते तर आपल्या समोर, आर्थिक संपन्नतेच्या वरच्या श्रेणीत असलेले चीन, सौदी अरब वगैरे हुकूमशाही देश आदर्श राहिले असते. ते आमचे आदर्श नाहीत. आमच्या रक्तातच लोकशाही आहे. ती फक्त एका वेगळ्या स्वरूपात, रचनेत आम्हाला इथे रुजवायची आहे. ते काम कॉंग्रेसच्या कुठल्याच सरकारने केलेले नाही. लोकशाही रुजविण्याला सर्वात मोठा अडथळा घराणेशाहीचा असतो. आम्ही हा अडथळाच अधिकाधिक पुष्ट करीत गेलो. परवा, पत्रकारांच्या दिवाळी-मिलन कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा उच्चार केला. राजकीय पक्षांमधील लोकशाहीचीदेखील पत्रकारांनी चर्चा केली पाहिजे, असे ते म्हणाले. भाजपाचे उदाहरण घ्यायचे, तर १९९८ पासून ८ वेगवेगळ्या व्यक्ती अध्यक्ष झाल्या आहेत. आज अमित शाह अध्यक्ष आहेत. पुढचा अध्यक्ष कोण, कुणालाच माहीत नाही. तो भाजपाचा एक कार्यकर्ता असेल, हे मात्र नक्की! तिकडे कॉंग्रेसची काय स्थिती आहे? १९९८ पासून सोनिया गांधीच अध्यक्ष आहेत. त्यांच्यानंतर कोण होणार? याचे उत्तर सर्वांना माहीत आहे. स्वत:ला लोकशाहीवादी पक्ष म्हणवून घेणार्‍यांची ही स्थिती आहे. नितीन गडकरी नेहमी सांगत असतात की, भ्रम आणि वास्तव यात अंतर आहे. भाजपाबाबत जो भ्रम पसरविला जात असतो की, या लोकांचा लोकशाहीला विरोध आहे, तेे संविधानाला मानत नाहीत. कॉंग्रेसचा एक फडतूस नेता मणिशंकर अय्यर तर नेहमी म्हणायचा की, भाजपा सत्तेत आली की, त्यानंतर या देशात कुठलीही निवडणूक होणार नाही. झाले उलटेच. प्रत्येक निवडणूक नियत वेळीच झाली आणि त्यातील ९० टक्के भाजपानेच जिंकल्या.
लाल बहादूर शास्त्रींच्या वेळेस, जनतेचा येथील राजकीय व्यवस्थेवर असलेला विश्‍वास, भाजपाचे नरेंद्र मोदी सरकार अशा रीतीने पुन्हा प्रस्थापित करीत आहे. हे या सरकारचे महनीय कार्य नाही काय? १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या खंडप्राय देशात, असे वातावरण निर्माण करणे, खरेतर फारच कठीण आहे. यात राजकीय नुकसानही होण्याची शक्यता असते. ती जोखीम नरेंद्र मोदी यांनी पत्करली. पात्र शेतकर्‍यांनाच कर्जमाफीचा फायदा मिळेल, असे घोषित करून त्यादृष्टीने कठोर कारवाई करणार्‍या देवेंद्र फडणवीस यांनीही हा धोका पत्करला आहे. परंतु, जे देशाच्या, राज्याच्या हिताचे आहे, त्याला प्राधान्य असले पाहिजे. कारण देश किंवा राज्य हे राजकीय पक्षांपेक्षा कधीही श्रेष्ठ असतात. हा विवेक या राज्यकर्त्यांजवळ आहे. कारण हे दोघेही भाजपा या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते (प्रॉडक्ट) आहेत आणि रा. स्व. संघाचे हिंदुत्व हा भाजपाचा जीवनरस आहे. ही साखळी आपण लक्षात ठेवली पाहिजे.

http://tarunbharat.org/?p=38377
Posted by : | on : 3 Nov 2017
Filed under : उपलेख, श्रीनिवास वैद्य, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

1 Responses to

राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…

 1. S. V. RANADE Reply

  3 Nov 2017 at 7:50 pm

  Chan lekh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

  छायाचित्रातून

 • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
 • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
 • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
 • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
 • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, श्रीनिवास वैद्य, संपादकीय, स्तंभलेखक (1297 of 1314 articles)


असताना बाळासाहेबांशी दगाबाजी करत त्यांनी वेगळी चूल मांडली. मग कॉंग्रेसचा घरठाव मोडून बाहेर पडत त्यांनी स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन केला. ...

×