ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक » राफेल, राहुल गांधी आणि वस्तुस्थिती

राफेल, राहुल गांधी आणि वस्तुस्थिती

श्यामकांत जहागीरदार |

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या राफेल विमानाच्या खरेदी प्रकरणावरून मोदी सरकारविरुद्ध एकटे राहुल गांधी टीका करीत आहेत. पण, त्यांच्या या टीकेत अन्य विरोधी पक्ष सहभागी नाहीत. याचा अर्थ काय? ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी अविश्‍वास ठरावाच्या वेळी राफेलबाबत नावे घेऊन टीका केली होती, तो शुद्ध बालीशपणा होता, अशी प्रतिक्रिया विरोधकांनीही दबक्या आवाजात का होईना, व्यक्त केली आहे. एकतर राहुल गांधींना संपुआच्या काळात राफेल विमाने किती किमतीत खरेदी करण्याचा प्रस्ताव होता, हेच माहीत नाही. पाचवेळा विविध ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या किमती सांगितल्या आहेत. त्यावरून कोणती किंमत खरी असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यावरून केवळ राफेल खरेदीत घोटाळा झाला, हे एकच पालुपद राहुल गांधी यांचे चालू आहे. एकतर विमाने खरेदीबाबत करार कसे होतात, हेच राहुल यांना माहीत नाही. केवळ विमानाची किंमत वेगळी. पण, त्यावर जी विविध आयुधे लावली जातात, त्याची किंमत वेगळी असते. याबद्दल राहुल गांधींनी चकार शब्द काढलेला नाही. कोणते क्षेपणास्त्र किती किमतीचे आहे, हे त्यांना माहीत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपुआच्या काळात राफेल सौदाच झाला नव्हता. पण, राहुल गांधी वारंवार आमच्या वेळी इतक्या कमी किमतीत सौदा झाला होता, असे खोटे बोलत आहेत. त्यांचा हा खोटेपणा विरोधकांच्या आणि संरक्षण क्षेत्राच्या जाणकारांच्या लक्षात आला आहे. राफेलचा करार ज्यावेळी रालोआच्या काळात झाला, तेव्हा भारतीय भूभाग, तापमान आणि गरजा अशा नव्या पंधरा बाबी नव्या राफेलमध्ये असणार आहेत. कारगिल युद्धात अतिशय उंचीवरून शत्रूंवर मारा करणार्‍या विमानांची गरज भासली होती व तेव्हापासून अत्याधुनिक विमानांचे अनेक स्क्वाड्रन्स निर्माण करण्याबाबत पावले उचलण्याची मागणी वाढत होती. पण, काँग्रेसच्या नेतृत्वात असलेल्या संपुआच्या काळात अतिशय दुर्लक्ष करण्यात आले आणि सारे प्रशासन भ्रष्टाचारात आकंठ बुडाले. घोटाळ्यांची मालिका समोर आली. कारगिल युद्ध १९९९ साली झाले. पण, काँग्रेसची झोप उघडली ती २०१२ साली. पण, धड करार तर करायचा होता. तो काही अंतिम स्वरूपापर्यंत पोहोचलाच नाही, ही वस्तुस्थिती आहे. १९९९ ते २०१४ हा पाच वर्षांचा कालावधी वाया गेला. मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी प्रकर्षाने सुरक्षा आणि अत्याधुनिक आयुधांच्या खरेदीवर भर दिला. त्यासाठी एका समितीला ४० हजार कोटी रुपयांच्या संरक्षण खरेदीसाठी मान्यता दिली. राफेल हाही त्यातीलच एक करार. अतिशय पारदर्शी पद्धतीने दोन देशांमध्ये हा करार झाला. त्याच्या अटी व शर्ती ठरविण्यात आल्या. पाच वर्षांत कोणत्याही वस्तूंचे दर वाढतात. पण, मोदी सरकारने नऊ टक्के कमी दराने केवळ विमानाचा सौदा केला. त्यानंतर त्यावर लावण्यात येणारी आयुधे, या आयुधांचे नियंत्रण, दिशादर्शन करणारी उपकरणे अशा सर्व बारीकसारीक बाबींची पूर्तता नव्या राफेल विमानांमध्ये होईल, अशी व्यवस्था केली. राफेल विमानाचे हे वैशिष्ट्य आहे की, अन्य विमाने केवळ दोन किंवा तीन उड्डाणे करण्याची क्षमता ठेवतात. तर राफेल विमान इंधन भरून, आयुधे घेऊन पाच वेळा परत येऊन पुन्हा उड्डाण करू शकते. यामुळे आपल्याला हव्या असलेल्या विमानांच्या संख्येतच २५ टक्के अधिक विमानांची क्षमता निर्माण होते. या सर्व बाबी राहुल गांधी यांना माहीत नाही. आता त्यात बर्‍याच कालावधीनंतर संपुआच्या काळातील संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅन्टोनी यांनी उडी घेतली. ती सुद्धा राहुलच्या सांगण्यावरून. ते काय बोलणार? अ‍ॅन्टोनी यांना संरक्षणविषयक करार काय असतात, हे माहीत असताना ते सुद्धा राहुल गांधी यांचीच री ओढत आहेत. कारण, विरोधक समर्थन देण्यास नकार देत आहेत. त्याचीही कारणे वेगळी आहेत. अविश्‍वास ठरावाच्या वेळी आपण फ्रान्सच्या राष्ट्रपतींसोबत बोललो, त्यावेळी त्यांनी या करारात कोणतीही बाब गोपनीय नाही, असे मला सांगितल्याचे ठोकून दिले. केवळ सनसनाटी निर्माण करणारे हे राहुल गांधींचे नाटक विरोधक आणि सारा देश पाहात होता. दुसर्‍याच क्षणी फ्रान्सकडून खुलासा आला की, गोपनीयतेबाबत अशी बोलणीच झाली नाही. यात त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनाही गोवले. त्यांच्यासमोर ही चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावरून तर राहुल हे खोटे बोलत आहेत, हे स्पष्टच दिसले. डॉ. मनमोहनसिंग यांनी या मुद्यावर तेव्हापासून बोलण्याचेच टाळले आहे. आता राहुल गांधी राफेलवर भाषणे देत आहेत आणि विरोधक मजा पाहात आहेत. राहुल गांधींना आगामी निवडणुकीनंतर पंतप्रधान करण्याचे स्वप्न मल्लिकार्जुन खडगे आणि अन्य नेते पाहात आहेत. जी व्यक्ती अन्य देशाच्या राष्ट्रपतींचे नाव घेऊन वाट्टेल तसे बोलतो, त्याची पंतप्रधान होण्याची लायकी तरी आहे का? यामुळेच विरोधक राहुल गांधींना जवळ उभे करण्यास तयार नाहीत. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी तर राहुलला सर्वात मोठा विदूषक म्हणून संभावना केली आहे. अन्य प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांकडे जाऊन काही जागा देता का जागा अशी याचना करताना हा पक्ष दिसत आहे. उत्तर प्रदेशात तर काँग्रेसला सोबत घेण्याची मायावतींची तयारी नाही. ही आहे, काँग्रेसची स्थिती. म्हणे महागठबंधन करणार? पण कुणासोबत? सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे. तसा हक्कच त्यांना संविधानाने दिला आहे. पण, देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व धोक्यात आणणारी विधाने जर विरोधी पक्ष करीत असेल तर या देशातील जनता सुबुद्ध आहे. ती कधीही अशा प्रकारांना थारा देणार नाही, हे राहुल गांधींनी जाणून घ्यावे. आज मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाला साडेचार वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत मोदींनी किंवा त्यांच्या सरकारने भ्रष्टाचार केला, असे एकही उदाहरण नाही. विरोधकांनाही त्यात काहीच सापडले नाही. म्हणून आता राफेलवरून पंतप्रधान मोदी यांची वैयक्तिक निंदानालस्ती करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी चालविलेला दिसतो. स्वातंत्र्य मिळाल्यापासून अगदी जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधीपर्यंतच्या काँग्रेसच्या नेत्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार हा शिगेला पोहोचला होता. सारा देश त्याचा साक्षीदार आहे. नेहरूंच्या काळात तर जीप खरेदी प्रकरणात कितीतरी मोठा घोटाळा झाला होता. कारण, त्यावेळी सेकंडहॅन्ड जीप खरेदी करून त्या नव्या खरेदी केल्याचे नेहरू सरकारने दाखविले होते. तेव्हापासून ही भ्रष्टाचाराची कीड काँग्रेसला लागली आहे. बोफोर्स घोटाळ्यात राजीव गांधींना सत्ता गमवावी लागली, म्हणून राहुल गांधींनी राफेलचे प्रकरण बाहेर काढले. या मुद्यावर आपण भाजपाला घेरू आणि त्यांची सत्ता हिरावून घेऊ असे कदाचित राहुलला वाटले असेल. मूर्खाच्या नंदनवनात वावरण्यासारखेच हे आहे. पण, राहुलने एक लक्षात ठेवावे. मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. कदाचित ही कोणाला अतिशयोक्ती वाटत असली तरी ही वस्तुुस्थिती आहे. देशाचा बहुमुखी विकास आणि गरीब जनतेचे कल्याण हा पंतप्रधान मोदी यांचा अजेंडा आहे. त्यामुळेच खरी चिंता राहुल गांधी यांना लागली आहे. राफेल विमानांची देशाला कशी गरज आहे, ही विमाने आल्यानंतर आपले हवाईदल कसे संरक्षणसज्ज होणार आहे, हे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल धनोआ यांच्यासह संरक्षण क्षेत्रातील अनेक तज्ञांनी स्पष्ट केले आहे. संरक्षण संशोेधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) निवृत्त महासंचालक डॉ. व्ही. के. अत्रे यांनीही राफेल मुद्यावरून निर्माण केले जात असलेले वादंग निरर्थक असून युद्धसामुग्रीच्या खरेदीबाबतच्या सर्वच बाबी गोपनीय ठेवण्याची तसेच या मुद्याचे राजकारण न करण्याची सूचनाही अत्रे यांनी केली आहे. काँग्रेसने याचे भान ठेवण्याची गरज आहे. राहुलच्या बालीश आरोपांची भाजपा त्यामुळेच पर्वा करीत नाही. कर नाही त्याला डर कशाला अशी म्हण आहे. हाथी चले बाजार तो…अशी आणखी एक म्हण आहे. त्यामुळे विरोधकांची भूमिका कशी असावी, याची जाणिव राहुल गांधी यांनी ठेवली पाहिजे.

https://tarunbharat.org/?p=62276
Posted by : | on : 20 Sep 2018
Filed under : उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक (589 of 1509 articles)


जनतेच्या आशीर्वादाने मिळालेल्या मुख्यमंत्रिपदाआडून मिळालेला सरकारी बंगला सोडतानाही त्या बंगल्याच्या भिंती फोडून फोडून साहित्य घेऊन जावेसे वाटले ते अखिलेश यादव ...

×