ads
ads
काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » राहुलच्या एचएएल सभेवरून वादळ!

राहुलच्या एचएएल सभेवरून वादळ!

राहुल गांधी एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि ते पंतप्रधानपदाची स्वप्ने रंगवीत आहेत. अशा व्यक्तीने आपली वर्तणूक कशी ठेवावी, याचे काही संकेत आहेत. देशाच्या संरक्षणक्षेत्राशी निगडित विषय असेल, तर मग आणखीच संवेदनशील दृष्टीने त्याकडे पाहायला हवे. पण, राहुल गांधी यांना यापैकी कशाचेच काहीही देणेघेणे नाही, असेच दिसते. ते सारेच विषय राजकारण समजून पोरखेळ करीत आहेत. बंगलोरमधील हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)मध्ये त्यांनी जो तमाशा केला, तो देशातील कोणत्याही सुजाण माणसाला भावणारा नाही. राफेल करारावरून त्यांनी सध्या एकाकी रान उठविले आहे. दुसरा कोणताही पक्ष त्यांना मदत करायला तयार नाही. जे अन्य पक्षांना समजते, ते राहुल गांधींच्या अजूनही लक्षात येऊ नये, याचेच आश्‍चर्य वाटते. परवा त्यांनी एचएएलमध्ये बळजबरीने घुसून जे वर्तन केले, ते एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय पक्षाला अशोभनीय आहे. वास्तविक पाहता, एचएएलच्या कर्मचारी संंघटनेने राहुल गांधींना बोलावले नव्हते. एचएएल ही सरकारी कंपनी असल्यामुळे आम्हाला येथे कोणताही राजकीय नेता नको, अशी स्पष्ट भूमिका ऑल इंडिया एचएएल ट्रेड युनियन को-ऑर्डिनेशन कमिटीचे सरचिटणीस सूर्यदेव चंद्रशेखर यांनी घेतली होती व राहुल गांधींच्या सभेला जर संघटनेचा कुणी सदस्य उपस्थित राहिल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आधीच जाहीर केले होते. ही गोष्ट काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना माहीत होती. अशी विरोधाची स्थिती असताना, कोणताही नेता तेथे गेलाच नसता. पण, राहुल गांधी तेथे गेले आणि पोरखेळ केलाच. प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांचे म्हणणे आहे की, काही निवृत्त कर्मचार्‍यांनी राहुल गांधींची सभा आयोजित केली होती. त्यामुळे आम्ही पोलिस परवानगी वगैरे काही काढली नाही. आम्ही ही सभा आयोजित केली नव्हती. कर्मचारी नेते चंद्रशेखर यांचे म्हणणे आहे की, काँग्रेस पक्षाचे काही नेते आमच्याकडे आले होते आणि अशी सभा तुम्ही आयोजित करा, अशी विनंती केली होती. ती आम्ही सपशेल धुडकावून लावली. त्यांचे म्हणणे होते की, एक छोटेखानी सभा एचएएल कंपनीच्या बाहेर व्हावी. पण, संघटनेने त्यावर काहीही निर्णय दिला नव्हता. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला अशा सभा घेण्याची अनुमतीच देत नाही. तिकडे एचएएलच्या प्रवक्त्यानेही खुलासा करताना सांगितले की, काँग्रेसने अशी सभा घेण्यासाठी कंपनीकडे कोणताही विनंती अर्जच दिला नव्हता. यावरून राहुल गांधी यांची सभा कुणी आयोजित केली होती, यावरून आता वादळ उठले आहे. यावरून काँग्रेसने काही निवृत्त कर्मचार्‍यांचे नाव पुढे करून हा खेळ केल्याचे समोर आले आहे. कर्नाटकमध्ये कुमारास्वामी आणि काँग्रेस युतीचे सरकार आहे. पण, एवढ्या संवेदनशील मुद्यावर मुख्यमंत्री कुमारास्वामी यांनी धारण केलेले मौन अचंबित करणारे आहे. याचा सरळ अर्थ असा की, कुमारास्वामी सरकारने राहुल गांधी यांना सभा घेण्याची परवानगी दिली. आता कर्मचारी संघटना सभेत भाग घेणार्‍या कर्मचार्‍यांवर काय कारवाई करते, हे दिसणारच आहे. पण, या घटनेवरून राहुल गांधी हे कसे अपरिपक्व नेते आहेत, हे पुन्हा दिसून आले. कर्मचारी संघटनेने असाही प्रश्‍न उपस्थित केला आहे की, ज्या वेळी काँग्रेसचे दहा वर्षे सरकार होते तेव्हा कर्मचार्‍यांसाठी त्यांनी काय केले? आमच्या मागण्या सोडविल्या नाहीत. मागे काँग्रेसने अशी अफवा पसरविली होती की, राफेल करारात एचएएलला डावलल्यामुळे कंपनीचे शेकडो कर्मचारी बेकार होणार आहेत. इतके बेजाबदारीचे विधान काँग्रेस कशी काय करू शकते, हाच मोठा प्रश्‍न आहे. एचएएलने देशाच्या संरक्षणदलाला बळ देण्यासाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली आहे, यात कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. पण, तो काळ वेगळा होता. मोदी सरकार आल्यानंतर हवाई संरक्षणासारख्या विषयाकडे त्यांनी आवर्जून लक्ष दिले. कारण, आज आमच्याकडे वायुसेनेच्या लढाऊ विमानांचे ४२ स्क्वाड्रन्स हवे असताना, ते केवळ ३१-३२ वर आले आहेत. ही गरज तातडीने दूर करण्यासाठी मोदी सरकारने काही धाडसी पावले उचलली. ‘मेक इन इंडिया’ योजनेंतर्गत खाजगी संस्थांना संरक्षणविषयक उपकरणे आणि विमाने भारतातच तयार व्हावीत यासाठी ४९ टक्के विदेशी गुंतवणुकीला मान्यता दिली. आज केवळ एचएएल नव्हे, तर संरक्षण क्षेत्रात काम करणार्‍या दर्जेदार खाजगी कंपन्या अस्तित्वात आल्या आहेत, ज्या आजही संरक्षण दलाला विविध विमानांचे सुटे भाग व अन्य संसाधने देत आहेत. वायुसेनाप्रमुखांनी स्पष्टच केले आहे की, एचएएलचे काम उत्कृष्ट आहे यात वाद नाही. पण, त्यांना काही मर्यादा आहेत. त्यांच्याकडे आधीच स्वदेशनिर्मित तेजस आणि ध्रुव हेलिकॉप्टर बांधणीचे काम दिले आहे. पण, त्याची पूर्तता करण्याचा कालावधी केव्हाच निघून गेला आहे. अगदी तेजसची पूर्तता करण्याचा दिनांक पाच वर्षे मागे गेला आहे. कामाचा ताण वाढला आहे. अशा वेळी दर्जेदार खाजगी संस्थांकडे काम सोपविण्याचा निर्णय झाला. यापूर्वीच रशियासोबत आपला कामोव्ह हेलिकॉप्टर्स बांधणीबाबत करार झाला. ६० हेलिकॉप्टर्स रशिया उड्डाण स्थितीत देणार आहे आणि उर्वरित १४० एचएएलमध्ये बांधली जाणार आहेत. हा करार रशिया व भारत यांच्याच दरम्यान झाला आहे. यावरून एचएएलचे कर्मचारी बेकार होणार, ही काँग्रेसची अफवा किती खोटी आहे, याची कल्पना यावी. तेजसलाच तयार करण्यासाठी विलंब होत असताना, खाजगी कंपन्यांना काम देण्यात गैर काय? आज देशात भारत डायनॅमिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत अर्थ मूव्हर्स, डीआरडीओ, गोवा शिपयार्ड, गार्डन रीच शिपबिल्डर्स, माझगाव डॉक्स, मिश्र धातू निगम व ऑर्डिनन्स फॅक्टरीज बोर्ड अशा भारतीय कंपन्या आहेत. त्यात एचएएल हीसुद्धा एक आहे. या सर्व कंपन्यांकडे संरक्षणविषयक विविध उपकरणे, यंत्रे तयार करण्याचे काम आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. याशिवाय भारतात संरक्षण उत्पादन करणार्‍या सात भारतीय कंपन्या आहेत. त्यांच्याकडे संरक्षण दलासाठी विविध आयुधे निर्माण करण्याची कंत्राटे दिली आहेत. टाटा तर हर्क्युलस विमाने तयार करते. या सातमध्ये मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीजपण आहे. २०१२ साली काँग्रेसने हीच राफेल विमाने तयार करण्याबाबत मुकेशच्या कंपनीशी करार केला होता. आज भारतासमोर सर्वात मोठे आव्हान आहे, आमच्या स्क्वाड्रन्स वाढविण्याचे. एचएएलची क्षमता त्यासाठी पुरेशी नाही. म्हणूनच खाजगी क्षेत्र संंरक्षण उत्पादनासाठी खुले करण्यात आले आहे. याची जाणीव राहुल गांधी यांनी ठेवावी आणि नंतरच पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहावीत!

https://tarunbharat.org/?p=65813
Posted by : | on : 15 Oct 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (118 of 779 articles)


वाळके | देशातील जुन्या नामवंत विद्यापीठांपैकी एक अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील एका घटनेवरून सध्या देशात वादळ उठले आहे. अतिरेकी मन्नान वानी ...

×