ads
ads
दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

►विजयादशमी उत्सवात सरसंघचालकांचे ठाम प्रतिपादन, नागपूर, १९ ऑक्टोबर –…

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

►उच्च न्यायालयाला भीती, मुंबई, १९ ऑक्टोबर – ‘मी टू’…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक » राहुल गांधींसमोरील आव्हान

राहुल गांधींसमोरील आव्हान

श्यामकांत जहागीरदार |

निवडणूक आयोगाने छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरममधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यामुळे राजकीय हालचालींना आता अधिकच वेग आला आहे. या निवडणुका देशातील सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्या, तरी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या भाजपा आणि काँग्रेस यांच्या दृष्टीने या निवडणुका अस्तित्वाची कसोटी पाहणार्‍या ठरणार आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांनी कोणाला दिवाळी करण्याची संधी मिळते आणि कोणाचे दिवाळे निघते, याचा निर्णय ११ डिसेंबरला होणार्‍या मतमोजणीने होणार आहे.
भाजपा आणि काँग्रेस या दोघांनीही या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. या पाचपैकी छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता आहे, तर मिझोरमध्ये काँग्रेसची. ४० सदस्यीय मिझोरम विधानसभेतील सत्ता काँग्रेसने कायम ठेवली, तरी त्याचा देशाच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण मिझोरम हे ईशान्य भारतातील अतिशय छोटेसे असे राज्य आहे. मात्र, मिझोरमधील सत्ता गमावली तर मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. कारण सध्या देशातील फक्त अडीच राज्यांतच काँग्रेसची सत्ता आहे. यात पंजाब, मिझोरम आणि कर्नाटकचा समावेश आहे. काँग्रेसने कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलरला सरकार बनवण्यासाठी पाठिंबा दिला. कुमारस्वामी सरकारमध्ये काँग्रेस दुय्यम भूमिकेत आहे. त्या अर्थाने कर्नाटकमध्ये काँग्रेसची अर्धीच सत्ता आहे.
अशा स्थितीत मिझोरमसारखे राज्य गमावणेही काँग्रेसला अतिशय महागात पडू शकते. दुसरीकडे ईशान्य भारतातील सातपैकी सहा राज्यांत सध्या भाजपा आणि मित्रपक्षांची सत्ता आहे. मिझोरमची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पूर्ण तयारी केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आणि ईशान्य भारताचे प्रभारी राम माधव त्या दृष्टीने कामालाही लागले आहेत. त्यामुळे मिझोरमची निवडणूक यावेळी काँग्रेससाठी सोपी राहिलेली नाही.
छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता आहे. छत्तीसगडमध्ये भाजपाचे डॉ. रमणसिंह, मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान, तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुकांना सामोरे जात आहे. छत्तीसगडमध्ये डॉ. रमणसिंह आणि मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान मागील १५ वर्षांपासून सत्तेत आहेत. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे पाच वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. लोकसभा निवडणूक लक्षात घेता या तीन राज्यांतील सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान भाजपासमोर आहे.
या तीनही राज्यांतील सत्ता भाजपाने आपल्याकडे कायम ठेवली, तरी लोकसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार करून कामाला लागलेल्या भाजपाचा आत्मविश्‍वास आणखी वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा भाजपाला मिळू शकतो. मात्र, यातील एकही राज्य भाजपाने गमावले तर त्याचा संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांवर नसला, तरी संबंधित राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर काही प्रमाणात निश्‍चित परिणाम होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाही याची जाणीव आहे. त्यामुळे मोदी आणि शाह किमान या तीन राज्यांतील विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने आपल्या प्रयत्नात कोणतीही कसर बाकी ठेवणार नाहीत, याबाबत शंका नाही.
अमित शाह यांनी गेल्या काही महिन्यांपासूनच या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तयारीत स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले आहे. या तीन राज्यांत भाजपाने आपले मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले असले म्हणजे कायम ठेवले असले, तरी या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात, त्यांच्या नावावर आणि त्यांच्या कामावरच लढवल्या जाणार आहेत. या तीन राज्यांत भाजपाच्या दृष्टीने ही सर्वात जमेची बाब म्हणावी लागेल. एकदा पंतप्रधान मोदी प्रचाराच्या मैदानात उतरले की, देशातील कोणताच राजकीय पक्ष भाजपाला पराभूत करू शकत नाही, अशी भाजपाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची खात्री आहे. निवडणुकीच्या मैदानात आत्मविश्‍वास आवश्यक असला, तरी अतिआत्मविश्‍वास अनेकवेळा धोकादायक ठरत असतो. दुसरीकडे प्रचाराचा सर्व भार पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर सोडून, तळागाळातील कार्यकर्त्यांनी काही प्रमाणात रिलॅक्स होणे योग्य ठरणार नाही.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत खरी सत्त्वपरीक्षा पंतप्रधान मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची नाही, तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची होणार आहे. अमित शाह यांनी भाजपाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून आतापर्यंत जवळपास दीड डझनावर राज्यांतील निवडणुका भाजपाला जिंकून दिल्या आहेत. त्यामुळे भाजपाचे सर्वाधिक यशस्वी अध्यक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा वारंवार उल्लेख करत असतात. मात्र, त्याउलट राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून एकही निवडणूक काँग्रेसला जिंकून दिली नाही. अमित शाह यांनी दीड डझनावर राज्यं जिंकली याचा दुसरा अर्थ, काँग्रेसने आपली तेवढी राज्यं गमावली.
राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. यातील हिमाचल प्रदेशातील आपली सत्ता काँग्रेसला गमवावी लागली, तर कर्नाटकात काँग्रेसने जनता दल सेक्युलरसमोर शरणागती पत्करत कशीबशी आपली इज्जत वाचवली. पंजाब विधानसभा निवडणूक काँग्रेसने जिंकली असली, तरी त्यात राहुल गांधी यांचे कोणतेही योगदान नाही. पंजाब विधानसभा निवडणूक जिंकण्याचे पूर्ण श्रेय कॅप्टन अमरिंदरसिंग यांना आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासमोर मिझोरमधील आपली सत्ता टिकवण्यासोबत छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपाकडून सत्ता हिसकवून घेण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र, राहुल गांधी यांची आतापर्यंतची कामगिरी पाहता ते त्यांच्यासाठी कठीणच नाही तर अशक्य आहे.
राहुल गांधी यांची प्रतिमा, वारंवार निवडणुकीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणारा विद्यार्थी, अशी आहे. देशातील सद्य:स्थिती पाहता, आपल्या पक्षाला जिंकून देणे तर दूर, पण स्वत: राहुल गांधी आणि श्रीमती सोनिया गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशच्या अमेठी आणि रायबरेली येथील आपल्या जागा कायम ठेवल्या तरी खूप, असे म्हणावे लागेल. राहुल गांधी यांच्या अशा प्रतिमेमुळेच आज देशातील कोणताही राजकीय पक्ष काँग्रेसशी आघाडी करायला तयार नाही. ज्या पक्षाच्या नेत्याची स्वत:च्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासोबत मित्रपक्षाला फायदा करून देण्याची क्षमता असते, त्या पक्षाशीच अन्य पक्षही आघाडी करायला तयार असतात.
भाजपासोबत आज जवळपास दोन डझन पक्ष आहेत, याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या बळावर आपल्या पक्षाच्या खासदारांना तर निवडून आणतात, पण सोबत मित्रपक्षाच्या उमेदवारांना जिंकून देण्यातही मोठे योगदान देत असतात. राहुल गांधी यांच्याजवळ अशी क्षमता नसल्यामुळे, बसपा आणि सपासारखे पक्ष त्यांच्यापासून दूर पळत आहेत. तरीसुद्धा मित्रपक्ष तयार असले तर पंतप्रधान व्हायची आपली तयारी असल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणतात, तेव्हा त्यांचे कौतुक करावेसे वाटते. जे मित्रपक्ष काँग्रेससोबत आघाडी करायला तयार नाही, ते आपल्याला पंतप्रधानपदासाठी कसा पाठिंबा देतील, असा प्रश्‍नही राहुल गांधी यांना का पडत नाही, याचे आश्‍चर्य वाटते.
राहुल गांधी आपल्या बोलण्याने आणि वागणुकीने देशातील जनतेचे वारंवार मनोरंजन करत असतात, त्यामुळे तर विधानसभा निवडणुका होत असलेल्या तेलंगणाचे काळजीवाहू मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख ‘देशातील सर्वात मोठा विदूषक!’ असा केला. राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात काँग्रेसला एखाद्दुसर्‍या राज्यातही जिंकून दिले नाही, तर पंतप्रधानपदाचे स्वप्न तर दूरच, पण काँग्रेसचे अध्यक्षपदही कायम ठेवणे त्यांना कठीण जाईल. कारण काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते हारणार्‍या नाही तर जिंकणार्‍या घोड्यावर पैसे लावत असतात.

http://tarunbharat.org/?p=65468
Posted by : | on : 11 Oct 2018
Filed under : उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक (29 of 1226 articles)


देशात एक वैचारिक दहशतवाद सतत थैमान घालतो आहे. काहीही घडले की, कायम हिंदुत्ववादी संघटनांच्या नावाने कंठशोष करत, त्यांच्यावर बंदी घालण्याची ...

×