ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक » राहुल गांधी आगे बढो…

राहुल गांधी आगे बढो…

भाऊ तोरसेकर |

मंगळवार बुधवारच्या मध्यरात्री केव्हातरी सीबीआयच्या दोन्ही वरिष्ठ अधिकार्‍यांना सक्तीने सुटीवर पाठवण्यात आले. त्यावरून बुधवारी दिवसभर गदारोळ चालू होता. त्याचा संदर्भ घेऊन गुरुवारी राहुल गांधी यांनी एका निवडणूक प्रचारसभेत आपली ‘राफायल’ टेप पुन्हा वाजवली. सीबीआय राफायल घोटाळ्याची चौकशी सुरू करणारच होती, इतक्यात अपरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीबीआयच्या प्रमुखालाच सुटीवर पाठवून दिले. असा आरोप राहुल इतक्या आत्मविश्‍वासाने करीत होते, की मला त्यांचा तो आवेश खूप आवडला. अगदी असाच आवेश आणि उत्साह त्यांनी पाच वर्षांपूर्वी सातत्याने दाखवला होता आणि परिणाम आपण बघितलेलेच आहेत. त्याची सुरूवात २०१३ च्या छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान व दिल्लीच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर झालेली होती. त्या चारही विधानसभांमध्ये काँग्रेसने सपाटून मार खाल्लेला होता आणि दिल्लीत तर पंधरा वर्षे काँग्रेसच्या हाती सत्ता असूनही काँग्रेसला फक्त ८ जागा मिळवीत तिसर्‍या क्रमांकावर जावे लागले होते. भाजपा आपले मित्रपक्ष अकाली दलाच्या सोबत निवडणूक लढूनही बहुमतापासून थोडी दूर राहिली. तर आम आदमी पक्ष नावाच्या नवख्या पक्षाने दुसरा क्रमांक पटकावताना पंधरा वर्षांपासूनच्या काँग्रेस मुख्यमंत्री शीला दीक्षितांनाही आपल्या मतदारसंघात प्रचंड बहुमताने पराभूत केलेले होते. जेव्हा असे काही व्हायचे, तेव्हा बिळात तोंड लपवून बसणार्‍यांना काँग्रेसश्रेष्ठी म्हणायची आपली राजकीय संस्कृती आहे. त्याचा खूप गवगवा झाला आणि पराभवाची जबाबदारी घ्यायला राहुल व सोनियांना माध्यमांच्या कॅमेर्‍यासमोर यावे लागले. तेव्हाही राहुलनी आजच्या सारखाच आवेश, अविर्भाव दाखवला होता. त्यानंतर त्यांनी कधी क्षणभर विश्रांती घेतलेली नाही. त्यावेळी ज्या आत्मविश्‍वासाने राहुल बोलले होते, तोच आत्मविश्‍वास आजच्या त्यांच्या राफ़ायल मोहिमेत पुरेपूर दिसून येतो. राहुल त्यावेळी काय बोलले होते, त्याचे आज अनेकांना स्मरण नाही, म्हणून आठवण करून देणे योग्य ठरेल.
त्या दारूण पराभवानंतर त्रयस्थपणे माध्यमांना सामोरे जाणारे राहुल गांधी यांना काडीमात्र दु:ख झालेले नव्हते. यातूनही पक्ष कसा ठामपणे उभा राहील, याची पत्रकार मंडळींना ग्वाही देताना राहुल म्हणाले होते, आमचा पराभव झाला हे खरे आहे. पण त्यातल्या चुका आम्ही समजून घेतल्या आहेत. काँग्रेसची संघटना इतकी मोठी व मजबूत आहे, की यातून आम्ही सावरून पुन्हा उभे राहू. इतर कुठल्याही पक्षाकडे नाही इतकी आमची शक्ती व कुवत अधिक आहे. त्यानंतर सहा महिन्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि इतिहासात काँग्रेसची त्यापेक्षा मोठी वाताहत कधी झालेली नव्हती. पण, सगळा काँग्रेस पक्ष खचून व ढासळून पडला असतानाही राहुल गांधींचा तो आत्मविश्‍वास कायम होता आणि आजही आहे. नंतरच्या चार वर्षात एकामागून एक राज्ये वा अनेक राज्यातली सत्ता गमावतानाही राहुल गांधींच्या त्या आत्मविश्‍वासाला तसूभर धक्का लागलेला नाही. ते तितक्याच ठामपणे आपल्या कुवतीवर विसंबून आहेत. हिमाचल, उत्तरप्रदेशात त्यांनी युवकांना स्थानिक पातळीवर उत्पादन झालेले मोबाईल चीनमध्ये खरेदी व्हायला हवे, असे स्वप्न दाखवले होते. आता ते राफ़ायलच्या विमानात स्वार होऊन उडत आहेत. हा आत्मविश्‍वास भारतात सहसा कुठल्याही राजकीय नेत्यापाशी आढळून येत नाही. त्याचीच खातरजमा सीबीआय घोटाळ्यानंतरही राहुलच्या भाषणातून दिसून येते. सहाजिकच हा आत्मविश्‍वास काँग्रेसला कुठे घेऊन जाणार आहे, त्याचे वेगळे विवरण देण्याची गरज नाही. पण अलिकडल्या काळात राहुलमध्ये तेव्हाच्या केजरीवाल यांचीही झाक थोडीफ़ार दिसू लागलेली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर लाथ मारून मग केजरीवालांनी देशव्यापी मोहीम छेडली होती. त्यांची गर्जना होती, मोदीजी को हराना है. त्यासाठी अरविंद केजरीवाल वाराणशीला जाऊन उभे राहिले होते. राहुल तेही करणार काय इतकाच प्रश्‍न आहे.
राहुलना शंभर वर्षाहून अधिक काळ बांधलेली संघटना मिळालेली आहे आणि केजरीवालांनी दिल्लीच्या यशानंतर शंभर दिवसात देशव्यापी संघटना उभी करून मोदींना पराभूत करण्याचा चंग बांधला होता. दिल्लीतले आपले सहासात हजार सवंगडी घेऊन कुठल्याही शहरात महानगरात जायचे आणि धमाल उडवून द्यायची; हा केजरीवाल यांचा एककलमी कार्यक्रम होता. त्यातून माध्यमात रोजच्या रोज झळकले की मोदी हरलेच म्हणून समजा, याविषयी त्यांच्या मनात तीळमात्र शंका नव्हती. त्यांच्या अशा आत्मविश्‍वासाने अनेकांना भुरळ घातली होती. इन्फ़ोसिस सारख्या जगात कौतुक होणार्‍या कंपनीचे माजी मुख्याधिकारी, एक हवाई वाहतूक कंपनी उभी करून दाखवणारा धाडसी उद्योगपती वा स्वयंसेवी क्षेत्रात आपली प्रतिष्ठा निर्माण करणार्‍या मेधा पाटकर; असे एकाहून एक दिग्गज केजरीवालांच्या त्या गर्जनांनी भारावून गेलेले होते. त्यांनी आपली प्रतिष्ठा आम आदमी पक्षाच्या झोळीत भिरकावून दिली. काही वाहिन्यांचे संपादक व पत्रकारही त्यात ओढले गेले. या सर्वांना क्षणात मातीमोल करून टाकणारा केजरीवालांचा आत्मविश्‍वास, आपण आज राहुल गांधींमध्ये बघू शकतो. त्यांची देहबोली व कर्कश बोलण्याने मोदी आधीच पराभूत झाले आहेत. आता फक्त मतदान व्हायचे बाकी असल्याची आपली खात्री पटायला वेळ लागणार नाही. मुद्दा इतकाच असतो, की अशी मते यंत्रात नोंदवली जात नाहीत, की मोजणीच्या दिवशी मोजली जात नाहीत. त्यावर निवडणुका जिंकल्या हरल्या जात नाहीत. अन्यथा आज मोदींना हरवण्याची वेळच राहुलवर आली नसती. त्याऐवजी त्यांना केजरीवाल को हराना है असली भाषा बोलावी लागली असती. कारण आज राहुल जे करत आहेत तेच केजरीवाल पाच वर्षांपूर्वी करून मोकळे झालेत. म्हणूनच नंतर अन्य राज्यातल्या विधानसभा निवडणुका लढवण्याचा विषयही त्यांनी कधी चर्चिला नाही.
बाकी मतदार काय करतील, ते नंतर दिसेलच. पण राहुल गांधींच्या या आत्मविश्‍वासाने बहुतांश काँग्रेस नेत्यांना खूप धीर येऊ लागला आहे. राहुलच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा एकहाती सत्ता मिळवू शकत नाही, की स्वबळावर निवडणुकाही लढवू शकत नाही, याविषयी आता अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेते खुलेपणाने बोलायचे धाडस करू लागले आहेत. राहुलना पक्षाने पंतप्रधान पदाचे उमेदवार केलेले नाही, असे चिदंबरम या ज्येष्ठाने परवाच सांगून टाकलेले आहे. दुसरे ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी मंत्री सलमान खुर्शीद यांनी काँग्रेसला मित्रपक्षांचा कुबड्या घेतल्याशिवाय लढता येणार नसल्याचे प्रामाणिकपणे सांगून टाकलेले आहे. ही राहुलच्या नेतृत्वाची प्रचितीच नाही काय? भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष निर्विवादपणे बहुमत मिळवायच्या गप्पा करतो आहे आणि त्याचे अनेक सहकारी त्याला दुजोरा देत आहेत. त्याच्या उलट काँग्रेसमधले राहुल गांधींचे विविध मोठे सहकारी स्वबळावर लढणे अशक्य असल्याचे सांगतात. राहुलची उमेदवारी मित्र पक्षांना रुचणारी नाही, अशी ग्वाही देऊ लागले आहेत. याचे कौतुक कोणी करीत नाही. राहुलचे सहकारीही असे दांडगे आहेत, की आपल्यामुळे किती व कोणती मते पक्ष गमावणार; त्याचाही आत्मविश्‍वास त्यांच्यात ठासून भरलेला दिसतो. दहा वर्षे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषवलेले दिग्विजय सिंह आपल्या बोलण्याने पक्षाची मते कमी होतात, असे सांगत आहेत. या सगळ्या राहुलच्या आत्मविश्‍वासाच्या खाणाखुणाच नाहीत काय? जो आत्मविश्‍वास जयपूरच्या पक्ष अधिवेशनात त्यांनी दाखवला होता, त्याचे इतके परिणाम समोर असताना भाजपाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी भयभीत होऊन जाण्याला पर्याय उरतो काय? तशी भाजपाची घाबरगुंडी उडाली नसती, तर त्यांनी सहासात महिने आधीच लोकसभेच्या तयारीला लागण्याची काय गरज होती? राहुलच्या त्या आवेशाला घाबरूनच मोदी-शहा आतापासून एप्रिल मे महिन्यातल्या लोकसभा मतदानाच्या कामाला लागलेले आहेत ना?

https://tarunbharat.org/?p=66600
Posted by : | on : 28 Oct 2018
Filed under : उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक (468 of 1509 articles)


अध्यक्ष राहुल गांधी यांनी कितीही घसा कोरडा करून आरडाओरडा केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हटले, तरी येणार्‍या लोकसभा ...

×