ads
ads
संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर – पक्षभेद आणि राजकीय…

फुकटात काहीच मिळत नाही

फुकटात काहीच मिळत नाही

►चीनची मदत घेणार्‍या देशांना लष्करप्रमुखांचा इशारा, वृत्तसंस्था पुणे, १७…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

►चीनसह पाकला खडे बोल!, वृत्तसंस्था जीनिव्हा (स्वित्झर्लंड), १५ सप्टेंबर…

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १५ सप्टेंबर – अमेरिका आणि चीन या…

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

►मराठवाड्यातील उमरज येथील घटना, प्रतिनिधी कंधार, १७ सप्टेंबर –…

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

मुंबई, १८ सप्टेंबर – ट्रेनने दररोज २३ दशलक्षांहून अधिक…

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

►मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती बंदी, मुंबई, १४ सप्टेंबर –…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:24
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » राहुल गांधी हे सर्वात मोठे विदूषक!

राहुल गांधी हे सर्वात मोठे विदूषक!

अरेरे! काय हे! बिचारे राहुल गांधी! कुणीही उठतो आणि त्या निरागस युवकाला वाट्टेल ते बोलतो. भाजपावाले तर रोजच तोंडसुख घेत असतात. पण, तेसुद्धा काय करणार? राहुल गांधी वागतातच तसे. आता हेच पाहा ना. राहुल गांधी हे देशातील सर्वांत मोठे विदूषक आहेत, असे म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांची खिल्ली उडविली. ६ सप्टेंबरला सकाळी राव यांनी विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेतला आणि राज्यपालांनी त्याला संमती दिली. हे अपेक्षितच होते. कारण, काही दिवसांपासून चंद्रशेखर राव हे विधानसभा भंग करणार, अशी अटकळ बांधली जात होती. पण, त्यासाठी ६ तारीख उजाडण्याची चंद्रशेखर राव वाट पाहात होते. कारण? राव यांना सहाचा आकडा शुभ आहे, असे तेच सांगतात. असो. राजीनामा दिल्यानंतर चंद्रशेखर राव यांनी आपल्या मनातील सारी मळमळ बाहेरच काढली. राहुल गांधी? राहुल हे देशातील सर्वात मोठे विदूषक आहेत. तुम्ही पाहिले नाही का लोकसभेत ते कसे वागले. त्यांनी पंतप्रधान मोदींना आधी मिठी मारली आणि नंतर आपल्या जागेवर बसताना डोळा मिचकावला. हे एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याचे वर्तन असते का? काँग्रेस हा आमचा एक नंबरचा शत्रू आहे. एवढ्यावर थांबले असते तर ते राव कसले? त्यांनीतर थेट पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी या दोन्ही दिवंगत माजी पंतप्रधानांपासून तर राहुल गांधींपर्यंत सारेच तेलंगणाचे एक नंबरचे शत्रू आहेत, असे विधान करून एकच खळबळ उडवून दिली. सोबतच राहुल गांधी हे जितके वेळा तेलंगणात येतील, तेवढ्या अधिक जागा आमच्या वाढतील, असे भविष्यही त्यांनी वर्तविले. एखाद्या मूर्खाप्रमाणे ते केवळ भुंकत आहेत आणि बिनडोकपणे अर्थहीन आरोप आमच्या विकासकामांच्या बाबतीत करीत आहेत. त्यांनी एकही आरोप अजून सिद्ध केलेला नाही. त्यांनी प्रयत्न करून पाहावा. राहुल गांधी यांचे कर्तृत्व काय? तर ते वंशपरंपरेने अध्यक्षाच्या गादीवर बसले आहेत. आणखी बरेच आरोप चंद्रशेखर राव यांनी काँग्रेसवर लावले आणि अगदी तीव्र स्वरूपात आपली प्रतिक्रिया दिली. इथपर्यंत सारेकाही ठीक होते. तिकडे प्रदेश काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे. बरे झाले, हुकूमशाही गेली. लोक या हुकूमशाहीला कंटाळले होते. आता आगामी निवडणुकीत काँग्रेसचीच सत्ता येईल, असा आनंद त्यांनी शब्दांतून व्यक्त केला. कृतीतून नंतर दिसणारच आहे. तर विरोधकांच्या एकजुटीला पहिला जबरदस्त तडा दिला तो चंद्रशेखर राव यांनी. त्यांना काँग्र्रेस नको आहे आणि महागठबंधनवाल्यांना काँग्रेस हवी आहे. असा हा सारा मामला. कर्नाटकात कुमारास्वामी यांच्या शपथविधीसोहळ्यालाही राव उपस्थित नव्हते. त्यांनी शुभेच्छा तेवढ्या पाठवून दिल्या होत्या. त्या वेळीच विरोधकांच्या एकजुटीचे भवितव्य काय असेल, याबद्दल कुजबुज सुरू झाली होती. तिकडे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणतात, राहुल गांधी राजकारणात अतिशय ज्युनिअर नेते आहेत. त्यांना आणखी काही काळ राजकारण शिकण्याची गरज आहे. ममतांचा काँग्रेस व राहुलबाबत जळफळाट होण्याचे कारण म्हणजे त्रिपुरा! त्या राज्यात माकपाला हरविण्यासाठी विधानसभेच्या निवडणुका होण्यापूर्वीच ममतांनी काँग्रेस-तृणमूल युतीचा प्रस्ताव पाठविला होता. पण, काँग्रेसने तो नाकारला आणि दोन्ही पक्षांचा पराभव झाला. तृणमूलला मोठा धक्का बसला. एकही जागा मिळाली नाही. त्याच वेळी ममता म्हणाल्या होत्या, काँग्रेसचे नेते (म्हणजे राहुल) बिनडोक आहेत. त्यांना राजकारणाची मुळीच जाण नाही. काँग्रेसला त्रिपुरामध्ये केवळ दीड टक्का मते मिळणे, ही त्यांच्या पक्षासाठी शरमेची बाब आहे, अशी तोफ त्या वेळी ममतांनी डागली होती. मध्यंतरी काँग्रेसने पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूलसोबत युती करण्याचे बोलून दाखविले होते. पण, कार्यकर्त्यांनी स्पष्टच सांगितले की, अशी अभद्र युती झाली तर आम्ही काँग्रेस पक्षात राहणार नाही. त्यामुळे काँग्रेसला प. बंगालमध्ये स्वतंत्रपणे लढण्याशिवाय आणि हारण्याशिवाय पर्याय नाही. उत्तरप्रदेशात तर काँग्रेसला दोन-चार जागा मान्य असतील तर विचार करू, असे मायावतींनी जाहीर केले आहे. अखिलेश आणि मायावती यांना आपल्या राज्यात काँग्रेस मुळीच नको आहे. आता चंंद्रशेखर राव यांनी धक्का दिला आहे. काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खडगे आशावादी आहेत. ते म्हणतात, आम्हालाच सर्वाधिक जागा लोकसभेत मिळतील आणि राहुल गांधी यांना पंतप्रधानपद मिळेल. आता बोला! राहुलने बिचार्‍याने आधीच माघार घेतली आहे. भाजपावगळता कुणीही पंतप्रधान झाल्यास आपला त्याला पाठिंबा राहील, असे राहुल गांधी यांनी आधीच घोषित करून टाकले आहे. विरोधकांना काँग्रेस का नको आहे? तर राहुल गांधी हे कुठे काय बरळतील, याचा त्यांना भरवसा नाही. एवढेच काय, यामुळे स्वत: काँग्रेसमधीलच ज्येष्ठ नेते त्यांच्या विधानामुळे धास्तावले आहेत. विदेशात जाऊन १९८४ च्या शीख नरसंहारात काँग्रेसचा हात नव्हता, असे जे राहुलने ठोकून दिले होते, त्या धक्क्यातून अजून काँग्रेस सावरलेली नाही. आता राव यांच्या भूमिकेमुळे कथित महागठबंधनावर काय परिणाम होतील, याचा अंदाज आताच बांधता येणार नाही. पण, काँग्रेस पक्षाने याची दखल घेतलेली दिसते. पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीतर जाहीरच करून टाकले की, अजून विरोधकांच्या एकजुटीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. काँग्रेस विभिन्न राज्यांमधील स्थिती पाहून तेथे युती करेल. पंतप्रधानपदाचा उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीनंतर ठरवला जाईल. आमचे लक्ष्य आहे, सर्वाधिक जागा मिळवण्याचे. तृणमूल, समाजवादी, बसपा आणि आता तेलंगणा राष्ट्र समिती यांनी आपले म्हणणे मांडले आहे. याचे कारण हेच आहे की, कोणत्याही पक्षाला काँग्रेसला वरचढ होऊ द्यायचे नाही. मध्यप्रदेशात काँग्रेस बसपासोबत युती करण्याच्या तयारीत आहे. फक्त तिथले नेते बोलत आहेत. बसपा कार्यकर्त्यांना ही युती नको आहे. तेथे तर काँग्रेसला उमेदवार मिळण्याची मारामार आहे. दक्षिणेत तामिळनाडू, केरळ, आंध्र आणि कर्नाटक ही राज्ये उरली आहेत. तेथेही प्रादेशिक पक्ष काँग्रेसला भाव द्यायला तेवढे उत्सुक नाहीत. मग राहिला उत्तर भारताचा भाग. मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशातील काँग्रेसची स्थिती समोर आली आहे. अन्य राज्यांमध्ये बहुतेक ठिकाणी भाजपाची सत्ता आहे. पूर्वांचलात काँग्रेस किंवा अन्य पक्षांना तेवढी जागाच उरलेली नाही. अशा स्थितीत काँग्रेसला किती जागा मिळतील, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. आगामी काळात मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्याच वेळी तेलंगणाचीही निवडणूक होण्याची शक्यता आहे. या तीन राज्यांतील निकालानंतरच राजकीय घडामोडींना खरा वेग येणार आहे…

http://tarunbharat.org/?p=61595
Posted by : | on : Sep 10 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (17 of 853 articles)


डॉ. गो. बं. देगलूरकर | गणेशाचं स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक कार्यारंभ गणेशपूजनाने होतो. या देवतेची देवळं-राऊळं संपूर्ण देशभर आढळून येतात. ...

×