हज सबसिडी बंद

हज सबसिडी बंद

►मुस्लिमांना प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार देणार ►नकवी यांची घोषणा, नवी…

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

►लवकरच पुराव्यांसह समोर येणार, अहमदाबाद, १६ जानेवारी – १०…

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

►सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश, नवी दिल्ली, १६ जानेवारी…

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

वॉशिंग्टन, १४ जानेवारी – अमेरिकेच्या हवाईक्षेत्रातील हवाई बेटावर क्षेपणास्त्र…

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

►अमेरिकेची पर्यटकांना सूचना, वॉशिंग्टन, ११ जानेवारी – अमेरिकेने भारतात…

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

लंडन, १० जानेवारी – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी…

भाजपाची तिरंगा रॅली

भाजपाची तिरंगा रॅली

►संविधान बचाव रॅलीला प्रत्युत्तर ►•रावसाहेब दानवे यांची घोषणा, मुंबई,…

ना. स. फरांदे कालवश

ना. स. फरांदे कालवश

पुणे, १६ जानेवारी – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधान…

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

सांगली, १६ जानेवारी – पश्‍चिम महाराष्ट्रात ‘रॉबिनहूड’ प्रमाणे आयुष्य…

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

॥ तरंग : दीपक कलढोणे | ‘हर्र बोला हर्र’…

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

॥ विशेष : मुकुल कानिटकर | एकीकडे जग भारताकडे…

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | हा वारस…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:12
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » रिटांचा कॉंग्रेसला टाटा!

रिटांचा कॉंग्रेसला टाटा!

उत्तरप्रदेश कॉंग्रेसच्या नेत्या रिटा बहुगुणा यांनी कॉंग्रेस पक्षाचा त्याग करून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. ही घटना सामान्य आयाराम-गयारामप्रमाणे दुर्लक्षित करण्यासारखी नाही. सामान्यत: कुठल्याही नेत्याने पक्ष सोडल्यावर मूळ पक्षनेत्यंाची प्रतिक्रिया जशी असते, तशी ती याबाबतीत उमटली नाही. रिटा बहुगुणा या तशाही पक्षाला एक ओझेच झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याने काहीही फरक पडत नाही. अशा प्रकारच्या साधारणत: प्रतिक्रिया अपेक्षित होत्या. पण, तशा त्या आल्या नाहीत. रिटा बहुगुणा यांनी पक्षाचा विश्‍वासघात केला आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस पक्षाने दिली आहे. या प्रतिक्रियेतच सारे काही आले आहे. कॉंग्रेसचे उत्तरप्रदेश विधिमंडळ पक्षाचे नेते प्रदीप माथुर यांनी म्हटले की, रिटा बहुगुणा आणि त्यांच्या कुटुंबाला कॉंग्रेस पक्षाने काय दिले नाही? (म्हणजे, सर्वकाही दिले.) त्यांच्या वडिलांना (हेमवतीनंदन बहुगुणा) मुख्यमंत्री बनविले. त्यांच्या भावाला (विजय बहुगुणा) उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनविले. खुद्द रिटा बहुगुणांना दोनदा लोकसभेची निवडणूक लढविण्याची संधी दिली. विधानसभेतही पाठविले. एवढेच नव्हे, तर उत्तरप्रदेश कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बनविले. आता तर त्या पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या होत्या. याहून अधिक काय द्यायला हवे होते? प्रदीप माथुर यांची वेदना प्रामाणिक आहे. कारण रिटा यांच्या पक्षत्यागाने कॉंग्रेस पक्षाला जबरदस्त धक्का बसला आहे. आगामी निवडणुकीसाठी या पक्षाने जी रणनीती आखली आहे, ती या घटनेमुळे कोसळली आहे, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे आणि यात काही अतिशयोक्ती नाही. गेली २७ वर्षे कॉंग्रेस पक्ष उत्तरप्रदेशात सत्तेच्या बाहेर आहे. केवळ बाहेर आहे असे नाही, तर तो दिवसेंदिवस अप्रासंगिक होत चालला आहे. दिल्लीच्या सिंहासनाचा मार्ग उत्तरप्रदेशातून जातो, असे मानले जाते. त्यामुळे उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा आपले बस्तान नीट बसविणे, ही कॉंग्रेसची प्राथमिकता आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी कॉंग्रेस पक्षाने फार आधीपासून कंबर कसली आहे. निवडणूक जिंकून देणारा ‘मॅनेजर’ म्हणून प्रसिद्धीस आलेल्या प्रशांत किशोरला प्रचंड पैसा देऊन कॉंग्रेस पक्षाने आपल्या दिमतीला आणला आहे. ही निवडणूक कॉंग्रेस पक्ष अत्यंत गांभीर्याने घेत असल्याचे हे संकेत आहेत. उत्तरप्रदेशातील सुमारे १६ टक्के मतदार असलेला ब्राह्मण समाज एकेकाळी कॉंग्रेस पक्षाच्या पाठीमागे ठाम उभा होता. कालांतराने हा मतदार कॉंग्रेसने गमावला. त्यामुळे सर्वप्रथम यंदा, हा एकेकाळचा निष्ठावंत ब्राह्मण समाज पुन्हा एकदा आपल्या छावणीत आणायचा, असा चंग कॉंग्रेसने बांधला. तद्नुसार वयोवृद्ध शीला दीक्षित यांना पक्षाने मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केले. समाजातील बाकी इतर घटक पक्षांपेक्षा ब्राह्मण मतदाराला कॉंग्रेसच्या बाजूने वळविणे सोपे आहे. त्यामुळे प्रथम या मतदारांवर लक्ष केंद्रित करण्याची व्यूहरचना कॉंग्रेस पक्षाने आखली. यात काही चूक नव्हते. परंतु, रिटा बहुगुणा यांच्या भाजपाप्रवेशाने ही व्यूहरचना साफ कोसळली आहे, असे मानले जाते. हा कॉंग्रेससाठी फार मोठा धक्का आहे, असे जे मानले जाते, ते यामुळेच. रिटा बहुगुणा या सोनिया गांधी यांच्या निकटच्या मानल्या जात. २००३ ते २००७ या काळात त्या महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा होत्या. त्यानंतर २००७ ते २०१२ पर्यंत उत्तरप्रदेश कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. परंतु, कॉंग्रेस पक्षात राहुल गांधींना अध्यक्ष बनविण्याचे वारे सुरू झाले आणि सोनिया गांधींचा प्रभाव हळूहळू कमी करण्यात आला. पक्षातील सोनियानिष्ठांना वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या पद्धतीने बाजूला सारणे सुरू झाले. या योजनेतून रिटा बहुगुणा यांनादेखील बाजूला करणे सुरू झाले. समाजवादी पक्षातून काही वर्षांपूर्वीच कॉंग्रेस पक्षात दाखल झालेले राज बब्बर यांना उत्तरप्रदेश कॉंग्रेसची धुरा सोपविण्यात आली. त्यामुळे बहुगुणा नाराज असणे स्वाभाविकच होते. भाजपात आल्यावर बहुगुणा यांनी सोनिया गांधींवर टीका केली नाही. राहुल गांधींच्या कार्यपद्धतीवर मात्र ताशेरे ओढले, हे लक्षात घेण्यासारखे आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वउदयामुळे सोनियानिष्ठांच्या मनात जी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, ती बहुगुणा यांच्या राजीनाम्याने अधोरेखित झाली. कॉंग्रेस पक्ष गांधी परिवाराच्या संदर्भात एकजूट असतो, असे जे एक चित्र बाहेर रंगविण्यात येते, ते तितकेसे खरे नाही, हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. राहुल गांधी कॉंग्रेससारख्या पक्षाचे नेतृत्व करण्यास लायक नाही, हे लक्षात येऊनदेखील त्याला कसेही करून पक्षाच्या अध्यक्षपदावर बसवायचेच, असा विडा काही नेत्यांनी उचलला आहे. सोनिया गांधीदेखील आजारपणामुळे समर्थपणे नेतृत्व सांभाळू शकत नाहीत. त्यांनाही मनोमन राहुलने आपली गादी सांभाळावी असेच वाटते. परंतु, या सत्तांतरात, सोनियानिष्ठांची ससेहोलपट होईल, अशी अपेक्षा सोनिया गांधींनादेखील नसेल. नव्या-जुन्या सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना सोबत घेऊन राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे घ्यावीत, ही अगदी सामान्य अपेक्षादेखील आज पूर्ण होताना दिसत नाही. राहुलच्या हाती सूत्रे आल्यावर आपले काय होणार, हा अस्तित्वाचा प्रश्‍न सोनियानिष्ठ नेत्यांच्या मनात उभा झाला आहे. कुठला निर्णय घ्यावा, या संभ्रमात ही नेतेमंडळी असतानाच, रिटा बहुगुणा यांनी भाजपाप्रवेश करून एक पर्याय सोनियानिष्ठांपुढे ठेवला आहे. या पर्यायाचा वापर किती नेते करतात, हे आगामी काळात दिसेलच. रिटा बहुगुणा या आक्रमक स्वभावाच्या नेत्या आहेत. तळागाळातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क आहे. त्यामुळे भाजपाला या अशा नेत्याचा फायदाच होणार, हे निश्‍चित! आज भाजपा उत्तरप्रदेशात बेरजेचे राजकारण करीत आहे. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांसह ८० पैकी ७३ जागा जिंकणे गंमत नाही. केवळ मोदीलाटेमुळे या जागा भाजपा जिंकला, असे मानणे भाबडेपणाचे होईल. संघटनेच्या पातळीवर मजबूत काम असल्याशिवाय कुठल्याही लाटेचा फायदा करून घेता येत नाही. तसे नसते तर ओडिशा व पश्‍चिम बंगालमध्येही भाजपाला समाधानकारक यश मिळाले असते. पण, ते तसे मिळाले नाही. उत्तरप्रदेशात पक्षसंघटन चांगले होते आणि त्याला मोदीलाटेची साथ मिळाली. म्हणूनच हे असे अभूतपूर्व यश भाजपाला मिळाले. त्याची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत करण्याची जिद्द भाजपाने बाळगली आहे. घडणार्‍या घटना भाजपाला अनुकूल अशा आहेत. अशा अनुकूल घटना घडण्याची गती येणार्‍या काळात वाढेल, अशी अपेक्षा आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात भाजपा बहुमताच्या काठावर असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले. त्याने इतर पक्षांचे चेहरे चिंताक्रांत झाले आहेत. अशा परिस्थितीत रिटा बहुगुणासारख्या दमदार नेत्याने भाजपात येणे, ही घटना भाजपाची ताकद वाढविणारी आहे.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under अग्रलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अग्रलेख, संपादकीय (881 of 885 articles)


चौफेर : सुनील कुहीकर येत्या दिवाळीत, बाजारात उपलब्ध होणार्‍या चिनी वस्तू नाकारत, आपल्या देशातल्या लोकांनी तयार केलेला माल विकत घ्या, ...