ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक » लढण्यापूर्वीच माघार?

लढण्यापूर्वीच माघार?

भाऊ तोरसेकर |

गेल्या रविवारी द सन्डे गार्डियनमध्ये एक बातमी वाचायला मिळाली. दोन महिन्यात तीनचार राज्यांच्या विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि त्याच संबंधातली ही बातमी आहे. यापैकी तीन विधानसभा भाजपा व काँग्रेस अशा दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांसाठी निर्णायक महत्त्वाच्या आहेत. तिन्ही राज्ये भाजपाकडे असून तिथली सत्ता टिकवली तर सहा महिन्यांनी येणारी लोकसभा निवडणूक भाजपासाठी आशादायक व सोपी होऊन जाणार आहे. उलट काँग्रेसला यापैकी राजस्थानात पाच वर्षांपूर्वी सत्ता गमावण्याची पाळी आली होती आणि मध्यप्रदेश व छत्तीसगड या दोन राज्यात तर काँग्रेसला लागोपाठ पंधरा वर्षे नामुष्की पत्करावी लागते आहे. साहजिकच यापैकी एकदोन राज्यात तुटपुंज्या संख्येने जरी काँग्रेसने सत्ता बळकावली, तरी पुढल्या लोकसभेसाठी विरोधकांना आपल्या नेतृत्वाखाली एकत्र येण्यास काँग्रेस भाग पाडू शकते. म्हणूनच या तीन राज्यात दोन्ही पक्षांसाठी अटीतटीची लढाई आहे. भाजपाचे पक्षाध्यक्ष अशा लढाईची वर्षभर आधीपासून जमवाजमव करतात. त्यामुळे भाजपाने काय काय उरकले आहे, ते अजून गुलदस्त्यात आहे. पण तिन्ही राज्याचे मुख्यमंत्री जनसंपर्क यात्रा नावाच्या मोहिमेवर आधीच रुजू झालेले आहेत. काँग्रेसनेही जमवाजमव सुरू केली असली, तरी ती उमेदवारांची निवड व विविध गटातल्या हाणामार्‍या रोखण्याची कसरत आहे. पराभव आणि दीर्घकाळ सत्ता हाती नसतानाही काँग्रेसमधील नेते कशासाठी आपसात लाथाळ्या करीत असतात, हे कधीच न उलगडणारे रहस्य आहे. पण त्यावर मात करण्याच्या गर्जना सध्याच्या नव्या नेतृत्वाने सुरू केल्या आहेत. मग ही सुरूवात कोणती आहे? तर मध्यप्रदेशातील २३० पैकी ८० जागांचे उमेदवार येत्या आठवड्यात काँग्रेस जाहीर करणार आहे. ही आघाडी आहे की पिछाडी आहे, तेच समजत नाही. कारण हे उमेदवार लौकर जाहीर करण्याचे तर्कशास्त्र चकित करणारे आहे.
गार्डियनच्या बातमीनुसार या ८० जागांचे उमेदवार लगेच जाहीर केले जातील, त्यायोगे त्यांना आपल्या मतदारसंघात प्रचार करायला अधिक वेळ मिळू शकेल, असे त्या पक्षाच्या एका नेत्याने सांगितले आहे. त्या रणनितीचा खुलासा करताना हा काँग्रेस नेता म्हणतो, या ८० जागा काँग्रेससाठी अवघड आहेत आणि तिथली लढत भलतीच कष्टाची आहे. थोडक्यात या अशक्य कोटीतल्या जागा आहेत अशी कबुली या निवेदनातून स्पष्ट होते. आणखी एक बाब लक्षणीय आहे. या ८० जागा अशा आहेत, जिथे एकाहून अधिक तिकीटाचे दावेदार नाहीत. म्हणूनच तिथली उमेदवारी लगेच जाहीर करण्यात कुठलीच अडचण नाही. पण त्याचाच दुसरा अर्थ असा, की काँग्रेसपाशी या जागी हिरिरीने लढू शकणारे कोणी उमेदवार नाहीत. जो येईल त्याला लगेच तिकीट देण्याखेरीज काँग्रेससमोर अन्य पर्याय नाही. विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या लक्षात घेतली तर या ८० जागांचे महत्त्व लक्षात येऊ शकते. ते समजून घेतले तर मग रणनिती कुठे फसते आहे, त्याचाही उलगडा होऊ शकतो. २३० जागांपैकी ८० जागा म्हणजे एकतृतियांश इतकी संख्या होते. तितक्या जागी कुठल्याही यशाची अपेक्षा काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वालाच नाही. याचा अर्थ तितक्या जागा त्यांनी भाजपा जिंकणार म्हणून आधीच गृहीत धरलेले आहे, तेवढ्या जागा वगळल्या तर काँग्रेसला लढण्यासाठी १५० जागा शिल्लक उरतात आणि सर्व जागा मिळून बहुमत म्हणजे ११६ जागा काँग्रेसला जिंकणे भाग आहे. थोडक्यात उरलेल्या दिडशेपैकी प्रत्येक जागा जिंकण्यासाठी कंबर कसायला पर्याय नाही. ही रणनिती असेल तर भाजपाला किमान बहुमत मिळणार हे त्यामागचे गृहित असू शकते. कारण ८० जागा प्रतिस्पर्ध्याने आधीच दिलेल्या असल्या तर भाजपाला बहुमतासाठी उरलेल्या दीडशेपैकी फक्त ४० जागा जिंकल्या तरी सत्ता सहज मिळून जाणार आहे. हे कसले समीकरण वा रणनिती आहे?
पंधरा वर्षांनी भाजपाला मध्यप्रदेशातील सत्तेतून हुसकावून लावणार्‍यांची ही भाषा थक्क करणारी नाही काय? लोकमत भाजपा वा शिवराजसिंग चौहान यांच्या विरोधात खवळलेले असेल, तर विरोधातला प्रमुख पक्ष काँग्रेससाठी सर्वच्या सर्व २३० जागा लढण्यायोग्य होतात आणि त्यातून किमान १७०-१८० जागा जिंकण्याचा मनसुबा असला पाहिजे. अमुकतमुक विरोधाचा बालेकिल्ला म्हणून सोडून देता येत नसतो आणि लोकमत इतके सत्ताधारी पक्षाच्या विरोधात गेलेले असेल, तर विरोधकांच्या गोटात प्रत्येक जागेसाठी पाचसात इच्छुकांची झुंबड उडालेली असायला हवी. तिकीटावरून हाणामार्‍या झाल्या की मग काँग्रेस प्रवक्ते नेहमी आपल्या पक्षाच्या लोकप्रियतेचे प्रतीक म्हणून तिकडे बोट दाखवत असतात. मग आता ही झुंबड नसल्यास लोकमत कोणाच्या बाजूने असल्याचे लक्षण मानायचे? कुठल्याही सत्ताधारी पक्षासाठी जनतेला सामोरे जाण्यासाठी शेवटचे एक वर्ष किंवा काही महिन्यांचा अवधी उपलब्ध असतो. पण विरोधी पक्षाला मात्र पुढल्या निवडणुका जिंकण्यासाठी एकेका जागी बस्तान बसवण्यासाठी पूर्ण पाच वर्षे हाताशी असतात. इथे तर काँग्रेसला पंधरा वर्षाचा कालावधी मिळालेला आहे आणि त्यात तीन लोकसभा व दोन विधानसभांमध्ये आपल्या त्रुटी व चुकांची पावती मिळालेली होती. मग त्याचा अभ्यास करून सज्ज व्हायला अखेरच्या वर्षात किंवा दोनचार महिन्यात धावाधाव कशाला करावी लागते आहे? त्याचे उत्तर कोणी नेता देत नाही. कारण कुठेही संघटना उरलेली नाही आणि सर्व पातळीवर नुसती तोंडपाटीलकी करणार्‍यांचा भरणा झालेला आहे. मान खाली घालून पक्षाचे काम करणारे व मतदाराला जाऊन भिडणारे लोकच काँग्रेसपाशी उरलेले नाहीत. त्यामुळे नुसत्या जाहिराती व प्रचारावर पक्षाला विजय व सत्ता मिळवून देण्याच्या वल्गना करण्याला नेतृत्व अशी उपाधी लावली जात असते.
आंधी चित्रपटात इंदिराजींचे पात्र रंगवलेले आहे. त्या मतदारसंघातला पक्षाचा एक बुजुर्ग इरसाल नेता म्हणून ओमप्रकाश यांनी ते पात्र रंगवलेले होते. निवडणुका जिंकून ती नायिका सुचित्रा सेन हेलिकॉप्टरमध्ये बसताना कार्यकर्त्यांना निरोप देते, तेव्हा ओमप्रकाशच्या तोंडचे वाक्य काँग्रेसच्या विजयी परंपरेचे लक्षण होते. अगले चुनाव तक जिंदा रहेंगे तो सेवामे हाजीर होंगे. हा काँग्रेसचा कार्यकर्ता होता. त्याला उमेदवारी वा पदाचा सोस नव्हता. आपल्या पक्षाला जिंकून देण्यासाठी निवडणूक काळात राबणे व नेत्याला विजयी करून देणे, असे कर्तव्य मानून सुखी असलेला ओमप्रकाश आता काँग्रेसमध्ये औषधालाही उरलेला नाही. तो कोणी साधूसंत दाखवलेला नव्हता, तर आपल्या परिसरात दबदबा असलेला आणि स्थानिक राजकारणाची गुंतागुंत जाणून पक्षाची पाळेमुळे होऊन राहण्यात धन्यता मानणारा वर्ग होता. असे लोक इरसाल व बनेलही होते. पण त्यांच्या खांद्यावर बसूनच दिल्लीतली सत्ता काँग्रेसने प्रदीर्घकाळ मिळवलेली होती. त्यांच्या क्षेत्रातील त्यांची सुभेदारी मक्तेदारी जपलेली होती आणि बदल्यात त्यांनी दिल्लीश्‍वरांच्या सिंहासनाला लागणारी कुमक वेळोवेळी पुरवलेली होती. तालुका-जिल्हा व राज्य पातळीवरचे हे स्थानिक नेतृत्व काँग्रेसश्रेष्ठी नावाच्या कोणीतरी उखडून टाकले आणि काँग्रेसचा वटवृक्ष बघता बघता उन्मळून कोसळण्याची पाळी आली. अमित शहा किंवा भाजपा आपली पाळेमुळे खोलवर रुजवत वाटचाल करतो आहे आणि त्यात पदाची लालसा वा सत्तेची आकांक्षा असलेल्यांना स्थान नाही. त्यांना सत्तापदे जरूर दिली जातात. पण पक्षसंघटनेत अशा लोकांना चंचूप्रवेशही मिळत नाही. म्हणून प्रत्येक जागा लढवायची होऊन जाते आणि कुठलीही जागा सोडून देण्याचा विषयही चर्चेला येत नाही. उत्तरप्रदेश, त्रिपुरा असो किंवा आपला हक्काचा प्रदेश असलेले गुजरात, कर्नाटक असोत, तिथली भाजपाच्या नेतृत्वाची व संघटनेची मेहनत विसरून त्या पक्षाला पराभूत करता येणार नाही.

https://tarunbharat.org/?p=61504
Posted by : | on : 9 Sep 2018
Filed under : उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक (455 of 1336 articles)


संबंधांना वैध करार देत, समलैंगिक असणे हा गुन्हा नाही, असा एका अर्थाने ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिल्यानंतर, समलैंगिक तसेच ...

×