ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:

लव्हरात्री…

सुनील कुहीकर |

मुळातच भाबड्या असलेल्या भारतीय समाजाला मूर्ख कसे बनवायचे, ते या देशातील सर्वच क्षेत्रातल्या ‘व्यापार्‍यांना’ खूप चांगले उमजले आहे. ते जसे राजकारण्यांना कळले आहे, तसेच क्रिकेटचा धंदा मांडून बसलेल्यांनाही उमगले आहे. चित्रपटक्षेत्रातील लोकांच्या बुद्धिमत्तेची महिमा काय वर्णावी? त्यांनी तर न्यायालयाच्या आडून कोट्यवधी रुपये कमावण्याची नवीच शक्कल शोधून काढली आहे. नुसतीच शोधून काढलेली नाही, तर ही शैली चांगलीच विकसितही केलीय् त्या शहाण्यांनी. ‘रामलीला’ नावाच्या एका चित्रपटाचा प्रत्यक्षातील ‘रामलीलेशी’कवडीचा संबंध नसताना, केवळ चित्रपटाच्या नावावरून नियोजित रीत्या गहजब माजवीत प्रदर्शनापूर्वीच तो प्रसिद्ध करण्याची, वादग्रस्त ठरवण्याची अन् मग त्यायोगे लोकांच्या खिशातून मोठ्या प्रमाणात पैसा काढण्याची क्लृप्ती नंतरही कित्येक चित्रपटांच्या संदर्भात ‘वापरली’ गेली. ‘पद्मावती’ हेही त्याचे ‘उत्तम’ उदाहरण ठरावे. बरं, चित्रपट देशभरात प्रदर्शित झाल्यावर, तो बघितला गेल्यावर लोकांचा संताप झाला, तर एकवेळ समजण्यासारखे आहे. नंतर लोकांनी जाळपोळ केली, निषेध व्यक्त केला, तर ती बाबही एकवेळ योग्य ठरवता येईल, पण इथेतर पिक्चर रीलीज होण्यापूर्वीच तो वादग्रस्तही ठरलेला असतो. त्यावर चर्चाही सुरू झालेली असते. इतकंच कशाला, कुणीतरी चित्रपटाविरुद्ध कोर्टात केसही दाखल करून चुकलेले असते. धार्मिक भावना तर एवढ्या स्वस्त झाल्या आहेत या देशात आताशा की, एवढ्या तेवढ्यावरूनच त्या दुखावू लागल्या आहेत. त्याचा बाजार मांडायला आहेतच काही लोक टपून बसलेले. या पार्श्‍वभूमीवर आता ‘लव्हरात्री’ नावाचा चित्रपट येतोय्…
नवरात्रीच्या उत्सवादरम्यान फुललेल्या एका प्रेमकहाणीवर आधारलेला आहे म्हणे हा चित्रपट. त्याला नाव दिले त्यांनी ‘लव्हरात्री.’ चित्रपट यायचाय् अजून बाजारात. पण लागलीच दुखावल्या कुणाच्यातरी धार्मिक भावना. हो! चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी भावना दुखावल्या तरच त्याला काही अर्थ ना! त्याशिवाय लोकभावनांचा भडका कसा उडेल? त्याशिवाय कुणी कोर्टात कसे जाईल? प्रकरण न्यायालयात दाखल झालं नाही, तर मग आयती प्रसिद्धी कशी मिळेल? प्रसिद्धीशिवाय रसिकांच्या उड्या कशा पडतील? प्रेक्षकांची गर्दी झाली नाही, तर गल्ले कसे भरतील निर्मात्यांचे? तर… सांगायचा मुद्दा एवढाच, की ‘लव्हरात्री’ नामक चित्रपटाच्या बाबतीतही हा चमत्कार घडून आला आहे. त्याचे, मायबाप प्रेक्षकांनी जराही आश्‍चर्य वाटून घेऊ नये! बाजारात दाखल होण्यापूर्वीच पिक्चर हिट करण्याची पूर्ण तयारी त्याच्या निर्मात्यांनी करून ठेवली आहे आतापासनंच. नाही म्हणायला, हा सिनेमा येत्या ऑक्टोबर महिन्यात येऊ घातला आहे. पण, बिहारमधील मुजफ्फरपूर येथील सुधीर ओझा नामक व्यक्तीने न्यायालयात केव्हाच प्रकरण दाखल करून ठेवले आहे. त्यावरून सलमान खानविरुद्ध गुन्हेबिन्हे दाखल करण्याचे आदेश जारी झालेत म्हणे! दारूच्या नशेत गाडी फुटपाथवर चढविल्याने एकाचा बळी घेतल्याचा आरोप असूनही, प्रचलित व्यवस्थेला तो धड सिद्ध करता आला नसल्याची, काळविटाची शिकार केल्याच्या प्रकरणात मेलेल्या काळविटांची फजिती करीत न्यायप्रक्रियेची त्याने केलेली थट्टा जगजाहीर असल्याची आणि भविष्यातही सलमान खानचे जरासेही बिघडण्याची शक्यता नसल्याची बाब पुरेशी स्पष्ट असताना, बिहारमधील एका जिल्हा न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या आदेशाने कुणी हुरळून जाण्याचे फारसे औचित्य नाही. पण दुर्दैवाने घडतेय् मात्र तेच, जे सलमानच्या फायद्याचे आहे.
हे खरेच की, चित्रपटजगतातील तमाम कलावंतांना असले विषय हाताळणे फार सोपे असते. कलेच्या निर्मितीतही जाती-धर्माची गणितं लीलया मांडण्यात त्यांचा हातखंडा असतो. ‘पीके’ची निर्मिती करताना, आपण सर्वच धर्मांवर समान टीका करीत असल्याचा ‘देखावा’ करतानाही, ‘मुसलमान धोका देतो’ हा भ्रम असल्याचे सिद्ध करायला आमीर खान विसरत नाही. ‘ओ माय गॉड’मधूनही सर्व धर्मीयांवर हल्ला करण्याच्या नावाखाली निशाणा ‘योग्य’ ठिकाणीच साधला गेला आहे. आता सलमान खानला ‘लव्हरात्री’ची अफलातून कल्पना सुचली आहे. हलाला, तीन तलाकसारख्या कित्येक समस्या मुस्लिम समूहाच्या दाराशी पहुडलेल्या असताना त्याला हात लावायचे सोडून, नवरात्रीच्या उत्सवात एकत्र आलेल्या तरुणाईतील कुण्या दोघांच्या प्रेमकहाणीवर बेतलेला चित्रपट काढण्याची आणि नेमक्या नवरात्रीच्या मुहूर्तालाच तो बाजारात आणण्याची शक्कल सलमानचे खिसे भरायला उपयुक्त ठरणार आहेच. कारण, त्याची तजवीज तर त्याने आधीच करून ठेवली आहे. रसिकांपुढे उभ्या ठाकलेल्या इतर शेकडो समस्या कवडीमोल ठरवीत, या चित्रपटाच्या वादग्रस्ततेचे बुजगावणे एव्हाना इतक्या बेमालूमपणे उभे करण्यात आले आहे, की उत्सुकतेची खाज मिटवायला तो स्वत:च गर्दी करणार आहे चित्रपटगृहाच्या दाराशी. मग मूर्खांचा बाजार भरेल पदरचे पैसे खर्च करून. त्यांच्याच तर भरवशावर मोठ्या विश्‍वासाने खेळला जातोय् हा सगळा खेळ, गेल्या कित्येक वर्षांपासून.
स्वत:च्या भावनांचा लिलाव मांडण्याची परवानगी इतरांना देऊन बसलेत लोक इथे. तेच ठरवतात आता, आम्ही केव्हा खूश व्हायचं अन् केव्हा आमची मनं दुखावलीत असं समजायचं ते. पद्माव‘ती’चा पद्माव‘त’ होताच युद्ध जिंकल्याचा साक्षात्कार झालेली, लागलीच क्षोभ शमलेली, इरेला पेटलेली आंदोलनं पटापट मागे घेणारी अगणित माणसं आहेत या समाजात. त्यांनाच पुढे करून ही असली गल्लेभरू थेरं चाललेली असतात, व्यापारी वृत्तीच्या शहाण्यांची. आता हेच बघा ना! जो चित्रपट आजपासून महिनाभराने कधीतरी प्रदर्शित होणार आहे, ज्याचे कथानक अद्याप कुणाला ठाऊकही नाही, त्यावरून बिहारमधील एका हुशार माणसाच्या भावना दुखावल्या. लागलीच सज्ज झाला तो थेट न्यायालयीन लढाई लढायला. बस्स! आता चित्रपट निर्मात्यापासून तर त्यात काम करणार्‍या शेवटच्या सहकार्‍यापर्यंत, सर्वांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले की काम फत्ते! प्रकरणाला आपोआपच मजबुती आणि गांभीर्य प्राप्त होणे तर क्रमप्राप्तच, असा कयास बांधल्याने, सुमारे सत्तर जणांवर आरोप ठेवला त्याने. यातून पुढे काय होईल, प्रत्यक्षात किती जणांना शिक्षा होईल ठाऊक नाही, पण प्रदर्शनापूर्वीच चित्रपट हिट करण्याची क्लृप्ती मात्र हमखास यशस्वी झाली आहे. आता यावरून सोशल मीडियावर चर्चा झडेल. खिसे भरणारे लोक वेगळेच असतील, पण या विषयावरून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले वैचारिक विरोधक एकमेकांच्या जिवावर उठतील. त्यांच्या आपसातील चर्चेतून वादळ निर्माण होईल. निर्मात्याला तरी यापेक्षा वेगळे काय हवे आहे, सांगा? त्याला जे हवे आहे ते विनासायास द्यायला तयार असलेला मूर्खांचा बाजार तर खुद्द मायबाप रसिक भरवून बसले आहेत. कुणाला कसूरवार ठरवायचे?
‘सैराट’पासून तर ‘पद्मावत’पर्यंतचा हाच एकसुरी अनुभव गाठीशी असतानाही त्यातून बोध कुणीच घेत नाही, हीच खरी खंत आहे. टीव्हीवरचा एखादा फडतूस रीयालिटी शो काय नि ठरवून वाद निर्माण केला गेलेलं एखादं पुस्तक काय, प्रसिद्धीचे हे नवेच तंत्र अंमलात आणताहेत त्या क्षेत्रातले हुश्शार लोक अलीकडे. दरवेळी कुणीतरी हीच खेळी खेळतो अन् आमच्याच नाकावर टिच्चून आम्हालाच लुटून पसार होतो. यात, ज्यांचा क्रिकेटशी काडीचा संबंध नाही अशा, शरद पवारांनी भरवलेल्या आयपीएलच्या धंद्यातून कमाई करणार्‍या सट्टेबाजांना दोष द्यायचा, की सलमानला न्यायालयाने शिक्षा जाहीर केली यात खोटे समाधान शोधणार्‍या रसिकांना? जग क्रिकेटचे असो की मग चित्रपटाचे, जोपर्यंत आपल्यासारखे रसिक-प्रेक्षक उपलब्ध आहेत, तोपर्यंत असली शक्कल लढविणार्‍यांचे कुणीच काहीच बिघडवू शकत नाही, हेच खरे…!

https://tarunbharat.org/?p=61936
Posted by : | on : 15 Sep 2018
Filed under : उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर, स्तंभलेखक (619 of 1519 articles)


सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जशा निकट येऊ लागल्या, त्याबरहुकूम केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील मोहिमांना धार चढू लागली आहे. निरनिराळे आरोप ...

×