ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » वजन कमी करण्याचा उद्योग…

वजन कमी करण्याचा उद्योग…

‘वजन वाढणे’, हा मराठीतला शब्दप्रयोग आहे. आता मराठी भाषेत कधी, कुठे आणि केव्हा कुठल्या शब्दाचा, वाक्याचा अर्थ काय निघेल काही सांगता येत नाही. त्यामुळे बर्‍याचदा अर्थाचा अनर्थ अन् पाण्याचा पदार्थ होतो. आता बघाना, बायको स्वयंपाकघरात पोळ्या करत आहे अन् तिने नवर्‍याला आवाज देत, ‘‘अहो, चिमटा घेता का?’’ असे म्हटले अन् त्याने काढलाच चिमटा तिला तर लाटणे डोक्यावर पडण्याची शक्यताच दाट असते. त्यावेळी चिमटा ही वस्तू आहे आणि गरम पोळ्या परतण्यासाठी आवश्यक आहे, याचे भान ठेवले पाहिजे. वजन कसे आणि कुठे वाढते, हे महत्त्वाचे आहे. ‘त्याचे दिल्लीत वजन आहे’, असे म्हणतो किंवा ‘साहेबांकडे त्याच्या शब्दाला वजन आहे’ असेही आपण म्हणतो. गज़ल या प्रकारात तर ती ऐकविताना हमखास, ‘‘इस शब्द का वज़न देखो…’’, असे शायर म्हणत असतो. कुणाचं राजकीय वजन वाढतं. कुणी त्या वजनाचाच माणूस असतो. कुस्तीपटूंच्या जोड्या तर वजनावरच लावल्या जात आतात. विमानात किती वजन न्यायचं, हे ठरलेलं आहे. आता विमानाच्या आत वीसच किलो वजन न्यायचं, हे ठरलेलं आहे. मात्र, आता एखादा माणूसच ओव्हर वेट असेल तर मग त्याचे काय? प्रवाशांचे वजन नेमके किती असावे, असे काही नियम विमानच कशाला कुठल्याच प्रवासात नाही. अगदी अंताच्या प्रवासातही नाही. हं, आता खांदेकरी तक्रार करतात की, फारच वजनी होता रे हा… आजकाल तर तीही तक्रार करायला जागा राहिली नाही, कारण स्वर्गरथ, मोक्षरथ नावाचे प्रकार आले आहेत. चार पावले चालले की पार्थिव रथारूढ करण्यात येत असतं. तरीही वजन वाढणे आणि त्यामुळेच्या समस्या या आहेतच. वजन वाढले की समस्या वाढतात. मग ते खिशाचे असो, तिजोरीचे असो की मग शरीराचे असो. वजन वाढले की समस्या वाढतात. आताच्या दिवसांत या वाढत्या वजनाच्या समस्या खूपच बळावल्या आहेत. त्यामुळे कोलेस्टरॉल वाढते, ब्लॉकेजेस होतात, रक्तदाब, मधुमेह या समस्या निर्माण होतात. ते दोन तर कायमचे सखे आहेत. तुम्ही मेल्याशिवाय ते काही तुमची साथ सोडत नाहीत. ते तुमच्या वारसांना त्यांनी न मागता वारसाहक्क म्हणून जात असतात… आता तुमची समस्या ही तुमची असतच नाही. आजकाल सेवा हा उद्योग झाला आहे. त्यामुळे तुमच्या सेवेला तत्पर हजर असतात लोक. त्यामागे सेवाभाव नसतो, हं सेवेला मात्र भाव असतो. तो समस्येपेक्षाही जास्त असतो. समजेल अशा मराठीत सांगायचे झाल्यास त्याला सर्व्हिस इंडस्ट्री असे म्हणतात. या इंडस्ट्रीचे फायदेही आहेत. म्हणजे तुम्ही मनात आणले किंवा तुम्हाला समस्या आली तर तुमच्या मनात असतानाच सेवा देणारे हजर असतात. म्हणजे कधीकाळी आपण आईच्या, आजीच्या हातचेच पापड खायचो, आता प्रांतोप्रांतीचे विविध प्रकारचे पापड घरपोच मिळतात. आता हे सारे असे घरपोच मिळत असल्याने समस्याही कशा घरपोच तयार होतात. वजन वाढणे, पोट वाढणे ही समस्या निर्माण झाली आहे आणि ‘वेट लॉस इंडस्ट्री’ नावाचा नवाच उद्योग तयार झाला आहे. त्यासाठी भांडवल काहीच लागत नाही. काहीही ऐकायला अन् स्वीकारायला तयार असलेले ग्राहक नव्या बाजारपेठेने तयारच करून ठेवले आहेत. वजन वाढण्याचा मार्ग पोटातून जातो, हा या इंडस्ट्रीचा फंडा आहे. त्यामुळे काय खावे, कसे खावे अन् किती, कुठे खावे यासंदर्भात हे वेट लॉस तज्ज्ञ मार्गदर्शन करत असतात. रामदेवबाबा पासून तर अगदी दीक्षित, दिवेकर, करंदीकर… असे कितीतरी मार्गदर्शक आहेत. एकही पैसा न घेता सेवाभावाने हे मार्गदर्शन करतात. वजन कमी करण्याचा मार्ग हा ईश्‍वर प्राप्तीच्या मार्गासारखाच आहे. म्हणजे ईश्‍वराकडे जाण्याचे अनेक मार्ग आहे. भक्ती, योग, नामस्मरण… असे कितीतरी मार्ग आहेत. तसेच वजन कमी करण्याचे प्रत्येकाचे आपले मार्ग आहेत. त्यांनी ते सिद्ध केले आहेत. युट्युब, गुगल या द्वारे आपण वजनमोक्षाच्या मार्गावर सहज जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही युट्यूबवर ‘वेट लॉस’ इतकेच टाकले तरीही ‘सात दिनमे दस किलो वजन कम करें’ पासून महिनेभरमे शर्तिया ५० किलो वजन कम’ असे दावे करण्यात आलेले दिसतील. आता पन्नास किलो वजन कमी करायचे असेल तर वजन असावे किती लागेल? बरे त्यासोबतच ‘हमारे मार्गपर चलने के पहले- चलने के बाद’ असे म्हणत लठ्ठ आणि रोड असे एकाच व्यक्तीचे वाटावे असे फोटोहो दिलेले असतात. मुंबईच्या एक डॉक्टर आहेत. त्या सूया टोचून वजन कमी करतात. एकही पैसा न घेता आपण हे काम सामाजिक आरोग्य राखण्यासाठी राष्ट्रीय कार्य म्हणून करत असल्याचे सांगतात. दृक्, श्राव्य, मुद्रित अशा अनेक माध्यमांतून हे वेटलॉस गुरू त्यांचा वेट मोक्ष मार्ग सांगत असतात. आजकाल यांची पुस्तके दणक्यात खपतात. त्यांचे फॉलोअर्स तयार होतात. ते मोफत ब्रँड अँबेसेडर झालेले असतात. युट्यूबवर यांची लिंक शोधली आणि ती ऐकली किंवा सबस्क्राईब केली तर तितके पॉईंटस् यांच्या खात्यात जमा होतात. तुम्ही चार वेटलॉस गुरूंना ऐकले तर तुमचं पार भजं झालेलं असतं. कुणी म्हणतं, फक्त दोनच वेळ जेवा. तेही पंचावन्न मिनिटेच. नंतर काहीच खाऊ-पिऊ नका. काही पदार्थ तर वर्ज्यच करा. तसेच अगदी याच्या विरुद्ध सांगणार्‍याही विभूती आहेत. म्हणजे तुम्हाला भूक लागली की काहीतरी खा. म्हणजे पोट रिकामे ठेवू नका. त्यामुळे इन्सुलीन तयार होण्याचे प्रोसेस, अ‍ॅमिनो अ‍ॅसिड, फॅटस्, व्हिटॅमिन्स… असे काय काय शब्द ऐकायला मिळतात. त्या ‘मेडिकल टर्म्स’ आपल्याला खूप सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा फील मस्त असतो. त्यामुळे कुणी लागली भूक की खा, कुणी दिवसातून दोनच वेळा खा, कुणी साठ मिनिटे झालीत की काहीतरी खा… असं वेगवेगळं सांगतात. बरे त्यांचे ऐकून तसे वागणारे असतात. इतकं असं विरोधी ऐकून तसं वागूनही प्रत्येकाच्या फालोअर्सचं वजन कमी झाल्याचं, बीपीच्या, शुगरच्या गोळ्या सुटल्याचं ती मंडळी सांगत असतात. म्हणजे आरोग्य विज्ञानाचे नेमके नियम काय? संभ्रच निर्माण होतो. कुणी साखर, तुप, दूध हे खलनायक आहेत, असं सांगतात तर कुणी तूप प्या, असं सांगतात. प्रोसेस फूड, पॅकेटबंद फूड खाऊ नका, असं कुणी सांगतं अन् कुणी बाबा ‘वजन घटानेवाले बिस्कुट’ तयार करतो. वजनमुक्तीचे हे असे अनेक मार्ग आहेत. जो ज्या मार्गाला लागला त्याला तोच मार्ग योग्य आहे, असे म्हणावेच लागते. एकमात्र नक्की, सार्‍या समस्या खाण्यावरूनच निर्माण होत असतात. ज्यांना खायला मिळतं त्यांचं वजन वाढतं अन् भारतात चाळीस टक्के जनता उपाशी- अर्धपोटी राहते. ज्यांना खायलाच मिळत नाही त्यांचा विचारही आपण खाताना ज्याच्या मनात येत नाही, त्यांचेच वजन वाढत असावे. त्यामुळे तुमचे वेटलॉस करायचे असेल तर रोज एका भुकेलेल्याला पोटभर जेवू घाला. त्याचे वजन वाढले की बघा तुमचे वजन कमी होते की नाही ते!

https://tarunbharat.org/?p=66602
Posted by : | on : 28 Oct 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (45 of 729 articles)


तोरसेकर | मंगळवार बुधवारच्या मध्यरात्री केव्हातरी सीबीआयच्या दोन्ही वरिष्ठ अधिकार्‍यांना सक्तीने सुटीवर पाठवण्यात आले. त्यावरून बुधवारी दिवसभर गदारोळ चालू होता. ...

×