ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » वर्गणीचे दिवस…

वर्गणीचे दिवस…

कशाकशाचे दिवस असतात. ते काळ, काम आणि वेगाच्या पर्यावरणात येत असतात. कधीकाळी विडंबन काव्याचे दिवस होते. आता ते नाहीत. कारण एकतर कुणाला आपली केलेली अशी गंमत, थट्टा आवडत नाही. आता असे म्हटले की लगेच काही २०१९ च्या निवडणुकीवर डोळे लावून बसलेले उपटसुंभ, ‘बघा बघा सहिष्णूताच राहिलेली नाही’ असे म्हणतील. त्या काळांत विडंबन काव्य करण्याची टूमच निघाली होती. अगदी आचार्य अत्र्यांनी ते केले अन् मग ते सुरू झाले. तर आता तेही दिवस सरले आहेत; पण असे कुणाकुणाचे अन् कशाकशाचे दिवस येत असतात. वर्षभरात सणांचे अन् उत्सवाचे सत्र सुरूच राहते. त्यानुसार काही दिवस येतात. आता वर्गणीचे दिवस आले आहेत. गणेशोत्सव अगदी तसा हातातोंडावर आला आहे. कधीकाळी घरोघरी मांडला जाणारा गणपती नंतर लोकमान्यांच्या प्रेरणेने गावोगावी मांडला जाऊ लागला. एक गाव अन् एकच गणपती असायचा. त्याच्या मूर्ती घडविण्यापासून तर त्याचा साराच खर्च गावकरीच करायचे. गणेशोत्सवाचे भादव्याचे दिवस आले की गावकरी एकत्र जमायचे. गणेशोत्सव कमेटी असायची. बैठक व्हायची अन् मग यंदा काय काय करायचे, हे ठरायचे. खर्च काढला जायचा. पंचक्रोशितली मंडळी खर्चात वाटा उचलायची. नंतर मात्र व्यक्तिस्वातंत्र्याचे स्तोम माजले. एकाच गावात चार-पाच गणपती सुरू झाले. मग सार्‍याच सण आणि उत्सवांचे व्यापारीकरण झाले. मूळ प्रथा बाजूला राहिल्या आणि व्यापार्‍यांनी त्यात त्यांच्या फायद्याच्या प्रथा घुसविल्या. आता दिवाळीला झावळ्याच्या काटीच्या टोकदार पानांना झेंडूची फुले लावली की घराची शोभा वाढायची. सजावट व्हायची. आता विजेच्या माळा लावायच्या असतात आणि आणखी काय काय करायचे असते. दुकान पाहिल्याशिवाय साजरे होणारे सण आता मॉलमध्ये गेल्याशिवाय पूर्ण होतच नाहीत. त्याही नंतरची पायरी म्हणजे आता सण आणि उत्सवांचे राजकीयीकरण झाले आहे. आता गावात नेत्यांचे गणपती असतात. मग जितके नेते तितके गणपती असतात. दहहंडी आणि गणपती उत्सव साजरे करूनच ‘भाऊ’ कार्पोरेटर, मग आमदार आणि मग मंत्री झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. हे भाऊ किंवा दादा कुठल्याही राजकीय पक्षाचे असू शकतात. त्यांच्या पक्षाची भूमिका कथित धर्मनिरपेक्ष असू शकते. गणपतीची मूर्ती एखादवेळी छोटी असू शकते, मात्र भाऊ, दादांची प्रतिमा मात्र त्याहीपेक्षा मोठी असते. करावी लागते. बाप्पांच्या विसर्जनानंतर या भाऊ, दादांच्या नेतृत्वाचा उदय होत असतो. तर आधीच्या काळी तरुणांची अन् बालकांचीही गणेश मंडळे असायची. ‘बाल गणेश मंडळ- साडी गल्ली, डोमगाव बुद्रूक’ अशी पाटी असायची. कापडावर पेंटर ती करून द्यायचे. ते फलक काळजीपूर्वक मंडळाचा अध्यक्ष किंवा सचिव जपून ठेवायचा अन् पुढील वर्षी तोच फलक कायम ठेऊन त्यावर ‘वर्ष तिसरे’चे वर्ष चौथे असे केले जायचे. आता फ्लेक्स आले आहेत. त्यामुळे त्यावर गणरायाच्या प्रतिमेसोबतच ‘बंटी भाऊ’, ‘पक्याभाऊं’चेही फोटो असतात. त्या काळात कापडी फलक असायचे अन् मग हे बालगणेशवाले तारुण्यात आले की हे बालगणेश मंडळचे चे ‘वडगाव खुर्द युवा गणेशोत्सव’ व्हायचे. मात्र, वर्गणी मागितली जायची. त्याच्याही अदा असायच्या. वर्गणी ही देणगी असते. ती ऐच्छिक असते, असा भाव काहीसा त्या काळात होता. त्यात आर्जव असायचे, भाषेत मार्दव असायचे. देणारेही पोरांची वाट बघत असायचे की, ‘‘अरे! यंदा अजून पोरं गणपतीची वर्गणी मागायला आली कशी नाहीत अजून? यंदा मांडणार नाहीत की काय?’’, असे गृहस्वामी विचारायचे. पोरं आलेत वर्गणीला की सणवारांचे दिवस असल्याने किमान घरात ओल्या खोबर्‍याच्या वड्या तरी असायच्या अन् त्या देऊन नंतर जलप्राषणासोबतच वर्गणी दिली जायची. ‘बापरे! काकांनी चक्क ५१ रुपये दिले.’ असे सुखद् आश्‍चर्य असायचे. कारण साधारण वर्गणीचा दर ११ किंवा २१ असायचा. गल्लीत, वेटाळांत एखाद्-दुसराच १०१ (इथे डोळे विस्फारलेले इमोजी आहे, असे गृहित धरून आकडा वाचावा) किंवा १५१ वाला एकदमच व्हीव्हीआयपी दाता असायचा. त्याच्या हाताने कधी आरती व्हायची. खूप आर्जवे करून वर्गणी मागितली जायची. देणारे काकादेखील, ‘यंदा काय कार्यक्रम आहेत?’ असे विचारायचे. काही खडूस असायचे. ‘‘साखर किती रुपये किलो झाली माहिती आहे का? सारखी महागाई वाढते आहे अन् तुम्हाला रे काय वर्गणी देणार?’’, असा प्रश्‍न विचारायचे. मग एखादा चुणचुणित मुलगा, ‘‘म्हणूनच तर यंदा वर्गणी वाढवून मागतो आहोत ना!’’ असे म्हणायचा. काही घरी गेल्या बरोबर काकूंकडे काकांनी वर्गणीचे पैसे ठेवलेलेच असायचे अन् काही घरी मग, ‘‘काका सायंकाळी येतील तेव्हा या’’ असे काकू सांगायच्या. आता काका फारच रागीट असल्याने एकतर मुले जायचीच नाहीत किंवा गेल्यावर काकांनी दिलेले पाच रुपये गुपचाप घेऊन परत यायचे. वेटाळांत हे माहिती असायचे. त्यामुळे आजुबाजूचे काका लोक, ‘‘त्या तमक्याने दिलेत ना, त्याच्या दुप्पट देईन’’ असे म्हणायचे. त्यांना हे माहिती असायचे की, हा कंजड लेकाचा पाच रुपयांच्या वर फेकणारच नाही… मग गणेशोत्सववाली मुलं अशा खडूस काकांबद्दल असहकाराचे धोरण स्वीकारायची. त्यांची पिंकी शाळेतून यायला उशिर होणार असेल तर वेटाळातली मुलं तिला आणायला जायची नाहीत. असहकाराचा हा पॅटर्न नंतर कडक होत गेला. दिवाळीला सुतळीबाँबला उदबत्ती लावून त्याचा टाईम बाँब करून त्यांच्या खिडकीत रात्री ठेऊन दिला जायचा… होळीला त्यांचे लाकडी सामान हमखास होळीत स्वाहा व्हायचे. नंतरच्या काळात बाल, तरुण मंडळांचा होमलीनेस गेला. वर्गणीची खंडणी कधी झाली, हे कळलेच नाही. ‘‘कॉकॉ, यंदॉ हज्जॉरचा आकडा हाय!’’ असे बजावले जाऊ लागले. आढेवेढे घेतलेच तर, ‘गाडी बाहेर राहते ना काका तुमची वर्षभर सुरक्षित.’ असे ‘समजावले’ जाऊ लागले. काकांची पिंकीही आता वयात आलेली असल्याने काकादेखील पोरांच्या मागायला येण्याची वाट न बघताच आधीच पाचशे रुपये पाठवून देऊ लागले. मुलं घरांतही यायला नकोतच ना! आता तर गणेशोत्सव आयोजित नाही तर प्रायोजित असतो. भाऊ किंवा दादांचे त्याला नेतृत्व असते. वेटाळातले लोक मंडपाचे काम सुरू झालेले दिसले की आपणहूनच ‘वर्गणी’ आणून देतात. खर्च किमान चार-पाच लाख तरी असतो. दादांच्या पक्षाचे मोठे लोक आरतीला येतात. दादांच्या फोटोसह स्वागत कमानी असतात. दादा आता किमान कार्पोरेटर झालेला असल्याने कंत्राटदारच आपणहून सारा खर्च करत असतात. वर्गणीची तशी काही गरजच पडत नाही. कार्यक्रम पुस्तिका छापली जाते. त्यात दादांच्या प्रभावक्षेत्रांतील ‘प्रतिष्ठानां’च्या हमखास जाहिराती असतात. कार्यक्रम म्हणजे ‘श्रींची स्थापना’ आणि ‘श्रींचे विसर्जन’ इतकेच असतात. बाकी सारीच रोषणाई असते. उत्सव कसा थाटात साजरा होतो. तरीही काही ठिकाणी वर्गणी केली जातेच. कारण आता अपार्टमेंटचा गणपती असतो… तर आता वर्गणीचे दिवस आले आहेत!

https://tarunbharat.org/?p=61023
Posted by : | on : 2 Sep 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (270 of 733 articles)


तोरसेकर | काश्मिरातले भाजपा-पीडीपी संयुक्त सरकार कोसळले आणि नंतरच्या काळात तिथे लष्करी कारवाईत होणार्‍या दगडफेकीला मोठा आळा बसला. शासकीय यंत्रणेत ...

×