ads
ads
हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

►संघाचा कुणीही शत्रू नाही • : सरसंघचालक मोहनजी भागवत…

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

►सीबीआयने घुसविल्याचा सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८…

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

रुपयातील घसरण किमान सात टक्के

रुपयातील घसरण किमान सात टक्के

►नाणेनिधीचा अंदाज ►नोटबंदी, जीएसटीमुळे विकासाला वेग, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १८…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

►सहकारी बँका अडचणीत ►नेत्यांना बजावली नोटिस, वृत्तसंस्था मुंबई, १८…

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

►अर्थमंत्री मुनगंटीवार यांना विश्‍वास, तभा वृत्तसेवा मुंबई, १८ सप्टेंबर…

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

►राष्ट्रवादी काँग्रेसची वित्त आयोगाकडे कैफीयत, तभा वृत्तसेवा मुंबई, १८…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:23
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » वाढते धूम्रपान घातकच!

वाढते धूम्रपान घातकच!

‘टोबॅको इज अ सायलेंट किलर,’ असं म्हटलं जातं, ते अगदी खरंच आहे. तंबाखू खाणं आरोग्यास हानिकारक आहे, अशी सूचना तंबाखूच्या पुडीवर, विडीच्या बंडलावर, सिगारेटच्या पाकिटावर ठळकपणे लिहिलेली असतानाही लोक तंबाखूचं सेवन करतात. तंबाखू खाल्ल्याने किंवा धूम्रपान केल्याने कॅन्सर होतो, असं सांगितल्यानंतरही तंबाखूचं सेवन थांबत नाही. याउलट, तंबाखू न खाणार्‍यांना किंवा सिगारेट न ओढणार्‍यांना काय कॅन्सर होत नाही काय, असा प्रतिप्रश्‍न केला जातो. दरवर्षी भारतात तंबाखूमुळे होणार्‍या कॅन्सरने नऊ लाख लोकांचा मृत्यू होत असतानाही तंबाखूसेवनाचे प्रमाण कमी झालेले नाही. धूम्रपानाचे प्रमाणही वाढतच चालले आहे. सिनेमात सिगारेट ओढतानाचे दृश्य दाखवायचे असेल, तर ‘धूम्रपान आरोग्यास घातक आहे,’ अशी ओळ दाखवावीच लागते. लोकांनी तंबाखूचे सेवन करू नये यासाठी अनेक उपाययोजना असतानाही तंबाखू खाणार्‍यांचे, विडी-सिगारेट ओढणार्‍यांचे प्रमाण वाढतच चालले आहे, ही चिंताजनक बाब आहे. भारतात जवळपास १२ कोटी लोक सिगारेट ओढतात. जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल विचारात घेतला, तर जगात जेवढे लोक सिगारेट ओढतात, त्याच्या १२ टक्के लोक हे भारतात आहेत. यावरून आपल्याला या समस्येचे गांभीर्य लक्षात येईल. भारतात वेगवेगळे कायदे आहेत, चळवळी चालवल्या जातात, व्यसनमुक्तीसाठी कार्यक्रम राबविले जातात, धूम्रपान करणे आरोग्यास हानिकारक असल्याचे निक्षून सांगितले जाते, तरीही लोक धूम्रपान करतात. विशेष म्हणजे स्त्रियांमधील वाढते धूम्रपान हा अधिक चिंतेचा विषय झाला आहे. ग्रामीण भागात तर स्त्रिया सुरुवातीपासूनच तंबाखूचे सेवन करतात, कुठेकुठे विड्या ओढतात. पण, आता शहरी भागातील महिलांमध्ये सिगारेट ओढण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. भारतात गेल्या काही वर्षांत पुरुषांचे धूम्रपानाचे प्रमाण कमी होत चालले असताना, स्त्रियांमधील धूम्रपान वाढत चालले आहे. वाढत्या धूम्रपानामुळे स्त्रियांना वांझपणाचा धोका वाढला आहे. शिवाय, कॅन्सरचा धोका आहेच. टीव्हीवर येणार्‍या जाहिराती, दाखविले जाणारे कार्यक्रम यामुळे स्त्रियांवर नको तो प्रभाव पडत आहे. टीव्हीने केलेल्या आक्रमणामुळे भारतातील स्त्रियांची जीवनशैलीही बदलत चालली आहे. बदलत्या जीवनशैलीत धूम्रपानाची सवय केव्हा लागली, हे सिगारेट ओढणार्‍या स्त्रियांनाही कळत नाही! बदलत्या लाईफ स्टाईलमुळे महिलांना धूम्रपान करण्याची सवय जडत आहे, असे एका सर्वेक्षणाअंती लक्षात आले आहे. धूम्रपानामुळे महिलांमध्ये वांझपणा येण्याची शक्यता तर बळावतेच, कॅन्सरचा धोकाही उत्पन्न होतो. याशिवाय, धूम्रपान केल्याने फुफ्फुस कमजोर होण्यास प्रारंभ होतो. जे धूम्रपान करतात, त्यांना सुरुवातीची चार-पाच वर्षे याबाबत काही जाणीव होत नाही. त्यांचे फुफ्फुस नियमितणे काम करीत असते. प्रत्यक्ष परिणाम दिसत नसला, तरी नुकसान सुरू झालेले असते. तंबाखू जरी पुरुष आणि महिला असा भेदभाव करीत नसला, तरी धूम्रपानामुळे महिलांवर लवकर विपरीत परिणाम होतो, असे तज्ज्ञ सांगतात. वांझपणासोबतच सर्व प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढीस लागत असल्याने चिंता वाढीस लागली आहे. भारत आणि चीन या दोन देशांमधील लोकसंख्या प्रचंड आहे. चीन नंबर एकवर आणि भारत नंबर दोनवर आहे. या दोन्ही देशांकडे पाश्‍चात्त्य जग बाजारपेठ म्हणूनच पाहते. त्यामुळेच अन्य उत्पादनांसोबतच तंबाखूयुक्त पदार्थांसाठीही भारत आणि चीनच्या बाजारपेठेवर पाश्‍चात्त्यांचा डोळा आहे. या दोन्ही देशांमधील महिला जाहिरातींना लवकर बळी पडतात, दोन्ही देशांमधील महिलांवर जाहिरातींचा प्रभाव लवकर पडतो, असा एका सर्वेक्षणातील निष्कर्ष आहे, जो चिंताजनक आहे. पाश्‍चिमात्य देशांमध्ये असलेले कडक कायदे सिगारेट कंपन्यांना मानवणारे नाहीत. त्यामुळे ते भारत आणि चीनमध्ये आपल्या उत्पादनांचा प्रचार-प्रसार करतात. भारत आणि चीन या दोन देशांमधील पुरुषांसोबतच मोठ्या प्रमाणात महिला सिगारेट ओढायला लागल्या, की पाश्‍चात्त्य जगातील बाजारपेठांची आपल्याला गरजच पडणार नाही, असा या कंपन्यांचा होरा आहे. त्यातूनच ते मोठ्या प्रमाणात जाहिराती करताना दिसतात. यावर अंकुश लावण्याची गरज आहे. दिवसेंदिवस धूम्रपान करणार्‍या स्त्रियांची संख्या वाढत चालली आहे. पूर्वी मुंबईसारख्या महानगरांमध्ये दिसणारे दृश्य आता अनेक छोट्यामोठ्या शहरांमध्येही दिसू लागले आहे. ही बाब समाजाची चिंता वाढविणारी आहे. विकसित देशांमध्ये धूम्रपान करणार्‍यांची जी संख्या आहे, त्यात ३० टक्के पुरुष आणि १७ टक्के महिला आहेत. विकसनशील देशात धूम्रपान करणार्‍यांत ३२ टक्के पुरुष आणि केवळ चार टक्के महिला आहेत. याचा अर्थ असा की, महिलांचे धूम्रपान करण्याचे प्रमाण हे विकसित देशात जास्त आहे. अमेरिकेसारख्या प्रगत आणि बलाढ्य देशात दरवर्षी पाच लाख लोकांचा धूम्रपान केल्याने होणार्‍या कॅन्सरने मृत्यू होतो. धूम्रपानामुळे होणार्‍या आजारांवर दरवर्षी ३०० कोटी डॉलर्स एवढा प्रचंड खर्च होतो. अमेरिकेत पुरुषांचे सिगारेट ओढण्याचे प्रमाण २२ टक्के आणि स्त्रियांचे १७ टक्के आहे. एकूण लोकसंख्येच्या पाच कोटी लोक धूम्रपान करतात. फ्रान्समध्ये धूम्रपानामुळे होणार्‍या आजारांवर २०० कोटी डॉलर्स, इंग्लंडमध्ये १०० कोटी डॉलर्स, चीनमध्ये ७० कोटी डॉलर्स एवढा खर्च केला जातो. भारतात अशा आजारांवर एक लाख १० हजार कोटी रुपयांचा खर्च केला जातो. केंद्र आणि राज्यांची सरकारं मिळून आरोग्य सुविधांसाठी जेवढा खर्च करतात, त्याच्या १२ पट जास्त खर्च आपल्या देशात धूम्रपान केल्यामुळे होणार्‍या आजारांवर उपचार करण्यावर खर्च केला जातो. यावरून आपल्याला समस्येचे गांभीर्य लक्षात यावे. भारतात एक हजार लोकांमध्ये ८७ लोक धूम्रपान करतात. एक व्यक्ती सरासरी दररोज आठ सिगारेट ओढते. पाकिस्तानातील ही सरासरी १६ सिगारेट एवढी आहे. पाकमध्ये हजारात १०० लोक धूम्रपान करतात. रशियात हजारात २६९ लोक धूम्रपान करतात आणि एक व्यक्ती सरासरी दररोज २४ सिगारेट ओढते. चीनमध्ये २०९ लोक सिगारेट ओढतात आणि सरासरी २२ सिगारेट ओढल्या जातात. नेपाळमध्ये १०९ लोक धूम्रपान करतात आणि सरासरी सहा सिगारेट ओढतात. युएईमध्ये हजारात १५४ लोक धूम्रपान करतात आणि सरासरी १८ सिगारेट ओढतात. भूतानमध्ये ८४ लोक धूम्रपान करतात आणि सरासरी २३ सिगारेट ओढतात. बांगलादेशात हजारात १५७ लोक धूम्रपान करतात आणि सरासरी तीन सिगारेट ओढतात. अमेरिकेत २०० लोक सिगारेट ओढतात आणि सरासरी २३ सिगारेट ओढतात. न्यूझीलंडमध्ये १३२ लोक धूम्रपान करतात आणि सरासरी २० सिगारेट ओढतात. ऑस्ट्रेलियात १३५ लोक धूम्रपान करतात आणि सरासरी २० सिगारेट ओढतात. जपानमध्ये हे प्रमाण हजारात १८३ एवढे असून, सरासरी २४ सिगारेट ओढल्या जातात. ग्रीस या देशात एक हजार लोकांमध्ये ३१२, मॅसिडोनियामध्ये ३०७, सर्बियामध्ये २९८ लोक धूम्रपान करतात. सुरिनाम या देशात एक माणूस दररोज सरासरी १०९ सिगारेट ओढतो! त्याला ‘चेनस्मोकर’पेक्षाही काही वेगळे नाव देता येईल. धूम्रपानाचे हे प्रमाण अतिशय घातक आहे. त्यामुळे धूम्रपानविरोधी मोहीम भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात वेगाने चालू करण्याची गरज आहे. धूम्रपानामुळे होणारे नुकसान अधोरेखित करतानाच जनतेने आपापल्या देशातील सरकारांवर दबाव आणून तंबाखूवर बंदी घालण्याची मागणी रेटून धरली पाहिजे. तर आणि तरच पुढला अनर्थ टळणार आहे…

http://tarunbharat.org/?p=60270
Posted by : | on : Aug 22 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (55 of 855 articles)


श्याम पेठकर | पावसाने मौन तोडले की त्याची गाणी होतात. आभाळाचे गहिवर ढगांमध्ये दाटून येतात आणि ढगांना पाण्याच्या टपोर्‍या थेंबांचे ...

×