ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » विकृती की प्रकृती?

विकृती की प्रकृती?

समलैंगिक संबंधांना वैध करार देत, समलैंगिक असणे हा गुन्हा नाही, असा एका अर्थाने ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिल्यानंतर, समलैंगिक तसेच त्याचे समर्थक यांचा जो जल्लोष मीडियात दाखविला जात आहे, तो संभ्रमित करणारा आहे. परंतु, या जल्लोषाकडे बघितले तर तो उन्मादच अधिक असल्याचे दिसून येईल. मीडियातील काही जणांच्या तर अक्षरश: मर्कटलीला सुरू आहेत. कशाचा हा एवढा उन्माद आहे? नैसर्गिक भावनेचा की विकृतीचा? सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकतेची भावना विकृत नसल्याचे म्हटल्याने सत्य पराभूत होत नाही. या निर्णयानंतर समलैंगिकांचा जल्लोष इतका फसफसून ओघळत आहे की, ज्यांना समलैंगिक भावना नाहीत, ते जणू गुन्हेगार ठरले आहेत! त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सर्व गदारोळात, हे प्रकरण नेमके काय आहे, ते समजून घेतले पाहिजे. २००१ साली नाझ फाऊंडेशन या एचआयव्ही/एड्स आणि लैंगिक समस्येवर कार्य करणार्‍या स्वयंसेवी संस्थेने कलम ३७७ विरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हे कलम रद्द करण्याची मागणी केली. भारतीय दंड विधानातील या कलमान्वये समलैंगिकता हा गुन्हा ठरविण्यात आला आहे व त्यासाठी जबर शिक्षेची तरतूद आहे. २००९ साली दिल्ली उच्च न्यायालयाने कलम ३७७ हे संविधानप्रदत्त मूलभूत अधिकारांचे हनन असल्याचे म्हटले. या निर्णयाविरुद्ध काही धार्मिक संस्थांनी (बहुतांशी ख्रिश्‍चन) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. २०१३ साली सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल रद्द ठरविला. कुठलाही कायदा रद्द करण्याचा अधिकार संसदेला आहे, न्यायालयाला नाही, असे ठणकावून सांगत सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्‍न संसदेने सोडवावा असे म्हटले. या निर्णयाविरुद्ध नाझ फाऊंडेशन व अन्य यांनी सर्वोच्च न्यायालयातच ‘क्युरेटिव्ह’ याचिका दाखल केली. त्यावर तत्कालीन सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या पीठासनाने हे प्रकरण पुनर्विचारार्थ पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केले. त्यावर आताचा सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे. या सर्व घटनाक्रमातून काही प्रश्‍न उपस्थित होतात. मुळात हा कायदा ब्रिटिशांनी केला आहे. मग, १९५१ साली स्वतंत्र भारताचे संविधान लागू झाले, त्या वेळी हे ३७७ कलम त्यात कायम का ठेवण्यात आले? आज जे सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे की, कलम ३७७ मुळे संविधानप्रदत्त मूलभूत अधिकारांचे हनन होत आहे, मग ही बाब संविधान निर्माण करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून इतर सर्व घटनातज्ज्ञांच्या लक्षात का आली नाही? हे कलम जसेच्या तसे ठेवण्यामागे त्यांचा काय विचार होता, याचा परामर्श कुणी घेतला आहे का? पं. जवाहरलाल नेहरू यांनीच भारतात लोकशाही रुजविली, असे म्हणता ना, मग, नेहरूंनाही हे मानवाधिकारांचे हनन करणारे कलम का खटकले नाही? मूलभूत अधिकारांचा जो पुळका आजच्या सर्वोच्च न्यायालयाला आला आहे, त्यावरून असे म्हणायचे का की, २०१३ सालच्या सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत अधिकारांशी काहीही देणेघेणे नव्हते? कायद्याचा अन्वयार्थ प्रत्येक न्यायाधीशापाठी बदलत जाणार का? भारताचे संविधान खेळखंडोबा वाटला का? या प्रश्‍नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. संविधानानुसार कायदा करण्याचे आणि एखादा कायदा रद्द करण्याचे अधिकार संसदेला देण्यात आले आहेत. संसदेतील सदस्यांना इंग्रजी भाषेत ‘लॉ मेकर’ असे विशेषण आहे. संसद ही जनतेचे प्रतिनिधित्व करीत असते. जर संसदेला या ३७७ कायद्याबाबत काही करण्याची इच्छा नाही, याचा अर्थ, भारतीय समाजाचीही तीच इच्छा आहे, असा का घेऊ नये? सरन्यायाधीश दीपक मिश्रा म्हणाले की, या कायद्यावर विचार करण्यासाठी संसदेत पुरेसे बहुमत येईपर्यंत थांबण्यास आम्ही तयार नाही. हे विधान अत्यंत आक्षेपार्ह नाही का? जनतेचे प्रतिनिधित्व करणार्‍या संसदेला जर या संदर्भात घाई नाही, तर तुम्हाला इतकी कुठली आणि कशाची घाई सुटली आहे? संसदेतील बहुमताऐवजी, न्यायालयात न्यायाधीशांचे बहुमत असले की झाले का? या पृथ्वीवर उत्पन्न होणार्‍या प्रत्येक सजीवाचे एकमेव मूळ उद्दिष्ट वंशसातत्य राखणे हे असते. अगदी बुद्धिमान मनुष्यप्राण्यापर्यंत. या वंशसातत्यासाठी सजीवांमध्ये निसर्गाने भिन्न लिंगाप्रती आकर्षण निर्माण केले आहे. या भिन्नलैंगिकतेतूनच वंशसातत्याची वाट प्रशस्त होत असते. ही प्रकृती आहे. ती कुणीही नाकारू शकत नाही. मनुष्यप्राणी सोडला तर इतर कुठलाही सजीव, या प्रकृतीच्या लक्ष्मणरेषा ओलांडत नाही. त्यामुळेच हे सजीव ना कधी सुसंस्कृत होऊ शकत, ना विकृत. परंतु, मनुष्यप्राण्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर प्रकृतीच्या या लक्ष्मणरेषा सदोदित ओलांडल्या आहेत. त्यामुळे केवळ आणि केवळ मनुष्यच सुसंस्कृत किंवा विकृत होऊ शकतो. प्राकृतातून संस्कृताकडे जाण्याची दिशा, भारतीय परंपरेत उच्च कोटीची मानली आहे. प्राकृताकडून विकृताकडे जाणे सदा निषिद्ध मानले आहे. भारतीय सभ्यतेची संपूर्ण उभारणीच या मूलभूत तत्त्वावर झाल्याचे आपल्या लक्षात येईल. या सनातन सत्यावर आधारलेली असल्यानेच आपली भारतीय सभ्यता हजारो वर्षे झाली तरी आजही टिकून आहे. जगातील बहुतेक सर्व सभ्यता नष्ट झाल्या असताना, भारतीय सभ्यता अजूनही केवळ टिकूनच नाही, तर उत्कर्षही पावत आहे, याचा मत्सर जगातील आधुनिक विचारसरणींना आहे की काय, असे वाटू लागले आहे. म्हणूनच की काय, ही भारतीय सभ्यता नष्ट व्हावी म्हणून अखंड प्रयत्न सुरू आहेत. त्याचे आपण सर्व भुक्तभोगी आहोत. या सर्व पृष्ठभूमीवर, पुरुषाला पुरुषाप्रती, स्त्रीला स्त्रीप्रती वाटणार्‍या लैंगिक आकर्षणापोटी, घडणारे शारीर व्यवहार हे विकृत आहेत; सुसंस्कृत तर नाहीच, पण प्राकृतही नाहीत, हे लक्षात येईल. परंतु, आधुनिकतेच्या नावावर हे विकृत व्यवहार सुसंस्कृत ठरविण्याची अहमहमिका सुरू झाली आहे. आज या व्यवहारांना कायद्याची मान्यता मिळाली आहे. याचा अर्थ समाजमान्यता मिळाली आहे, असा होत नाही. समाज कायद्याने बदलत नाही. तसे असते तर आज जगाचे चित्र फार मनोहर दिसले असते. समाज स्वत: बदलत असतो. काळाच्या ओघात जे ग्राह्य ते ग्रहण करून आणि जे त्याज्य ते टाकून तो पुढे जात असतो. अशा या सतत बदलत्या समाजाचे प्रतिबिंब म्हणजे लोकनिर्वाचित संसद! ‘यथा प्रजा, तथा राजा’ हे लोकशाहीचे सूत्र आहे. त्यामुळे ३७७ वरील या निर्णयाने सर्वोच्च न्यायालयाने संसदेच्या अधिकारांवर आक्रमण केले आहे, असेच म्हणावे लागेल. हे असले घातक पायंडे पाडून न्यायालये काय साध्य करतात, देवास ठाऊक! प्रश्‍न समलैंगिकांना मान्यता देण्याचा अथवा न देण्याचा नाही. त्यांना स्वीकारायचे की नाही, हे समाज ठरवेल आणि त्याला ठरवू दिले पाहिजे. परंतु, दु:ख म्हातारी मेल्याचे नाही, तर काळ सोकावतो त्याचे आहे…

https://tarunbharat.org/?p=61434
Posted by : | on : 8 Sep 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (262 of 737 articles)


कुहीकर | आता ही कोण म्हणून विचारू नका! सामाजिक क्षेत्रातील तिच्या योगदानाबद्दलही चकार शब्द काढायचा नाही हं कुणीच. तिच्या नैतिक ...

×