ads
ads
संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर – पक्षभेद आणि राजकीय…

फुकटात काहीच मिळत नाही

फुकटात काहीच मिळत नाही

►चीनची मदत घेणार्‍या देशांना लष्करप्रमुखांचा इशारा, वृत्तसंस्था पुणे, १७…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

►चीनसह पाकला खडे बोल!, वृत्तसंस्था जीनिव्हा (स्वित्झर्लंड), १५ सप्टेंबर…

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १५ सप्टेंबर – अमेरिका आणि चीन या…

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

►मराठवाड्यातील उमरज येथील घटना, प्रतिनिधी कंधार, १७ सप्टेंबर –…

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

मुंबई, १८ सप्टेंबर – ट्रेनने दररोज २३ दशलक्षांहून अधिक…

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

►मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती बंदी, मुंबई, १४ सप्टेंबर –…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:24
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » विजयाची चव चाखवणारा कर्णधार!

विजयाची चव चाखवणारा कर्णधार!

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, शैलीदार डावखोरे फलंदाज अजित वाडेकर यांचे १५ ऑगस्टला, वयाच्या ७७ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील भारतीयांचा स्वाभिमान उंचावणार्‍या एका पर्वाचे केवळ साक्षीदारच नाही, तर त्या पर्वाचे निर्माते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. तो काळ वेगळाच होता. तेव्हा भारतीय क्रिकेट संघाशी भारतीयांचा स्वाभिमान जुळला होता. क्रिकेट खेळाडूदेखील त्या जाणिवेनेच खेळायचे, वावरायचे. खेळाडूंच्या पांढर्‍या पोशाखाइतकीच शुभ्रता या खेळामध्ये होती. एका वाक्यात सांगायचे झाले, तर त्या काळी आजच्यासारखे पैशाचे वाह्यात प्रस्थ या खेळात नव्हते. अशा या काळातील अजित वाडेकर आहेत. अजित वाडेकर यांचे नाव निघताच, क्रिकेटप्रेमींना १९७१ सालच्या इंग्लंड व वेस्ट इंडिजसोबत झालेल्या मालिका आठवतात. वाडेकर यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने प्रथमच भारताबाहेर कसोटी मालिका जिंकल्या होत्या. क्रिकेट खेळाचे माहेरघर असलेल्या इंग्लंडमध्येच इंग्लंडच्या चमूला नामोहरम करण्याचा पराक्रम केला होता. वेस्ट इंडिजलाही त्यांच्या देशात पराभूत करून मालिका खिशात टाकली होती. तोपर्यंतचा भारतीय क्रिकेट संघाचा इतिहास बघितला, तर या दोन घटना आश्‍चर्यकारक वाटाव्या अशा होत्या. तोपर्यंत, कसोटी सामन्यात विजय, ही फार दूरची गोष्ट होती. पराभव टाळणे आणि सामना अनिर्णित ठेवणे, ही बाब खूप श्रेयस्कर मानली जायची. आपल्या संघाने सामना अनिर्णित ठेवून पराभव टाळला, याचाच भारतीयांना अभिमान वाटायचा. भारतीय क्रिकेट संघ सामना जिंकण्यासाठी नाही, तर सामना अनिर्णित ठेवण्यासाठीच खेळतो, अशी टीकाही त्या काळी होत होती. पण, अजित वाडेकर यांनी भारतीय चमूलाच नाही, तर भारतीय क्रिकेटप्रेमींना यशाची चव चाखायला दिली. अजित वाडेकर महान फलंदाज म्हणून विख्यात नव्हते. ते कर्णधार म्हणून प्रसिद्ध होते. उत्कृष्ट खेळ असणे वेगळे असते आणि नेतृत्व करण्याचा गुण असणे वेगळे असते. वाडेकर जन्मजात नेता होते. आपल्या चमूतील प्रत्येक खेळाडूच्या कमी-अधिक क्षमतेचा बारकाईने अभ्यास करून, त्याचे मर्मस्थळ झाकून, त्याच्यातील शक्तिस्थळाला अधिकाधिक उत्तेजित करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची फार मोठी जबाबदारी कर्णधारावर किंवा नेतृत्वावर असते. ही जबाबदारी पार पाडण्यात अजित वाडेकर शंभर टक्के उत्तीर्ण झाले होते! तसे बघितले तर अजित वाडेकर यांना भारताकडून खेळण्याची संधी जरा उशिराच मिळाली. १९६६ साली वेस्ट इंडिजचा बलाढ्य संघ, गॅरी सोबर्स यांच्या नेतृत्वात भारतात आला असता, अजित वाडेकर प्रथमच भारतीय संघाकडून खेळले. परंतु, १९७१ साली याच गॅरी सोबर्स यांच्या संघाला त्यांच्याच देशात धूळ चारून मालिका जिंकण्याचा विक्रमही केला तो अजित वाडेकर यांनीच! वेस्ट इंडिज आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून मालिका जिंकण्याचे श्रेय मात्र क्रीडा समीक्षकांनी वाडेकरांना मिळू दिले नाही. वाडेकरांच्या उत्कृष्ट नेतृत्वगुणामुळे हे विजय मिळाले नसून, नशिबामुळे मिळाले, असे त्या वेळी बोलले जात होते. एवढेच नाही, तर ओळीने तीन मालिका जिंकण्याचा पराक्रमही वाडेकरांच्या संघाने केला असला, तरी त्याचेही फार कौतुक करण्यात आले नाही. हा वाडेकरांवर अन्याय होता. विजय मर्चंट यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने अजित वाडेकर यांच्यावर भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविली. त्याआधी मन्सूर अली खान पतौडी कर्णधार होते. ‘नबाबी’ पतौडींच्या जागेवर हा कोण मुंबईतला मध्यमवर्गीय, असा कुत्सित प्रश्‍न त्या वेळी वारंवार विचारला गेला होता. पण, याच वाडेकरांनी आपल्या मध्यमवर्गीय ‘खडूस’ वृत्तीचा परिचय देत, भारताची मान उंचावली होती. अजित वाडेकर यांच्या चमूत तेव्हा सुनील गावसकर, गुंडाप्पा विश्‍वनाथ हे फलंदाज, तर फारुख इंजिनीअर यष्टिरक्षक आणि बिशनसिंह बेदी, इरापल्ली प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर आणि वेंकटराघवन् हे फिरकीपटू होते. भारतीय फिरकीपटूची जादू सार्‍या जगाला दाखवून देण्याचे आणि त्या आधारे सामने जिंकून दाखविण्याचे श्रेय कुणाला द्यायचे असेल, तर ते निश्‍चितच अजित वाडेकर यांना द्यावे लागेल! भारतीय क्रिकेट संघ म्हणजे फिरकी, असे समीकरणच त्या काळी झाले होते. भारतीय फिरकीपटूंचा संघात इतका दबदबा निर्माण झाला होता की, संघातील कथित वेगवान गोलंदाजांना, फिरकीपटूंसाठी नवा चेंडू खराब करण्याचेच काय ते काम उरले होते! एकदा का चेंडू खराब झाला की, मग या वेगवान गोलंदाजांचे काम संपायचे आणि मग सुरू व्हायचे फिरकीपटूंचे साम्राज्य…! ही परिस्थिती कपिलदेव येईपर्यंत सुरू होती. या अशा यशस्वी फिरकी-युगाचे जनक म्हणून अजित वाडेकर यांना श्रेय द्यायला हवे. आपल्या शक्तिस्थळांचा अचूक व योग्य वेळी वापर करण्यात अजित वाडेकर निष्णात होते. चमूतील एक-दोन खेळाडू आपल्या वैयक्तिक पराक्रमाने सामने जिंकून देत आहेत, हे दृश्य तितकेसे योग्य नसते. संपूर्ण चमूने सांघिक खेळाचा उत्कृष्ट समन्वय प्रदर्शित करीत सामना जिंकणे केव्हाही श्रेष्ठ मानले गेले आहे. अजित वाडेकरांनी भारतीय क्रिकेट संघाला याच वृत्तीचा परिचय देत विजय मिळवून दिले आहेत. आपल्या वैयक्तिक कामगिरीचा आलेख उंचावण्यातच तत्पर असलेला कर्णधार कधीही यशस्वी होत नसतो. सांघिकतेने विजय प्राप्त करण्यासाठी प्रसंगी त्याला आपली कारकीर्दही समर्पित करावी लागते. अजित वाडेकर या पठडीतील कर्णधार होते. आज क्रिकेटचे रूप बदलले आहे. क्रिकेट खेळातील कलात्मकता, अभिजातता लोप पावली आहे. क्रिकेट बाजारू झाला आहे. या खेळात प्रचंड पैसा ओतला जात आहे आणि बाहेरही काढला जात आहे. खेळाडू फाजील लाडाच्या आहारी गेले आहेत. डोळे पांढरे व्हावे इतका प्रचंड पैसा यात येत असल्यामुळे, त्यापाठोपाठ येणारे सर्व दुर्गुण व अपप्रवृत्ती व्यवस्थितपणे या खेळात शिरल्या आहेत. पूर्वी क्रिकेटचा सामना एक खेळ असायचा, आज ते एक खर्चीक आयोजन झाले आहे. एकेकाळी सभ्य लोकांचा खेळ म्हणून मान्यता पावलेल्या या खेळाला आज किळसवाणे स्वरूप प्राप्त झाले आहे. परंतु, अजित वाडेकर या अशा क्रिकेटचे खेळाडू नव्हते. ज्या वेळी खेळात खिलाडूवृत्ती सर्वोपरी होती, परस्परांवर विश्‍वास होता, मनाची विशालता होती, त्या काळातले ते होते. आज लहानसहान निर्णयांसाठीदेखील तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागत आहे. इतका अविश्‍वास निर्माण झाला आहे. ही वेदना घेऊनच तर नाही ना, अजित वाडेकर अनंताच्या प्रवासाला गेले असतील! भारतीयांच्या स्वाभिमानाला विजयाच्या मोरपिसाने कुरवाळण्याची संधी देणार्‍या अजित वाडेकर यांना विनम्र श्रद्धांजली!

http://tarunbharat.org/?p=59976
Posted by : | on : Aug 18 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (61 of 853 articles)


श्रीनिवास वैद्य | परवा बंगालचे दोन संघ प्रचारक मुंबईहून हावड्याला जाणार होते. आधी परिचय असल्यामुळे भेटण्यासाठी मला फोन आला. मी ...

×