ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » उपलेख, संपादकीय » विज्ञान विरुद्ध तंत्रज्ञान कृत्रिम संघर्ष…

विज्ञान विरुद्ध तंत्रज्ञान कृत्रिम संघर्ष…

विजय चौथाईवाले |

तीस वर्षांपूर्वी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) माझे पीएच्. डी. प्रबंधाचे काम अर्ध्यावर आले असताना, मला एका फ्रेन्च प्राध्यापकासोबत तीन महिन्यांसाठी काम करण्याची संधी आली होती. परंतु, एनसीएलने मला स्पष्ट सांगितले की, पीएच्. डी. करणार्‍या विद्यार्थ्याला अशा प्रकारे सुटीवर जाण्याची तरतूद नाही. एनसीएलचे तत्कालीन प्रभारी संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी हस्तक्षेप केल्यामुळे, मला ती परवानगी मिळू शकली.
अमेरिकेतील माझे पीएच्. डी. प्रबंधानंतरचे कार्य संपवून मी जेव्हा परत आलो, तेव्हा मी सरकारी प्रयोगशाळा किंवा विद्यापीठात कार्य न करण्याचे जे ठरविले, ते या अशा अनुभवांमुळेच.
त्यानंतर भारताच्या विज्ञान-क्षेत्रात खूप काही बदल झाले आहेत. डॉ. माशेलकर यांनी, कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इण्डस्ट्रियल रीसर्च व्यवस्थेतील आत्मतुष्टीची भावना बर्‍याच प्रमाण नष्ट केली, आर्थिक तरतुदींच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा केली, राष्ट्रीय संस्था आणि विद्यापीठांतील शास्त्रीय प्रयोगशाळा आता बर्‍यापैकी साधनसंपन्न आहेत. मी जेव्हा पीएच्. डी. करीत होतो तेव्हा संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन फक्त बाराशे रुपये होते, ते आता २५ हजार रुपये झाले आहे. अनेक हुशार शास्त्रज्ञ आता भारतात परतत आहेत. ही एक सकारात्मक घडामोड आहे.
‘द प्रिंट’च्या १५ ऑगस्टच्या अंकातील शेखर गुप्ता यांनी त्यांच्या ‘मोदीज स्पेस ड्रीम : इंडिया स्टिल डझन्ट नो द डिफरन्स बिटवीन टेक् अ‍ॅण्ड सायन्स’ या लेखात (मोदींचे अंतराळ स्वप्न : भारत अद्याप तंत्रज्ञान व विज्ञानातील फरक जाणत नाही), प्राचीन भारतीय विज्ञानाची पुराव्यानिशी किंचितही भलावण करणार्‍यांवर अकारण ताशेरे ओढतानाच, भारतातील विज्ञान क्षेत्राच्या सध्याच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करीत काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. यावर मला माझी काही निरीक्षणे नमूद करायची आहेत.
अहमदाबाद येथील टोरेन्ट फार्मास्युटिक्स कंपनीत कार्यरत असताना एका ब्रिटिश सल्लागाराने मला विचारले की, तुम्ही बायोटेक्नोलॉजिस्ट आहात काय? मी नाही म्हणालो. कारण, माझ्या मते तंत्रज्ञानापेक्षा विज्ञानाची वैशिष्ट्यपूर्ण वरचढ भूमिका असते. हा वाद काही नवा नाही. अगदी अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूटस् ऑफ हेल्थसारख्या उच्च संस्थेतही, मूलगामी वैज्ञानिक आणि प्रत्यक्ष कार्यस्थळी कार्य करणारे प्रयोगात्मक (क्लिनिकल) वैज्ञानिक (वैद्यकीय पदवी नसणारे आणि वैद्यकीय पदवीधारक) यांच्यात सतत एक वाद आहे.
भारतात, जनसामान्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित होण्यात काही परंपरा अडथळे आणत असतात. हे खरे असले तरी आणि आमच्या अध्ययनव्यवस्थेत प्रश्‍न विचारण्याची परंपरा असतानाही, शेखर गुप्ता यांनी जे काही प्राचीन आहे, त्यांची थट्टा उडविली आहे. आदी शंकराचार्यांची एक प्रसिद्ध उक्ती आहे- ‘अग्नी शीतल असतो किंवा अंधारासारखा असतो असे शंभर श्रुतींनी म्हटले, तरी या संदर्भात त्यांना तसा अधिकार नाही.’ परंतु, आम्हा भारतीयांनी ही वृत्ती गमविली आणि आम्ही अधिकाधिक ग्रंथप्रामाण्यवादी बनत गेलो, चौकटीच्या बाहेरचा विचार करण्याची क्षमता किंवा आधी प्रतिपादित केलेल्या सिद्धान्तांचा पडताळा घेण्याचे आम्ही सोडून देत गेलो.
आमची आधुनिक शिक्षणपद्धती आम्हाला प्रश्‍न विचारायला प्रेरित करीत नाही. आमचे हुशार विद्यार्थी सिद्धान्तत: स्पष्ट असतात, ताज्या घडामोडींबाबत निष्णात असतात; परंतु समस्या सोडविण्याची त्यांची क्षमता खूप कमकुवत असते. एका उच्च बायोटेक विभागातील परीक्षक म्हणून मी विद्यार्थ्यांना विचारीत असे- ‘‘तीन परीक्षण नळीत तीन वेगवेगळे जलरूप द्रव आहेत. त्यात एकतर डीएनए, प्रोटीन किंवा लिपिड आहे. त्यांना ओळखण्यासाठी एक साधा प्रयोग शोधून काढा.’’ अर्धी उत्तरेदेखील बरोबर येत नसत. परंतु, किचकट शास्त्रीय प्रमेये ते सहजतेने ग्रहण करू शकतात.
पीएच्. डी.धारकांना मुलाखतीत मी प्रश्‍न विचारतो- ‘‘तुम्हाला पुरेसा पैसा उपलब्ध करून दिला तर तुम्ही तुमचा पीएच्. डी.चा प्रकल्प पुढच्या टप्प्यावर नेण्यास काय कराल?’’ बहुतेक वेळा येणारे उत्तर निराशा करणारे आणि काहीतरी भव्यदिव्य विचार करण्याची अक्षमता प्रकट करणारे असते.
तरुणांच्या मनात अपयशाची प्रचंड भीती आहे. उत्कृष्ट संस्थांमध्ये आवडत्या शाखेत प्रवेश न मिळण्याची भीती, त्यांना सुरक्षित पर्याय शोधण्याकडे घेऊन जाते.
विज्ञान आता एकापेक्षा अधिक ज्ञानशाखांशी निगडित होत आहे; परंतु भारतात मात्र ते कप्पाबंद स्थितीतच आहे. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी गणित नको म्हणून जीवशास्त्र निवडतात किंवा याच्या उलटही. ऑरगॅनिक केमेस्ट्रीकडे मी केलेले दुर्लक्ष, माझ्या नंतरच्या कारकीर्दीत फार मोठा अडथळा बनले आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगत देशांमध्ये आढळून येणारा परस्परांशी समन्वय आणि एकापेक्षा अधिक ज्ञानशाखांमधील सहकार्य, भारतात मात्र अपवादानेच दिसून येते.
तंत्रज्ञानाकडे जितके लक्ष दिले जाते तितके विज्ञानाकडे दिले जात नाही, हे शेखर गुप्तांचे म्हणणे मलाही मान्य आहे. परंतु, तीन मुद्यांवर मात्र माझे त्यांच्याशी मतभेद आहेत.
पहिला, मूलभूत (बेसिक) विज्ञान आणि उपयोजित (अप्लाइड) विज्ञान/तंत्रज्ञान यांच्या स्पष्ट भेदरेषा नाही. मूलभूत विज्ञान आवश्यक आहे, परंतु ते पुरेसे नाही. या मूलभूत संकल्पनेची स्पष्ट जाण नसेल, तर कुठलेही उच्चस्तराचे तंत्रज्ञान विकसित होऊ शकत नाही. कुठलेही मूलगामी संशोधन, ज्ञानाला पुढच्या टप्प्यावर नेण्यात परिणत होत नसेल, तर ते एकतर पुनरावृत्ती असते किंवा नक्कल तरी असते. सी. एन. आर. राव आणि ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची तुलना केवळ अनावश्यकच नाही, तर ज्ञानाला पुढच्या टप्प्यावर नेण्याच्या क्षेत्रात आणि वैज्ञानिक ज्ञानातून काहीतरी उपयोगी गोष्ट यशस्वी रीत्या निर्माण करण्यात त्यांचे जे योगदान आहे, त्याला नाकारण्यासारखे आहे. अशी उपयोगी गोष्ट निर्माण करण्यास बरीच वर्षे लागणे हा दुय्यम मुद्दा आहे. बाजारात ते तंत्रज्ञान उपलब्धच नसेल, तर त्याला विलंब म्हणता येणार नाही.
तंत्रज्ञान्यांना कमी लेखण्याच्या मोहामुळे शेखर गुप्तांनी स्वत:च मूलगामी विज्ञानाचे क्षेत्र उल्लंघून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्यांनी एका नव्या औषधाच्या संशोधनाचे उदाहरण दिले आहे. ते खरेतर, मूलगामी विज्ञानाच्या अगदी अचूक नसलेल्या आधारावर विकसित झालेले ‘अति जोखीम-अति पारिश्रमिक’ तंत्रज्ञान आहे. गेल्या दशकात भारतातील या क्षेत्रात खूप चर्वितचर्वण झाले आहे. बाजारात एक कोटी डॉलर्सपेक्षा कमी खर्चात एक नवा रेणू आणण्याचे आश्‍वासन देणार्‍या काही कंपन्या एकतर विकल्या गेल्यात किंवा त्यांनी आपला हा ‘अति जोखीम’ असलेला संशोधन प्रकल्प गुंडाळला आहे. परंतु, इतरांनी मात्र या क्षेत्रात सातत्याने गुंतवणूक सुरूच ठेवली. टोरेन्ट फार्मास्युटिकल्सचा या प्रकारातील पहिला रेणू तिसर्‍या श्रेणीच्या प्रयोगात्मक चाचणीसाठी दाखल झाला आहे. झायडस फार्माने एवढ्यातच एक नवा रेणू भारतीय बाजारात आणला आहे, हे किती लोकांना माहीत आहे?
दुसरे, जेनेरिक फार्मा क्षेत्राबाबत त्यांच्या सरसकट वक्तव्याशी मी असहमत आहे. या क्षेत्राचे आर्थिक व समाजोपयोगी योगदान लक्षात न घेता म्हणायचे की, या क्षेत्राने काही शास्त्रीय भर घातली नाही किंवा अभिनव तंत्रज्ञानाचा विकास केला नाही, हे अति सरळीकरण झाले. जेनेरिक उत्पादनातील काही घटकांना तर इंडियन फार्माकोपियाने (आयपी) संरक्षितही केले आहे. वाहतुकीचे नियम तोडणे किंवा जुगाड करणे इतके सोपे म्हणून या क्षेत्राच्या श्रेयाला किंवा योगदानाला नाकारणे निश्‍चितच योग्य नाही.
भारतातील अति जोखमीच्या संशोधनाला प्रत्येक पातळीवर हस्तक्षेपाची आवश्यकता असते. शालेय विद्यार्थ्यांना सुरवातीलाच प्रत्यक्षानुभवाची आणि मेंदूला आव्हान देण्याची संधी मिळायला हवी. नीती आयोगांतर्गत अटल इनोव्हेशन मिशनद्वारा निधिप्राप्त, ५००० हून अधिक अटल टिंकरिंग लॅब्ज, या दिशेने पुढे टाकलेले एक भक्कम पाऊल आहे. दुसरे पाऊल, कप्पेबंदपणा दूर करणे, विविध ज्ञानशाखांमधील समन्वयाला प्रोत्साहित करणे आणि जागतिक दर्जाची शास्त्रीय पायाभूत संरचना उपलब्ध करून देणे, यासाठी इन्स्टिट्यूटस् ऑफ सायन्टिफिक एज्युकेशन अ‍ॅण्ड रीसर्च (आयआयएसईआर) स्थापन करणे आहे. यामुळे उत्कृष्ट विद्यार्थी आणि विद्वान मूलभूत विज्ञानाकडे आकर्षित झाले आहेत आणि त्यांनी जागतिक दर्जाचे संशोधन निबंध प्रकाशित केले आहेत.
शास्त्रीय संकल्पनांचे रूपांतर उपयोगी वस्तूंमध्ये करण्याचे काम बव्हंशी खाजगी क्षेत्रात होते. भारतात, उद्योग-आणि शैक्षणिक संस्थांमध्ये पुरेसा सहयोग नाही. प्राथमिक स्तरावरील संशोधनांसाठी पुरेसे भांडवलही उपलब्ध नाही. कमीतकमी बायोटेक क्षेत्रात मात्र, बीआयआरएसीने (बायोटेक्नोलॉजी इण्डस्ट्री रीसर्च असिस्टन्स कौन्सिल) ही त्रुटी भरून काढली आहे. इतरही ज्ञानशाखांनी याचे अनुकरण करण्याइतपत ते मौलिक आहे. अटल इनोव्हेशन मिशनने सुमारे ५० कन्क्युबेटर्सना स्टार्टअप संस्कृती भारतीयांमध्ये रुजविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
२०१० साली स्थापन झालेली नोएडामधील एक लहानशी बायोटेक कंपनी- कुरादेव, कॅन्सर नष्ट करणार्‍या औषधाच्या अति जोखमीच्या संशोधनात उतरली आहे. संशोधनाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर ते जेव्हा पोहचले, तेव्हा त्यांनी शोधून काढलेला रेणू, बहुराष्ट्रीय औषधी कंपन्यांना आकर्षिक करू शकण्याच्या पातळीवर नेण्यासाठी त्यांना पाच कोटी रुपयांची गरज होती. बर्‍याच काळापासून ते ही रक्कम उभी करू शकले नव्हते. कारण त्यांच्या संशोधनाचे खरे मूल्य कुणाला समजलेच नव्हते. कसेबसे त्यांनी पाच कोटी रुपये जमविले आणि आता त्यांच्या या रेणूला रोश कंपनीने स्वीकारले आहे. कुरादेव कंपनीला अडीच कोटी डॉलर्स (सुमारे १६० कोटी रु.) मिळाले आहेत. त्यावर त्यांना ३० टक्के कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागला असता. परंतु, २०१६ साली, ‘स्टार्टअप अ‍ॅक्शन प्लॅन’नुसार अशा उत्पन्नावर लागणार कॅपिटल गेन टॅक्स १० टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला आहे.
थोडक्यात, मी एनसीएल, पुणे सोडल्यानंतर आणि शेखर गुप्ता यांनी सी. एन. आर. राव यांची मुलाखत घेतल्यानंतर खूप काही सकारात्मक घडामोडी घडल्या आहेत. विज्ञान विरुद्ध तंत्रज्ञान ही, कम्युनिस्ट विरुद्ध रा. स्व. संघ सारखी विचारधारेची लढाई नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान परस्परपूरक आहेत. भारतात, तंत्रज्ञानात्मक प्रगतीमुळे मूलगामी विज्ञानाबाबत जागरूकता वाढली आहे, शास्त्रीय संस्थांना निधी उपलब्ध करून देण्याबाबत समाजमन तयार होत आहे. हे जग निर्दोष नाही आणि आम्हाला आत्मसंतुष्ट होण्यापूर्वी फार मोठा पल्ला गाठायचा आहे. परंतु, विज्ञान आणि तंत्रज्ञानात कृत्रिम संघर्ष निर्माण करणे, हे निश्‍चितच दोघांच्याही विकासाच्या दृष्टीने उपयोगी नाही.
(विजय चौथाईवाले हे भारतीय जनता पार्टीच्या परराष्ट्र व्यवहार प्रकोष्ठाचे संयोजक आहेत. लेखातील मते लेखकाची वैयक्तिक आहेत.)

https://tarunbharat.org/?p=61140
Posted by : | on : 3 Sep 2018
Filed under : उपलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, संपादकीय (383 of 847 articles)


दिवस असतात. ते काळ, काम आणि वेगाच्या पर्यावरणात येत असतात. कधीकाळी विडंबन काव्याचे दिवस होते. आता ते नाहीत. कारण एकतर ...

×