कर्नल प्रसाद पुरोहित यांना सशर्त जामीन

कर्नल प्रसाद पुरोहित यांना सशर्त जामीन

►मालेगाव बॉम्बस्फोट, नवी दिल्ली, २१ ऑगस्ट – २००८ च्या…

उडीद, मुगाच्या आयातीवर निर्बंध!

उडीद, मुगाच्या आयातीवर निर्बंध!

►मोदी सरकारचा शेतकर्‍यांना दिलासा, नवी दिल्ली, २१ ऑगस्ट –…

भाजपाच्या ३५०+ रणनीतीला बळकटी

भाजपाच्या ३५०+ रणनीतीला बळकटी

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट – २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा…

हसिनांच्या हत्येचा प्रयत्न; १० दहशतवाद्यांना मृत्युदंड

हसिनांच्या हत्येचा प्रयत्न; १० दहशतवाद्यांना मृत्युदंड

ढाका, २० ऑगस्ट – बांगलादेशच्या पंतप्रधान बेगम शेख हसिना…

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

►•वैज्ञानिकांच्या अभ्यासातील निष्कर्ष, मेलबर्न, १७ ऑगस्ट – आपल्या भूतलावर…

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

►स्वातंत्र्यदिनी पाकच्या उलट्या बोंबा, इस्लामाबाद, १४ ऑगस्ट – काश्मीरसह…

मीरा भाईंदर मनपा भाजपाच्या ताब्यात

मीरा भाईंदर मनपा भाजपाच्या ताब्यात

मुंबई, २१ ऑगस्ट – काट्याची टक्कर आणि वर्चस्वाची लढाई…

राज्यात पावसाची पुन्हा हजेरी

राज्यात पावसाची पुन्हा हजेरी

►•खरीप पिकांच्या वाढीस फायदा ►धरणक्षेत्रातही संततधार, पुणे, २० ऑगस्ट…

२७ ऑगस्टला राणेंचा भाजपात प्रवेश

२७ ऑगस्टला राणेंचा भाजपात प्रवेश

मुंबई, १९ ऑगस्ट – गेल्या काही काळापासून दुर्लक्षित असलेले…

भारत – चीन खडाजंगी

भारत – चीन खडाजंगी

डॉ. प्रमोद पाठक | आर्थिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक स्तरावर…

आक्रमक चीन आणि धीरोदात्त भारत

आक्रमक चीन आणि धीरोदात्त भारत

संजय वैद्य | चीन वारंवार भारताला युद्धाच्या धमक्या देत…

स्वातंत्र्याचा अर्थ

स्वातंत्र्याचा अर्थ

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | ही मानसिकताच रोगट…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:46
अयनांश:
Home » उपलेख, रविंद्र दाणी, संपादकीय, स्तंभलेखक » विरोध : युद्धबंदीचा आणि नोटबंदीचा!

विरोध : युद्धबंदीचा आणि नोटबंदीचा!

दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, सीमेवर व संसदेत अशा दोन आघाड्यांवर लढावे लागत आहे. सीमेवर त्यांना युद्धबंदी मोडणार्‍या, देशाच्या विरोधकांचा सामना करावा लागत आहे, तर संसदेत त्यांना नोटबंदीच्या विरोधकांचा सामना करावा लागत आहे. मोदीशैलीने पाकिस्तान हादरला आहे आणि मोदीशैलीने विरोधी पक्षही हबकले आहेत.
प्रथमच पाकिस्तानला त्याच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे, असे भारतातील सुरक्षातज्ज्ञांना वाटत होते. आजवरच्या सरकारांनी हे होऊ दिले नव्हते. पाकिस्तानने दोन गोळ्या चालविल्या की, भारताचे सैनिक फार तर चार गोळ्या चालवून उत्तर देत होते. आज भारतीय सेना मोदींवर खूष आहे. ही खुषी मोदींनी ‘वन रँक वन पेन्शन’ दिली याची नाही, तर पंतप्रधांनानी, आमचे आजवर बांधलेले हात मोकळे केले, याची आहे. भारतीय सैन्य काय करू शकते, हे १९७१ नंतर प्रथमच पाकिस्तानच्या लक्षात येत आहे.
पाकिस्तान आजवर, भारतीय नागरिकांची हत्या करीत होता आणि भारताचे डीजीएमओ म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स- पाकच्या डीजीएमओशी हॉटलाईनवर बोलून आपला कडक विरोध-निषेध नोंदवीत होते. अनेक वर्षांपासून हे सुरू होते. मात्र, बुधवारी जरा वेगळे घडले. पाकिस्तानच्या डीजीएमओंनी भारताच्या डीजीएमओंशी संपर्क साधून भारतीय जवानांच्या कारवाईवर विरोध नोंदविला.
३ च्या बदल्यात १२!
पाकिस्तानने माछिल भागात भारताच्या तीन जवानांची हत्या केली. जिनेव्हा कराराचे उल्लंघन करीत, भारताच्या एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना केली. याचा बदला घेण्याची घोषणा भारतीय लष्कराने केली होती. २४ तासांच्या आत कॅप्टन शौकत अलीसह तिघा पाकिस्तानी जवानांना ठार करण्यात आले आणि एक पाकिस्तानी बस उडविण्यात आली, ज्यात ९ नागरिक ठार झाले. भारत आमच्या नागरिकांना ठार करीत आहे, असा ओेरडा पाक सरकार व पाक वृत्तपत्रे करत आहेत. पाकिस्तानी लष्कर आजवर भारताच्या निष्पाप नागरिकांना ठार करत होते, तेव्हा पाकिस्तानची ही मानवी संवेदना कुठे गेली होती? पाकिस्तानला समजेल त्याच भाषेत त्याला उत्तर दिले जात आहे. भारतीय सैनिकांनी आता बहुधा आपल्या बंदुका वापरणे बंद केले असावे. कारण, पाकिस्तानच्या गोळ्यांना शक्तिशाली तोफगोळ्यांनी उत्तर दिले जात आहे. अशाच काही तोफगोळ्यांनी पाकिस्तानची एक बस उडविण्यात आली.
पाक वृत्तपत्रांत दखल
भारताच्या बदललेल्या भूमिकेची दखल पाक प्रसारमाध्यमांत घेतली जात आहे. सीमेवर जे काही सुरू आहे ते अभूतपूर्व आहे, असे पाक वृत्तपत्रे म्हणत आहेत. भारतीय सैनिकांनी अमुक अमुक भागात फार जबर मारा केला, असा मजकूर पाक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक’ झालेच नाही, असे म्हणणार्‍या पाक वृत्तपत्रांची ही बदललेली भाषा बरेच काही सांगत आहे.
धावाधाव!
पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी श्रीमती मलिहा लोदी यांनी संयुक्त राष्ट्राला, सीमेवरील परिस्थिती तातडीने हाताळण्याची मागणी केली आहे. हे कधी होत नव्हते. कारवाया पाकिस्तान करीत असे आणि संयुक्त राष्ट्रात भारत, पाकिस्तानला आवरण्याची मागणी करीत असे. असेच दृश्य मागील अनेक वर्षांत होते. मोदींनी हे बदलविले. आता पाकिस्तानला धावाधाव करावी लागत आहे. भारतीय तोफगोळ्यांचा मारा थांबवा, असे साकडे पाकिस्तानला संयुक्त राष्ट्राकडे घालावे लागत आहे.
अपेक्षित
पाकिस्तानने प्रथम अतिरेक्यांना भारतात पाठविणे बंद करावे. मग, सीमेवरील स्थिती आपोआप निवळेल, असे भारताच्या डीजीएमओंनी पाकला सांगितले. आजवर जे करावयास हवे होते, बरोबर तेच मोदी करीत आहेत. पाकिस्तानने सीमेवर युद्धबंदी मोडली की, त्याबद्दल नवी दिल्ली वा न्यूयॉर्कमध्ये ओरडा न करता, तोफांची तोंडे पाक चौक्यांकडे वळवायची, हे नवे धोरण मोदी सरकार राबवीत आहे. त्याचे सुपरिणाम दिसू लागले आहेत. खोर्‍यातील कथित जहाल नेते अचानक थंडावले आहेत. बिळात लपून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
तणाव कायम
सीमेवर तणाव कायम आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख उद्या निवृत्त होत आहेत. पदावरून पायउतार होण्यापूर्वी ते एखादे दु:साहस करण्याची शक्यता फेटाळली जात नाही. त्यांच्या काही विधानांची दखल भारताने घेतली असून, भारतीय लष्कराला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी सीमेवर युद्धबंदीचा सामना करीत आहेत, तर संसदेत त्यांना नोटबंदीच्या विरोधकांचा सामना करावा लागत आहे.
नोटबंदीचा विरोध
नोटबंदीमुळे देशात काही ठिकाणी गैरसोय होत आहे. पण, विशेेष म्हणजे लोक या गैरसोयीचा सामना करण्यास तयार आहेत. रिझर्व्ह बँकेचे एक माजी गव्हर्नर डॉ. रेड्‌डी यांनी एका मुलाखतीत नोटबंदीच्या निर्णयात काही प्रमाणात नागरिकांची गैरसोय होणे अटळ असल्याचे प्रतिपादन केले आहे. नोटबंदीचे स्वागत करताना त्यांनी काही उपाय सुचविले आहेत. नोटबंदी करण्यापूर्वी सरकारने ५०० च्या नव्या नोटा छापून तयार ठेवावयास हव्या होत्या, असा एक युक्तिवाद केला जात आहे. असे करणे शक्य नव्हते. कारण, एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोटा का छापल्या जात आहेत, याचा अर्थ न समजण्याइतपत कुणी खुळे नाही. याचा अर्थ लगेच लक्षात आला असता व ती बातमी वार्‍यासारखी सर्वत्र पसरली असती.
प्रचंड संख्या
नाशिक व अन्य नोट छपाई कारखान्यांमध्ये सध्या त्यांच्या क्षमतेपेक्षा ३५ टक्के अधिक नोट छपाई सुरू आहे. नोटा छापून झाल्यावर त्या एटीएममध्ये पोहोचण्यास २१ दिवस लागत असत. हा कालावधी कमी करून तो ६ दिवसांवर आणण्यात आला आहे. हे सारे उपाय योजूनही देशात काही काळ नोटांचा तुटवडा राहणार आहे. मात्र, तो प्रत्येक दिवसागणिक कमी होत जाईल, असा सरकारचा अंदाज आहे. त्याच वेळी जनतेच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने काही उपाय योजले आहेत. विशिष्ट ठिकाणी १५ डिसेंबरपर्यंत ५०० च्या नोटा चालणार आहेत. तोपर्यंत नव्या नोटा मोठ्या प्रमाणात बँका व बाजारात येतील, असा सरकारचा कयास आहे.
संसद ठप्प
भारत-पाक सीमेवर गंभीर घटना घडत असूनही संसदेत त्यावर चर्चा झालेली नाही. कारण, विरोधी पक्षांना पाकिस्तानपेक्षा नोटबंदीची चिंता अधिक सतावीत आहे. लोकसभेत नोटबंदीवर चर्चा झालेली नाही. राज्यसभेत ती सुरू झाली. मात्र, पंतप्रधानांच्या एका टिपणीने राज्यसभेत गदारोळ सुरू झाला. राज्यसभाही ठप्प झाली. नोटबंदीच्या विरोधात सारे विरोधी पक्ष एकजूट झाले आहेत.
परिणाम
नोटबंदीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोणता व किती परिणाम होईल, हे जानेवारीच्या अखेरीस लक्षात येईल. ५०० व १००० च्या नोटा जमा करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर आहे. ही मुदत वाढणार नाही. या काळात किती राशी बँकेत जमा होते, त्यातील किती वाटा सरकारला मिळतो, याचा अंदाज जानेवारीच्या अखेरीस येईल. यावेळी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीस सादर होणार आहे. या नोटबंदीच्या पार्श्‍वभूमीवर अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. तोपर्यंत नोटबंदीच्या विरोधाचा धुराळाही खाली बसलेला असेल. सारी आकडेवारी सरकारजवळ आलेली असेल. सरकारचे नवे निर्णय घोषित झालेले असतील आणि त्यानंतर या निर्णयाचे झालेले फायदे देशासमोर आलेले असतील…

शेअर करा

Posted by on Nov 27 2016. Filed under उपलेख, रविंद्र दाणी, संपादकीय, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उपलेख, रविंद्र दाणी, संपादकीय, स्तंभलेखक (938 of 1070 articles)


टेहळणी : डॉ. सच्चिदानंद शेवडे | मोदींची तुलना काही उत्साही विरोधकांनी लहरी तुघलकाशी केली आहे. साहजिक आहे. मोदींनी काहीच तयारी ...