विक्रम कोठारीचा घोटाळा ३६९५ कोटींचा, गुन्हा दाखल

विक्रम कोठारीचा घोटाळा ३६९५ कोटींचा, गुन्हा दाखल

►निवास व कार्यालयांची झडती ►घोटाळा नाही, थकित कर्ज असल्याचा…

नीरव मोदी दुबईत?

नीरव मोदी दुबईत?

►पाचव्या दिवशीही धाडी, नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – पंजाब…

जया तृणमूलच्या गोटात, राज्यसभेचे तिकिट?

जया तृणमूलच्या गोटात, राज्यसभेचे तिकिट?

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – सलग ३ वेळा समाजवादी…

इम्रान खान तिसर्‍यांदा लग्नाच्या बेडीत

इम्रान खान तिसर्‍यांदा लग्नाच्या बेडीत

कराची, १९ फेब्रुवारी – पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार…

पाकच्या कारवाईने हाफिझ सईद चवताळला

पाकच्या कारवाईने हाफिझ सईद चवताळला

►नजरकैदप्रकरणी न्यायालयात जाणार, लाहोर, १६ फेब्रुवारी – पाकिस्तानने बेकायदेशीरपणे…

जेकब झुमा यांचा राजीनामा

जेकब झुमा यांचा राजीनामा

जोहन्सबर्ग, १५ फेब्रुवारी – स्वत:च्या पार्टीतील सदस्यांकडून आलेल्या प्रचंड…

आता अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी जाणार!

आता अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी जाणार!

►साध्वी प्रज्ञासिंह यांची भूमिका, औरंगाबाद, १९ फेब्रुवारी – १९९०…

प्रकल्प लटकवणे हीच काँग्रेसची संस्कृती

प्रकल्प लटकवणे हीच काँग्रेसची संस्कृती

►पंतप्रधान मोदी यांचा घणाघात ►नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन,…

राज्यात १.३५ लाख कोटींची रेल्वे विकासाची कामे

राज्यात १.३५ लाख कोटींची रेल्वे विकासाची कामे

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी – महाराष्ट्रातील रेल्वे…

काँग्रेसमुक्त भारत, काळाची गरज!

काँग्रेसमुक्त भारत, काळाची गरज!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | काँग्रेस राजवटीत शिक्षणक्षेत्रात…

काँग्रेसला काय धाड भरलीय?

काँग्रेसला काय धाड भरलीय?

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | शेखर गुप्ता…

राष्ट्रद्रष्टे : श्रीगुरुजी

राष्ट्रद्रष्टे : श्रीगुरुजी

॥ विशेष : डॉ. कुमार शास्त्री | श्रीगुरुजी आध्यात्मिक…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » शिवसेनेचे नेते काय उत्तर देतील बाळासाहेबांना?

शिवसेनेचे नेते काय उत्तर देतील बाळासाहेबांना?

‘‘मी वर जाऊन बाळासाहेबांना उत्तर देईन, असे जर मोदी म्हणाले असतील, तर त्यांचे मनापासून आभार! बाळासाहेबांबद्दल त्यांच्या मनात आदर असल्याचे त्यावरून दिसून येते.’’ -इति उद्धव ठाकरे. वाघासारख्या लढाऊ बाण्याच्या ज्यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा वारू महाराष्ट्रातच नव्हे, तर अगदी राज्याच्या सीमा ओलांडून उधळला गेला, त्या बाळासाहेब ठाकरेंबद्दल सर्वांच्याच मनात आदर होता आणि आजही आहे. वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या निमित्ताने तो व्यक्तही होत असतो. कारण, त्या व्यक्तिमत्त्वाची उंचीच तेवढी मोठी होती. मात्र, त्यांच्या पश्‍चात ‘ती’ उंची या पक्षात अजून कुणाला गाठता येत नाहीय् आणि तरीही सर्वांच्या अपेक्षा मात्र बाळासाहेबांच्या तोडीच्या असतात, हे खरे दुर्दैव आहे. बाळासाहेबांच्या हयातीत ना शिवसेनेची भाजपाशी युती तुटली, ना या पक्षाचे आजच्यासारखे कधी खुळखुळे झाले. आपण स्वत: ज्या पक्षासोबत राज्याच्या आणि केंद्रातील सरकारमध्ये सहभागी झालो आहोत, त्याच सरकारला जाहीर रीत्या धारेवर धरण्याची एकही संधी न गमावणार्‍या शिवसेनेच्या खासदारांच्या वाट्याला परवा आलेले पंतप्रधानांचे खडे बोल गैरवाजवी कसे म्हणायचे? जेव्हा स्वतंत्र कार्यपद्धतीचे, स्वतंत्र विचारांचे, स्वतंत्र अस्तित्व राखून असलेले दोन राजकीय पक्ष स्वत:ची गरज, सोय लक्षात घेऊन सत्ताप्राप्तीसाठी किंवा सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा सार्‍याच गोष्टी दोघांच्याही मनासारख्या होऊ शकत नाहीत, हे वास्तव आहे. पण, म्हणून दरवेळी आपसातली उणीदुणी चव्हाट्यावरच आणली पाहिजे, असे कुठे आहे? नेमके हेच तारतम्य शिवसेनेच्या नेतृत्वाकडून पाळले जात नाही. जराशी संधी मिळाली की, धुमश्‍चक्री सुरू करण्यात जणू असुरी आनंद मिळत असल्याच्या थाटातले त्यांचे वागणे असते दरवेळी. मित्रपक्षावर घाव घालायला जणू संधीच्या शोधातच असतात या पक्षाचे नेते! पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाबाबत शिवसेनेचे मतभेद असतील, तर ते समजता येईल, पण म्हणून त्यांनी जाहीरपणेच त्याची वाच्यता केली पाहिजे, असे कुठे आहे? सारे पंतप्रधान ‘असेच’ वागतात का, हा सवाल उपस्थित करताना उदाहरण पंडित नेहरूंचे द्यायचे आणि रोख मात्र नरेंद्र मोदींकडे ठेवायचा, ही त्यांची तर्‍हा भावणारी नाहीच मुळी. एकीकडे सत्तेचे सारे लाभ मिळवण्यासाठी सरकारमध्ये सहभागीही व्हायचे आणि दुसरीकडे त्याच सरकारविरुद्ध विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चात या पक्षाच्या खासदारांनी सहभागीही व्हायचे… उद्धव ठाकरेंना यात काही वावगे वाटत नसेलही कदाचित, पण हा सारा प्रकार खरोखरीच अजब अन् अतर्क्य आहे. सर्वसामान्यांसाठी तो अनाकलनीयही आहे. इतिहास तपासून बघा, स्थित्यंतराचा काळ हा नेहमीच संभ्रम निर्माण करणारा असतो. त्या काळात जे जे म्हणून घडते किंवा घडत राहते, त्याचा अर्थ त्या क्षणी लावताही येत नाही कित्येकदा. दिशाच गवसत नाही अनेकदा. पण, म्हणून जे घडते ते चुकीचेच असते, असे नाही. राजकारणाच्या गर्तेत हरवलेल्या विरोधी पक्षातल्या लोकांना ही बाब ठरवून समजून घ्यायची नसेल, तर एकवेळ मान्य करताही येईल, पण शिवसेनेच्या वागण्यातून काय अर्थ काढायचा? सरकारने घेतलेल्या एखाद्या निर्णयाविरुद्ध सरकारमध्ये सहभागी असलेल्या एका राजकीय पक्षानेच मोर्चे काढायचे? हे असले बेताल वागणे या राज्यातल्या सामान्य मतदारांना कळत नाही, असा समज झालाय् की काय त्यांचा? परिवर्तन काय असे सहज घडून येते? कुठल्याही बदलातून घडून येणारी स्थित्यंतरे कुठल्याही त्रासाविना, विनासायास घडून येतील, अशी अपेक्षा बाळगणार्‍यांना शहाणे कसे म्हणायचे? याही वेळी ते सहज घडून येणार नाही. थोडासा त्रास होईल तुम्हा-आम्हा सर्वांनाच. तरीही त्याचे राजकारण करायला सरसावलेत काही लोक. कालपर्यंतची हातातली सत्ता घालवून आज विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आलेल्या राजकीय पक्षांचे जाऊ द्या, पण या देशातल्या सामान्य माणसाला मात्र पंतप्रधानांचा हा निर्णय मनापासून भावला आहे. या निर्णयाच्या भविष्यातील सकारात्मक परिणामांचा वेध त्यांना घेता आला आहे. म्हणूनच चार चार तास रांगेत उभे राहण्याची वेळ आली, तरी त्यांची त्या बाबत तक्रार नाही. आपल्याच जिवावर गब्बर झालेल्या धनदांडग्यांनी हा पैसा दाबून ठेवला असल्याची, दहशतवादीही आपलाच पैसा वापरून आपल्याच विरुद्ध षडयंत्र रचतात, याची पुरेपूर कल्पना असलेल्या लोकांची पंतप्रधानांच्या निर्णयाला मुळीच ना नाही. त्यांच्या खिशातून पैसे काढण्याचा मार्ग ‘हाच’ असल्याची जाणीव त्यांना आहे. सरतेशेवटी यातून चांगलेच घडणार असल्याचा ठाम विश्‍वासही आहे लोकांच्या मनात. आडवळणावरच्या एखाद्या दुर्गम गावातल्या छोट्याशा घरात राहणार्‍या सामान्य माणसाला असलेली ही उमज, सरकारमध्ये प्रत्यक्षात सहभागी असलेल्या एका राजकीय पक्षाच्या संसदेत बसणार्‍या सदस्यांना येत नसेल, तर यापेक्षा दुर्दैवी बाब दुसरी कोणती असणार आहे? ‘‘या निर्णयाला अगदीच ‘सर्जिकल स्ट्राईक’ वगैरे म्हणू नका! ‘सर्जिकल स्ट्राईक’ फक्त सैनिकच करू शकतात. सरकारमध्ये बसलेले नेते नाही!’’ अशी विनवणी तर खुद्द पंतप्रधानांनी या देशातल्या तमाम जनांना केली आहे. त्यामुळे परिवर्तनासाठी एक क्रांतिकारी निर्णय असला, तरी त्याचा गवगवा करण्याची किंवा त्यासाठी स्वत:च्या आरत्या ओवाळून घेण्याची भूमिका तर त्यांचीही दिसत नाही. सरकारला या मुद्याचे राजकारण करायचे नाही. निर्णय घेताना काही त्रुटी राहिल्या, दिवसागणिक काही नवे मुद्दे समोर येताहेत, तर त्यावरचे उपाय तातडीने निर्णय घेऊन योजले जाताहेत. मग या निर्णयाला विरोध करणार्‍यांची पोटदुखी नेमकी कुठे आहे? असे देशव्यापी प्रभाव पडेल असे निर्णय घेतले की, त्याचे पडसाद तर उमटणारच! इथे सकारात्मक बाब ही आहे की, या निर्णयामुळे थोडाबहुत त्रास होत असला, तरी तो सहन करण्याची जनतेची तयारी आहे. मग त्याला होणार्‍या त्रासाचे राजकारण ही मंडळी का अन् कशासाठी करताहे? या निर्णयातून डोकावणारे भविष्यातील परिणाम जे सामान्य माणसाला दिसताहेत, ते शिवसेनेच्या नेत्यांना दिसत नाहीयेत का? तसे नसेल तर मग सुरुवातीला का स्वागत केले त्यांनी या निर्णयाचे अन् नंतर का बदलली भूमिका त्यांची? खरं तर हा प्रश्‍न अन्य विरोधकांनाही विचारला पाहिजे. मंदिरात व्हीआयपी दर्शन घेण्याकरिता, रांगेतल्या सामान्य जनतेला मागे टाकून समोर जाताना ज्यांना कधी खंत वाटत नाही, त्या तमाम नेत्यांना आता बँकांपुढे लागलेल्या रांगांमधील सामान्य नागरिकांसाठी कळवळा दाटून येतो आहे. हा खरोखरीच सामान्यांसाठीचा कळवळा आहे की, या निर्णयामुळे उद्भवणार्‍या परिणामांचा पोटशूळ, हे स्पष्ट होईल लवकरच. ‘‘हा निर्णय घेऊन, आपण एक चांगले काम करून आलो असल्याचे वर जाऊन बाळासाहेबांना सांगू,’’ असे पंतप्रधानांनी तर जाहीर केले आहे. पण, या निर्णयाला विरोध करून शिवसेनेचे नेते बाळासाहेबांना काय उत्तर देतील…?

शेअर करा

Posted by on Nov 24 2016. Filed under अग्रलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अग्रलेख, संपादकीय (885 of 949 articles)


दिल्ली वार्तापत्र : श्यामकांत जहागीरदार | पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात कॉंग्रेस आणि अन्य विरोधी ...