ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » शिस्त लावणे म्हणजे हुकूमशाही नव्हे!

शिस्त लावणे म्हणजे हुकूमशाही नव्हे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय प्रामाणिक, परिश्रमी, देशाप्रति समर्पित आहेत. त्यांच्यातला आत्मविश्‍वास हिमालयाच्या उंचीएवढा आहे. राष्ट्रनिर्माणासाठी वाटेल तो त्याग करण्याची त्यांची तयारी आहे. शिस्त हा त्यांचा आवडता विषय आहे. प्रत्येक काम शिस्तीत झाले पाहिजे, प्रत्येकाने त्याचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे, असा आग्रह जर ते धरत असतील आणि आज अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसारच आपल्या सरकारची धोरणं राबवत असतील तर त्यात चूक ती काय? एखादी व्यक्ती शिस्तप्रिय आहे आणि इतरांनाही शिस्त लावण्याचे काम करीत असेल तर त्यातही चूक काय? मध्यंतरी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. त्यात पंतप्रधानांनी नायडू हे शिस्तप्रिय असल्याचे सांगत त्यांची प्रशंसा केली होती. परंतु, दुर्दैवाने आपल्या देशात आज अशी स्थिती निर्माण करण्यात आली आहे की, जो कुणी शिस्तीची भाषा बोलेल त्याला लोकशाहीविरोधी ठरविले जाते, हुकूमशहा म्हटले जाते. पंतप्रधानांनी नायडूंची प्रशंसा करताना इतरांकडून शिस्तीची अपेक्षा केली असेल तर ती चुकीची कशी ठरविता येईल? आपल्या देशात ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ हा परवलीचा शब्द झाला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आडून कुणालाही काहीही बोलण्याचा परवाना मिळाल्याच्या थाटात टीका केली जात आहे. आपण देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध बोलतो आहोत, अनावश्यक बोलतो आहोत, ज्या संविधानाने त्यांना पंतप्रधान पदावर आरूढ होण्याचा अधिकार दिला आहे, त्या संविधानाचा आपण अपमान करतो आहोत, याचे जराही भान या मंडळींना राहात नाही. टीव्हीवरील चर्चा ऐका, समाजमाध्यमांमधून उमटणार्‍या प्रतिक्रिया बघा, सगळीकडे आपल्याला कायद्याच्या विरुद्ध वर्तणूक दिसेल. अर्थात, याला अपवाद हे असतातच. पण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड आपण कायद्याची ऐसीतैशी करतो आहोत, याचा या मंडळींना सोईस्कर विसर पडतो. कारण, आपल्या देशातील न्यायप्रणालीही सुस्तावलेली आहे. आता ती का सुस्तावली आहे, याच्या तपशिलात जाण्याचे कारण नाही. असे असले तरी वास्तव अमान्य करता येणार नाही. मात्र, संसदेने जे कायदे पारित केले आहेत, संविधानात ज्या तरतुदी आहेत, त्यांचाच फक्त आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर हुकूमशहा असल्याचा आरोप केला जातो. आम्ही कसेही वागू, देशाचे अहित झाली तरी आम्हाला पर्वा नाही, आम्ही कुणावरही कसलीही टीका करू, कुणाचाही अपमान करू, आमच्यावर कारवाई करायची नाही आणि केलीच तर ती आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी ठरवू, ही जी वृत्ती आहे, ही ठेचून काढण्याची गरज आहे. आता नुकतीच अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा आटोपली. या स्पर्धेत जगज्जेती खेळाडू सेरेना विल्यम्स एक सामना खेळत असताना तिच्याकडून झालेल्या चुकीसाठी पंच कार्लोस यांनी तिला पेनल्टी रुल लावला. कारण, सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडू विजयी झाली होती. त्यामुळे सेरेना विल्यम्स ही पंच कार्लोस यांच्यावर भडकली. तिने त्यांना चोर, लबाड आणि आणखी अनेक विशेषणं लावलीत. पण, आंतरराष्ट्रीय टेनिस महासंंघाने पंच कार्लोस यांची बाजू उचलून धरली. त्यांनी नियमानुसारच कारवाई केली असे सांगत महासंघाने पंचांचे मनोबल वाढविले. इथे नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करणारे कार्लोस यांना आपण हुकूमशहा म्हणणार का? जो नियम कार्लोस यांना लागू होतो, तोच पंतप्रधान मोदी यांनाही लागू व्हायला नको का? आपल्या देशात जनता हीच पंच आहे. निवडणुका येऊ घातल्या आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी जी मंडळी देशाच्या पंतप्रधानांना कारण नसताना बदनाम करण्यासाठी उतावीळ झाली आहे, त्यांचा फैसला पंचरुपी जनतेलाच करावा लागणार आहे. आज आपला देश स्वतंत्र होऊन सात दशके लोटली आहेत. इतिहास साक्षी आहे. ज्या ज्या वेळी संविधानाची अंमलबजावणी करणार्‍या संस्था अक्षम होतात, त्या त्या वेळी लोकशाही कमजोर होते. याचा अनुभव जनतेने घेतला आहे. देश चालवायचा असेल, प्रगतिपथावर न्यायचा असेल तर त्यासाठी कायद्यातील सर्व तरतुदींचे कठोर पालन करणे आणि करवून घेणे आवश्यक असते. आपल्याकडे अनेकदा अशी चर्चा सुरू होते की, देशाला एखाद्या हुकूमशहाचीच गरज आहे. लोक स्वत:च बोलत असतात. कारण, जेव्हा अनागोंदी माजते, नेते राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष करतात, राजकीय पक्ष मनमानी करायला लागतात, सामान्य जनतेला भीती वाटायला लागते. या भीतीतूनच ते हुकूमशहाची गरज व्यक्त करतात. १९७० च्या दशकातील प्रारंभीच्या वर्षांमध्ये इंदिरा गांधी यांचा एक शक्तिशाली नेता म्हणून उदय झाला. सरकारी कार्यालये, लोकसेवक आणि प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी त्यांनी अनेक कठोर पावले उचलली. त्यातूनच त्यांनी सरकारी योजनांचे यशस्वी क्रियान्वयनही केले. पण, त्यांच्याच नेतृत्वात देशावर आणिबाणी लादण्यात आली. नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेण्यात आले. प्रसारमाध्यमांचे स्वतंत्र्यही अबाधित राहिले नव्हते. आणिबाणीला विरोध करणार्‍या नेत्यांना आणि संपादकांना तुरुंगात डांबण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या सांस्कृतिक राष्ट्रवाद जोपासणार्‍या संघटनेवरही बंदी घालण्यात आली होती. या अर्थाने बघितले तर इंदिरा गांधींचे सरकार हे हुकूमशाही सरकार बनले होते. पण, पंतप्रधान मोदी यांच्याकडून अजून तरी अशी कुठलीही कृती घडलेली नाही, ज्यावरून त्यांना हुकूमशहा ठरविता येईल. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून ज्या पाच शहरी नक्षल्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, त्यांना सरकारविरोधात कोर्टात जाण्याचा अधिकार आहे, सत्ताधारी पक्षाच्या नेत्याविरुद्धही विरोधकांना कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. असे असतानाही जर मोदी सरकारवर हुकूमशाहीचा आरोप होत असेल तर ही जनतेच्या डोळ्यांत धूळफेकच म्हणावी लागेल. देशात कुठेही काहीही घडले की त्याचा संबंध मोदी सरकारशी जोडण्याचा गोरखधंदा सध्या तेजीत आहे. वास्तविक, कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही राज्य सरकारांची जबाबदारी आहे. असे असतानाही कुठल्याही राज्यात काही घडले की त्यांचा संबंध पंतप्रधान मोदींशी आणि त्यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारशी जोडला जातो. देशात कायद्याचे राज्य शंभर टक्के आहे. जो हिंसक जमाव एखाद्याची हत्या करतो, त्या हत्येसाठी जबाबदार असणार्‍यांवर कायद्याने कारवाई केली जाते, केली गेली आहे. कायद्याचे राज्य आहे, न्यायालये आपल्या शैलीने काम करण्यास स्वतंत्र आहेत, अशा परिस्थितीत सरकारवर हुकूमशाहीचा आरोप कसा काय करता येईल? काँग्रेसच्या शासन काळात इतर राजकीय पक्षांची राज्य सरकारे आणि राज्यपालांची ज्या असंवैधानिक पद्धतीने बडतर्फी केली जायची, तसला प्रकार मोदी सरकारच्या काळात कुठे अनुभवास आला नाही. असे असतानाही मोदी सरकारला हुकूमशहा ठरविणे यात फक्त आणि फक्त घाणरडे राजकारण आहे, बाकी काही नाही.

https://tarunbharat.org/?p=62278
Posted by : | on : 20 Sep 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (344 of 843 articles)


जहागीरदार | देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या राफेल विमानाच्या खरेदी प्रकरणावरून मोदी सरकारविरुद्ध एकटे राहुल गांधी टीका करीत आहेत. पण, ...

×