कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

►पीडितेचे नाव जाहीर केल्याने कोर्टाचा संताप ►पुढील सुनावणी २५…

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

►भारतीय नौदलाचे ‘अनोखे’ स्वागत, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८ एप्रिल…

देशात चलन तुटवडा नाही

देशात चलन तुटवडा नाही

►बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात पैसा •: अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती,…

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

►स्वीडनमधील भारतीयांशी संवाद, वृत्तसंस्था स्टॉकहोम, १८ एप्रिल – डिजिटल…

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

वृत्तसंस्था स्टॉकहोम, १७ एप्रिल – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

►ड्रग व्यापारी गजाआड, ब्रिटिश पोलिसांची कमाल, वृत्तसंस्था लंडन, १७…

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

►राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय ►फेरबदलाची रक्कम माफ, वृत्तसंस्था मुंबई,…

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

वृत्तसंस्था मुंबई, १८ एप्रिल – लोकप्रतिनिधी किंवा लोकसेवकांनी भ्रष्ट…

कबीर कला मंच रडारवर

कबीर कला मंच रडारवर

►कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे ►मुंबई, पुणे, नागपुरात कारवाई ►नवी दिल्लीतही…

मर्जी आपली, भवितव्यही आपले

मर्जी आपली, भवितव्यही आपले

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | मोदी सरकारने राष्ट्रहिताशी…

अस्वस्थपर्व…!

अस्वस्थपर्व…!

॥ विशेष : सुधीर पाठक | भगतसिंग मार्क्सवादी होते.…

आत्महत्येची पुर्वतयारी?

आत्महत्येची पुर्वतयारी?

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | म्हणजेच विरोधकांचा…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » उपलेख, तरुण विजय, संपादकीय, स्तंभलेखक » ‘शोनार बांगला’च्या परतीचा संघर्ष…

‘शोनार बांगला’च्या परतीचा संघर्ष…

तरुण विजय |

हिंदू चेतना जागविणारी म्हणून वंग भूमीची ओळख आहे, त्याचप्रमाणे हिंदूंवरील संकटांचीही ही भूमी साक्षीदार आहे. वंगभूमीने राष्ट्रजागृती तर केली, मात्र दुसरीकडे तीन दशके कम्युनिस्टांचे अत्याचारही बंगालवासीयांना सोसावे लागले. बंगालने प्रखर राष्ट्रवादी तसेच क्रांतिकारकांना जन्म दिला, आध्यात्मिक जागरण करणार्‍या विभुती येथेच निर्माण झाल्या, विज्ञान, वाङ्मय व कलाक्षेत्रातील नामवंत बंगालनेच दिले आणि शेवटी ‘ममता बी’पण दिली. हिंदूंवर अत्याचार करणारे सरकार म्हणून ममता सरकारची इतिहासात नोंद होईल. मोहरमसाठी या सरकारने हिंदूंच्या दुर्गा विसर्जनावरच बंदी आणली होती.
कुणाला बंगालचा तो भयंकर दुष्काळ आठवतो काय? चर्चिल आणि त्याच्या साम्राज्यवादी ब्रिटिश प्रशासनाने ३० लाख भारतीयांना तडफडून मरण पत्करण्यास भाग पाडले. प्रचंड उपासमार आणि अन्नान्न दशा होऊन आमचे बांधव मृत्युमुखी पडले. मृतकांचा आकडा २० ते २५ लाख या दरम्यान असल्याचे काही विश्‍लेषक सांगतात. ‘‘मला भारतीयांविषयी तिरस्कार वाटतो. त्यांची केवळ जनावरांशीच तुलना होऊ शकेल, त्यांचा धर्मही पशुवत आहे. बंगालचा दुष्काळ त्यांच्या करणीचेच फळ होते, जे सशांप्रमाणे मुले जन्माला घालतात.’’ असे द्वेषमूलक उद्गार त्या वेळी चर्चिलने भारतीयांविषयी काढले होते.
स्वातंत्र्यानंतर हा दुष्काळ कुशासन आणि अराजकतेच्या राजकारणाच्या रूपाने पसरला. विधानचंद्र राय, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची भूमी म्हणून पूर्वी ज्या बंगालची ओळख होती तो बंगाल नंतर रक्तरंजित नक्षलवाद-माओवादाच्या विळख्यात अडकला. तीन हजारांहून अधिक लोक मारले गेले. साडेतीन लाख वनवासी-आदिवासी विस्थापित झाले. हा स्वातंत्र्यानंतरचा बंगाल होता, ज्याने १९४६ मध्ये मुस्लिम लीगचा नेता जिन्नाने भडकविल्यामुळे हजारो हिंदूंची कत्तल होताना पाहिले होते. ती रक्तरंजित तारीख होती १६ ऑगस्ट १९४६.
प्रथम इंग्रज, नंतर मुस्लिम कट्टरवादी त्यानंतर जवळजवळ साडेतीन दशके म्हणजे ३३ वर्षांची कम्युनिस्ट राजवट. धर्मावर आघात, गरिबांचे शोषण, मार्क्सवादी संघटनांची प्रत्येक क्षेत्रात दखल हे सुरूच होते. प. बंगालमध्ये मार्क्सवादी सरकारची दडपशाही एवढी भयंकर होती की, रामकृष्ण मिशनसारख्या संस्थांनाही स्वत:ला अहिंदू आणि नवीन संप्रदायाची घोषणा करून अल्पसंख्यक बनण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागली होती. कम्युनिस्ट राजवट म्हणजे हिंदूंसाठी जणू दु:खाचा डोंगरच होता.
ममतादीदीने परिवर्तनाची हाक देऊन ‘मां-माटी-मानुष’चा राजकीय नारा दिला, तेव्हा कम्युनिस्ट राजवटीमुळे त्रस्त झालेल्या जनतेने त्यांना प्रचंड बहुमताने विजयी केले. आतातरी भय, दहशत, भ्रष्टाचार आणि अहिंदूंच्या आक्रमकतेपासून बंगालचे संरक्षण होईल, असे वाटले होते. मात्र, केवळ नावातच परिवर्तन झाले, राजवटीत नाही! एकीकडे गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार प्रचंड वाढला; तर दुसरीकडे मुस्लिम जिहादी शक्तींचे हिंदूंवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले. हुगळीच्या आजूबाजूच्या परिसरावर जर नजर टाकली, तर स्वातंत्र्यापूर्वीच्या बंगालच्या दुष्काळासारखे दृश्य दिसून पडते. फाटक्या कपड्यांतील उपाशी मुले, म्हातारे-कोतारे, तुटक्या-उद्ध्वस्त प्लॅस्टिकचा दुर्गंध येणार्‍या झोपड्या आणि घाणीत राहणारे लक्षावधी लोक. हे आहे बंगालचे २०१८ चे कटुसत्य. शारदा चीट फंडसारख्या अनेक घोटाळ्यात फसलेले तृणमूल काँग्रेसचे दिग्गज नेते हे तर वानगीदाखल लहानसे उदाहरण आहे.
बंगालमध्ये ४२ हजार पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावरही होणार आहे. आपले राजकीय भवितव्य धोक्यात असल्याचे दिसताच तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. हे कार्यकर्ते पोलिसांकडे दुर्लक्ष करून खुल्लमखुल्ला गुंडगिरी व रक्तरंजित हिंसाचार व दडपशाही करीत आहेत. सोमवार, ९ एप्रिल रोजी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बरुइपूर तालुक्यात एका महिला भाजपा कार्यकर्तीला भर बाजारात मारहाण करण्यात आली. मारहाण करणार्‍या आरोपीचे नाव होते शब्बीर मुल्ला. मात्र, कुठल्याही चॅनेलवर याची साधी बातमीही देण्यात आली नाही आणि त्यावर कुठे चर्चाही उपस्थित करण्यात आली नाही.
मात्र, बंगाल मोठ्या परिवर्तनाकडे आगेकूच करीत आहे, हे निश्‍चित! एक प्रगतिशील, विज्ञानवादी, बहुलतावादी, भारतीय समाजाच्या रूपात बंगालला जिवंत राहायचे आहे की नाही? तेथे दुर्गा माता आणि विवेकानंदांच्या भक्तांचे जीवन सुरक्षित राहील की नाही? मुस्लिम कट्टरवादाला आधी इंग्रजांचा आश्रय मिळाला, नंतर कम्युनिस्टांनी त्याचे पोषण केले आणि आता ममता बॅनर्जी. मुस्लिमबहुल वस्तीत मुस्लिम स्कार्फ घालून ‘अल्लाऽ होऽ अकबरऽ…’ म्हणण्यापर्यंत यांची मजल गेली. आतातर हिंदूविरोधी जिहादी अभियानाला जणू सरकारी संरक्षणच प्राप्त झाले आहे!
आज भारतातील सर्वाधिक मागासलेला आणि उद्योगविहीन प्रांत म्हणून बंगालची संपूर्ण भारतात ओळख आहे. इन्फोसिस, टाटासारखे मोठे उद्योग जे लाखो लोकांना रोजगार देणारे प्रकल्प स्थापित करण्यासाठी विख्यात आहेत, ते बंगालमधून बाहेर पडले आहेत. तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीमुळे राज्याची प्रशासकीय व्यवस्था साफ कोलमडून पडली आहे. गोरखा लॅण्ड आंदोलनाच्या वेळी दार्जिलिंगबरोबरच देशभक्त, हिंदुनिष्ठ गोरखाली समाजाच्या बाबतीत अन्यायकारक धोरण अवलंबिल्याबद्दल तृणमूल सरकारवर टीकेची झोड उठली होती.
हा बंगालच्या संस्कृतिनिष्ठ समाजाच्या जागरणाचा काळ आहे, ज्यांनी आपल्या डोळ्यांत ‘आमार शोनार बांगला’ची स्वप्ने सजविली आहेत. त्यांच्यासाठी लोकशाही युद्धाच्या रणांगणात स्वत:ला झोकून देण्याची हीच योग्य वेळ आहे. विजय प्राप्त करण्याशिवाय त्यांच्यासमोर आता दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नाही.
जेथे मां, माटी आणि मानुष या तिघांचाही अपमान होतो, जेथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्यज्वालेवर मुस्लिम जिहादची राख फेकली जाते, जेथे प्रीतिलता वाड्डेेदारसारख्या क्रांतिकारिणीचा आत्मा तडफडतो तो शोनार बांगला असूच शकत नाही. तो शोनार बांगला जो कवी-गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांच्या दिव्य वाणीने झंकारून गेला, जेथे श्यामाप्रसाद आणि नजरूल इस्लाम यांच्या मैत्रीने नवप्रकाश दिला, तो बंगाल आज भ्रष्ट, परधर्मीय व विद्रूप तत्त्वांना बळी पडत आहे. हे भारता, आतातरी जागृत हो आणि कधीकाळी तुला जागृत करणार्‍या, तुझ्यात चैतन्य ओतणार्‍या, तुझ्यात प्राण फुंकणार्‍या बंगालची व्यथा जरा ऐक. अमानुष, महिषासुरी, मातृद्रोही तत्त्वांच्या तावडीतून या वंगभूमीची सुटका कर.
‘‘जेथे मन भयमुक्त आणि मस्तक सन्मानाने ताठ होईल, त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गात, हे प्रभू, माझ्या देशात नवचैतन्य आण.’’ ही गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांची प्रार्थना साकार कर…

Posted by : | on : Apr 17 2018 | Filed under : उपलेख, तरुण विजय, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, तरुण विजय, संपादकीय, स्तंभलेखक (6 of 1722 articles)


सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला हरविण्यासाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांनी उत्तरप्रदेशात एकत्र येण्यात काही गैर नाही. भाजपा सत्ताधारी ...

×