जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

►बहुतांश उपग्रह पृथ्वीपासून जवळच्याच अंतरावर, नवी दिल्ली, २६ जून…

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवी दिल्ली, २६ जून – नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा…

अडवाणींची स्वत:हून माघार

अडवाणींची स्वत:हून माघार

►चिन्मयानंद यांची माहिती, नवी दिल्ली, २५ जून – भाजपाचे…

माझे सरकार निष्कलंक

माझे सरकार निष्कलंक

►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, वॉशिंग्टन, २६ जून – माझ्या…

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

क्विन्सटाऊन, २६ जून – न्यूझीलंडमध्ये मद्यपानाच्या विरोधात मोहीम चालवणार्‍या…

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

►आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार • •►‘मोदी, मोदी’च्या घोषणांनी…

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

►शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घतले नाही तर बघतो!, नाशिक, २५…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 05:56 | अस्त: 19:02
अयनांश:
Home » उपलेख, संपादकीय » श्रद्धासुमने

श्रद्धासुमने

 प्रासंगिक : सुलभा अमृत चौधरी |

गांधीजींच्या निर्वाणानंतर, सत्य-अहिंसा-करुणेच्या मार्गाने चालणार्‍या, आचार्य विनोबा भावेंनी जमीनदार आणि भूमिहीनांचा संघर्ष मिटवून त्यांच्या मनात स्नेहज्योत पेटविली. त्यांच्या जीवनात मानवतेचा प्रकाश पसरविणार्‍या, भूदानयज्ञाची मुहूर्तमेढ तेलंगणात रोवली गेली. निमित्त घडले तेलंगणा येथे आयोजित ‘सर्वोदयी संमेलनाचे!’
कोणत्याही वाहनाचा उपयोग करायचा नाही. वर्धा ते तेलंगणा पदयात्रेचा त्यांचा दृढ संकल्प झाला. ३०० मैलांचे अंतर सहकार्‍यांसह विनोबा चालू लागले. या पदयात्रेत दु:ख-दारिद्र्याच्या विळख्यात अडकलेल्या नर-नारायणाचे त्यांना दर्शन झाले. जमीनदारांकडून भूमिहीन मजुरांचे होणारे शोषण, त्यांच्यावर होणारा अन्याय-अत्याचार सामाजिक आणि आर्थिक विषमतेत दडलेला असल्याचे सत्य विनोबांना समजले. त्यंाच्यातली विषमतेची ही दरी कमी व्हावी या उद्देशाने, तेलंगणातील सर्वोदयी संमेलनानंतर लगेच रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर भूदानयज्ञाचा प्रारंभ झाला. तेलंगणात विनोबांनी केलेल्या आवाहनानुसार येथील रामचंद्र रेड्‌डी या जमीनदाराने आपली १०० एकर जमीन दान करून, भूदानयज्ञाचा शुभारंभ केला. त्यानंतर १३ वर्षे आसेतु हिमाचल भारतभर काश्मीरपर्यंत अखंड पदयात्रा सुरू राहिली. विनोबांच्या सर्वोदयी विचारांनी प्रभावित होऊन अनेक स्त्री-पुरुष, ऊन-पाऊस, वादळवारा, थंडीचा जोर सोसत पदयात्रेत सहभागी झाले. पुरातून, भरपावसातून, डोंगरदर्‍या पार करीत ‘जय जगत’चा नारा लावीत ‘भौमर्षी’ विनोबांसह मंतरलेपणात तरुण-तरुणींचीही अनेक पावले चालत राहिली.
पदयात्रेत सहभागी निष्ठावंत स्त्रियांचा निवास आणि समूहसाधनेसाठी १९५९ साली विनोबांनी पवनार गावी, धामनदीच्या तीरावर ब्रह्मविद्यामंदिराची स्थापना केली. ब्रह्मविद्येचा उगम ‘उपनिषद’ असले, तरी त्याचे अंतिम विकसित रूप भगवद्गीतेत सापडते. ब्रह्मविद्येचे शास्त्र पुरुषांनी लिहिले. स्त्रियांना ब्रह्मविद्येचा अधिकार नव्हता. स्त्रियांना ब्रह्मसाधनेचा अधिकार प्राप्त व्हावा, या हेतूने आचार्यांचा हा प्रयत्न लक्षणीय आहे.
पदयात्रेतील छोट्या समूहाने, ब्रह्मचर्य व व्रतस्थ जीवनाचा स्वीकार करून, आध्यात्मिक स्तरावर समूहाने, जीवनाचा शोध घेण्याचा हा प्रयोग आहे. इथे स्वावलंबन आणि श्रमनिष्ठा बाळगून, ध्यानात्मक, शांत कर्मयोग सुरू आहे. हा आश्रम विनोबा समाधिस्थळ आहे. इथे राहणार्‍या निवासी साधकाला- १) स्वैच्छिक दारिद्र्य, २) श्रमातून उदरनिर्वाह व ३) सर्वसंमतीचे तत्त्वपालन आवश्यक आहे. २५ साधक भगिनी परस्परसमरसता हीच समूहजीवनाची कसोटी मानतात. इथे बिना अनुशासन असते स्वयंशासन, आत्मसंयम, स्वावलंबनादी एकादश व्रतांचे पालन होते. भूदान पदयात्रेतील इथे वास्तव्याला असणार्‍या बहुतेक साधक भगिनी ८० ते ८७ वयोगटाच्या आहेत. श्रमाधिष्ठित जीवनाचे मूल्य वाढविणारी ‘शेती’ ही जप-तप-ध्यानापेक्षा, भक्तीचे श्रेष्ठ साधन आणि चित्तशुद्धीचा मार्ग मानला आहे.
जगभर स्त्रियांना उपेक्षित, अपमानित, शोषित जीवन का जगावे लागते, याचे कारण जाणून निराकरण करण्याची, आध्यात्मिक प्रयोगशाळा, तपस्वी विज्ञाननिष्ठ आचार्यांनी निर्माण केली. आज विश्‍वात अन्योन्य विश्‍वासाची उणीव आहे. वास्तविक, विश्‍वास हाच सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा व्यापक श्‍वास आहे. सामूहिक चित्तनिर्मितीच्या या प्रयोगशाळेत सत्य-अहिंसा-करुणेचे प्रयोग शिकण्यासाठी देश-विदेशातून लोक इथे येतात. हिंदी भाषेतून निघणारा ‘मैत्री’चा मासिक अंक, आश्रमाचे, विनोबा विचारांचे मुखपृष्ठ आहे. विश्‍वातल्या समस्यांचे चिंतन करून निराकरणाचे उपाय या कर्मभूमीत शोधले जात आहेत. ज्ञान-शांती देणारा हा आश्रम विश्‍वाचे ऊर्जाकेंद्र आहे.
धाम नदीच्या तीरावर वसलेल्या, हिरवाईने नटलेल्या ब्रह्मविद्यामंदिरात डेलिया, जास्वंद, प्राजक्त, मोगरा-गुलाबाचा, तुळसमंजिर्‍यांसह मिश्र गंध दरवळतो. आंबा, फणस, केळी, जांभूळ, पेरू, संत्रा ही फळझाडे; सेंद्रिय शेतीतल्या भाज्या, हळद, धान्यशेती प्रसन्नता देते. शब्द-रूप-रस-गंधापलीकडे जाणवणारी चैतन्याची अनुभूती घेण्यासाठी या ‘पॉवर हाऊस’ला नक्की भेट द्यावी. वर्ध्यापासून ६ कि.मी. अंतरावरचे हे ब्रह्मविद्यामंदिर मैत्री जपणारे, वत्सल शब्दांनी आधार देऊन जीवनाची योग्य दिशा दाखविणारे, परम शांती देणारे परमधाम आहे. इथले प्रेरक सूत्र आहे- ‘स्नेह वर्धनम्, कटुक वर्जनम्
जीवनम् सत्य शोधनम्‌|’
पदयात्रेत असताना कुसुमताई, कालिंदीताई, लक्ष्मी फुकन, मीरा बहन या विनोबांच्या मानसकन्या-बाबांची सर्व प्रवचनेच नव्हे, तर त्यांचा शब्द न् शब्द टिपून घेत होत्या. त्यांच्या टिपणांमधूनच विनोबा साहित्य निर्माण झाले. कुसुम देशपांडे यांना तपस्वी विनोबांची सेवा व विशेष अनुग्रहाचा लाभ मिळाला. नावाप्रमाणेच कुसुम कोमल मनाच्या ताई, अत्यंत तरल-संवेदनक्षम केवळ स्नेहमूर्ती होत्या. त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व स्नेह-वात्सल्याचा प्रसन्न झरा होता. नितळ गौर कांतीप्रमाणे त्यांचे मन शुद्ध, नितळ होते. त्यांच्या शांत, प्रसन्न चेहर्‍यावर कधी नाराजीची छटा दिसली नाही, राग मावळलेला. ते तेजस्वी डोळे एकाग्र चित्ताने सूर्योदय-सूर्यास्त पाहत- सर्वांशी आपलेपणाने बोलत- सहज मैत्री हा त्यांचा स्वभाव. दुसर्‍याचे बोलणे शांतपणे ऐकून मितले आणि रसाळ शब्द उच्चारत, ‘‘हो का? असं होय? हं! छान! सुंदर!’’ या परिमित शब्दांतून झिरपणारा स्नेह, माधुर्य केवळ शब्दातीत!
विनोबांच्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या १५-१६-१७ या कालावधीत त्रिदिवसीय मित्रमिलनसोहळा, प्रवचन-भजन, सामूहिक चिंतनपर कार्यक्रमाद्वारे संपन्न होतो. विनोबा विचारांशी, समूहाशी तादात्म्य पावलेल्या कुसुमताईंना २०१५ ला वयाच्या ८६ वर्षी देवाज्ञा झाली. योगायोगाने १७ नोव्हेंबरचा चिंतनसोहळा समाप्तीचा दिवस होता! सर्वांचे भोजनही आटोपले आणि उपस्थित सर्वांचा निरोप घेत त्या अनंतात विलीन झाल्या!
आश्रमप्रथेप्रमाणे शेतात त्यांचा अग्निसंस्कार वेदमंत्रानी संपन्न झाला. अस्थिविसर्जन आश्रम परिसरात झाडाखाली झाले. आज त्या देहरूपाने आश्रमात नाहीत. मात्र, श्रद्धासुमने वाहताना मनात दाटी झाली होती प्राजक्तफुलांची निशिगंध अन् दरवळणार्‍या मोगर्‍याची!
पदयात्रेतल्या प्रत्यक्षदर्शींनी त्यांच्या रणरागिणी रूपाचा प्रसंग सांगितला. परधर्मियांसह मंदिरप्रवेश पूर्व अनुमतीने करताना, धर्ममार्तंडांनी विनोबांवर केलेला हल्ला- प्रहार कुसुमताईंनी पदर खोचून आवेशाने झेलला.
‘कुसुमात अणि कोमलानि
वज्रात आणि कठोराणि॥
असे खंबीर रूपही होते कोमल मनाचे. कुसुमताईंच्या स्मृतीला वंदन! विनोबाकार्याला, त्यांच्या स्मृतीला भावसुमनांजली सादर अर्पण!

शेअर करा

Posted by on Nov 15 2016. Filed under उपलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उपलेख, संपादकीय (422 of 470 articles)


भ्रष्टाचार, काळा पैसा, दहशतवाद आणि बनावट चलनाविरुद्ध लढण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या सर्व नोटा अवैध ठरविण्याचे ऐतिहासिक पाऊल मोदींनी उचलले ...