ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » उपलेख, चारुदत्त कहू, संपादकीय, स्तंभलेखक » संघाचे पुढारलेपण आणि त्यापुढील आव्हाने…

संघाचे पुढारलेपण आणि त्यापुढील आव्हाने…

चारुदत्त कहू |

चालू महिन्यात शिकागो येथे पार पडलेल्या विश्‍व हिंदू संमेलनाने जगभरातील हितचिंतकांचे, अभ्यासकांचे आणि टीकाकारांचे लक्ष संघाकडे वेधले गेले आणि १७, १८, १९ सप्टेंबरला दिल्लीत होऊ घातलेल्या आणखी एका कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा संघाबद्दल देशभरात चर्चेची गुर्‍हाळं रंगणार आहेत. यानिमित्ताने संघशक्तीची चर्चा करताना संघापुढील आव्हानांचीही चर्चा होण्याची गरज आहे.
दर चार वर्षांनी पार पडणार्‍या विश्‍व हिंदू संमेलनाचे (वर्ल्ड हिंदू काँग्रेस) सूप वाजले आहे. स्वामी विवेकानंदांच्या, अमेरिकेतील जगप्रसिद्ध भाषणाला सव्वाशे वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधून यंदाच्या दुसर्‍या विश्‍व हिंदू संमेलनाचे ७, ८ आणि ९ सप्टेंबरला आयोजन केले गेले. जगभरातील हिंदूंनी एकमेकांशी संपर्क प्रस्थापित करणे, कल्पनांचे आदानप्रदान करणे, एकमेकांना प्रोत्साहन देणे आणि चर्वितचर्वणातून निघालेल्या निष्कर्षानुरूप काम करणे, हे विश्‍व हिंदू संमेलनाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. पहिली वर्ल्ड हिंदू काँग्रेस २०१४ मध्ये नवी दिल्लीत झाली. या परिषदेत निरनिराळी सात व्यासपीठे निर्माण झाली. त्यात जागतिक हिंदू समुदायात उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, नीतिमूल्यांबाबत जाणीवजागृती आणि सृजनात्मकता यांचाही समावेश होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून हिंदू समाजाला संघटित करण्याचे काम अविरत सुरू आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून या जागतिक परिषदा आयोजित केल्या जात आहेत. हिंदू स्वयंसेवक संघाच्या पुढाकारातून शिकागोत आयोजित परिषदेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीतर उपस्थिती लावलीच, शिवाय जगभरातील २०० हून अधिक नामवंत वक्त्यांनी निरनिराळ्या चर्चासत्रांमध्ये भाग घेऊन हिंदुधर्माचे महत्त्व आणि त्याचे जागतिक योगदान याबाबत मत प्रतिपादन केले. एकंदरीत संमेलनाची रचना, आयोजनातील भव्यता, हिंदू नीतिमूल्यांबाबत जाणीवजागृती, जगभरातील हिंदू एका व्यासपीठावर येणेे, जागतिक समस्यांबद्दल झालेला ऊहापोह, हिंदूंचे जागतिक स्तरावरील योगदान आदींबाबत प्रतिपादित झालेली मते पाहता, हे संमेलन यशस्वी झाले, असेच म्हणावे लागेल.
जगात इस्लाम आणि ख्रिश्‍चन समुदायानंतर सर्वाधिक मोठी जनसंख्या हिंदूंची आहे. ख्रिस्ती आणि मुस्लिम हे आपल्या देशाचा धर्म घोषित करणारी अनेक राष्ट्रे आज अस्तित्वात आहेत. पण, हिंदूंचे राष्ट्र म्हणून आज एकही देश अथवा जमिनीचा तुकडा अस्तित्वात नाही, ही वस्तुस्थिती आहे. नाही म्हणायला भारत हा हिंदुबहुल देश आहे, असे म्हटले जात असले, तरी या धर्माचे जगभरातील अनुयायी सुसंघटित नसल्याची खंत व्यक्त करून, डॉ. मोहनजी भागवत यांनी, या समाजातील न्यून जागतिक परिषदेच्या निमित्ताने दाखवून दिले आहे. जगात ख्रिस्ती लोकांच्या संघटना आहेत, चर्चच्या माध्यमातून या संघटना पैसा गोळा करतात आणि एखाद्या कार्पोरेट कंपनीप्रमाणे काम करतात. किती लोकांना कन्व्हर्ट केले यावरून, चर्चच्या पाद्रींना पगार आणि इन्सेन्टिव्हजही दिले जातात. तशीच परिस्थिती मुस्लिमांची आहे. सुसंघटित गुन्हेगारी, धाकदपटशा, खंडणी, लव्ह जिहाद, शस्त्रास्त्रांंचा अवैध व्यापार, दहशतवाद आदी माध्यमातून कन्व्हर्शनचे प्रकार सातत्याने या समाजातील दुष्प्रवृत्तींकडून सुरू आहेत. जगातील ४५ देशांचा समावेश असलेली ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉन्फरन्स ही संघटना मुस्लिम देशांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्याचप्रमाणे ख्रिश्‍चियन इकॉनॉमिक फोरम ही ठामपणे ख्रिस्ती देशांच्या आणि समुदायाच्या मागेही ठामपणे उभी आहे. हिंदूंचा असा कुठलाही फोरम नसताना किंवा तशा फोरमने आकार घेतलेला नसताना, जागतिक हिंदू परिषदेत सहभागी झालेल्या ५० देशांमधील २५० पुढारी आणि २२०० प्रतिनिधींनी ही केवळ धार्मिक परिषद नसून, यातून जागतिक हिंदू आर्थिक व्यासपीठ, हिंदू शिक्षण परिषद, महिला, युवक, क्रीडाविषयक व्यासपीठ विकसित होऊ शकते, याचे संकेत दिले आहेत.
जगाच्या अर्थकारणाला दिशा देण्याच्या कामात देशोदेशींच्या राज्यकारभाराशी संबंध नसलेले घटक मोठा हातभार लावत आहेत. धर्म हासुद्धा त्यातील महत्त्वाचा घटक आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. देशोदेशींच्या समर्थकांना आपल्या मतानुरूप वळविणे आणि त्यांचा सृजनात्मक आर्थिक विकासाठी वापर करून घेण्याचे कामही धर्मामार्फत केले जाऊ शकते. जागतिक आर्थिक फोरमच्या एका लेखातील आकडेवारीनुसार अमेरिकेच्या अर्थकारणात धर्माचा सहभाग वार्षिक १.२ ट्रिलियन डॉलर्सचा आहे. धार्मिक सभा-संमेलनातून अमेरिकेच्या अर्थकारणाला ४१८ बिलियन डॉलर्सची मदत होते. धार्मिक संस्था विशेषतः विद्यापीठे, धर्मार्थ संस्था आणि आरोग्यविषयक संस्था अमेरिकी अर्थकारणात ३०३ बिलियन डॉलर्सची भर घालतात. त्याचप्रमाणे धर्माशी संबंधित, धर्माधारित आणि धर्मामुळे प्रभावित झालेल्या व्यवसायातून अमेरिकी अर्थव्यवस्था ४३७ बिलियन डॉलर्सनी समृद्ध होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार्‍या कॅथलिक बँंकेची एकूण संपत्ती ८ बिलियन डॉलर्सची असून, ही बँक जगभरातील कॅथलिक ख्रिश्‍चनांच्या उत्थानासाठी प्रभावीपणे काम करीत आहे. मुस्लिम जगताच्या पाठिंब्याने उभी झालेली ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉन्फरन्स (ओआयसी) असेच कार्य त्यांच्या समाजबांधवांसाठी करते. अशाप्रकारे हिंदूंसाठी काम करणारे कुठलेच व्यासपीठ नसल्याने वर्ल्ड हिंदू काँग्रेसचे आयोजन हे त्या दिशेने उचललेले एक सकारात्मक पाऊल म्हणायला हवे. शिकागो परिषदेत ४, ५ देशांच्या राज्यकर्त्यांच्या प्रतिनिधींनी घेतलेला सहभाग स्वागतार्ह म्हणायला हवा. ४ सप्टेंबर २०१६ रोजी मदर टेरेसांना संतत्व बहाल करण्यासाठी झालेल्या कार्यक्रमात १३ देशांचे प्रमुख आणि ९० देशांमधील सरकारचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. रोहिंग्यांचा प्रश्‍न ज्या वेळी जागतिक व्यासपीठावर चर्चिला गेला आणि त्यांच्याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा म्हणून ओआयसीचे विशेष अधिवेशन बोलाविले गेले. धर्माची ताकद काय हे ओळखण्यासाठी ही दोन उदाहरणे पुरेशी आहेत. आज हिंदूंची शक्तीही कमी नाही. भारताबाहेरील हिंदूंची संख्या ६० ते ७० मिलियन असून, ते तब्बल ४५ देशांमध्ये वास्तव्यास आहेत. हिंदूंची ५० लाखांहून अधिक संख्या असलेले भारतासह १५ देश आहेत. त्यात नेपाळ, बांगलादेश, इंडोनेशिया, पाकिस्तान, श्रीलंका, मलेशिया, अमेरिका, म्यानमार, इंग्लंड, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस, कॅरिबियन बेटे (वेस्ट इंडिज) आणि फिजी या देशांचा समावेश आहे. या देशांतील हिंदूंना अनेक सामाजिक आणि राजकीय समस्यांना तोंड द्यावे लागते. पण, आजवर त्यांना त्यांच्या समस्या कुठे मांडाव्या, हे कळायला मार्ग नव्हता. पण, वर्ल्ड हिंदू काँग्रेसच्या निमित्ताने या मंडळींच्या समस्यांना वाचा फोडण्याचे व्यासपीठ उशिरा का असेना, उपलब्ध झाले आहे.
हिंदू एकीकडे संघटित होऊन प्रगतीची शिखरे पादाक्रांत करीत असताना, अजूनही अनेक अंतर्गत वैचारिक द्वंद्वातून बाहेर पडलेला नाही. दिल्लीत पुढच्या आठवड्यात प्रचार विभागाच्या वतीने सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या ३ दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भविष्यातील भारत ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोन’ असा त्यांच्या व्याख्यानांचा विषय आहे. त्यात समाजाच्या विभिन्न स्तरातील गणमान्यांना संघ समजावून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. निरनिराळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, भिन्न देशांचे राजदूत, व्यावसायिक, उद्योजक, क्रीडापटू, वकील, डॉक्टर्स, सनदी अधिकारी, सनदी लेखापाल, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी निमंत्रित राहतील. या निमित्ताने संघाचे काम, कामाची पद्धती, त्याबद्दलचे आक्षेप, संघापुढील आव्हाने याबद्दल व्यापक चर्चा होण्याची गरज निर्माण झाली आहे.
जगातील अनेक समस्यांवर हिंदू जीवनपद्धती हेच एकमेव उत्तर असल्याची संघाची भूमिका आहे. त्याचप्रमाणे भारतात जन्माला आली ती प्रत्येक व्यक्ती हिंदू, असेही संघ मानतो. पण, समाज तसे मानण्यास तयार नाही. समाजाची ही भूमिका बदलण्याचे आव्हान संघ आणि स्वयंसेवक दोहोंपुढे आहे. भारतात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या मुस्लिम आणि ख्रिश्‍चनांना भारतीय मुस्लिम व भारतीय ख्रिश्‍चन म्हणून स्वीकारले जाऊ शकत नाही का? हेदेखील बघितले जायला हवे. आपला समाज गणपतीच्या दूध पिण्याचे, गणपतीला हत्तीचे धड लावले जाण्याच्या, विश्‍वासाच्या पातळीवरील घटनेचे वैज्ञानिक आधारावर समर्थन करणे थांबवेल का, हेदेखील बघावे लागेल. इस्कॉनचे अनुयायी गोरे म्हणून त्यांना मंदिरप्रवेश कसा काय नाकारला जाऊ शकतो, यावरही विचार केला जायला हवा. समाजाला भेडसावणार्‍या अनेक समस्या आहेत, त्याबाबत नव्या नीतिनियमांची बांधणी करण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी घेतलेला सकारात्मक सहभागच संघाच्या पुढारलेपणावर शिक्कामोर्तब करणार आहे!

https://tarunbharat.org/?p=61647
Posted by : | on : 11 Sep 2018
Filed under : उपलेख, चारुदत्त कहू, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, चारुदत्त कहू, संपादकीय, स्तंभलेखक (615 of 1507 articles)


काय हे! बिचारे राहुल गांधी! कुणीही उठतो आणि त्या निरागस युवकाला वाट्टेल ते बोलतो. भाजपावाले तर रोजच तोंडसुख घेत असतात. ...

×