ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » उपलेख, रविंद्र दाणी, संपादकीय, स्तंभलेखक » सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे…

सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे…

रवींद्र दाणी |

सर्वोच्च न्यायालयाने दोन महत्त्वाचे निवाडे दिले. एक निवाडा आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल आहे, तर दुसरा प्राचीन आस्थेबद्दल. या दोन्ही निवाड्यांचे व्यापक व दूरगामी परिणाम आहेत. या दोन्ही निवाड्यांवर उलटसुलट प्रतिक्रिया नोंंदविल्या जात आहेत.
राम जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाने एक निवाडा दिला. हा निवाडा रामज्मभूमी-बाबरी ढांचा प्रकरणावर राहणार आहे, असे वातावरण काही माध्यमांनी निर्माण केले होते. प्रत्यक्षात तसे नव्हते. मशीद आणि नमाज यांचा अविभाज्य संबंध आहे काय, एवढाच एक मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर होता आणि दुसरा मुद्दा होता तो १९९४ मध्ये उत्तरप्रदेश सरकारने केलेले भूमीचे अधिग्रहण. हे दोन्ही मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या ताज्या निवाड्यात स्पष्ट केले. मशीद आणि नमाज यांचा परस्पराशी अविभाज्य संबंध नाही, असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि त्याच वेळी १९९४ चे भूमी अधिग्रहण न्यायालयाने वैध ठरविले. आता २९ ऑक्टोबरपासून मुख्य खटल्याची सुनावणी सुरू होईल. जी प्रथम १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. त्या मुख्य सुनावणीत अडथळा निमार्ंण करण्यासाठीच हा नवा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तो आता दूर करण्यात आला आहे.
नवे बेंच
मुख्य खटल्याच्या सुनावणीसाठी नवे बेंच गठित केले जाईल. मनोनित सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई याचा निर्णय करतील. सध्या जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार जमिनीच्या मालकीहक्काबाबत ही सुनावणी असेल. म्हणजे हे रामजन्मस्थान आहे वा नाही, याचा विचार सर्वोच्च न्यायालय करणार नाही, तर ज्या २.७७ एकर जमिनीवरून हा सारा वाद सुरू आहे, त्या जमिनीचा मालक कोण, सुन्नी वक्फ बोर्ड, हिंदुमहासभा की निर्मोही आखाडा, यावर सुनावणी होणार आहे. आणि याच कारणाखाली आणखी तिसर्‍या लोकांना या सुनावणीत सामील करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच नकार दिला आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालय
अलाहाबाद उच्च न्यायालयाने राम जन्मभूमीच्या बाजूने निर्णय देताना, २.७७ एकर जागेचे त्रिभाजन केले असून, एकतृतीयांश जागा निर्मोही आखाडा, एकतृतीयांश हिंदुमहासभा व एकतृतीयांश जागा सुन्नी वक्फ बोर्डाला दिली आहे. म्हणजे या निर्णयातही वादाची बीजे आहेतच. मंदिर-मशीद जवळजवळ बांधली गेल्यास पुन्हा कायम तणावाची स्थिती कायमच राहणार आहे. दोन्ही समुदायांना मान्य होईल, त्यांच्या भावनांचा आदर होईल, असा निवाडा सर्वोच्च न्यायालय देऊ शकेल काय आणि दिल्यास तो कसा असेल, याची कल्पना आज कुणालाही करता येत नाही.
२०१९ पूर्वी अवघड?
सर्वोच्च न्यायालयात २९ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या सुनावणीचा निवाडा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी होण्याची शक्यता फारच कमी आहे. सुनावणी सुरू झाल्यावर त्यात पुन्हा अडथळे आणण्याचे प्रयत्न होतील. एकूणच या खटल्याची व्याप्ती, त्याची संवेदनशीलता पाहता, या खटल्याचा निकाल लागण्यास काही अवधी लागेल, असे मानले जाते. आणि, लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा होऊ शकतो हे वास्तव पाहता, तर सर्वोच्च न्यायालयही लोकसभा निकालापूर्वी त्याचा निवाडा देण्याची शक्यता फार कमी आहे.
अंमल कोण करणार?
सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निवाडा दिला, तरी त्याचा अंमल कोण करणार, असा एक प्रश्‍न उपस्थित होणार आहेच. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवळी कावेरीच्या मुद्यावर राज्य सरकारांना काही आदेश दिले होते, त्या आदेशांचे उल्लंघन करण्याइतपत घटना घडल्या आहेत. उद्या, सर्वोच्च न्यायालयाने, वादग्रस्त जागा सुन्नी वक्फ बोर्डाची आहे असा निवाडा दिला, तरी त्याची अंमलबजावणी कोणतेही सरकार करू शकत नाही. अयोध्येत वादग्रस्त जागी एक लहानसे का होईना राममंदिर अस्तित्वात आले आहे, त्याला कोणतेही सरकार हटवू शकत नाही. आणि नेमकी हीच बाब समोर ठेवून या प्रश्‍नावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न व्हावयास हवा, असे काही नेत्यांना वाटते.
आधार निवाडा
सर्वोच्च न्यायालयाने आधारबाबत एक महत्त्वाचा निवाडा देत, आधारला वैध मानत असताना, काही ठिकाणी आधारची गरज नाही, असे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय पीठाने ४-१ अशा बहुमताने हा निवाडा दिला आहे. न्या. चंद्रचूड यांनी आधारच्या विरोधात निवाडा दिला आहे. न्या. चंद्रचूड हे एक चांगले न्यायाधीश मानले जातात आणि सर्वोच्च न्यायालयातील सेवाज्येष्ठतेचा क्रम पाहता, न्या. चंद्रचूड २०२२ मध्ये दोन वर्षांसाठी सरन्यायाधीश होणार आहेत. त्यांचे वडीलही सरन्यायाधीश पदावर राहिले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचा कार्यकाळ सर्वाधिक राहिलेला आहे.
मास्टरकार्ड
आधारबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा तसा योग्य आहे. पण, आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक कार्ड, राष्ट्रीय नागरिकत्वाचे आणखी एक कार्ड असे करण्यापेक्षा एकच मास्टर कार्ड असावे, असे काहींना वाटते. अनेक देशांमध्ये मुलाचा-मुलीचा जन्म झाल्यावर त्याच दिवशी त्याला राष्ट्रीयत्वाचा क्रमांक दिला जातो व तो मृत्यूपयंर्र्ंत बदलत नाही. विदेशातील अशा चांगल्या बाबीचा समावेश सरकारने भारतीय प्रणालीत केला पाहिजे. काही ठिकाणी आधार मागितले जाणार, काही ठिकाणी पॅन मागितले जाणार, काही ठिकाणी रेशन कार्ड मागितले जाणार, यापेक्षा प्रत्येक भारतीयाला जन्माच्या वेळी एकच कार्ड दिले गेले, तर अनेक बाबींची गुंतागुंत टाळता येईल. आसाममध्ये एक विचित्र गुंतागुंत तयार झाली आहे. नागरिकत्वाच्या राष्ट्रीय नोंदवहीत मुलाचे नाव तर आहे, पण वडिलाचे नाही. भावाचे आहे, बहिणीचे नाही. पतीचे आहे, पत्नीचे नाही. हा सारा गुंता आता न्यायालयात गेला आहे. ज्यांची नावे नाहीत त्यांना आपली नावे समाविष्ट करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. तो वेळ निश्‍चितच वाढविला जाईल. याला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही देण्यात आले आहे. आजही भारतात राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर नाही. हीतर मूलभूत बाब असवयास हवी होती. ती असती तर बांगला देशी घुसखोरांची गंभीर समस्या तयार झाली नसती. आधारचा आधार अधिक व्यापक करून, त्यात व्यक्तीचे खाजगी अधिकार आणि देशाची सुरक्षा याची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला पाहिजे.

https://tarunbharat.org/?p=64737
Posted by : | on : 1 Oct 2018
Filed under : उपलेख, रविंद्र दाणी, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, रविंद्र दाणी, संपादकीय, स्तंभलेखक (464 of 1422 articles)

Rss Dr Bhagwat
अन्वयार्थ : तरुण विजय | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांचे भाषण ऐकण्यासाठी देशातील ख्यातनाम बुद्धिजीवी, राजनयिक, कलावंत आणि विविध पंथांच्या संतमहात्म्यांची ...

×