ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » सृष्टीचे सर्वोत्तम रूप ‘प्रकाश!’

सृष्टीचे सर्वोत्तम रूप ‘प्रकाश!’

दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. संपूर्ण सृष्टी प्रकाशमान करण्याची क्षमता असलेला दीपोत्सव सुरू झाला आहे. वसुबारस आणि धनत्रयोदशी आटोपली असून, आज नरकचतुर्दशी आहे. उद्या आपण सर्व जण लक्ष्मीपूजन करणार आहोत. या प्रकाशपर्वात सगळीकडे आनंदाचे वातावरण असते आणि असायला हवे. तसे पाहिले तर सृष्टी ही बहुरूपवती आहे. सृष्टीची अनेक रूपं आहेत आणि ती पूर्वापार आहेत. आपण ती अनुभवतही असतो. सेकंदा-सेकंदाला सृष्टीचे रूप बदलत असते आणि त्याची अनुभूती आपण सगळेच घेत असतो. छांदोग्य उपनिषदानुसार, सृष्टीचे सर्वोत्तम रूप जर कोणते मानले गेले असेल तर ते आहे ‘प्रकाश’ रूप! आपल्याला म्हणजेच या सृष्टीला प्रकाश देणारा कोण आहे, तर तो सूर्य आहे. सूर्य हा या सृष्टीचाच एक भाग आहे. वैदिक वाङ्मयात सूर्याला देवता मानले गेले आहे. सूर्य हा सहस्रआयामी प्रकाशदाताही आहे. बृहदारण्यक उपनिषदात असे म्हटले आहे की, ‘तमसो मा ज्योतिर्गमय, असतो मा सद्गमय!’ याचा अर्थ असा की, अंधकारातून प्रकाशाकडे आणि असत्याकडून सत्याकडे चला. हा तर सृष्टीचा संदेश आहे. या भूतलावर वास करणार्‍या तमाम जिवांच्या आयुष्यात सदासर्वदा प्रकाश राहावा, यासाठीच अग्नीने अमर अशा सूर्याला आकाशात बसविल्याचा उल्लेख आमच्या धर्मग्रंथात आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की, भारताच्या या सनातन ज्योतिर्गमय आकांक्षेचे सांस्कृतिक आयोजन म्हणजेच दीपावली होय! खरेतर दीपावली हे निराळेच प्रकाशपर्व आहे. दिवसा श्रम आहेत, तर रात्री विश्राम आहे. रात्री अंधकारही आहे. सूर्याकडून प्रकाश घेऊन तो रात्रीही आपल्याला मिळावा, अशी व्यवस्था सृष्टीच्या निर्मात्यांनी केली आहे. चंद्र हा सूर्याप्रमाणे दररोज पूर्ण आकारात आपल्यासमोर येत नाही. त्याचा आकार सतत बदलत असतो. पौर्णिमेला तो पूर्ण आकारात असतो आणि आल्हाददायक असा प्रकाश भूतलावरील जीवितांना देतो. शरदपौर्णिमेला पूर्ण प्रकाश असतो, तर ठीक पंधरा दिवसांनी येणार्‍या कार्तिकी अमावास्येला अंधकाराचे साम्राज्य असते. पण, आपल्या पूर्वजांनी या अंधकाराच्या पर्वाचे प्रकाशपर्वात रूपांतर केले ते दिवाळसणाच्या रूपाने! भारताचा शाब्दिक अर्थच ‘प्रकाशरत’ असा होतो. ‘भा’ म्हणजे प्रकाश आणि ‘रत’ म्हणजे संलग्नता. दीपपर्वाचे मुख्य आयोजन हे अमावास्येच्या रात्रीच असते. परंतु, आपल्याकडच्या परंपरने हे प्रकाशपर्व म्हणजे पाच दिवसांचे मधुर असे आयोजन मनवून टाकले आहे. हा काळ अतिशय आनंदाचा असतो, समाधानाचा असतो. लंकाविजय प्राप्त करून अयोध्येत परतलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचे स्वागत हे सहस्र दिवे प्रज्वलित करून झाले होते, याचा विसर आपल्याला पडायला नको. महाभारत काळात पांडवांना बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास घडला होता. त्यानंतर जेव्हा पांडव आपल्या भूमीत परतले होते, त्याचा संदर्भही दीपपर्वाशी जोडला जातो. पद्मपुराण आणि स्कंदपुराणातही दिवाळीचा उल्लेख आहे. दिवाळी म्हणजेच या दीपपर्वाची देवी श्रीलक्ष्मी ही आहे. लक्ष्मी म्हणजेच विष्णूपत्नी. लक्ष्मी आणि विष्णूची ही जोडी फारच गोड आहे. दोघेही क्षीरसागरात शेषशय्येवर आहेत आणि असे असतानाही शांत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘शांताकारं भुजंग शयनं’ हे फार आश्‍चर्यकारक आहे. शेषशय्येवरही शांत, स्थितप्रज्ञ राहणे सोपे नाही. पण, म्हणूनच धनाची देवता श्रीलक्ष्मी ही रिद्धी, सिद्धी, समृद्धीच्या विवेकाधीन कोषाची स्वाभिमानी आहे. आपली भारतीय संस्कृती ही पाश्‍चिमात्य संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. आपल्याकडे धनसंचयाला फार महत्त्व नाही आणि केलेला धनसंचय हा समाजाच्या भल्यासाठी करावा, तो स्वत:वर खर्च करणे दंडनीय मानले गेले आहे. पण, आता परिस्थिती बदलली आहे. धनसंचय हा स्वत:साठी केला जाऊन श्रीमंतीचे ओंगळवाणे प्रदर्शन घडविले जात आहे. शेजारचे कुटुंब उपाशीपोटी झोपत असले, तरी त्याची तमा न बाळगता आम्ही आमच्या संपत्तीचे भडक प्रदर्शन करून कोडगेपणाही दाखवून देत असतो. पाश्‍चिमात्य अर्थशास्त्रात उद्योग करणार्‍याला साहसी आणि लाभाला साहसासाठीचा पुरस्कार मानले जाते. पण, भारतीय चिंतन हे त्यापेक्षा फार वेगळे आहे. ‘शुभ-लाभ’ भारतीय चिंतनाचा विकास आहे. पाश्‍चिमात्य चिंतनात ज्याला लाभ म्हटले आहे, त्यात करचोरी, भेसळ आदींचा समावेश होतो. भारतीय चिंतनातील शुभलाभात हे तत्त्व नसते. आर्थिक दुष्टचक्रातून मोठ्यांची संपत्ती अधिकाधिक वाढत गेली आणि गरिबांचे दारिद्र्य वाढत गेले. २०१६ साली एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार, एक टक्का धनिकांकडे ५८.४ टक्के धन होते. १० टक्के धनिकांकडे ८० टक्के पैसा होता. ही जी विषमता आपल्या समाजात आहे, ती चिंताजनक आहे. खरे म्हणजे भारतीय चिंतनात विषमतेला कुठे स्थानच असायला नको. पण, दुर्दैवाने आम्ही पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत राहिल्याने विषमतेची दरी अधिकाधिक रुंदावत चालली आहे आणि ही बाब गंभीर आहे. आपण जे प्रकाशपर्व साजरे करतो आहोत, त्यात समस्तजनांच्या कल्याणाचा विचार आहे. या प्रकाशपर्वात आपल्यापैकी कुणीही अंधकारात राहू नये, अशी अपेक्षा आहे. कारण, हा प्रकाश म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचे संधान आहे. धनसमृद्धी आणि ज्ञानप्रकाश यावर भारतातील प्रत्येकाचा अधिकार आहे. असे असले तरी निर्माण झालेली विषमता फार भयंकर आहे. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचविण्याचे अतिशय महत्त्वपूर्ण काम केले आहे. प्रत्येक घर प्रकाशमान करण्याचे त्यांचे ध्येय स्वागतायोग्य आहे. लघुउद्योग करू इच्छिणार्‍याला ५९ मिनिटांत एक कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याची त्यांनी केलेली घोषणा म्हणजे या प्रकाशपर्वाची अनोखी भेटच म्हटली पाहिजे. लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे आणि त्यासाठी अनेक योजना सरकारने सुरू केल्या आहेत. पण, लोकांच्या जीवनदृष्टीत प्रकाश ओतण्याचे काम कोणतेही सरकार करू शकत नाही. आपल्या आसपास राहणारा प्रत्येक मनुष्य सुखी राहिला पाहिजे, याची काळजी तर आपल्यापैकी प्रत्येकाने घ्यायला हवी ना? सगळीकडे सरकार कसे पोहोचणार? या प्रकाशपर्वात आपण असा संकल्पच सोडला पाहिजे की, मी स्वत: आनंदाने जगेल आणि माझ्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करीन. अतिशय प्राचीन परंपरा लाभलेला आपला भारत देश अर्थात हिंदुस्थान, अखंड आणि एकात्म राहावा, यासाठी प्रयत्न करणे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य असताना, काही फुटीरवादी मनोवृत्तीचे लोक अनेकदा चिथावणीखोर वक्तव्ये करून देशाच्या विभाजनासाठी प्रयत्न करतात, त्यांना आपण आक्रमक समजून त्यांचा योग्य बंदोबस्तही केला पाहिजे. समाजविभाजक अस्मिता मजबूत होत असताना त्यांचे कंबरडे मोडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिले पाहिजे. आधुनिक भारतात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व असले, तरी समता-समरसतेचा अभाव दिसतो आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना समरसता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असताना, त्या समरसतेच्या यज्ञात प्रत्येकाने आहुती देण्याची गरज आहे.

https://tarunbharat.org/?p=67182
Posted by : | on : 6 Nov 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (27 of 729 articles)


कहू | विदेशातून आलेले ‘मी टू’चे फॅड थांबण्याची काही चिन्हे नाहीत. भारतातही त्याचे लोण पसरत चालले आहे. सिनेअभिनेत्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत ...

×