ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » हरिवंश-विजयाचा अन्वयार्थ

हरिवंश-विजयाचा अन्वयार्थ

९ ऑगस्टला राज्यसभेचे उपसभापती निवडले गेले. भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) हरिवंश नारायण सिंह या पदावर निवडून आले. त्यांनी काँग्रेसप्रणीत विरोधी पक्षांचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांचा २० मतांनी पराभव केला. हरिवंश यांना १२५, तर हरिप्रसाद यांना १०५ मते मिळाली. या निवडणुकीचे आणि हरिवंश यांच्या विजयाचे विशेष महत्त्व आहे. ४० वर्षांनंतर प्रथमच राज्यसभेच्या उपसभापतिपदी काँग्रेसची व्यक्ती विराजमान झाली आहे. १९५२ पासून बघितले, तर १९६९ ते १९७२ या काळात रिपब्लिकन पक्षाचे भाऊ खोब्रागडे आणि १९७२ ते १९७७ संयुक्त समाजवादी पक्षाचे गोडे मुर्‍हारी हे दोन उपसभापती गैरकाँग्रेसी होते. बाकीच्या काळात केवळ आणि केवळ काँग्रेसचाच उपसभापती राहिला आहे. ती परंपरा यावेळी मोडली गेली. लोकसभेत रालोआला बहुमत असले, तरी ते राज्यसभेत नव्हते. असे असतानाही रालोआने आपला उमेदवार निवडून आणला, यावरून सध्या देशात राजकारणाचे वारे कुठल्या दिशेने वाहात आहेत, हे लक्षात येईल. विरोधी पक्षांनी जी काही व्यूहरचना आखली असेल, ती निष्फळ सिद्ध झाली आहे. हे यासाठी महत्त्वाचे आहे की, हे निवडणुकीचे वर्ष आहे. २०१९ सालच्या निवडणुकीत कुठल्याही मार्गाने का होईना, पण नरेंद्र मोदी यांना पराभूत करायचे आहे, असा फतवा सोनिया गांधी यांना काढला आहे. त्यासाठी महागठबंधन तयार करण्यात आले. कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीच्या वेळी महागठबंधनची एकता आणि शक्ती प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही आघाडी दिवसेंदिवस मजबूत व्हायला हवी होती. परंतु, उलट घडत आहे. मोदी सरकारवरील अविश्‍वास प्रस्तावाची संधीदेखील अशीच वाया गेली. लोकसभेत रालोआला बहुमत आहे, असे कारण देता येईल. पण राज्यसभेचे काय? तिथे तर रालोआला बहुमत नव्हते. मग तिथेही विरोधी पक्षांवर पराभवाची नामुष्की का म्हणून यावी? याचे सरळ आणि सोपे उत्तर म्हणजे राहुल गांधी. राहुल गांधींना अध्यक्ष म्हणून स्वीकारणे काँग्रेस पक्षाची अपरिहार्यता असू शकते; पण इतर विरोधी पक्षांनी त्याला डोक्यावर घेण्यास काहीतरी कारण हवे ना! सर्वात वयस्कर व सर्वात मोठा पक्ष असतानाही राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदाची आशा बघणे सोडले आहे. हा त्यागदेखील विरोधी पक्षांना आकर्षित करू शकला नाही. या निवडणुकीत ज्या विरोधी पक्षांनी रालोआच्या विरुद्ध मतदान केले, ते मोदी यांचा विरोध म्हणून केले; राहुल गांधींचे नेतृत्व मान्य असल्यामुळे नाही, हे लक्षात घ्यायला हवे. या निवडणुकीत काँग्रेसला आपला उमेदवार निवडून आणता आला असता, तर याचा प्रभाव फार मोठा असता. विरोधकांचे महागठबंधन अधिक बळकट झाले असते आणि दुसरीकडे भाजपाला घाम फुटला असता. त्यामुळेच काँग्रेसने ही संधी गमवून स्वत:चे तसेच विरोधकांच्या आघाडीचे फार मोठे नुकसान केले आहे. वायएसआर काँग्रेस, मेहबुबा मुफ्तींचा पीडीपी आणि केजरीवालांचा आप यांनी काँग्रेसला मतदान केले नाही. आप व पीडीपीचे खासदार सभागृहातच आले नाही. वायएसआरचे दोन्ही खासदार सभागृहात उपस्थित होते, परंतु त्यांनी मतदानात भाग घेतला नाही. रालोआमधील नागा पीपल्स फ्रण्टचा एक खासदार मात्र अनुपस्थित राहिला. विरोधकांपैकी काँग्रेसचे ३ खासदार, तृणमूलचे २, समाजवादी पार्टीचे ३ आणि द्रमुकचे २ खासदार अनुपस्थित राहिले. वायएसआर, पीडीपी आणि आपच्या खासदारांनी काँग्रेसला मतदान केले असते तरीही काँग्रेस जिंकत नव्हती. जे १६ खासदार अनुपस्थित होते, त्या सर्वांनी उपस्थित राहून काँग्रेसला मतदान केले असते, तरीही काँग्रेस जिंकत नव्हती. याला कारण, बिजू जनता दलाच्या (बिजद) ९ व तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) ६ जणांनी रालोआला मतदान केले. हा १५ मतांचा फरक फार मोठा होता. भाजपाने जनता दल (यू)च्या हरिवंश नारायण सिंह यांना उमेदवारी देऊन हुशारी दाखविली. जनता दल (यू)चे नितीशकुमार भाजपावर नाराज आहेत, अशा चर्चा पसरविल्या जात होत्या. त्याला आता खीळ बसेल. तसेच नितीशकुमार यांनी स्वत: बिजदचे प्रमुख नवीन पटनायक यांच्याशी चर्चा करून त्यांची ९ मते आपल्याकडे वळविली. हरिवंश यांना उमेदवारी देऊन भाजपाने नितीशकुमार यांच्याशी आपले संबंध अधिक मजबूत केले. तसेच बिजद, टीआरएस व वायएसआर या पक्षांना विरोधी पक्षांच्या आघाडीतून अलगद बाहेर काढले. विरोधी ऐक्याला हा फार मोठा धक्का आहे. कारण बिजद ओडिशामध्ये, टीआरएस तेलंगणामध्ये आणि वायएसआर आंध्रप्रदेशात फार मजबूत स्थितीत आहेत. आंध्रप्रदेशातील सत्तारूढ तेलुगू देसम् पक्षाने रालोआशी फारकत घेतली आहे. परंतु, आता त्यालाही पश्‍चात्ताप होत असेल. तेलुगू देसम्ला रालोआतून बाहेर पडण्याचे तसे काही ठोस कारण नव्हते. परंतु, आंध्रप्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा मिळावा म्हणून. जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर पक्ष गेल्या चार वर्षांपासून आंध्रप्रदेश पिंजून काढत आहे. त्यांना लोकांचा प्रतिसादही प्रचंड प्रमाणात मिळत आहे. हे बघून तेलुगू देसम्चे धाबे दणाणले नसते तरच नवल! आणि म्हणून वायएसआरला काटशह देण्यासाठी तेलुगू देसम्ने रालोआपासून फारकत घेत, मोदी सरकारवर लोकसभेत अविश्‍वास प्रस्ताव आणला. हे इतके सविस्तर सांगण्याचे कारण म्हणजे आंध्रप्रदेशात तेलुगू देसम्चे जहाज बुडतीवर आहे. वायएसआर पक्ष मतदानात अनुपस्थित राहिला, याचा अर्थ हा पक्ष भाजपाकडे वळला आहे. काही दिवसांनी चित्र अधिक स्पष्ट होईल. तेलंगणात आणि ओडिशामध्ये तशीही भाजपाची शक्ती फार नाही. त्यामुळे तिथले सशक्त पक्ष भाजपाने आपल्या बाजूला नाही, तर महागठबंधनातून बाजूला केले आहेत. महाराष्ट्रातील शिवसेनेचेही तसेच आहे. राज्यात भाजपावर अतिशय विषारी टीका करणारा शिवसेना, शेवटी भाजपाच्याच बाजूने उभा राहिला आहे. ही व्यूहरचना फार आधीपासून तयार झाली असली पाहिजे. तशी व्यूहरचना करण्यात राहुल गांधींना अपयश आले. यातून त्यांच्यातील नेतृत्वगुणाचा अभाव समोर आला आहे. ज्या राज्यसभेत सत्तारूढ आघाडीकडे बहुमत नाही, तिथे १२५ मतेही राहुल गांधींना मिळविता आली नाहीत. आता ते १२५ कोटी जनतेची मते कशी काय मिळवू शकणार, असा प्रश्‍न विचारला जात आहे. त्यामुळे सलग ४० वर्षांनंतर उपसभापतिपदावर प्रथमच गैरकाँग्रेसी व्यक्ती निवडली जाणे, यापेक्षाही, मोदींना हरविणे तर सोडाच, पण किमान बहुमतापासून तरी दूर ठेवण्याचे काँग्रेस आणि काही विरोधी पक्षांचे स्वप्न धुळीस मिळविण्याची बीजे या निवडणुकीच्या निकालात आहेत, हे महत्त्वाचे आहे. हाच या निवडणुकीचा सर्वात मोठा आणि भारतीय राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा निष्कर्ष आहे, असे म्हणावे लागेल.

https://tarunbharat.org/?p=59541
Posted by : | on : 11 Aug 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (235 of 773 articles)


कुहीकर | स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंना या देशातल्या काँग्रेस समित्यांची पसंती नव्हतीच कधी. त्या समित्यांनी तर ...

×