रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, २५ जुलै – रामनाथ कोविंद…

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

नवी दिल्ली, २५ जुलै – मजबूत अर्थव्यवस्थेसोबतच आम्हाला समान…

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

नवी दिल्ली, २५ जुलै – वैश्‍विक किरणांच्या अभ्यासात महत्त्वाची…

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

►डोकलामवर चर्चेची दर्शवली तयारी, बीजिंग, २५ जुलै – सिक्कीम…

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

►भारताने चूक सुधारावी, चीनची दर्पोक्ती, बीजिंग, २४ जुलै –…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

►शेतकर्‍यांना सुखी ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील ►आमदार डॉ. बोंडेंनी मांडला…

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

►२ आठवड्याची न्यायालयीन कोठडी, सातारा, दि. २५ जुलै –…

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

►३३ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, मुंबई, २४ जुलै…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:05 | सूर्यास्त: 19:00
अयनांश:
Home » उपलेख, रविंद्र दाणी, संपादकीय, स्तंभलेखक » हर हर मोदी, घर घर मोदी!

हर हर मोदी, घर घर मोदी!

दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी |

८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजाराच्या चलनी नोटा रद्द करण्याचा निर्णय घोषित केला तेव्हा त्याचा सर्वाधिक आनंद, मागील सात वर्षांपासून तुरुंगात खितपत पडलेल्या लेफ्ट. कर्नल पुरोहित यांना झाला असावा. लेफ्ट. कर्नल पुरोहितवर मालेगाव बॉम्बस्फोट, समझौता एक्सप्रेस स्फोट, आरडीएक्ससारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले असले तरी ते खरे नाहीत. लष्कराच्या कोर्ट ऑफ इनक्वायरीमध्येे बहुतेक आरोपात पुरोहित यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. पुरोहितला अडकविण्यात आले ते वेगळ्याच कारणाखाली. पुरोहित यांनी आपल्या वरिष्ठांकडे, बनावट चलनी नोटांबाबत काही अहवाल सादर केले होते. त्यात आयएसआयचा सहभाग हा एक मुद्दा तर होताच, शिवाय देशातील काही राजकीय नेत्यांचाही त्यात उल्लेख होता. पुरोहित यांनी त्या अहवालात एक मोठी चूक केली. त्यांनी आपल्या अहवालात या नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला. हे नेते एवढे प्रभावशाली होते की, त्यांनी सरळ पुरोहितला देशद्रोही ठरवून टाकले! त्या चुकीची शिक्षा पुरोहित मागील सात वर्षांपासून भोगत आहेत.
वार आणि मार
मोदींच्या या निर्णयाने आयएसआय, काश्मिरी फुटीरवादी यांचे कंबरडे मोडले गेले आहे. मोदींनी वार आयएसआयवर केला, तर त्यांच्या निर्णयाचा मार देशातील काही नेत्यांना-व्यापार्‍यांना बसला आहे. मुलायमसिंह-मायावती-केजरीवाल हे सारे नेते मोदींच्या निर्णयावर तुटून पडले आहेत. कारण, मोदींच्या निर्णयाने या नेत्यांना कंगाल करून टाकले आहे. विशेषत: उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना या नेत्यांनी एका रात्रीतून कंगाल होणे त्यांच्यासाठी केवढा मोठा धक्का आहे, याची कल्पनाच केलेली बरी!
पाकिस्तानला तडाखा
पाचशे व हजाराच्या नोटा काश्मीरमधील फुटीरवाद्यांच्या हातातील एक मोठे हत्यार होत्या. सीमेपलीकडून नोटांनी भरलेली पोती येत. यात फुटीरतावादी नेते, राजकीय नेते, पोलिस अधिकारी सारे सामील असत. या नोटा युवकांच्या हाती दिल्या जात आणि त्याच हाताने हे युवक हाती दगड घेत. हा सारा खेळ अनेक वर्षांपासून काश्मीर खोर्‍यात खेळला जात होता. बनावट नोटा किती वापरल्या जात असत, याचा एक किस्सा सांगितला जात होता. पाकव्याप्त काश्मीरमध्ये एका दुकानावर धाड घातली जाते. अधिकारी दुकानदाराला म्हणतो, मला मोठी रक्कम हवी. दुकानदार आतील कक्षात जातो. कोणतीही घासघीस न करता तेवढी रक्कम अधिकार्‍याला देतो. अधिकार्‍याला वाटते, आपण कमी रक्कम मागितली. तो त्या दुकानदाराकडे अधिक रकमेची मागणी करतो. दुकानदार पुन्हा आतील कक्षात जातो. कुरकूर न करता तेवढी रक्कम बाहेर घेऊन येतो. असे दोन-तीन वेळा झाल्यावर या अधिकार्‍याला वाटते, या दुकानदाराजवळ रोख रक्कम आहे तरी किती? हे पाहण्यासाठी तो आतील कक्षात डोकावतो. आतील दृश्य पाहून त्याचे डोळे विस्फारतात. तेथे चक्क नोटांची छपाईच सुरू असते! नोटांचा हा कारखाना आय.एस.आय. चालवीत असते आणि त्यात भारतीय नोटा छापल्या जात असतात. हा एक किस्सा असला, तरी त्यात जराही अतिशयोक्ती नाही.
पाचशे आणि हजार!
काश्मिरी युवकाला आज नोकरीची गरजच भासत नाही. दिवसभर मेहनत करून हजार-पाचशे रुपये कमविण्याची गरज नाही. तास-दोन तास दगडफेक केली की तेवढे पैसे मिळतात. दररोज पाचशेची नोट आणि शुक्रवारी हजाराची नोट! शिवाय आझादीचे युद्ध लढल्याचे समाधान मिळते ते वेगळेच! कुटुंबात नोकरी एकाला मिळते. दगडफेकीत तर सारे कुटुंब सामील होऊ शकते- महिला, बालक, वृद्ध- सारे! म्हणजे एका कुटुंबाला दगडफेकीच्या कामात दररोज दोन, तीन, चार हजार रुपये मिळतात. काश्मिरी नेते तर पैशात लोळत आहेत. त्यांना पैशाची कोणतीही कमतरता नाही आणि हे पैसे आणण्यासाठी आयएसआयला काहीच करावे लागत नाही. फक्त एक छापखाना टाकावा लागतो. तो त्यांनी टाकला आहे. आयएसआय काश्मीर खोरे बंद करण्यासाठी पैसे ओतत असते, तर भारताची गुप्तचर एजन्सी रॉ, खोरे सुरू करण्यासाठी पैसे ओतत असते. मोदी सरकार आल्यापासून भारताकडून हुरियत नेत्यांना मिळणारा पैसा बंद झाला. याचा हुरियत नेत्यांवर कोणताही परिणाम झाला नाही. कारण, आयएसआयकडून अधिक पुरवठा सुरू झाला. यासाठी आयएसआयला काय करावे लागले? फक्त अधिक छपाई करावी लागली. मोदींच्या या निर्णयाने त्याला लगाम बसला आहे.
गडबडीचा स्रोत
भारताच्या रिझर्व्ह बँकेकडून छापल्या जाणार्‍या या नोटांमध्ये कोणतीही गडबड नव्हती. मग तरीही आएसआयला भारतीय नोटांशी अगदी मिळत्याजुळत्या नोटा छापणे कसे शक्य होत होते? भारताच्या नोटा परदेशी कंपन्यांकडून आयात केलेल्या एका वेगळ्या प्रकारच्या कापडावर छापल्या जातात. ज्याला नोटांचा कागद म्हटले जाते, तो कागद नसून ते एक प्रकारचे कापड असते. जगात असे कापड पुरविणार्‍या दोनच कंपन्या आहेत. भारत ज्या कंपन्यांकडून कागद घेत होता, तेथूनच आएसआयला कागद मिळत असावा, असे मानले जाते. अन्यथा रिझर्व्ह बँक व आयएसआय यांच्या नोटांमध्ये एवढे साम्य कसे राहणार? नव्या नोटा भारतीय कागदावर छापल्या जात आहेत, त्यात नव्या सुरक्षा मानकांचा समावेश करण्यात आला आहे. याची नक्कल करणे पाकिस्तानला फार जड जाणार आहे आणि पाकिस्तानने नक्कल करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यासाठी वापरले जाणारे कापड भारतीय बनावटीचे राहणार असल्याने पाकिस्तानला पूर्वीसारखा नोटांचा पाऊस काश्मीर खोर्‍यात व भारतातही पाडता येणार नाही.
१० महिन्यांची तयारी
मोदी यांनी याची तयारी १० महिन्यांपासून सुरू केली होती. नव्या नोटा छापल्या जाणे, ही तर सामान्य बाब होती. मात्र, एक असामान्य निर्णय घेतला जाणार आहे, याची कल्पना फक्त पंतप्रधानांना होती. कारण, निर्णय फक्त तेच घेणार होते. ८ नोव्हेंबरला असा निर्णय घेतला जाईपर्यंत याचा सुगावाही त्यांनी कुणाला लागू दिला नाही!
फायदा होणार
मोदी यांच्या या निर्णयाचा देशाला फार मोठा फायदा होणार आहे. पहिला फायदा म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या घरी जी काही लहानमोठी रक्कम असते ती बँकेत जमा होणार. जो काळा पैसा बँकेत जमा होणार नाही, तेवढी रक्कम अर्थव्यवस्थेतून आपोआप बाद होणार. म्हणजेच भारतीय चलनाची किंमत वधारणार. अर्थव्यवस्थेतून बाद होणारी ही रक्कम किती असेल, हे जानेवारीत स्पष्ट होईल. ती काही लाख कोटींच्या घरात राहण्याची शक्यता आहे. शरीर शुद्धीकरणासाठी ज्या प्रमाणे शरीरातील अशुद्ध भाग बाहेर जाणे आवश्यक असते, तोच नियम अर्थव्यवस्थेलाही लागू होतो. मोदींच्या निर्णयाने काळा पैसा आपोआप बाहेर टाकला जाणार आहे. तो १०० टक्के टाकला जाणार नसला, तरी बर्‍याच प्रमाणात अर्थव्यस्थेचे शुद्धीकरण या निर्णयाने होणार आहे.
हर हर मोदी
मोदींच्या या निर्णयाला काही मूठभर राजकारणी सोडून जनतेचा जबर पाठिंबा मिळत आहे. ज्यांना नोटा बदलविण्यासाठी त्रास होत आहे, रांगा लावाव्या लागत आहेत, तेही या निर्णयाचे समर्थन करीत आहेत. मोदींच्या या निर्णयाचा काहींना आर्थिक फटका बसला, तेही याचे समर्थन करीत आहेत. आमचे काही लाख गेले, ठीक आहे देशासाठी गेले, असे आम्ही समजू, अशा प्रतिक्रिया समोर आहेत. सामान्य नागरिक आनंदी आहे. साधा न्हावी, धोबी, रिक्षावाला प्रत्येकाला मोदींचा निर्णय मनापासून आवडला आहे. एका सामान्य नागरिकाची प्रतिक्रिया आहे- हर हर मोदी, घर घर मोदी! प्रत्येक घरात मोदींची चर्चा आणि प्रत्येक घरात मोदींच्या निर्णयाचे स्वागत!

शेअर करा

Posted by on Nov 14 2016. Filed under उपलेख, रविंद्र दाणी, संपादकीय, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उपलेख, रविंद्र दाणी, संपादकीय, स्तंभलेखक (891 of 972 articles)


वेधक : शेफाली वैद्य | ८ नोव्हेंबर २०१६ ही तारीख भारतीयांच्या सदैव लक्षात राहील. काल रात्री आठ वाजता देशाला उद्देशून ...