ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » हा बदल, दुरुस्ती नव्हे!

हा बदल, दुरुस्ती नव्हे!

अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडीच्या निमित्ताने दरवर्षी मराठीविश्‍वात हालचाल निर्माण होते. एरवी सारेच कसे- ‘सारेच कसे सामसूम, तरंग नाही तलावात,’ असे असते. संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक आणि आता झालेली निवड, या प्रक्रियेत विवेकाचा भाग किती, यावर चर्चा करण्याआधी संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आलेल्या- विलक्षण अभ्यासाचा वारसा लाभलेल्या, कविमनाच्या, रसाळ व्याख्यात्या आणि सामाजाचं सृजनात्मक पालकत्व स्वीकारल्याच्या भावनेतून वागणार्‍या नम्र विचारवंत अरुणाताई ढेरे यांचं अभिनंदन आणि त्यांची निवड करणार्‍यांना दाद देऊनच आपण समोर सरकलो पाहिजे. संमेलनाध्यपदासाठी आतावर निवडणूक घेण्यात यायची. त्यावरून गेली दोन दशके वाद आणि वादंग व्हायचे. संमेलनाध्यक्षपदी निवडून येणार्‍यांच्या एकुणातच वाङ्मयीन लायकीच्या संदर्भात तर ही चर्चा असायचीच; पण निवडणूक म्हटली की राजकारण आलेच. आता अरुणाताईंनी त्याला ‘वाङ्मयीन राजकारण’ अशी छानशी संज्ञा दिली असली, तरीही सारस्वताच्या प्रांतात रंगणारे हे राजकारण; ‘राजकारण’ म्हणून ख्यात असलेल्या देशीय राजकारणापेक्षाही घाणेरडे असते, अशी लोकचर्चा होती. त्यातली तथ्यं पाण्यात पडलेल्या शेवाळासारखी घाणीसारखी उजागर व्हायचीच आणि त्यामुळे मूळ स्वच्छ प्रवाह झाकला जायचा. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणूकप्रक्रियेवर या आधीही बरंच बोललं गेलं आहे. अर्थात, अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या घटनेच्या चौकटीतच ही निवडणूक होत होती. त्या प्रक्रियेत बदल करायला हवा, अशी मागणीही होत होती. बदल सुचविलेही जात होते. घेण्यात येणार्‍या आक्षेपात दम होताच. एकतर संमेलनाध्यक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहण्यासाठी वाङ्मयीन अर्हता ठरलेली नव्हती. त्या व्यक्तीचे किमान शिक्षण, त्याने केलेली साहित्यसेवा वगैरे असे काहीच ठरलेले नव्हते. महामंडळाच्या चार घटक संस्थांपैकी एका घटक संस्थेची ती व्यक्ती सदस्य असायला हवी आणि तिच्या अर्जावर दोन सदस्यांच्या अनुमोदक म्हणून सह्या हव्यात, इतकेच होते. मतदारांची संख्याही निर्धारित होती. आपल्या अफाट सदस्यांपैकी कोण मतदार असतील, हे घटक संस्थेचे अध्यक्ष ठरवायचे. या सार्‍या प्रक्रियेत पारदर्शकता नव्हती आणि त्यातून निर्माण होणार्‍या असंख्य प्रामाणिक प्रश्‍नांना उत्तरेही नीट मिळत नव्हती. मतपत्रिका पोस्टाने पाठविल्या जायच्या. त्या महामंडळाचे कार्यालय असलेल्या घटक संस्थेच्या कार्यालयांत गोळा व्हायच्या, या दरम्यान त्या बदलल्या जातात/ गेल्या, असे आक्षेपही घेतले गेले आहेत. घटक संस्थेचे संस्थानिक आपल्या मतदारांना कोर्‍या मतपत्रिका मागतात किंवा त्यांना हव्या त्याच उमेदवाराला मतदान करून तशाच मतपत्रिका महामंडळाकडे पोहोचवितात, असाही एक आक्षेप सातत्याने घेतला जात होता. विदर्भ साहित्य संघाकडे महामंडळाचे कार्यालय आल्यावर श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याकडे महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी सुरुवातीपासूनच बदलांचे सूतोवाच केले. खर्चीक होत जाणारी संमेलने आणि दलदलीत फसत चाललेली संमेलनाध्यक्षांची निवड, या दोन मुद्यांवर श्रीपाद जोशी यांनी गेल्या तीन वर्षांत काम केले. संमेलनासाठी निधी जमविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे संमेलने पुन्हा स्वागताध्यक्षाच्या दावणीलाच बांधलेल्या अवस्थेत असतील. मात्र, निवडणुकीऐवजी निवड हा बदल त्यांनी घडवून आणला. अर्थात, हा बदल आहे, दुरुस्ती म्हणावे काय, हे काळच ठरवेल. महामंडळाच्या चार घटक संस्था आणि बृृहन्महाराष्ट्रातील संलग्न संस्थांनी एकूण २० नावे सुचवायची आणि महामंडळाच्या २० सदस्यांनी त्यातील एकाची निवड करायची, असे एकुणात या बदलाचे ढोबळ स्वरूप आहे. त्यातून येत्या साहित्य संमेलनासाठी अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली. एका योग्य व्यक्तीची ही निवड आहे. त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. योग्यतेचे निकषच बदलले, हे खरे आहे. याआधी आयोजन समितीला हवा असलेला अन् महामंडळाचे कार्यालय ज्या घटक संस्थेकडे आहे त्यांना हवी असलेलीच व्यक्ती संमेलनाध्यक्ष व्हावी, यासाठी आटापिटा केला जायचा. मात्र, या निवडीने तो विषय बाजूला पडला. एरवी अरुणा ढेरेदेखील निवडणुकीच्या वाट्याला गेल्या नसत्या. ज्यांनी संमेलनाध्यक्ष असावे, अशी मंडळी निवडणुकीच्या राजकारणामुळे त्या वाटेला जात नसत. अशांपैकी अनेकांची नावे विचार करण्यात आलेल्या २० नावांत होती. काहींनी याआधी निवडणूक लढविली होती आणि काही साहित्यिक निवडणूक लढले असते असेही होते. मात्र, निवडप्रक्रियेने निवडणुकीचा खर्च आणि साहित्यविश्‍वाबद्दलचा आदर कमी करणार्‍या चर्चांना फाटा दिला गेला, हे महत्त्वाचे. महत्त्वाकांक्षी अयोग्य व्यक्तींच्या रिंगणात उतरण्याने ही प्रक्रिया अधिक गढूळ आणि खर्चीक होऊ लागली होती. त्यात राजकीय पक्षांच्या पुढार्‍यांचे आशीर्वादही महत्त्वाचे ठरू लागले होते. निवडणूक ही लोकशाहीप्रक्रिया आहे हे खरेच असले, तरीही त्यात लोकशाहीच्या पडद्याआड घराणेशाही आणि सामंतशाही प्रभावी ठरत असते, हा सार्वत्रिक अनुभव साहित्याच्या प्रांतातही येऊ लागला होता. निवडप्रक्रियेने त्याचा प्रभाव किमान पहिल्या वर्षाततरी कमी जाणवला. संमेलनाध्यक्ष आता निकोपपणे आपली मते मांडू शकतील काय? संमेलन स्वतंत्र अभिव्यक्तीचे, वैचारिक स्वायत्तता असलेली असतील काय? आर्थिक स्वावलंबन येत नाही तोवर हे शक्य नाही… निवडप्रक्रियेतही काही त्रुटी आहेत आणि असतीलही. मात्र, हा बदल स्वीकारार्ह नक्कीच आहे. येत्या काळात त्यातल्या त्रुटी दूर करता येतील. नव्या पळवाटा येऊ नयेत, यासाठी महामंडळ म्हणून सार्‍यांनी एकत्रपणे काम करावे लागेल. आता मराठवाडा साहित्य परिषद विदर्भाच्या विरोधातच वागायचे असते, अशाच आविर्भावात वागत असते. योग्य व्यक्तींची विवेकपूर्ण निवड, ही संज्ञाच खूप निसरडी आहे. योग्य व्यक्तीचे निकष बदलत जाणारे आहेत आणि विवेकाची भावनाही लवचीकच असते. माझे नाव सुचवा, यासाठी कुणी खेळ्या नाही करणार अन् आपल्याला हव्या त्याच व्यक्तींची नावे सुचविण्याचा खेळ संस्थानिक करणार नाहीत, असे नाही. घटक संस्थांचे कर्ते हे संस्थानिकच असतात, असा अनुभव आहे. आता त्यांचे अधिकार अधिकच वाढणार आहेत. संमेलनाध्यक्षपदासाठी कुणाचे नाव सुचवायचे, हे त्यांच्या हातात असणार आहे. त्यांना हवा तो किंवा त्यांचे लांगूलचालन करणारा साहित्यिक ‘योग्य,’ असेही निकष यापुढे रूढ होऊ शकतात; नव्हे, तसेच होण्याची दाट शक्यता आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून नाव सुचविताना संबंधित व्यक्तीला विचारले जात नाही काय? नवनियुक्त अध्यक्षांना त्यांच्या निवडीबद्दल सांगितल्यावर त्यांनी चटकन होकार दिला नाही. नाव सुचविले गेले हे माहिती असताना आपलीही निवड होऊ शकते, हे स्वीकारले गेले आहे, असा त्याचा अर्थ होत नाही काय? ना. धों. महानोरांनी नावही सुचवू नका, असे सांगून टाकले होते. तसा थेट पवित्रा हवा… तरीही ‘निवडणूक ते निवड’ या नव्या बदलासह आता संमेलनाच्या स्वरूपातही बदल व्हावा. संमेलनाची वैचारिक श्रीमंती वाढावी आणि आर्थिक सूज उतरावी, इतकीच अपेक्षा!

https://tarunbharat.org/?p=66722
Posted by : | on : 30 Oct 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (272 of 843 articles)


जोशी | सध्याच्या इन्स्टंट आणि ‘रेडी टू कूक’च्या जमान्यात प्रक्रियायुक्त पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. साहजिकच या क्षेत्रात आर्थिक ...

×