ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » हिंदुत्ववादी कायमच फासावर!

हिंदुत्ववादी कायमच फासावर!

या देशात एक वैचारिक दहशतवाद सतत थैमान घालतो आहे. काहीही घडले की, कायम हिंदुत्ववादी संघटनांच्या नावाने कंठशोष करत, त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी करत, या देशातील तमाम तथाकथित पुरोगामी, डावी मंडळी सतत वैचारिक पोलिसगिरी करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. कोणत्याही कारणाने, कोणीही कोणाचीही हत्या केली की, या लोकांना जणू हिंदुत्वाच्या नावाने शिमगा करण्याची संधीच मिळते. त्यातही अशा घटनांमध्ये ज्याची हत्या झाली तो जर अल्पसंख्यक असेल, तो जर यांच्याच पद्धतीचा कथित पुरोगामी किंवा डाव्या विचारांचा असेल, तर मग चौकशी अजून सुरू होण्याआधीच ही मंडळी स्वत:च न्यायाधीश होतात आणि हिंदुत्चाच्या विचारधारेत काम करणार्‍या सर्वांना काल्पनिक रीत्या फासावर चढवून मोकळे होतात! इतरांवर अस्पृश्यता पाळणारे, असा आरोप करायचा, इतरांना दहशतवादी म्हणायचे, इतरांना फॅसिस्ट असल्याची शिवी द्यायची, मात्र हे सगळे व्यवहार आपण अगदी बिनबोभाट करायचे, असा यांचा खाक्या दिसतो आहे. या लोकांच्या अशा मनमानीची, स्वयंघोषित पोलिसगिरीची जरा झाडाझडती घेतलीच पाहिजे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करणारे नरेन्द्र दाभोळकर यांची हत्या झाली. त्यानंतर कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या झाली. त्यानंतर कर्नाटकात कलबुर्गी व गौरी लंकेश या विचारवंतांची हत्या झाली. या प्रत्येक घटनेत अजून पोलिसांच्या डायरीला गुन्ह्याची नोंद होऊन तपास सुरू होण्याच्या आधीच, या तथाकथित पुरोगाम्यांनी आपला वैचारिक दहशतवाद कामाला लावला होता. लगेच या घटनेबाबत आरोप करायला सुरुवात झाली होती. तातडीने सनातन संघटनेवर बंदी घालण्याची भाषा सुरू झाली. केवळ सनातनच नाही, तर त्या बरोबरीने बजरंग दल, दुर्गावाहिनी, शिवप्रतिष्ठान यांनाही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा यांचा आटापिटा चालू झाला होता. केवळ प्रसिद्धीच्या बळावर ओरड करणारी ही मंडळी असल्याने, माध्यमांचा उपयोग करून लोकांसमोर या सर्वच हिंदुत्ववादी संघटनांची यथेच्छ बदनामी करण्याचा आपला नेहमीचा कंड शमविण्याला सुरुवात झाली होती. आज प्रत्यक्षात यांचा आवाज येत नसला, तरी आतून त्यांच्या हिंदुत्वविरोधी कारवाया सुरूच असतात. उत्तरप्रदेशमध्ये दादरी येथे गोमांस खाल्ल्याची अफवा उठल्यामुळे मारहाण झाली आणि एकाचा मृत्यू झाला होता. लगेच ही हत्यापण हिंदुत्ववादी संघटनांनी नियोजनपूर्वक केल्याचा शोध, तपास सुरू होण्याच्या आधीच लावत गदारोळ माजवला गेला होता. आझम खान महाशय तर थेट संयुक्त राष्ट्रसंघात ‘इस्लाम खतरे में है’ ची बांग द्यायला निघाले होते! ज्या उत्तरप्रदेशात ही घटना घडली होती, तेथे या आझम खान महाशयांच्या पक्षाचे सरकार होते. तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी यांच्या पक्षाची होती. उत्तरप्रदेशात अल्पसंख्यकांचे रक्षण करण्यात अपयशी झालेले हे महाशय, हत्येचे खापर मात्र हिंदुत्ववाद्यांवर फोडत संयुक्त राष्ट्रसंघात निघाले होते. खरेतर तेव्हाच आझम खान महाशयांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवायला पाहिजे होते. तेथे पाकिस्तानातील मंडळी कशी काश्मिरींवर अन्याय-अत्याचार करत आहेत, सुन्नी शियांवर अत्याचार करत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील मुस्लिम रस्त्यावर येऊन सत्याग्रह करून सांगू लागले आहेत की, आम्हाला पाकिस्तानात नाही, तर हिंदुस्थानात जायचे आहे. पाकिस्तानात त्यांना श्‍वास घेण्याचेही स्वातंत्र्य नाही, हे त्यांना कळले असते. आझम खान महाशयांना हे माहिती नव्हतेच असे नाही, पण त्यांनी काहीही खुट्ट वाजले की हिंदुत्चवाद्यांना शिव्या घालण्याचा विडा उचलला होता. आताही ते तसेच वागत आहेत. तसे पाहिले तर उत्तरप्रदेशात त्यांचे राज्य होते व तसे असतानाही मुस्लिमाची हत्या कशी झाली, याचा जाब उत्तरप्रदेशातील मुस्लिम समुदाय त्यांना निवडणुकीत विचारेल, म्हणून आधीच हिंदुत्चवादी संघटनांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत, त्यांना उत्तरप्रदेशातील मुस्लिम मतांच्या पोळ्या भाजण्यासाठी दादरीची धग वापरायची होती. पण, झाले उलटेच! मतदारांनी आझमसारख्यांना आपटी दिली आणि योगींच्या नेतृत्वात भाजपाचे, पर्यायाने हिंदुत्ववादी विचारसरणीचे सरकार सत्तारूढ झाले. कोणीही काहीही अप्रिय घडविले की, त्याचे खापर हिंदुत्ववाद्यांच्याच माथ्यावर फोडायचे. याच्या उलटे घडले की, मात्र मरणार्‍यांनाच आरोपी करायचे आणि मारणार्‍यांचा कैवार घ्यायचा, असला यांचा सापेक्ष मानवतावाद आहे. यांच्या सोयीचे ते मानवतावादी, यांच्या सोयीने हे दहशतवादी ठरवणार. आमचे मत स्पष्ट आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश आणि दादरीचा तो अखलाख अहमद यांच्या हत्या अत्यंत निषेधार्ह आहेत. या सर्व हत्याकांडाचा कसून तपास होत, जे खरे आरोपी आहेत त्यांना सर्वात कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे, यात दुमत नाहीच. मात्र, इथे काहीही सिद्ध होण्याआधी स्वत:च न्यायाधीश बनून शिक्षा देण्याचा जो नाद केला जात आहे तो थांबला पाहिजे. दाभोळकरांची हत्या झाली आणि अजून पोलिस घटनास्थळी पोहोचून तपास सुरू करत असतानाच, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान केले होते की, महात्मा गांधींची हत्या करणार्‍या शक्तीच या हत्येमागे आहेत. दादरीच्या घटनेत सगळी तपासयंत्रणा, रक्षणाची जबाबदारी असलेल्या सरकारमधील मंत्री तपास पुढे जाण्याआधीच संयुक्त राष्ट्रसंघात शिमगा करण्याचा दम देत होता. याच्या उलट, ज्या गांधीहत्येच्या घटनेत न्यायालयीन चौकशी झाली, त्या चौकशीने समाधान झाले नाही म्हणून कपूर कमिशन नेमून चौकशी करण्यात आली होती. मात्र, त्या चौकशांमध्ये या घटनेशी रा. स्व. संघाचा दूरान्वयानेही काही संबंध आहे, असे सिद्ध झाले नाही. तरी अजून मंडळी गांधीहत्येच्या प्रकरणाने आपले हात काळे करत ते काळे संघाला लावण्याचा आटोकाट प्रयत्न करतच असतात. गोध्राच्या घटनेत दोन डब्यांना जाळ लावून पाऊणशे माणसांना जिवंत जाळण्याचे कारस्थान अगदी पूर्वनियोजितपणे केले जाते, त्याबद्दल निषेधाचे एक अवाक्षर ही मंडळी काढत नाहीत. उलट, तेव्हाचे रेल्वेमंत्री लालूप्रसाद बनावट अहवाल प्रसिद्ध करायला लावतात की, ती आग म्हणे बाहेरून नव्हे तर आतूनच लागली होती! दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश आणि अखलाख यांच्या हत्येमागे जे कोणी आरोपी असतील ते कोणत्याही संघटनेचे असोत की कोणत्याही विचारांचे असोत, त्यांना कसलीही दयामाया न दाखवता, गतीने खटला चालवून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मात्र, कसलाही पुरावा नसताना, तपास अजून सुरू होत असताना या घटनांचे भांडवल करत हिंदुत्ववादी संघटनांवर सरसकट बंदी घालण्याची मागणी करणे, हा वैचारिक द्वेषाचा सवंग प्रकार होय!

https://tarunbharat.org/?p=65383
Posted by : | on : 10 Oct 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (257 of 791 articles)


पेठकर | नाना पाटेकर, रजत कपूर, आलोकनाथ, कैलाश खेर, विकास बहल, माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील, गौरांग दोशी, चेतन भगत, गेल्या काही ...

×