ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » हिंदुत्वाला शिव्या घालण्याचे पाप करू नका!

हिंदुत्वाला शिव्या घालण्याचे पाप करू नका!

देशातील तमाम ढोंग्यांनी सध्या हिंदू धर्माला बदनाम करण्याची मोहीमच जणू आरंभली आहे. काहीही झाले की, हिंदुत्ववाद्यांना जबाबदार धरून ठोकून काढायचे, ही सवय असल्यागत हे ढोंगी वागत आहेत. एखाद्या मुस्लिम व्यक्तीला देशाच्या कुठल्याही भागात मारहाण झाली आणि मारहाण करणारे हिंदू असले, की यांना आयतीच संधी चालून येते. पण, ही मारहाण कोणत्या कारणावरून झाली आहे, ज्याला मारले आहे, त्या व्यक्तीचा गुन्हा काय आहे, ही मारहाण खरोखरीच हिंदू-मुस्लिम अशा भेदभावातून झाली आहे काय, हे जाणून न घेता दोषी असलेल्या मुस्लिम व्यक्तीची बाजू घेत संपूर्ण हिंदू समाजाला, विशेषत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याची मोहीम जाणीवपूर्वक राबविली जाते. याउलट, देशाच्या विविध भागात अनेक हिंदूंवर अत्याचार होत असताना, त्याबाबत हे ढोंगी चकार शब्दही काढत नाहीत. वास्तविक, हिंदू-मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने राहात आहेत. आपसात एखाद्या कारणावरून काही मतभेद झालेत आणि त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले, तर सरसकट हिंदूंना दोषी ठरवून मुस्लिमांचीच बाजू घेत अशा हिंसाचाराला धार्मिक रंग दिला जातो. पण, असे करून आपण समाजाचे आणि देशाचे मोठे नुकसान करीत आहोत, याचा विसर या मंडळींना पडलेला असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही खरेतर सांस्कृतिक राष्ट्रवाद जोपासणारी संघटना आहे. हिंदू ही जीवनशैली आहे, असे एकदा नव्हे, अनेकदा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतरही हिंदुत्वाबाबत बोलणार्‍याला सरसकट जातीयवादी ठरविले जाते. हिंदुत्व हे अतिशय व्यापक आहे. सर्वसमावेशक आहे. प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या धर्मानुसार आचरण करावे, असे मानणारे फक्त हिंदुत्वच आहे! असे असतानाही हिंदुत्वाची भाषा बोलणार्‍यांना लक्ष्य करून सतावले जाते, हे या देशाचे दुर्दैवच म्हटले पाहिजे. अहिंसा, सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव, वसुधैव कुटुंबकम् असे जे शब्द आहेत, ते स्वाभाविकपणेच हिंदुत्वाशी जोडले जातात. हिंदू धर्माचे जे खरे अनुयायी आहेत, त्यांनी हे सगळे शब्द हिंदुत्वाचा पर्याय म्हणूनच स्वीकारले आहेत. हे शब्द आपल्या आचरणात आणले म्हणजे खर्‍या अर्थाने आपण हिंदुत्व जगलो, असे मानणार्‍यांची संख्या कमी नाही. पण, काही करंट्या हिंदूंनीच हिंदुत्व बदनाम करण्याचा विडा उचलला असल्याने खरे संकट हे इतर धर्मियांकडून नव्हे, तर हिंदूंमधीलच ढोंग्यांकडून आहे, हे ओळखले पाहिजे. जे विदेशी नागरिक आहेत, जे हिंदुत्वाबाबत काही थोडेसेही जाणतात, त्यांनाही या शब्दांची महत्ता माहिती आहे आणि हिंदुत्व कसे व्यापक आहे, हेही माहिती आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’सारखी जी हिंदू धर्माची विशेषता आहे, त्याबाबतही विदेशी नागरिक जाणून आहेत. असे असताना आपल्याच देशातील हिंदू बांधव, आपल्या देशातील प्रसारमाध्यमे जेव्हा हिंदू कट्टरवाद, हिंदू आतंकवाद असे शब्द प्रचारात आणतात, तेव्हा वाईटही वाटते आणि वेदनाही होतात. खर्‍या हिंदूचे रक्त खवळते. पण, त्याच्यातली सहिष्णुता त्याला पुन:पुन्हा शांत करीत असते. हिंदुत्वाबाबत जेव्हा अशी विशेषणं वापरली जातात, तेव्हा महात्मा गांधी यांच्या विचारांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. महात्मा गांधी यांनी १९२७ साली एका अमेरिकी नागरिकाला एक लांबलचक पत्र लिहिले होते- ‘‘मी जगातल्या सगळ्या धर्मांचा अभ्यास केला आहे. हिंदू धर्मात मला सर्वाधिक सहिष्णुता आढळून आली. हिंदुत्वात मला कुठेही सैद्धांतिक कट्टरता आढळून आली नाही. नेमकी हीच बाब मला हिंदू धर्माकडे जास्त आकर्षित करते. हिंदुत्वात कुठेही सैद्धांतिक कट्टरता नसल्यानेच हिंदू धर्मानुयायाला आत्माभिव्यक्तीचे सर्वाधिक स्वातंत्र्य लाभते, असे माझे स्पष्ट मत आहे.’’ असे गांधीजींनी त्या पत्रात नमूद केले होते. आपल्या देशातील जे लोक कायम गांधींजीच्या नावाचा उदो उदो करीत असतात, त्यांचा गांधीजींच्या या पत्रावर तरी विश्‍वास आहे काय? त्यांनी गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा एकतर प्रामाणिकपणे अवलंब करावा वा गांधींच्या विचारांचा त्याग तरी करावा. कुणी म्हणेल ही टोकाची भूमिका झाली. पण, हरकत नाही. तत्त्वांसाठी टोकाची भूमिका घेण्यातही गैर काहीच नाही. गांधींना हिंदुत्वाबाबत काय वाटत होते, हे जाणूनच घ्यायचे नाही असे ज्यांनी ठरविले आहे, त्यांच्याबाबत काही बोलण्यातही अर्थ नाही. एकीकडे गांधी तत्त्वज्ञानाचा प्रचार-प्रसार करायचा आणि दुसरीकडे त्यांचे विचार सोईस्कर रीत्या अमान्य करायचे, हे तर शुद्ध ढोंग आहे. हिंदू धर्मियांना कुणाबद्दलही आकस असण्याचे कारण नाही. हिंदू हा सर्वसमावेशी असल्याने त्याला अन्य धर्माबद्दलही नितान्त आदर आहे, असतो. अन्य धर्मातील चांगल्या गोष्टींचे आचरण करताना सच्चा हिंदूला कधीही संकोच वाटत नाही. मुस्लिमांनी त्यांच्या धर्मानुसार, ख्रिश्‍चनांनी त्यांच्या धर्मानुसार आचरण केल्यास कोणताही हिंदू त्याला कधीच आक्षेप घेत नाही. कुणी कोणत्या ईश्‍वराची उपासना करावी, हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे, त्यासंदर्भात कोणताही हिंदू कधीच कुणाला जबरदस्ती करीत नाही वा आपले मतही त्याच्यावर लादत नाही. हिंदूंकडून कुणाचेही कधीच जबरदस्तीने धर्मांतरणही केले जात नाही. असे असतानाही हिंदुत्व का बदनाम केले जाते आहे, याचा प्रत्येक हिंदूने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. मध्यंतरी दाभोळकर हत्याप्रकरणी काही लोकांना अटक करण्यात आली. लागलीच हिंदुत्ववाद्यांना झोडपणे सुरू झाले. जगात जेवढे अतिरेकी आहेत, ते सगळे मुस्लिम आहेत हे सत्य आहे. सगळे मुस्लिम अतिरेकी आहेत, असे कुणीच कधी म्हटलेले नाही. भारतात ज्या हिंदू दहशतवादाची निरर्थक चर्चा केली जाते, तसा दहशतवाद जगाच्या पाठीवर कुठे अस्तित्वात तरी आहे काय? जगातल्या कुठल्याही देशात जाऊन एखाद्या हिंदूने उत्पात माजवल्याचे एकतरी उदाहरण आहे काय? याउलट, जगात जिथे कुठे आत्मघाती हल्ले झाले, त्या सगळ्यांमध्ये फक्त मुस्लिम दहशतवादीच सामील होते, हे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही कुठलाही हिंदू कधीच सगळ्या मुस्लिम बांधवांना दोष देत नाही, सरसकट जबाबदार धरत नाही. हे हिंदुत्वाचे औदार्य नाही तर दुसरे काय आहे? हिंदू जीवनशैली आचरणात आणणारा कुणीही कधीच अन्य धर्माच्या व्यक्तीचा द्वेष करीत नाही, त्याला इजा पोहोचविण्याचा विचारही करू शकत नाही. अहिंसा सगळ्याच धर्मांमध्ये आहे. पण, हिंदू धर्मामध्ये याचा प्रयोग सगळ्यात जास्त झाला आहे. अहिंसा हिंदू धर्मात स्पष्टपणे अभिव्यक्त झाली आहे, हे नाकारून कसे चालेल? माणसाने माणसाशी माणसासारखा व्यवहार करावा, याची शिकवण तर हिंदुत्वातच मिळते. पण, या भूतलावर जेवढे म्हणून जीव आहेत, त्या सगळ्यांप्रती मनुष्याने आत्मीय भाव जपला पाहिजे, अशी शिकवणही हिंदुत्वच देते, हे लक्षात घेतले तर हिंदुत्वाची व्याप्ती आपल्या सहज लक्षात येईल. पण, ज्यांना केवळ राजकारणच करायचे आहे, त्यांच्याबद्दल काही बोलणे व्यर्थच! अहिंसा ही हिंदू संस्कृतीची सगळ्यात मोठी शक्ती आहे, अशी गांधीजींची धारणा असताना, त्यांच्या विचारांचे आचरण करणारे आज हिंदुत्वाला शिव्या घालण्याचे पाप का करीत आहेत, याचे उत्तर काळच देईल…!

https://tarunbharat.org/?p=60751
Posted by : | on : 29 Aug 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (271 of 726 articles)


पेठकर | अलीकडे खूप अस्वस्थ वाटतं. चिडचिड होते. संतापही येतो. आपल्याविरुद्ध कटकारस्थानं चाललीय्, असं वाटतं. आपल्याबद्दल कुणीच सकारात्मक विचार करत ...

×