विक्रम कोठारीचा घोटाळा ३६९५ कोटींचा, गुन्हा दाखल

विक्रम कोठारीचा घोटाळा ३६९५ कोटींचा, गुन्हा दाखल

►निवास व कार्यालयांची झडती ►घोटाळा नाही, थकित कर्ज असल्याचा…

नीरव मोदी दुबईत?

नीरव मोदी दुबईत?

►पाचव्या दिवशीही धाडी, नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – पंजाब…

जया तृणमूलच्या गोटात, राज्यसभेचे तिकिट?

जया तृणमूलच्या गोटात, राज्यसभेचे तिकिट?

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – सलग ३ वेळा समाजवादी…

इम्रान खान तिसर्‍यांदा लग्नाच्या बेडीत

इम्रान खान तिसर्‍यांदा लग्नाच्या बेडीत

कराची, १९ फेब्रुवारी – पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार…

पाकच्या कारवाईने हाफिझ सईद चवताळला

पाकच्या कारवाईने हाफिझ सईद चवताळला

►नजरकैदप्रकरणी न्यायालयात जाणार, लाहोर, १६ फेब्रुवारी – पाकिस्तानने बेकायदेशीरपणे…

जेकब झुमा यांचा राजीनामा

जेकब झुमा यांचा राजीनामा

जोहन्सबर्ग, १५ फेब्रुवारी – स्वत:च्या पार्टीतील सदस्यांकडून आलेल्या प्रचंड…

आता अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी जाणार!

आता अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी जाणार!

►साध्वी प्रज्ञासिंह यांची भूमिका, औरंगाबाद, १९ फेब्रुवारी – १९९०…

प्रकल्प लटकवणे हीच काँग्रेसची संस्कृती

प्रकल्प लटकवणे हीच काँग्रेसची संस्कृती

►पंतप्रधान मोदी यांचा घणाघात ►नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन,…

राज्यात १.३५ लाख कोटींची रेल्वे विकासाची कामे

राज्यात १.३५ लाख कोटींची रेल्वे विकासाची कामे

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी – महाराष्ट्रातील रेल्वे…

काँग्रेसमुक्त भारत, काळाची गरज!

काँग्रेसमुक्त भारत, काळाची गरज!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | काँग्रेस राजवटीत शिक्षणक्षेत्रात…

काँग्रेसला काय धाड भरलीय?

काँग्रेसला काय धाड भरलीय?

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | शेखर गुप्ता…

राष्ट्रद्रष्टे : श्रीगुरुजी

राष्ट्रद्रष्टे : श्रीगुरुजी

॥ विशेष : डॉ. कुमार शास्त्री | श्रीगुरुजी आध्यात्मिक…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » हिलरी की ट्रम्प?

हिलरी की ट्रम्प?

जगभरातील माध्यमांचे आणि देशांचे लक्ष लागून असलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या काही तासांवर आलेली आहे. ८ नोव्हेंबरपर्यंत प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया संपून नवा राष्ट्राध्यक्ष कोण असेल हे जाणून घेण्यास जग उत्सुक असेल. पुढील चार वर्षे अमेरिकी जनतेच्या हृदयावर सत्तेच्या राजकारणात अननुभवी असलेले डोनाल्ड ट्रम्प राज्य करतील की, गेली अनेक वर्षांचा राजकारणाचा अनुभव असलेल्या हिलरी क्लिटंन, हे बघणे भारतीयांसाठीही महत्त्वाचे ठरणार आहे. असे म्हणतात की, अमेरिकेचा कोणीही नेहेमीसाठी मित्र नसतो, जो अमेरिकेचे हित जोपासतो, त्याला अमेरिका जवळ करते. हे सार्‍या जगाने अनुभवले आहे. फार लांब जाण्याची गरज नाही. पूर्वी भारताकडे बघण्याचा अमेरिकेचा दृष्टिकोन हेटाळणीचा किंवा दुर्लक्ष करण्याचा होता. पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील वाढत्या आतंकवादाबाबत त्याने कधीच सहानुभूती दाखविली नाही. ज्या-ज्या वेळी भारताने दहशतवादाचा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात मांडण्याचा प्रयत्न केला आणि ज्या-ज्या वेळी या दहशतवादाचे पोषण पाकिस्तान करीत असल्याचे उदाहरणांनी पटवून दिले, तेव्हादेखील अमेरिकेने मौन बाळगले होते. पण जेव्हा भारताने अणुस्फोट घडविला आणि आर्थिक निर्बंध टाकूनही भारतावर त्याचा काहीच परिणाम झाल्या नसल्याचे दिसून आले, तेव्हापासून अमेरिकेची भारताकडे बघण्याची दृष्टी बदलली. अमेरिकी ट्विन टॉवर्स अतिरेक्यांनी विमान हल्ला करून उडवून लावले. त्यात ३ हजारावर अमेरिकी नागरिक बळी पडल्यानंतर, या अतिरेक्यांना पाकिस्तानातील अतिरेकी डोकी मदत करत होती, हे जेव्हा अमेरिकेच्या लक्षात आले, तेव्हा या देशाने पाकिस्तानला कानपिचक्या देत, त्याच्या धोरणात बदल करून, भारतासोबत मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्यास सुरुवात केली. गेल्या दोन वर्षांच्या काळात आपले हित भारतच जास्तचांगले जोपासू शकतो, हे ध्यानात आल्याने ओबामांनी भारताचे दौरे करून, मैत्रीला एक नवा आयाम देण्याच्या दिशेने पावले टाकली. म्हणूनच येत्या काळात अमेरिकेचे हित जोपासण्यास अधिक महत्त्व देणारे देश त्याच्या अधिक जवळ जातील, हे स्पष्ट आहे. सध्याच्या ओबामांच्याच धोरणांचा नव्या राष्ट्राध्यक्षाने पाठपुरावा केला तर भारतासाठी ती नवी आशा निर्माण करणारी बाब राहील. या निवडणुकीमुळे अमेरिकी लोकांचे भवितव्य जसे ठरणार आहे, तसेच जगाच्या राजकारणावरदेखील या निवडणुकीचे मोठे परिणाम दिसणार आहेत. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच एखादी महिला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढत आहे. भारत, बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन अशा अनेक देशांनी आजवर महिलांना आपापल्या देशाचे नेतृत्व बहाल करून, आपल्या देशाचे पुरोगामित्व सिद्ध केले आहे. पण लोकशाहीचे गुणगान गाणार्‍या अमेरिकेला आजवर एकाही महिलेला राष्ट्राध्यपदी बसवता आले नाही. गेली आठ वर्षे बराक ओबामा यांच्या नेतृत्वात डेमोक्रेटिक पक्षाची सत्ता अमेरिकेने अनुभवली. याच काळात जागतिक मंदीचा देखील सामना जगासोबत अमेरिकेला करावा लागला. मोठ्या आर्थिक घसरणीतून सावरण्यात बराक ओबामा यांना यश आले असले, तरी अजूनही मंदीतून हा देश पूर्ण सावरलेला नाही. हाच मुद्दा उपस्थित करून रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘बी अमेरिकन बाय अमेरिकन’ अशी भूमिका काही सभांमध्ये अहमहमिकेने मांडली आहे. या भूमिकेमागे चीनचे डम्पिंग धोरणही कारणीभूत होते. चीनने आपला हलक्या दर्जाच्या आणि कमी किमतीच्या उत्पादनांची अमेरिकेत इतकी प्रचंड साठेबाजी केली की, त्याचा परिणाम अमेरिकी उत्पादनांवर देखील दिसू लागला. अमेरिकी युवकांमध्ये बेरोजगारीचे वाढते प्रमाण पाहता, बाह्य देशांसाठी विशेषतः भारतीयांबाबतचे व्हिसा धोरण कठोर करण्याच्या आवश्यकतेवरही ट्रम्प यांनी भर दिलेला आहे. आजवरच्या निवडणुकांच्या निकालांच्या टक्केवारीकडे नजर टाकली तर ट्रम्प यांच्यापेक्षा थोडी आघाडी हिलरी क्लिटंन यांना मिळालेली दिसत आहे. पण एवढी आघाडी संपूर्ण बहुमतासाठी त्यांना आश्‍वस्त करीत नाही. प्रारंभीच्या काळात ट्रम्प यांची उमेदवारी कोणीही फारशी गांभीर्याने घेतली नाही. प्राथमिक फेर्‍यांमध्ये तर त्यांना चक्क पैसे देऊन गर्दी गोळा करावी लागली. नंतरच्या आणि अखेरच्या टप्प्यांमध्ये मात्र ट्रम्प यांनी हिलरींना चांगलीच टक्कर दिली. जगभरातील माध्यमांचे प्रतिनिधी आणि राजकीय विश्‍लेषक गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेत तळ ठोकून आहेत. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया समजून घेणे, तेथील लोकांची मतं जाणून घेणे, निरनिराळ्या वंशाच्या नागरिकांच्या मागण्यांवर प्रकाश टाकणे, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती, त्यांची कारकीर्द आणि त्यांच्याबद्दलचे वाद-प्रतिवाद यांचा आढावा घेतला जात आहे. पण या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे उभय उमेदवारांवर विरोधकांनी केलेली यथेच्छ शिवीगाळ. अगदी गल्लीतल्या उमेदवारांसारखा हा प्रकार होता. त्याला स्थानिक माध्यमांनी प्रसिद्धीदेखील भरपूर दिली. वैयक्तिक दोषारोप, सेक्स स्कँडल्स, आर्थिक घोटाळे यामुळेही ही निवडणूक रंजक ठरली. डोनाल्ड ट्रम्प यांनी न केलेला करांचा भरणा जसा चर्चेला आला तसाच हिलरी क्लिटंन यांनी सत्तेचा गैरवापर करून केलेली पैशांची उधळपट्टीही चर्चिली गेली. ट्रम्प यांच्या पत्नीची तारुण्यातील निम्नवस्त्रांकित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करून, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न झाले. ट्रम्प कसे हेकेखोर स्वभावाचे आहेत आणि त्यांची अनेक महिलांशी कशी लफडी होती, हा मुद्दाही माध्यमांनी चघळला. ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणांमध्ये चीनवर जोरदार प्रहार केले. ओबामा प्रशासनाने गेली आठ वर्षे चीनला दिलेल्या मोकळ्या हातामुळे अमेरिका दुबळी झाली आणि डेमोक्रिटिक पक्षाचे इथेच चुकले, अशी भूमिका ट्रम्प सातत्याने मांडत आहेत. मुस्लिम दहशतवादाचा मुद्दादेखील त्यांनी रेटून धरला आहे. इस्लामी अतिरेक्यांचा अमेरिकेला भविष्यातही धोका असून, त्यांचा पुरता बीमोड करण्यासाठी छळछावण्यांच्या निर्मितीची त्यांची कल्पना आहे. मेक्सिकन निर्वासितांचे अमेरिकेतील लोंढे रोखण्याला ट्रम्प यांचे प्राधान्य असेल, यासाठी त्यांनी उभय देशांच्या सीमेवर भिंत उभारण्याची कल्पना मांडली आहे. दुसरीकडे हिलरींच्या पाठीमागे ओबामांनी पूर्ण शक्ती लावली आहे. माझी कारकीर्द यशस्वी करण्यात हिलरींचा सिंहाचा वाटा होता, हे जाहीर करून त्यांनी हिलरींबद्दल सहानुभूती मिळविली आहे. या निवडणुकीत उभय उमेदवारांनी दिवाळी साजरी करून, हिंदूंची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. कुणाला मते द्यावीत, यावरून अनिवासी भारतीय ठाम आहेत. एक मात्र निश्‍चित. त्यांची मते कुणा एकाला एकगठ्ठा जाणार नाहीत. घोडा-मैदान दूर नाही. कुणीही निवडून आले तरी त्याला भारताची मदत, सहकार्य घ्यावेच लागणार आहे.

शेअर करा

Posted by on Nov 8 2016. Filed under अग्रलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अग्रलेख, संपादकीय (914 of 949 articles)


सर्वसाक्षी : श्याम परांडे | सुमारे एका दशकापूर्वी बालीवासीयांनी हिमायलन इन्स्टिट्यूटच्या स्वामी वेद भारती यांना वैदिक विज्ञान शिकविण्यासाठी बोलावले होते. ...