ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » ही व्यक्ती बावळट नव्हे, देशविरोधी!

ही व्यक्ती बावळट नव्हे, देशविरोधी!

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष काँग्रेसचे अध्यक्ष आणि २०१९ सालानंतर या देशाचे पंतप्रधान बनण्याचे स्वप्न बघणारे राहुल गांधी यांना ‘पप्पू’ संबोधून, त्यांची वक्तव्ये हसण्यावारी नेण्याची वेळ संपली आहे. हे प्रकरण आता जरा जास्तच धोकादायक होत चालले आहे. देशात या व्यक्तीने काहीही बरळले तर त्यात फारसे काही नुकसान नसते. झालीच तर लोकांची करमणूक होते. पण, परदेशात जाऊन जेव्हा तुम्ही काहीही बरळता, ते मात्र अतिशय गांभीर्याने घ्यावे लागते. जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरात राहुल गांधींचे विचार(?) ऐकण्यासाठी गोळा केलेल्या गर्दीस, आता एवढ्यातच राहुल गांधींनी संबोधित केले. या संपूर्ण भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका करताना, भारत देशाचीच बदनामी करून टाकली. अतिशय खोटारडे दावे केलेत. चुकीची माहिती सांगितली. या सर्व प्रकारामुळे भारतीय मानस प्रक्षुब्ध झाले नसते तरच नवल! भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी या मूर्खपणाच्या वक्तव्यावरून राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष यांची चांगलीच हजेरी घेतली आहे. भारतात तर त्यांचे बोलणे कुणी मनावर घेत नाही. परंतु, भारताबाहेर जर्मनीत गोळा केलेला हा जमाव त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेण्याची शक्यता आहे. विदेशातील मीडिया तर भारताची बदनामी करण्यासाठी टपूनच बसला आहे. त्यामुळेच, आतातरी राहुल गांधी यांना बावळट म्हणून माफ करणे योग्य होणार नाही. राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या नोटबंदी, जीएसटी लागू करणे या धोरणावर कडाडून टीका केली. त्यांच्या मते नोटबंदीमुळे लाखो-लाखो सूक्ष्म व लघु उद्योजकांकडे रोखीचा पैसा येणे बंद झाले. त्यामुळे ही सर्व मंडळी बेरोजगार झाली. बेरोजगार मग हताशेमुळे विद्रोहाच्या स्थितीत येतात. ते हिंसाचाराकडे वळतात. जमावाकडून होत असलेल्या हत्या (मॉब लिंचिंग) या बेरोजगारीमुळेच वाढल्या आहेत. हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी सीरियातील इसिस या अत्यंत जहाल दहशतवादी संघटनेचा हवाला दिला. युद्धामुळे या देशातील तरुण बेरोजगार झालेत आणि त्यामुळे ते इसिसकडे ओढले गेले, असे राहुल गांधी म्हणाले. त्यांचा इशारा भारताकडे होता. भारतातही मोदी सरकार सत्तेत आल्यापासून बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि त्यामुळे ही तरुण बेरोजगार मंडळी दहशतवादाकडे वळतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. हाच युक्तिवाद ग्राह्य धरला, तर १९८४ साली भारतातील सर्वात मोठे मॉब लिंचिंग, बेरोजगारीमुळे घडले होते काय, याचे उत्तर राहुल यांनी दिले पाहिजे. म्हणजे सर्वाधिक बेरोजगारी तर काँग्रेसच्याच काळात तयार झाली, असे मानायचे काय? मुळात, राहुल गांधी यांचे हे प्रतिपादन दिशाभूल करणारे आणि अत्यंत खोटे आहे. इस्लामची कट्टर विचारसरणीच दहशतवादाला जन्म घालणारी आहे. आता तर हे सार्‍या जगानेच मान्य केले आहे. त्यात बेरोजगारीची काहीही भूमिका नसते, हे वेळोवेळी सिद्धही झाले आहे. दलितांबद्दलचे पूतनामावशीचे प्रेमही त्यांनी असेच खोटे बोलून तिथे व्यक्त केले. राहुल म्हणाले की, अनुसूचित जाती/जमातींच्या संरक्षणासाठी जे कायदे होते ते मोदी सरकारने काढून घेतले आहेत. त्यामुळे दलितांवरील हल्ले वाढले आहेत. वस्तुस्थिती ही आहे की, दलितांना विशेष संरक्षण देणारा जो अ‍ॅट्रॉसिटी कायदा आहे, तो सर्वोच्च न्यायालयाने किंचित मवाळ केला होता. मोदी सरकारने नवे विधेयक मांडून, हा कायदा पूर्ववत् कडक केला आणि तेही संसदेच्या याच गेल्या पावसाळी अधिवेशनात. असे असतानाही ही व्यक्ती इतके कसे खोटे बोलू शकते अन् तेही परदेशात? रोजगारनिर्मितीबाबत त्यांनी जे आकडे सांगितले तेही खोटे आहेत. जर्मनीतील त्यांचे हे भाषण ऐकले तर लक्षात येईल की, यांच्या भाषणात तर्क वगैरे काहीही नसतो. वस्तुस्थितीवर आधारित एकही आरोप नसतो. राहुल गांधींचा भाषण देण्याचा आत्मविश्‍वास एवढ्यात इतका वाढला आहे की ते आता कुठेही, कुणाहीसमोर बेधडक खोटे बोलू लागले आहेत. देशाच्या दृष्टीने ही अत्यंत धोकादायक घडामोड आहे. सत्तारूढ व विरोधी यांच्यात विरोध असतो, पण वैरत्व नसते. असे वातावरण भारतात बरीच वर्षे होते. जेव्हापासून काँग्रेस पक्षाची सूत्रे मूळ विदेशी आणि कॅथॉलिक ख्रिश्‍चन असलेल्या सोनिया गांधी यांच्याकडे गेली आहेत, तेव्हापासून भारतीय राजकारणात विरोधी पक्षांना शत्रू मानणे सुरू झाले आहे. आज जे देशातील राजकीय वातावरण इतके विषाक्त झालेले दिसून येते, याला संपूर्णपणे काँग्रेसच जबाबदार आहे. सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष बनण्यापूर्वी इतके विषाक्त वातावरण नव्हते. तसे असते, तर जिनिव्हात संयुक्त राष्ट्र संघासमोर काश्मीरप्रश्‍नी भारताची बाजू सशक्तपणे मांडण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी भारत सरकारच्या प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे सोपविले नसते. राहुल गांधींची भाषणे नीट ऐकली तर लक्षात येईल की, गेल्या एक-दीड वर्षापासून त्यांच्या भाषणाची भाषा, अत्यंत आक्रमक आणि खोटारडी झाली आहे. परंतु, राहुल गांधी स्वत:च्या बळावर भाषण देऊ शकत नाहीत. कुणीतरी त्यांना भाषण लिहून देत असते. याच सुमारास महाराष्ट्रातील एक श्‍वानपंथीय पत्रकार दिल्लीत राहुल दरबारी मनसबदार झाले आहेत. नागाचे विषही फिके वाटावे इतके विषारी असलेले हे विद्वान, सध्या राहुल गांधींची भाषणे लिहून देत असावेत, अशी दाट शंका यायला लागली आहे. कारण राहुल गांधींना स्वत:चे चिंतन नाही, वक्तृत्व नाही. जे लिहून दिले किंवा जे रटून ठेवले ते आपल्या विदुषकी चाळ्यांसह प्रेक्षकांना सादर करणे, एवढेच त्यांना माहीत! राज्यसभेत मनसबदारी मिळावी म्हणून या पत्रकाराने किती तडफड केली हे सर्वविदित आहे. आता घोडे गंगेत न्हाले. त्यामुळे राहुल गांधींच्या माध्यमातून ते आपला हिंदुत्वविरोधी कंड शमवून घेत असल्याची चर्चा आहे. हे सर्व असले, तरी विदेशात भारताची बदनामी आणि इसिससारख्या अत्यंत विषारी दहशतवादी संघटनेबाबत सहानुभूती निर्माण होणारी भाषणे करणे, कठोर निंदेस पात्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात भारताची प्रतिमा उज्ज्वल करण्याच्या मागे लागले आहेत. कुठल्याही जागतिक धोरणात भारताच्या भूमिकेची दखल घेतली गेली पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न आहे. ती प्रतिमा धुळीत मिळविण्याचे कार्य राहुल गांधी करीत आहेत आणि तेही क्षुद्र राजकारणासाठी आणि द्वेषासाठी. हे तर आणखीनच भयंकर आहे. हा सर्व प्रकार २०१९ सालच्या निवडणुकीपर्यंत वाढतच जाणार आहे. निवडणुका कुणीतरी जिंकणार, कुणीतरी हरणार. पण, विदेशात भारताची खोट्या माहितीच्या आधारे बदनामी करण्याचे महापाप मात्र कधीच क्षम्य असणार नाही, हे या लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे…

https://tarunbharat.org/?p=60473
Posted by : | on : 25 Aug 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (394 of 843 articles)


कुहीकर | प्रिय नवज्योतसिंग सिद्धू, साष्टांग दंडवत! हो बाबा, परवा जो कारनामा तू केलास त्यानंतर तर साष्टांग दंडवतच घालायला हवा ...

×