प्रत्येक ग्रामपंचायतीत वायफाय

प्रत्येक ग्रामपंचायतीत वायफाय

►साडेसात लाख ‘हॉटस्पॉट’ बसविणार ►केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय, नवी…

अल्लाशिवाय इतरांची पूजा करणारे मुस्लिम नाही!

अल्लाशिवाय इतरांची पूजा करणारे मुस्लिम नाही!

►•देवबंदचा आणखी एक फतवा, लखनौ, २१ ऑक्टोबर – मुस्लिम…

म्हणून निवडणुकीची घोषणा नाही

म्हणून निवडणुकीची घोषणा नाही

►मुख्य निवडणूक आयुक्तांचे गुजरातबाबत स्पष्टीकरण, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर…

दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही

दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही

►अमेरिकी प्रशासनाची भूमिका, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर – पाकिस्तान…

दोन वर्षांपासून बेपत्ता पाक पत्रकार सापडली

दोन वर्षांपासून बेपत्ता पाक पत्रकार सापडली

इस्लामाबाद, २१ ऑक्टोबर – मागील दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली…

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

वॉशिंगटन, १८ ऑक्टोबर – आपला शेजारील राष्ट्र पाकिस्तानवर नजर…

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

►शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत योजना सुरू ►मुख्यमंत्री फडणवीस यांची…

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

मुंबई, १८ ऑक्टोबर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने…

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

►५ कोटी रुपये राखीव किंमत, मुंबई, १८ ऑक्टोबर –…

महासत्ता भारत : एक विचार

महासत्ता भारत : एक विचार

॥ विशेष : सतीश भा. मराठे | आपण महासत्ता…

दुमदुमले भारतमाता गौरव गान…

दुमदुमले भारतमाता गौरव गान…

॥ तरंग : दीपक कलढोणे | कुणी कुणाला आदेश…

मोदीजी, अभी नही, तो कभी नही!

मोदीजी, अभी नही, तो कभी नही!

॥ विशेष : सोमनाथ देशमाने | अयोध्येत राम जन्मभूमीवर…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:58
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » होय, हिंदुत्व जीवनशैलीच!

होय, हिंदुत्व जीवनशैलीच!

हिंदुत्व ही पूजापद्धती नाही. हिंदुत्वाचा एकच एक ग्रंथ नाही. हिंदुत्व म्हणजे एकच मसीहा किंवा प्रेषित नाही. हिंदुत्वाचा प्रार्थनापद्धतीशी काहीही संबंध नाही. कोणत्याही देवाची उपासना कोणत्याही पद्धतीने करा किंवा न करा, तरीही तो हिंदू असू शकतो. कारण हिंदुत्व ही एक जीवनशैली आहे. हे आम्ही म्हणत नाही, तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात याबाबत निवाडा दिला आहे. वास्तविक हा न्यायालयाचा पहिला निवाडा नाही. १९९० साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी हिंदुत्वाच्या विषयात मते मागितली म्हणून त्यांची निवड रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने १९९५ साली हाच निकाल दिला होता. मात्र, एरवी न्यायालयाचा आदर, न्यायालय मानलेच पाहिजे यावर बेंबीच्या देठापासून ओरडणारे न्यायालयाच्या या निकालावर मात्र पोट दुखत असल्यासारखे कण्हत होते. त्यापैकी एक तिस्ता सेटलवाड या रिकाम्या उचापती करणार्‍या वकील बाईने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आणि हिंदुत्वाची जी व्याख्या वीस वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केली, त्याचा पुनर्विचार करण्याबाबत विनंती केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या पूर्ण बेंचने आता अगदी स्वयंस्पष्ट निकाल दिला आहे. हिंदू आणि हिंदुत्व यांची व्याख्या पुन्हा करण्याचे किंवा त्यावर सुनावणी घेण्याचे काहीच कारण नाही, असे न्यायालयाने फटकारले आहे. या देशात जेवढा बुद्धिभ्रम करण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला, त्याचा उपयोग करून त्यापेक्षाही जास्त गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न या देशातील कथित डाव्या, समाजवादी पुरोगाम्यांनी केला आहे. धर्म आणि पंथ या दोन स्वतंत्र संकल्पना असूनही त्यांचे सर्रास भाषांतर रिलिजन असे करून हिंदुत्वाला काळिमा फासण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सतत केला जातो. एका महान व्यक्तीने त्याच्या योग्यतेनुसार व्यक्तिगत जीवनाच्या उन्नतीसाठी उपासनेचा एक विशिष्ट मार्ग, प्रार्थनेची एक विशिष्ट पद्धत सांगितली की त्याचे अनुयायी तयार होतात. तो एक पंथ होतो. ही उपासना, हा पंथ, ही पूजा उंबर्‍याच्या आत वैयक्तिक श्रद्धेपुरती मर्यादित असते. हिंदुत्वाने धर्म सांगितला आहे. धर्म म्हणजे धारण करतो तो धर्म. जीवनात आचरण करतो तो धर्म. या आचरणाची काही जीवनमूल्ये हिंदुत्वाने सांगितली आहेत, नव्हे, त्या मूल्यांसाठी आपले सगळे आयुष्य समर्पित करणारे त्यागी महान सत्पुरुष या परंपरेत होऊन गेले आहेत. जीवनाच्या रंगमंचावर मुलगा, वडील, आई, मुलगी, भाऊ, बहीण, नागरिक, राजा, माणूस, गुरू, शिष्य अशा विविध भूमिका किती आदर्श कराव्यात, हे सांगणे म्हणजे धर्म आहे. सिंहासनाच्या पायर्‍या चढत असताना वडिलांनी दिलेले वचन निभावण्यासाठी पायर्‍या उतरून वनवासाला जायचे हे आदर्श मुलाचे अत्युच्च उदाहरण आहे. भाऊ वनवासाला निघाला म्हणून आपणही राजमहाल सोडून वनवासाला जायचे, तर दुसर्‍याने त्याच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य सांभाळायचे, हे आदर्श भावाचे उदाहरण आहे. पती जन्मांध आहे म्हणून आपल्या डोळ्यावरही पट्‌टी बांधून त्या सह-अनुभूतीने सहजीवन कंठायचे, पती वनवासाला चालला तर त्याच्याबरोबर वनवासाला जायचे हा पत्नीधर्म आहे. एक प्रतिज्ञा घेतली तर ती आयुष्यभर कशी निभावून न्यायची हे दर्शविणारी भीष्मप्रतिज्ञा या परंपरेत आहे. शत्रूची सून नजराणा म्हणून समोर आणली गेली असता तिच्याशी बहिणीचे नाते निर्माण करून तिला सन्मानाने परत पाठवायचे, असा भावाचा धर्म येथे आहे. तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा, तुम्ही कोणत्याही आध्यात्मिक गुरूचे अनुयायी असा, पण सार्वजनिक जीवनात तुम्ही हा पुत्रधर्म, पितृधर्म, भ्रातृधर्म, पत्नीधर्म, राजधर्म, नागरिक धर्म यांचे पालन करा, हे सांगणारी जीवनपद्धती म्हणजे हिंदुत्व आहे. मात्र, या देशात असा काही भ्रम इंग्रजांनी आणि नंतर कुटिल राजकारण्यांनी निर्माण केला की वातावरण बरोबर उलटे करून टाकले. स्वतः हे राजकीय नेते आपापल्या जातीच्या संघटना करतील, जातीच्या आधारे मते मागतील, जातीय भावनांचा भडका उडवून राजकीय पोळ्या भाजून घेतील आणि जे जाती-पाती मोडून, प्रार्थनापद्धतीला बाजूला ठेवून व्यक्ती, समाज, सृष्टी, परमेष्टी यांचे नाते संतुलित राखण्यासाठी हिंदुत्वातील जीवनमूल्यांचे नाव जरी घेतील, तर त्यांना हे सगळे जातीयवादी म्हणून हिणवतील. स्वतः संकुचित विचारांच्या गटारात लोळतील. मात्र, हिंदुत्व म्हटले की काहीतरी भयंकर गुन्हा असल्याचा भास निर्माण करतील. हिंदुत्वाच्या जीवनरचनेत केवळ मानवामानवातील संबंधातील आदर्श आहेत असे नाही, तर मानव आणि समाज, मानव आणि प्राणी, वनस्पती ही सृष्टी, मानव आणि पर्यावरण म्हणजे परमेष्टी यांच्यातील संबंध हे कसे बांधीलकीच्या, जबाबदारीच्या जाणिवेने आदर्श राहतील याची काळजी केली आहे. डंख मारणार्‍या सापाचीही पूजा आहे, तसेच आरोग्यदायी जीवनदायी वडाच्या झाडाचीही पूजा आहे. कृषी जीवनाचा केंद्र असलेल्या गायीचीही पूजा आहे आणि ओझोन देणार्‍या तुळशीच्या रोपाचीही पूजा आहे. सूर्य, चंद्र, तारे यांच्याशीही नाते जोडलेले आहे. नाते केवळ चंदा मामा असे म्हणून नाही, तर रथसप्तमी, कोजागरी पौर्णिमा अशा अनेक उत्सवांतूनही जोडलेले आहे. ‘हिंदू जीवनदर्शन सार्‍या मानवतेला करील पावन’ असे या जीवनदर्शनाचे वर्णन एका कवीने केले आहे. मात्र, सतत हिंदुत्वाला गावंढळ, मागास, बुरसटलेले असे दर्शविण्याचा आटापिटा काही लोकांनी केला आहे. जगात प्रत्यक्षाच्या पातळीवर पराभूत झालेल्या आपल्या साम्यवादी आणि भांडवलवादी जीवनरचनेबरोबर फरफटत जाणार्‍यांनी आपलेच खरे करण्यासाठी हिंदुत्वाला कलंकित करण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. धर्म या शब्दाचे भाषांतर रिलिजन असे होऊच शकत नाही. मात्र, केवळ ते तसे करण्याचाच अपराध या लोकांनी केला असे नाही, तर इतर अत्यंत संकुचित एका पुस्तकापुरत्या आणि एका गुरूपुरत्या मर्यादित पंथांच्या बरोबरीने हिंदू जीवनपद्धतीचे नाव जोडण्याचा अपराधही या लोकांनी केला. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने हिंदू एक जीवनपद्धती आहे असा निःसंदिग्ध निकाल दिला होता, तरीही तिस्तासारख्या लोकांनी पुन्हा हिंदुत्वाला सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून संकट निर्माण करण्याचे कारस्थान रचले होते. यांचे हे लाल कारस्थान सर्वोच्च न्यायालयाने पार उधळून लावले आहे. हिंदुत्वाला एका जातीपुरते बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला गेला, तो लोकांनी उधळून लावला आणि आता हिंदुत्वाला इतर प्रार्थनापद्धतीप्रमाणे उपासना पद्धतीचा रंग लावण्याचा केलेला ‘तिस्ता प्रयत्न’ सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असला, तरी त्याने भागणार नाही. वैभवशाली तत्त्वज्ञान मात्र लाजिरवाणा अस्पृश्यता, जातिभेदाचा व्यवहार ही विसंगती हिंदू समाजाने सोडली पाहिजे. मानवतेला पावन करणारे जीवनदर्शन पुस्तकात, पुराणात न ठेवता आपल्या जीवनात जगून दाखवावे लागेल. ही आदर्श जीवनमूल्ये जगणारा समाज जसा जसा उभा राहील तसे तसे हिंदुत्वाला आपल्या बेगडी विचाराने झाकोळून टाकणारे नतद्रष्ट दूर फेकले जातील आणि हिंदुत्वाचा तेजोनिधी आसमंतात तळपत राहील!

शेअर करा

Posted by on Oct 26 2016. Filed under अग्रलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अग्रलेख, संपादकीय (694 of 706 articles)


दखल : एस. एन. पठाण इस्लाम धर्मात एखादा पुरुष आपल्या पत्नीला तीन वेळा तोंडी, तलाक-तलाक- तलाक, असे म्हणून तिच्यापासून कायमची ...