जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

►बहुतांश उपग्रह पृथ्वीपासून जवळच्याच अंतरावर, नवी दिल्ली, २६ जून…

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवी दिल्ली, २६ जून – नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा…

अडवाणींची स्वत:हून माघार

अडवाणींची स्वत:हून माघार

►चिन्मयानंद यांची माहिती, नवी दिल्ली, २५ जून – भाजपाचे…

माझे सरकार निष्कलंक

माझे सरकार निष्कलंक

►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, वॉशिंग्टन, २६ जून – माझ्या…

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

क्विन्सटाऊन, २६ जून – न्यूझीलंडमध्ये मद्यपानाच्या विरोधात मोहीम चालवणार्‍या…

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

►आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार • •►‘मोदी, मोदी’च्या घोषणांनी…

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

►शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घतले नाही तर बघतो!, नाशिक, २५…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 05:56 | अस्त: 19:02
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » २०१४ विसरून कसे चालेल?

२०१४ विसरून कसे चालेल?

संघ परिवार, भाजपा इत्यादी तथाकथित उजव्या विचारसरणीशी लढण्यासाठी सेक्युलर मंडळी ज्या बुरुजांकडे मोठ्या आशेने बघत होती, त्यातील आणखी एक बुरूज कोसळला. उत्तर प्रदेशातच मर्यादित असलेल्या समाजवादी पार्टीत जे काही सुरू आहे, ते पाहून सर्व सेक्युलर मंडळी खचली आहेत. राहुल, केजरीवाल यांनी निराशा केली असतानाच, आता मुलायमसिंहांच्या पक्षानेही स्वत:ची अशी धूळधाण करून घ्यावी, याचा फार मोठा धक्का या मंडळींना बसला आहे. प्रत्येक घटनेचे विश्‍लेषण करणारी राजकीय पंडित मंडळी, यावेळीही पुढे सरसावली आहेत आणि एकेक जण, उत्तर प्रदेशात नक्की काय झाले, कसे झाले आणि का झाले, यासंबंधी आपल्या कुवतीनुसार भाष्य करीत आहेत. कुणी, या सर्व गोंधळातून काही तरी सकारात्मक, ताजे बाहेर पडेल, अशी आशा बाळगून आहेत. जणू काही हे एक प्रकारचे समुद्रमंथनच आहे! सर्वांचे एका बाबतीत मात्र एकमत आहे की, समाजवादी पार्टीतील या विनाशलीलांचा फायदा केवळ बहन मायावतींच्या बहुजन समाज पार्टीलाच होणार आहे. जो मुसलमान समाजवादी पार्टीला आपला तारणहार मानत होता, तो आता, बसपाकडे वळणार. कारण भाजपाला बसपाच हरवू शकते, असे मुसलमानांना वाटू लागले आहे. याचाच अर्थ असा की, यादवांची मते सपालाच मिळतील आणि मुसलमानांची मते बसपाला प्राप्त होऊन, दलित व मुसलमान मिळून, बसपा सत्तेत येणार. मायावती गालातल्या गालात हसत असल्याची व्यंग्यचित्रे देखील प्रकाशित होत आहेत. भाजपाचा पराभव कसा होणार, केवळ याच काळजीने ग्रस्त असलेल्या सेक्युलर मंडळींना ही असले विश्‍लेषणे वाचून कमालीचे समाधान मिळत आहे. चला! मुलायम नाही, तर मायावती… भाजपाला फायदा होत नाही ना! मग झाले! ही सर्व राजकीय पंडित मंडळी, विश्‍लेषण मांडताना एका घटनेला मात्र साफ विसरून गेली आहेत. ही घटना म्हणजे २०१४ सालची लोकसभेची निवडणूक. या निवडणुकीत उत्तर प्रदेश राज्यातून निवडून द्यायच्या ८० जागांपैकी भाजपा ७१ व मित्रपक्षाला २ अशा ७३ जागा मिळाल्या होत्या. उर्वरित सात जागांपैकी दोन सोनिया व राहुल यांना आणि मुलायमसिंह यादव व त्यांच्या कुटुंबीयांना पाच जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपाला झालेल्या मतदानाची टक्केवारी होती ४२.३. सपाला २२.२, बसपाला २० टक्के मतदान झाले होते. बसपाला २० टक्के मते मिळूनही एकही जागा जिंकता आली नव्हती. सपाला पाच जागा मिळाल्या असल्या तरी, त्याला मुलायमसिंहांचा वैयक्तिक व कौटुंबिक प्रभाव कारणीभूत होता. या निवडणुकीच्या केवळ दोन वर्षे आधी, म्हणजे २०१२ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीला २२४ जागांचे बहुमत मिळून अखिलेशसिंह यादव मुख्यमंत्री बनले होते. दोनच वर्षांनंतर सत्तारूढ पक्षाचा इतका दारुण पराभव व्हावा, याची काय कारणे असावी, या प्रश्‍नावर राजकीय पंडितांनी असे सांगितले की, मोदींची लाट होती. त्यामुळे भाजपाला हे इतके अभूतपूर्व यश मिळाले. म्हणजे, जमिनी स्तरावर भाजपाने जे काही कार्य केले असेल, त्याची दखल कुणीच घ्यायला तयार नाही. शिवाय, जातिगत राजकारणाच्या भिंती ढासळल्या असतील आणि एक जागृत समाज म्हणून मतदान झाले असण्याचीही शक्यता कुणी बोलून दाखविली नाही. येऊन-जाऊन, या जातीची इतकी मते, त्या जातीची तितकी मते, याच गणिताच्या आधारावर निवडणूकपूर्व अंदाज आणि निवडणूकपश्‍चात विश्‍लेषणे असतात. रा. स्व. संघाच्या विचारांच्या प्रभावाने जातिभेदाच्या कृत्रिम भिंती कोसळून पडतात, यावर कुणाचाच विश्‍वास नाही. तसे हे काही आश्‍चर्य नाही म्हणा! कारण, या लोकांची सारी हयात जातींचे राजकारण करण्यातच गेली आहे. परंतु, काळ बदलत आहे. जाती निरर्थक ठरत आहेत. सामाजिक समरसता वाढत आहे. यामुळेदेखील निवडणूक निकालावर परिणाम होऊ शकतो, याचा कुणी विचारही करताना दिसत नाही. जणुकाही मतदार म्हणजे त्या त्या पक्षाची खाजगी मालमत्ताच आहे. काहीही झाले तरी ती दुसरीकडे जाणार नाही, अशी काहीतरी समजूत या राजकीय पंडितांनी करून ठेवली आहे. निव्वळ जातीच्या आधारावर पक्ष स्थापन करून राजकारण करणार्‍यांची गत काय होते, याची अनेक उदाहरणे स्वातंत्र्यापश्‍चात भारतात आहेत. जे कृत्रिम आहे, जे अनैसर्गिक आहे, ते नष्ट होणारच. उत्तर प्रदेशात ही प्रक्रिया वेगाने सुरू झालेली दिसून येते. आगामी विधानसभेची निवडणूक झाल्यावर ही प्रक्रिया सुरू होईल, असा अंदाज होता; पण ती पुरेशी आधीच सुरू झाली आहे, एवढेच. भाजपाला पराभूत करण्यासाठी समाजवादी पार्टीच्या वळचणीला असलेला मुस्लिम समाज, बसपाकडे जाणार असे जेव्हा ही राजकीय पंडित मंडळी म्हणतात, तेव्हा याची हिंदू समाजात काय प्रतिक्रिया उमटेल, हे मात्र सांगत नाहीत. जर मुस्लिम समाज ठरवून एका विशिष्ट पक्षाला मतदान करण्यास सिद्ध झाला असेल, त्याकडे हिंदू समाज डोळेझाक करून शांत बसेल का? हिंदूंमध्येही प्रतिक्रिया उमटणारच; आणि ही प्रतिक्रिया, हिंदूंमधील जातीच्या भिंती तोडणारी असेल. बसपाला जर मुस्लिमांची रसद मिळणार असेल, तर मग उत्तर प्रदेशातील यादव, मुलायमसिंहांकडे पाठ फिरवून भाजपाकडे वळणार नाहीत कशावरून? दोन वर्षांपूर्वी निवडून आलेले रालोआचे ७३ खासदार, डझनावरी मंत्री, नरेंद्र मोदी यांची जादू, केंद्र सरकारची कामगिरी इत्यादींचा प्रभाव उत्तर प्रदेशातील मतदारांवर पडणारच नाही, असे कसे म्हणता येईल? समाजवादी पार्टीची पाच वर्षांची कारकीर्द लोकांनी बघितली आहे. त्याआधी बसपाचीही बघितली आहे. मग आता एक संधी भाजपालाही द्यायला हरकत नाही, असा विचार तेथील मतदार करणार नाहीत कशावरून? पण आपल्या येथील राजकीय पंडितांना हे कधीच सुचणार नाही. कारण त्यांच्यालेखी भाजपाला कधीच स्थान नसते. सर्व सेक्युलर राजकीय पक्षांना घरघर लागली असताना, तसेच या सर्व पक्षांमध्ये संघटन म्हणून काहीच नसताना, या पक्षांना मते मिळण्याची शक्यता आहे का आणि तेही भाजपासारखा एक सक्षम पर्याय समोर असताना, याचा विचार या पंडितांनी केला पाहिजे. केवळ लाटेच्या भरवशावर कुणी निवडणुका जिंकत नसतो. तसे असते तर, मग २०१४ साली मोदींच्या लाटेची जादू पश्‍चिम बंगाल, ओडिशामध्येही चालली असती. जिथे संघटन मजबूत तिथेच लाटेचा फायदा होण्याची शक्यता असते. समाजवादी पार्टीची विनाशाकडे वाटचाल सुरू असताना, मतदार भाजपाकडे वळण्याचीच शक्यता आहे, ही वस्तुस्थिती मांडणे आवश्यक आहे. मतदार नाराज असले तरी, एखादा सक्षम पर्याय स्पष्टपणे समोर येईपर्यंत, शांत बसतात. पण एकदा का असा पर्याय त्यांच्या लक्षात आला की, मग ते कुठल्याही राजकीय पंडिताची कुठलेही विश्‍लेषण ध्यानात न घेता, जातिपातीची, धर्माची, प्रदेशाची बंधने झिडकारून मतदान करतात. असे नसते तर, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालेच नसते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आतापासूनच दिसू लागली आहे.

शेअर करा

Posted by on Oct 29 2016. Filed under अग्रलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अग्रलेख, संपादकीय (452 of 470 articles)


सुनील कुहीकर त्या दोघांनी मिळून आरंभलेल्या एका उपक्रमाला आता तीन वर्षे झाली होती. यंदाचा कार्यक्रम अगदी पंधरा दिवसांवर आला होता. ...