ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » उपलेख, चारुदत्त कहू, संपादकीय, स्तंभलेखक » २०१९ मधील मोदींच्या विजयाची दुंदुभी…

२०१९ मधील मोदींच्या विजयाची दुंदुभी…

चारुदत्त कहू |

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. २०१४ प्रमाणेच यावेळीदेखील रालोआच सत्तेत येईल, असे सध्याचे वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाने, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वात रालोआ पूर्वीपेक्षाही जादा जागा आणि मते घेऊन सत्तेत येण्याचा दावा केला आहे. एकूण मतदानाच्या ५१ टक्क्यांपेक्षा जास्त मते घेण्यासाठी आम्ही कंबर कसली असल्याची घोषणा अमित शाह यांनी केली आहे. विरोधकही एकीचे नारे देत आहेत. सत्ताधार्‍यांना लोळविण्याचा निर्धार करीत आहेत. पण, हे सारे करीत असताना २०१४ आणि २०१९ च्या परिस्थितीत झालेले बदल ध्यानात घेऊनच चर्चा केली जायला हवी, दावे-प्रतिदावे केले जायला हवेत. देशातील आजच्या परिस्थितीवर नजर टाकल्यास दोन बाबी स्पष्ट आहेत. गेल्या चार वर्षांत मोदी सरकारविरुद्ध भ्रष्टाचाराचा एकही ठोस आरोप झालेला नाही आणि दुसरी बाब म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वातील विरोधकांची युती अजूनही आपले अस्तित्व दाखवू शकलेली नाही. गेल्या काही दिवसांत झालेली सर्वेक्षणे बघितली, तर ती सारीच मोदींना पुन्हा राजमुकुट सोपविण्याचे भाकीत वर्तविणारी आहेत. भाजपाच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक एकत्र आले असले, तरी उत्तरप्रदेशात बसपा आणि समाजवादी पार्टी काँग्रेससाठी लक्षणीय जागा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेस उद्विग्न आहे. इतरही राज्यांमध्ये काँग्रेसची नेतेमंडळी इतरांचे नेतृत्व मान्य करण्यास तयार नाहीत. २०१४ पूर्वी भाजपा विरोधी पक्षात होती तेव्हाचे दावे आज काँग्रेस करीत असेल, तर त्यात हशील नाही. आज भाजपाचे लोकसभेत आणि राज्यसभेत सर्वाधिक सदस्य आहेत. देशातील ७० टक्के भागावर या पक्षाची सत्ता आहे. भाजपा आणि मित्रपक्षांची मिळून देशातील २१ राज्यांमध्ये सत्ता आहे. विशेष म्हणजे देशविदेशातील अर्थविषयक संस्था केंद्र सरकारच्या कामाबाबत आश्‍वस्त आहेत. अर्थव्यवस्थांशी तुलना करता, जागतिक क्रमवारीत भारताने सहाव्या क्रमांकावर उडी घेतली आहे. गेल्या चार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक देशांना भेटी देऊन भारताबद्दलची प्रतिकूल मते सकारात्मकतेत बदलली आहेत. फेसबूक, ट्विटर आदी नेटवर्किंग साईट्सचा विचार करता, तेथेही मोदींची लोकप्रियता, फॉलोईंग जागतिक क्रमवारीत अव्वल आहे. भारताबाबत आणि विद्यमान सरकारबद्दल व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रिया निरर्थक नाहीत. जागतिक अर्थकारणात ज्यांची नावे अभिमानाने घ्यावीत, अशा बोलक्या प्रतिक्रिया सत्ताधार्‍यांसोबतच विरोधकांनीही जाणून घ्यायला हव्यात.
युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीची जीवनोपयोगी वस्तूंची बाजारपेठ ५३.५ बिलियन युरोपियन डॉलर्सची आहे. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल पोलमन म्हणतात, मला मोदी सरकारबाबत प्रचंड विश्‍वास आहे. या देशाची वाढती लोकसंख्या हे निराळेपण आहे. मी ज्या युरोपचे प्रतिनिधित्व करतो, त्या भागात अशी लोकसंख्यावाढ कुठेच आढळत नाही. या सरकारचे सर्वसमावेशकतेचे धोरण वैशिष्ट्यपूर्ण असून, ते स्वच्छ भारत, मेक इन इंडिया आणि स्मार्ट सिटी योजनांमधून दिसून येत आहे. सरकारला अजूनही प्रचंड काम करण्याची आवश्यकता आहे, हे जगजाहीरच आहे. तथापि, सरकारने जी कामे आज करून ठेवली आहेत, त्यामुळे या देशातील प्रत्येक नागरिकासाठी उज्ज्वल भविष्याचा पाया रोवला गेला आहे.
मायक्रोसॉफ्ट ही संगणकीय क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी. या कंपनीचे कर्तधर्ते सत्या नडेला म्हणतात, भारताजवळ जागतिक दर्जाचे उद्योजक आणि मनुष्यबळाची पुंजी आहे. पंतप्रधानांची दृष्टी स्फटिकासारखी निरभ्र आहे. मानवी चातुर्याचा उपयोग करून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचे शस्त्र कसे वापरायचे याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. भारतातील ५ लक्ष खेड्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोविण्याची आमची योजना आहे. आम्ही जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा भारतात आणू आणि त्या आणताना तंत्रज्ञानाची सुरक्षितता धोक्यात येणार नाही, याची काळजी घेऊ.
क्वालकॉमचे पॉल जेकब म्हणतात, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाबाबतच्या दृष्टीकोनामुळे अतिशय उत्साहित आहोत. त्यांच्या नेतृत्वात भारत योग्य दिशेने मार्गक्रमण करीत आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतातील इंटरनेटचे जाळे आणि प्रवास कितीतरी व्यापक आहे. भारत स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानासाठी जगाला प्रचंड मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देत आहे. विदेशातील अर्थोद्योजकच मोदींबद्दल आशावादी आहेत असे नव्हे, भारतातील उद्योजकही त्यांचे चाहते झाले आहेत. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महेंद्र हे त्यापैकीच एक. पंतप्रधानांच्या व्यावसायिक मित्रत्वाच्या धोरणाचे आनंद महिंद्र स्वागत करतात. देशाची अर्थव्यवस्था आश्‍चर्यकारक पद्धतीने बरच्या बाजूला राहील, याबाबत ते आशावादी आहेत. एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेतील पारदर्शकतेचा अनुभव त्यांना येतो आहे. कुठल्याच व्यवहारांबद्दल सध्या शुल्क आकारले जात नाही. मोदी निवडून आल्यापासून त्यांना भेटायला आनंद महिंद्र एकदाही दिल्लीला गेले नाहीत. तशी गरजही भासली नाही. त्यांना मागावे, विनंती करावी, असे त्यांच्याजवळ काहीच नाही, ही या भारतीय उद्योगपतीची भावना पुरेशी बोलकी आहे.
देशातील श्रीमंत परिवार मोदींची तारीफ करतात हे तर न दडवलेले सत्य आहे. त्याचा अनुभव जनतेलाही येतोच. मुकेश अंबानी तर वेळोवेळी मोदींच्या आणि त्यांच्या भारताबाबतच्या दृष्टिकोनाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहेत. यातूनच मोदींवर ते अंबानी आणि अदानींची बाजू घेतात, असा सातत्याने आरोप केला जातो. पण हेच अंबानी मोदींबद्दल काय बोलतात, हे त्यांच्याच शब्दात जाणून नको का घ्यायला? रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा आणि मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी म्हणतात, नरेंद्र मोदी हे राजांचे राजे आहेत. त्यांना अर्जुनासारखी स्पष्ट दृष्टी लाभलेली आहे. गेल्या दशकात त्यांच्या विचारधारेमुळे आणि दूरदृष्टीमुळे भारतातीलच नव्हे, तर जगभरातील गुंतवणूकदार आणि उद्योजक एखाद्या लोहचुंबकाप्रमाणे त्यांच्याकडे आकर्षित झालेले बघायला मिळतात.
बँकिंग क्षेत्र हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या क्षेत्रातील लोकही मोदींच्या धोरणांची तारीफ करताना दिसत आहेत. त्यातूनच जगातील अभ्यासक, सर्वेक्षणकर्ते भारताबद्दल त्यांच्या भूमिका निश्‍चित करीत आहेत. एचडीएफसी या खाजगी क्षेत्रातील बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख तर मोदींच्या कौतुकात कोणतीच कसर ठेवत नाहीत. या सरकारने देशातील मोठ्या प्रमाणात होणार्‍या भ्रष्टाचारावर आळा घातल्याचा त्यांचा अनुभव सांगतो. सूक्ष्म अर्थकारणाच्या संदर्भात भारत आज जेवढा शक्तिशाली झाल्याचे जाणवते आहे, तेवढी सशक्त स्थिती यापूर्वी कधीच नव्हती. निर्धारी नेतृत्वामुळे आणि महत्त्वाच्या धोरणात्मक बदलांमुळे देशाचा विकास होताना दिसतोय्, असे ते सांगतात. समकक्ष अर्थव्यवस्थांशी तुलना करता येणार्‍या काळात भारताचा जीडीपी ७.५ पर्यंत पोहोचेल, ही अपेक्षा त्यांना आहे, ती उगाच कशी म्हणता येईल? विकासाची प्रचंड क्षमता असलेली भारतीय बाजारपेठ कुणीच दृीष्टआड करू शकत नाही, ही त्यांची प्रतिक्रिया भारताच्या आजच्या स्थितीचे पुरेसे वर्णन करणारी आहे. मोदींनी दिलेले नवभारताचे स्वप्न साकारले जाईल, अशी ग्वाही टाटा समूहाचे रतन टाटा देतात तेव्हा भारताने गाठलेल्या उंचीची कल्पना आल्याशिवाय राहात नाही. सिस्को सिस्टीम्सचे जॉन चेंबर्स यांना तर अशी भीती आहे की, पुढच्या निवडणुकीत मोदी जर निवडून आले नाहीत तर देशाने गाठलेला लक्षणीय सर्वसमावेश विकास धोक्यात आल्याशिवाय राहायचा नाही. ही सारी मनोगते मोदींच्या पुढच्या निवडणुकीतील यशाबद्दल आशा व्यक्त करणारीच म्हणावी लागतील. विरोधकांनी कितीही दावे केले, तरी त्यांना त्यांच्या नेतृत्वाबाबत असे खात्रीशीर भरोसा देणारे कुठे सापडणार, हा प्रश्‍नच आहे.

https://tarunbharat.org/?p=59761
Posted by : | on : 14 Aug 2018
Filed under : उपलेख, चारुदत्त कहू, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, चारुदत्त कहू, संपादकीय, स्तंभलेखक (613 of 1418 articles)


समुदायाला एकाकी पाडण्याचा सरकारचा डाव असल्याचा नवा जावईशोध, स्वनामधन्य नेते शरद पवार यांनी लावला आहे. त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिकच द्यायला ...

×