पीएनबीने केल्या १८ हजार कर्मचार्‍यांच्या बदल्या

पीएनबीने केल्या १८ हजार कर्मचार्‍यांच्या बदल्या

नवी दिल्ली, २१ फेब्रुवारी – पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या…

आता पगार नाही, नवीन नोकरी शोधा

आता पगार नाही, नवीन नोकरी शोधा

►नीरव मोदीचा कर्मचार्‍यांना ई मेल, नवी दिल्ली, २१ फेब्रुवारी…

ललितादेवींनी पेन्शनमधून फेडले होते पीएनबीचे कर्ज

ललितादेवींनी पेन्शनमधून फेडले होते पीएनबीचे कर्ज

►माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा असाही प्रामाणिकपणा, नवी दिल्ली, २१ फेब्रुवारी…

इम्रान खान तिसर्‍यांदा लग्नाच्या बेडीत

इम्रान खान तिसर्‍यांदा लग्नाच्या बेडीत

कराची, १९ फेब्रुवारी – पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार…

पाकच्या कारवाईने हाफिझ सईद चवताळला

पाकच्या कारवाईने हाफिझ सईद चवताळला

►नजरकैदप्रकरणी न्यायालयात जाणार, लाहोर, १६ फेब्रुवारी – पाकिस्तानने बेकायदेशीरपणे…

जेकब झुमा यांचा राजीनामा

जेकब झुमा यांचा राजीनामा

जोहन्सबर्ग, १५ फेब्रुवारी – स्वत:च्या पार्टीतील सदस्यांकडून आलेल्या प्रचंड…

नवे जिल्हे, तालुके नवनिर्धारित निकषांनीच होणार

नवे जिल्हे, तालुके नवनिर्धारित निकषांनीच होणार

►मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेणार मंजुरी ►२२ नव्या जिल्ह्यांचे प्रस्ताव, प्रवीण…

मराठवाड्यात रेल्वे प्रकल्प; बोगी निर्मिती होणार

मराठवाड्यात रेल्वे प्रकल्प; बोगी निर्मिती होणार

►• १५ हजारांना मिळणार रोजगार, मुंबई, २० फेब्रुवारी –…

आता अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी जाणार!

आता अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी जाणार!

►साध्वी प्रज्ञासिंह यांची भूमिका, औरंगाबाद, १९ फेब्रुवारी – १९९०…

काँग्रेसमुक्त भारत, काळाची गरज!

काँग्रेसमुक्त भारत, काळाची गरज!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | काँग्रेस राजवटीत शिक्षणक्षेत्रात…

काँग्रेसला काय धाड भरलीय?

काँग्रेसला काय धाड भरलीय?

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | शेखर गुप्ता…

राष्ट्रद्रष्टे : श्रीगुरुजी

राष्ट्रद्रष्टे : श्रीगुरुजी

॥ विशेष : डॉ. कुमार शास्त्री | श्रीगुरुजी आध्यात्मिक…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » अपर्णा क्षेमकल्याणी, साहित्य » हिरावलेले आवाज…

हिरावलेले आवाज…

•जावे अनुवादांच्या देशा : अपर्णा क्षेमकल्याणी

hiravlele-awazपुस्तकाचे नाव – स्टोलन व्हॉईस
लेखक – झ्लाता फिलिपोविच,मेलनी चैलेंजर
अनुवाद – हिरावलेले आवाज
अनुवादक – करुणा गोखले
डायरी लिहिणे ही कुठल्याही संवेदनशील मानवाची गरज असते . मनातील गोष्टी सांगायच्या पण, आणि त्या कुणाला समजाव्यात याचीही आवश्यकता नाही या साध्या हेतूने डायरी अथवा रोजनिशी लिहिली जाते.
रोजनिशी कुणाला दाखवायची नसल्याने यात प्रांजळपणे सत्य कथनाचा भाग असतो. त्यामुळेच कुणाचीही रोजनिशी जेव्हा आहे त्या स्वरूपात प्रसिद्ध होते तेव्हा ते प्रामाणिक लेखन म्हणून स्वीकारले जाते. त्यात तात्कालिक घटनांवर भाष्य असते, ते खाजगी लेखन असल्यामुळे त्यात कुठलाच आविर्भाव नसतो त्यामुळे तो एक ऐतिहासिक दस्तावेजही ठरू शकतो.
रोजनिशी प्रसिद्ध होऊन जगभर गाजल्याचे उदाहरण म्हणजे‘डायरी ऑफ ऍन फ्रँक’ या डायरीने युद्धजन्य परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, युद्धाने होणारी ससेहोलपट आणि लहान मुलीचं भावविश्‍व रखरखितपणे जगाच्या समोर ठेवलं; आणि जगभरातील वाचक ऍनच्या रोजनिशीमुळे युद्धाशी जोडले गेले, सहोदर झाले. युद्धाशी निगडित रोजनिशींचे संकलन असलेले एक पुस्तक माझ्या वाचनात आले आणि वाचक म्हणून माझी मुळं हादरून गेली. पुस्तकाचे नाव ‘हिरावलेले आवाज’ पहिले महायुद्ध ते इराक युद्ध, यातील तरुण मुला-मुलींच्या युद्धकालीन डायर्‍यांचे संकलन म्हणजे हे पुस्तक आहे. ‘युद्धस्य कथा रम्य:’ असं जे काही म्हंटलं जातं ते धादांत खोटं आहे याची प्रचीती या मुलांच्या रोजनिशी वाचून येते.
मुळात युद्ध आपल्यापर्यंत कधी पोहोचणार नाही या भ्रमात आपण सगळेच असतो. युद्धे ही केवळ इतिहासात घडून गेलेली असतात हा आपला गैरसमज असतो.
गरिबी, भयंकर रोग यासारखंच युद्धही येत-जात असतं हे आपल्या गावी नसतं. युद्ध आणि सैनिक इतकंच समीकरण आपल्याला माहीत असतं. युद्धाचा विचार टाळण्यासाठी आपण युद्धाची शक्यता दूरवरच्या लोकांच्या आयुष्याशी जोडून मोकळे होत असतो. पण हेच युद्ध मानगुटीवरचे भूत होऊन आपल्यावर थयथयत नाचत सुटते तेव्हा काय होत असेल!
भलेही युद्धाने निर्णायकी बदल घडत असतील, भलेही युद्ध इतिहास बदलवत असेल, भलेही मानवाच्या कर्तृत्वाची रंजक कहाणी अभिमानाने मिरवत असतील युद्धाच्या खुणा! पण मुलांच्या नजरेतून युद्धाकडे बघितलं तर तीच कहाणी रक्तरंजित दिसेल. बालपण ओरबाडणारा क्रूरकर्म काळ दिसेल. हतबलता, संभ्रम, अन्याय, वेदना यांनी भरलेला काळ आणि बाल्य, तारुण्य, निरागसता हरवल्याची जाणीव दिसेल. जगातल्या चौदा देशांतला युद्धकाळ आणि मरणाच्या दारात उभी असलेली मुलं. त्यांच्या घुसमटलेल्या बाल्याच्या आणि दबलेल्या मन:स्थितीच्या साक्षी देणार्‍या अशा डायर्‍यांतले काही दिवस म्हणजे ‘हिरावलेले आवाज.’ जगातील युद्धबाधित क्षेत्रातील मुलं एकाच हिरावलेल्या आवाजात जेव्हा विचारत राहातात, ‘जगातील युद्ध संपणार कधी?’ त्यावेळी पुस्तक मिटून ठेवण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही. पण म्हणूनच हा संहार वाचत असताना त्याच्याकडे केवळ साहित्य अथवा ऐतिहासिक दस्तावेज म्हणून वाचक बघत नाहीत किंबहुना बघू शकत नाही.
माणसातील माणुसकी वाढीला लावणारी ती एक प्रेरक कहाणीही ठरते. ङ्गहिरावलेले आवाजङ्ख म्हणूनच माझ्या दृष्टीनं अनुवादित पुस्तकांतील महत्त्वाचे पुस्तक ठरते. मूळ पुस्तकाची लेखिका झ्लाता फिलिपोविच ही देखील युद्धग्रस्त. तिच्या वयाच्या अकराव्या वर्षी ती युद्धाचा एक भाग झाली.
त्या काळी ती डायरी लिहीत असे. तिची ही डायरी खाजगी न राहाता प्रकाशित झाली. मेलनी चॅलेंजर ही ब्रिटिश स्त्री २००३ साली झ्लाताच्या संपर्कात आली आणि झ्लाता मेलिनीच्या कामात सहभागी झाली. मेलिनी युद्धकालीन रोजनिशींचे संकलन करण्याच्या विचारात होती. या दोघींनी मिळून या कामाला सुरुवात केली. आतापर्यंत ज्या युद्धकालीन रोजनिशी प्रसिद्ध झाल्या होत्या त्या वैयक्तिक होत्या.
स्टोलन व्हॉईसेस हा असा संग्रह आहे की ज्यात अल्पवयीन किंवा तरुणांचे युद्धविषयक अनुभव रोजनिशीच्या माध्यमातून व्यक्त झालेले आहे. या डायर्‍यांचे संकलन करत असताना या दोघींना जाणवलेली अधोरेखित करण्याजोगी बाब म्हणजे युद्धजन्य परिस्थितीतून जात असताना लहान मुलांच्या अनुभूती सारख्या होत्या. आणि लेखनातही खूप साधर्म्य होतं. माणूस सर्वत्र सारखाच याचा प्रत्यय देणारा हा अनुभव आहे. या पुस्तकात तेरा मुलांच्या रोजनिशीतील काही भागांचं संकलन आहे.
यातील बहुतेकांना लेखनवाचनाची गोडी होती. एकदा हा वाईट काळ गेला की आपण कादंबरीकार, पत्रकार किंवा कवी होण्याची स्वप्न ही मुलं बघत होती. त्यातून स्वत:ला व्यक्त करण्याच्या उद्देशाने त्या लिहिल्या गेल्या. यातील काही मुलांची युद्धाच्या होरपळीत राख झाली, तर काहींनी चिवटपणे युद्ध परिस्थितीशी झुंज दिली. बहुतेक मुलांच्या कुटुंबांची आहुती युद्धात पडली. या डायर्‍यातून युद्ध तुकड्यातुकड्यातून आपल्या समोर येतं. आयुष्याचे अनेक तपशील उलगडले जातात. आयुष्यातील छोट्या छोट्या व्यावहारिक बाबी किती महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्या अभावाचा काय परिणाम होतो हे वाचक म्हणून आपण शिकतो. दोन्ही लेखिकांनी या खर्‍या युद्ध कहाण्यांचे अतिशय उत्तम संपादन करून वाचकांना सहस ंवेदनांशी जोडलं आहे. युद्ध म्हणजे नेमकं काय, ती कशी लढली जातात आणि त्यांचा सामना करायचा म्हणजे नेमकं काय करायचं हे आपल्या ध्यानात येतं.
शांततेचा अर्थ लक्षात येतो. या पुस्तकाचा शांततेसाठी सकारात्मक उपयोग होऊ शकतो. इतिहासाला मानवी चेहरा देण्याचं काम या पुस्तकाने केलं आहे. या पुस्तकाचा तितकाच समर्थ अनुवाद मराठीतील ख्यातनाम अनुवादक करुणा गोखले यांनी केला आहे .
बालकं ही आपली सर्वात मौल्यवान साधनसंपत्ती असते. युद्धकाळात त्यांच्यातील निरागसता कशी लोप पावते याचे उदाहरण इंग पोलक च्या डायरीवरून येतं. इंग एक ज्यू मुलगी. ऑस्ट्रियाची. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात नाझींच्या छळातून लहान मुलं तरी वाचावीत यासाठी अनेक मुलांना रेल्वेत भरून इंग्लंडला पाठवण्यात आले त्यात इंग देखील होती. १२ वर्षाची इंग लिहिते, माझी घरी जायची आस आता आणखी सहन होत नाहीये. मी मेल्यावर माझ्या थडग्यावर लिहा : घरच्या आठवणींनी व्याकुळ होऊन एक मूल मेलं. ते इथे विश्रांती घेत आहे.
बालपण करपल्याची अशी किती उदाहरणं सांगावी? पियानो वाजवणारी, दोस्तांसोबत हुंदडणारी, आई-वडिलांवर प्रेम करणारी मुलं अचानक यंत्रवत होऊन गेली युद्धामुळे. खेळण्याचा अधिकार असलेल्या वयात मुलं हात जोडून प्रार्थना करत राहातात, निवार्सित होतात, पालकांच्या मायेला दुरावतात, त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांची शाळा उद्ध्वस्त होते, मित्र मरतात आणि मुलं फक्त आवंढे गिळू शकतात.
बालसुलभ भोकाड काढायची देखील त्यांना मुभा नाही. कारण त्याचा आवाज हिरावला गेला आहे. अखेर कुठपर्यंत हे चालणार? परिस्थितीशी शर्थीने लढणार्‍या या कोवळ्या जिवांच्या जिद्दीला सलाम करण्यासाठी वाचायलाच हवं ‘हिरावलेले आवाज.’

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under अपर्णा क्षेमकल्याणी, साहित्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अपर्णा क्षेमकल्याणी, साहित्य (16 of 17 articles)


महत्त्वाकांक्षी- आजचे राजकीय वास्तव दर्शवणारी कादंबरी पुस्तक परीक्षण: प्रा. व्यंकटेश वळसंगकर, गुलबर्गा. सर्वोत्तम सताळकर हे कथाकार म्हणून गेल्या काही वर्षात ...