Home » सोलापूर » कोमात गेलेली राष्ट्रवादी अजित पवारांच्या दौर्‍याने जोमात येणार का?

कोमात गेलेली राष्ट्रवादी अजित पवारांच्या दौर्‍याने जोमात येणार का?

ajit_pawar1पंढरपूर, [२२ ऑक्टोबर, प्रतिनिधी] – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आ. अजित पवार यांनी सोलापूर जिल्हयात दौरा सुरू केला आहे. विधानसभा निवडणूकीत पराभव झाल्यामुळे जिल्हयातील राष्ट्रवादी कोमात गेली आहे. पवार यांच्या दौर्‍यामुळे जोमात येणार का अशी चर्चा होत आहे. पंढरपूर तालुक्यातील शहर व तालुका अध्यक्षपद खा. विजयसिंह मोहिते पाटील गटातील कार्यकर्त्याना देण्यात आले आहे. यामुळे पदाधिकार्‍यात नाराजी पसरली आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणूकीत सत्तांतर घडले. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र निवडणूकीत अनेकजण पराभूत झाले. निवडणूकीनंतर राष्ट्रवादी कॉंगेसचे मातब्बर नेते माजी आ. सुधाकरपंत परिचारक, आ. भारत भालके यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ सोडली. यामुळे राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्ते आ. भालके व परिचारक यांच्या बरोबर बाहेर पडले. यामुळे पक्षास मोठा हादरा बसला. गेल्या दोन वर्षात पक्षांकडून म्हणावे तसे काम झाले नाही. पक्ष कोमात असल्याची चर्चा होत होती.
लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालीका व नगरपरिषद निवडणूक होणार असल्याने या निवडणूकीत यश मिळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आ. अजित पवार यांनी सोलापूर जिल्हयात दौरे सुरू करून मेळावे घेण्यास सुरवात केली आहे. या माध्यमातून पुन्हा पक्ष बांधणीस सुरवात झाली आहे. गेल्या वर्षी पासून पंढरपूर शहर व तालुका अध्यक्षपद रिक्त होते हि दोन्ही पदे भरण्यात आली आहेत. पंढरपू तालुका अध्यक्षपदी ऍड. दिपक पवार तर शहर अध्यपदी दिपक वाडदेकर यांची निवड करण्यात आली आहे. पवार, वाडदेकर खा. विजयसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक आहेत. दोन्ही पदे मोहिते पाटील गटाला गेल्यामुळे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज आहेत.
मेळाव्यात अजित पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यावर सत्तेची गोचीडे गेली अशी टिका करून पक्ष सोडून गेलेल्यांना आता पुन्हा संधी नाही असे सांगितले. आ. अजित पवार सोलापूर जिल्हयात पक्षास किती उभारी देवू शकतात हे पाहणे गरजेचे आहे.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in सोलापूर (111 of 118 articles)


  =अमृतवाणीच्या दुसर्‍या दिवशी ऍम्फि थिएटर भरगच्च= सोलापूर, [२२ ऑक्टोबर, प्रतिनिधी] - मनात कोणताही हेतू, अपेक्षा न ठेवता केलेली भक्तीच ईश्‍वराला ...