Home » सोलापूर » तिसर्‍या दिवशीही बँकांसमोर मोठ्या रांगा

तिसर्‍या दिवशीही बँकांसमोर मोठ्या रांगा

hindustan-resolution-currency-exchange-sbi-solapurवार्ताहर,
[सोलापूर, दि. १२ नोव्हेंबर ] –
मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर गुरूवारपासून बँकांसमोर रद्द केलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि बँकेत नोटा भरण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. तीच परिस्थिती शनिवारी राहिली. नागरिकांना नोटांच्या तुटवड्यामुळे पैसे हातात मिळेनात. त्यामुळे बँकांसमोरील गर्दी हटेना आणि करन्सी पुरेना अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून प्रत्येक बँकेत नागरिकांना देण्याइतक्या नोटाच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नागरिकही वैतागून चालले आहेत.
एटीएमची संख्या वाढली
शुक्रवारी स्टेट बँक ऑफ इंडिया व अन्य काही बँकांचीच एटीएम चालू राहिली होती. शनिवारी मात्र बँक ऑफ इंडियाचेही एटीएम सुरू झाली आहेत. आता हळूहळू एटीएम चालू होण्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे बँकेतून पैसे काढण्याचा बँकावरील ताण कमी होत आहे. परंतु नोटा बदलून घेण्यासाठी मात्र बँकेत जावे लागत असल्याने बँकांमधील गर्दी मात्र कमी होत नाही. काही ठिकाणी कॅश डिपॉझिटर यंत्रणा असूनही त्या काही प्रमाणात बंद आहेत.
सहकारी बँकांकडून काही प्रमाणात वाटप सुरू
हजार आणि पाचशेच्या नोटा बंद झाल्यानंतर सहकारी बँकांमधून केवळ ५०० आणि हजाराच्या नोटा भरून घेण्यात येत होत्या. गुरूवार शुक्रवारी हे दोन्हीही दिवस खात्यावर रक्कम भरून घेण्यात येत होती.
या बँकेतून काहीही रक्कम दिली जात नव्हती. शनिवारी मात्र या संदर्भात बँकेशी संपर्क साधला असता काही प्रमाणात पैसे देण्याचे काम सुरू झाल्याचे सांगण्यात आले. या सहकारी बँकांना स्टेट बँकेकडून दोन दिवस १००, ५०, २० आणि १० च्या नोटाच मिळाल्या नसल्याने दोन दिवस पैसे काढण्यात आले नाहीत. शनिवारी काही बँकांनी आपल्याकडे जमा झालेली रक्कमेतून ग्राहकांना पैसे देण्यास सुरूवात करण्यात आली आहे, अशी माहिती मिळत आहे. मात्र ती फारच लिमिटेड पडत आहे.
नव्या नोटा मिळाल्या तरी सुट्या पैशाची अडचण आहेच
बँकांमधून आता नव्या दोन हजार, पाचशेच्या नोटा मिळत आहेत. त्यामुळे बाजारात आता पैसा येईल. मात्र ज्यांना या नव्या नोटा मिळाल्या आहेत त्यांना सुट्या पैशांचा प्रश्‍न उभा रहात आहेच. त्यामुळे नागरिक आता सुट्या पैशांचीच अधिक मागणी करीत आहेत. परंतु आता बँकांमधूनही सुट्या पैशाची चणचण निर्माण होत आहे. हा सगळा सुटा पैसा बाजारात गेला आहे. तो पुन्हा जमा होऊन बँकेत जमा होणेही तितकेच आवश्यक असल्याचे मतही व्यक्त करण्यात येत आहे.

सहकारी बँकांना २ हजाराच्या नोटा : मिणीयार
गेल्या तीन दिवसांपासून सहकारी बँकांच्या ग्राहकांना मात्र अधिक त्रास सहन करावा लागला आहे. कारण सहकारी बँकांमधून केवळ हजार आणि पाचशेच्या नोटा जमा करून घेण्यात आल्या आहे. या बँकांकडे कमी रकमेच्या नोटा होत्या तेवढा ग्राहकांना दिल्या आहेत. मात्र आता पैसे काढणार्‍या खातेदारांना पैसे देण्यासाठी सहकारी बँकांकडे पैसाच नव्हता. स्टेट बँकेनेही त्यांना गेले तीन दिवस नवीन नोटा दिल्या नाहीत. शनिवारी मात्र स्टेट बँकेने सहकारी बँकांना नवीन २ हजारांच्या नोटांचे वाटप केल्याची माहिती नागरी बँक असोसिएशनचे सदस्य राज मिणीयार यांनी तरूण भारतशी बोलताना दिली. प्रत्येक बँकेला १० लाख रूपये दिले आहेत. मात्र ही रक्कम पुरेशी नसल्याचेही ते म्हणाले. कारण एका ग्राहकाला १० हजार रक्कम काढता येणार आहे. त्यामुळे ही रक्कम १०० ग्राहकांना पुरू शकते. तसेच ज्या बँकेच्या शाखा अधिक आहेत त्यांना तर खूप मोठी अडचण आहे, असेही मिणीयार म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 13 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in सोलापूर (88 of 119 articles)


  = हाती घ्याल ते तडीस न्या! कर वसुलीसाठी आयुक्तांची निर्णायकी = विशेष प्रतिनिधी सोलापूर, दि. १२ नोव्हेंबर - चलनामधून बाद ...