संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २४ जून – संसदेचे पावसाळी…

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना

नवी दिल्ली, २४ जून – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज…

मानसरोवर भाविकांना चीनने प्रवेश नाकारला

मानसरोवर भाविकांना चीनने प्रवेश नाकारला

►रस्ता खराब असल्याचे कारण पुढे केले, गंगटोक, २४ जून…

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

►३६ विकसित देश घेणार झाडाझडती ►मुंबई हल्ल्यानंतर टाकले होते…

भारत हा सद्‌वर्तनी, सद्‌गुणी लोकांचा देश

भारत हा सद्‌वर्तनी, सद्‌गुणी लोकांचा देश

►डोनाल्ड ट्रम्प यांनाही सत्यता मान्य, वॉशिंग्टन, २४ जून –…

भारताला मिळणार २२ गार्डियन ड्रोन्स

भारताला मिळणार २२ गार्डियन ड्रोन्स

►पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा, नवी दिल्ली, २३ जून –…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

►परिवहन विभागाची हायकोर्टात माहिती, मुंबई, २४ जून – शाळेऐवजी…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:05 | अस्त: 19:19
अयनांश:
Home » सोलापूर » न.प.निवडणुकीत मित्रपक्षांना बरोबर घेणार: परिचारक

न.प.निवडणुकीत मित्रपक्षांना बरोबर घेणार: परिचारक

=नगर परिषद निवडणूक=
prashant-paricharakपंढरपूर, [२१ ऑक्टोबर] – आगामी पंढरपूर न.पा.ची निवडणूक सर्व मित्रपक्ष, संघटनांना बरोबर घेवून शहर विकास आघाडीच्या झेंड्याखाली लढविली जाईल. इच्छुकांनी उमेदवारी अर्ज २४ ऑक्टोंबरपर्यंत पांडुरंग भवन येथे आणून द्यावेत, असे आवाहन आ. प्रशांत परिचारक यांनी केले.
इसबावी येथील श्रीराम मंगल कार्यालयात न.पा. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चर्चा करण्यासाठी शहर विकास आघाडम बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना आ. परिचारक बोलत होते. यावेळी माजी आ.सुधाकरपंत परिचारक, शहर विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक, युवक नेते प्रणव परिचारक, माजी नगराध्यक्ष बाबासाहेब आधटराव, नगरसेवक दगडू धोत्रे, लक्ष्मण शिरसट, माजी नगरसेवक विलास साळुंखे, प्रताप गंगेकर, नागेश गंगेकर, सतिश मुळे, इक्बाल बागवान, कमलताई तोंडे आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. शहर विकास आघाडीच्या झेंड्याखाली मित्रपक्ष, संघटनांना बरोबर घेवून आघाडी करून निवडणूक लढवावी असा सूर अनेकांनी काढला. यावेळी मार्गदर्शन करताना माजी आ. सुधाकरपंत परिचारक म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. यामुळे आता आ. प्रशांत परिचारक यांनी योग्य निर्णय घ्यावा.
पुढे बोलताना आ. प्रशांत परिचारक म्हणाले, विधान परिषद निवडणुकीत मला सर्व पक्षांनी मदत केली. यामुळे विजय संपादन झाला. न.पा. निवडणुकीत यश मिळविण्यासाठी सर्व मित्रपक्ष, संघटनांना बरोबर घेवून शहर विकास आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढविली जाईल. भाजप, शिवसेना, रिपाइंशी चर्चा करून त्यांना जागा दिल्या जातील. इच्छुकांनी आपले अर्ज २४ ऑक्टोंबरपर्यंत पांडुरंग भवन येथे आणून द्यावेत. निवडणूक लढविण्याची जागा राखीव असल्यास अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र, झेरॉक्स प्रत जोडावी असे आवाहन केले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
समविचारी पक्षांशी आघाडी करून निवडणूक लढविणार : आ.भालके
bharat-bhalkeनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर चर्चा करून आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविली जाईल. इच्छुकांनी आपले अर्ज महावीर नगर येथील संपर्क कार्यालयात आणून देण्याचे आवाहन आ. भारत भालके यांनी केले.
पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चर्चा करण्यासाठी आ.भारत भालके गटाची बैठक निवडक कार्यकर्त्यासह झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीत कार्यकर्ते जोमात दिसले मात्र नेत्यात निरुउत्साह दिसून आला. नगरसेवक पदासाठी अनेकांची नावे चर्चेत आली तर नगराध्यक्षपदासाठी युवराज पाटील, नामदेव भुईटे, संतोष नेहतराव, किरण घाडगे यांची नावे चर्चेत होती.
पंढरपूर नगरपरिषद निवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास चार दिवस राहिल्यामुळे उमेदवार ठरविण्यासाठी बैठक घ्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांतून होत होती म्हणून आ.भारत भालके यांनी गटाची बैठक बंगल्यावर घेतली. यावेळी आ. भारत भालके, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठल कारखान्याचे संचालक राजुबापू पाटील, युवराज पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, दिनकर पाटील, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ, निवडक कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत इच्छुक नगरसेवक व नगराध्यक्षपदा बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्त्यानी उमेदवारीचे मागणी करून कशा पध्दतीने निवडणूक लढविता येईल याबाबत मते मांडली.
काही जणांनी राष्टवादी कॉग्रेसबरोबर आघाडी करून कॉंग्रेसच्या पंजा या चिन्हावर निवडणूक लढवावी, असे मत मांडले. सर्व कार्यकर्त्यांचे विचार ऐकल्यानंतर या निवडणुकीत मोठया प्रमाणात खर्च येणार असल्याने नेत्यांनी तुम्ही लक्ष्मी दर्शन करण्यास तयार असाल तर आम्ही येवू असे अश्‍वासन दिले.
एकंदरीत बैठकीत नेत्यात निरुत्साह दिसून आला. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आ.भारत भालके यांच्या कार्यालयात अर्ज आणून द्यावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in सोलापूर (119 of 121 articles)


=सरासरीच्या ३९६ मिमी पाऊस= सोलापूर, [२१ ऑक्टोबर] - यंदाचा पावसाळा अंतिम टप्यात असून, सप्टेबंरअखेर सरासरीच्या ८० टक्के पाऊस झाला. २१ ...