संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २४ जून – संसदेचे पावसाळी…

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना

नवी दिल्ली, २४ जून – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज…

मानसरोवर भाविकांना चीनने प्रवेश नाकारला

मानसरोवर भाविकांना चीनने प्रवेश नाकारला

►रस्ता खराब असल्याचे कारण पुढे केले, गंगटोक, २४ जून…

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

►३६ विकसित देश घेणार झाडाझडती ►मुंबई हल्ल्यानंतर टाकले होते…

भारत हा सद्‌वर्तनी, सद्‌गुणी लोकांचा देश

भारत हा सद्‌वर्तनी, सद्‌गुणी लोकांचा देश

►डोनाल्ड ट्रम्प यांनाही सत्यता मान्य, वॉशिंग्टन, २४ जून –…

भारताला मिळणार २२ गार्डियन ड्रोन्स

भारताला मिळणार २२ गार्डियन ड्रोन्स

►पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा, नवी दिल्ली, २३ जून –…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

►परिवहन विभागाची हायकोर्टात माहिती, मुंबई, २४ जून – शाळेऐवजी…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:05 | अस्त: 19:19
अयनांश:
Home » सोलापूर » फटाका दुकानांना ग्राहकांची प्रतीक्षा

फटाका दुकानांना ग्राहकांची प्रतीक्षा

=प्रदुषणमुक्त दिवाळीच्या आवाहनाचा परिणाम =
dsc_0519-1वार्ताहर
सोलापूर, [दि.२६ ऑक्टोबर ] – सोलापूर शहरातील चार पुतळा पाठीमागील परिसर, आसार मैदान, होम मैदान, कोंतम चौकातील ठोक विक्रेते, पूर्व भागातील विविध ठिकाणी फटाके दुकाने विक्रीसाठी सज्ज झाली आहेत. मात्र फटाके खरेदीपासून ग्राहक अद्याप लांबच असल्याचे चित्र बाजारात दिसत आहेत.
दिवाळीचे प्रामुख्याने चार दिवस असतात. त्यामध्ये नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज यांचा समावेश आहे. यावर्षी बुधवारी वसुबारस झाले. त्यानंतर गुरूवारी कोणतीही महत्त्वाची तिथी तथा दिवस नाही. शुक्रवारी धनत्रयोदशी आहे आणि शनिवारी नरक चतुर्दशी आहे आणि त्याच दिवसापासून दिवाळीचे महत्त्वाचे दिवस सुरू होतात. त्यामुळे आणखीन दोन दिवस तरी फटाक्यांच्या दुकानात फारशी गर्दी होईल असे वाटत नाही, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. शुक्रवारी संध्याकाळी प्रामुख्याने फटाक्यांचा बाजार चांगला बहरेल असा विक्रेत्यांचा अंदाज आहे. त्यामुळे दुकाने थाटून तयार असली तरी शुक्रवारनंतरच फटाके खरेदी होईल असे मानण्यात येत आहे.
दिवाळीच्या सणात फटाके हा बच्चे कंपनीचा अतिशय आवडता कार्यक्रम असतो. त्यामुळे कपडे, फराळ साहित्य झाल्यानंतर साहजिकच फटाक्यांकडे नागरिकांचे लक्ष जाते. परंतु गेल्या अनेक वर्षापासून फटाके विक्रीचा अभ्यास करता फटाके विक्री आणि ते उडविणे कमी कमी होत चालले आहे. तसेच फटाके तयार करण्याच्या वस्तूंमध्येही प्रचंड वाढ होत असल्याने ते महागही होत चालले आहे. वाढत्या महागाईच्या काळात क्षणिक आनंदासाठी हजारो रूपये खर्च करण्यासही नागरिक तयार होत नसल्याचे दिसून येत आहे.
प्रदुषणमुक्त दिवाळी अभियान
गेल्या चार-पाच वर्षांपासून सगळीकडेच प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन विविध सामाजिक संस्था, पक्षी-प्राणी मित्र, पर्यावरणवादी, शाळांमधून करण्यात येत आहे. फटाके न फोडता दिवाळी साजरी करण्याचे आवाहन होत आहे. याचाही फटका फटाके विक्रेत्यांना होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत सुमारे 40 टक्क्यापेक्षाही अधिक विक्री घटली असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. याही वर्षी दिवाळी पूर्वीपासूनच पालकांपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वच जण विद्यार्थ्यांना फटाके मुक्त दिवाळीचे आवाहन करीत आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये चांगली जनजागृती होऊन फटाक्यांपासून चार हात दूरच राहणे विद्यार्थी पसंत करीत आहेत.
फटाक्यांच्या मोठया आवाजामुळे वयोवृद्ध, हृदयविकाराच्या रूग्णांना अधिक त्रास होतो. तसेच फटाके फोडण्याच्या नादात अनेकवेळेला दुर्घटनाही घडत असल्याचे दिसून येते. यालाही फाटा देण्यासाठी फटाके न फोडण्याचे आवाहन केले जात आहे. फटाके फोडण्यासाठी फटाक्यांच्या आवाजाच्या मर्यादेवरही प्रदुषण नियंत्रण बंधने आणली आहेत. त्यामुळे ठराविक डेसिबल पेक्षा मोठया आवाजाचे फटाक्यांचे आता उत्पादनही कारखानदारांकडून होत नसल्याने मोठ्या आवाजाची आवड असणारा वर्गही आता फटाके खरेदीपासून दूर होत असल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.
चिनी मालावर बहिष्कार
उरी येथील घटनेनंतर संपूर्ण भारत वर्षात चीनी उत्पादनावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फटाके व्यवसायातही चिनी उत्पादने आहेत. प्रतिवर्षी ती बाजारात येत होती. परंतु यावर्षी मुंबईसह विविध मोठ्या शहरातूनही चिनी मालावर व्यापार्‍यांनीच बहिष्कार टाकल्याने हा मालही यावर्षी बाजारात फारच कमी प्रमाणात आला आहे. त्याचा परिणाम म्हणूनही किंमतीत वाढ झाली असल्याचे एका व्यापार्‍याने सांगितले.
फॅन्सी अ‍ॅटमना मागणी
मोठ्या आवाजाच्या फटाक्यांच्या उत्पादनाला बंदी, आवाजाचे फटाके न फोडण्याचे होणारे आवाहन यामुळे अलिकडे फॅन्सी फटाक्यांना अधिक मागणी होत आहे. त्यामध्ये फुलबाज्या, भुईचक्कर, झाड, नागगोळी, अशा अ‍ॅटमना अधिक मागणी होत आहे. परंतु एकूणच फटाक्यांची मागणी मात्र घटत आहे.

शेअर करा

Posted by on Oct 27 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in सोलापूर (100 of 121 articles)


=अजीत पवारांची सोलापुरात रोखठोक मुलाखत= विशेष प्रतिनिधी सोलापूर, [दि. २५ ऑक्टोबर] - लोकांच्या प्रश्‍नांची तड लागली पाहिजे, त्याला नाहक हेलपाटे ...