कायदा मोडणार्‍यांना संरक्षण देऊ नका : सर्वोच्च न्यायालय

कायदा मोडणार्‍यांना संरक्षण देऊ नका : सर्वोच्च न्यायालय

►गोरक्षणाबाबत खंडपीठासमोर सुनावणी , नवी दिल्ली, २१ जुलै –…

व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित

व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित

►उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २१ जुलै –…

रामनाथ कोविंद मंगळवारी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारणार

रामनाथ कोविंद मंगळवारी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारणार

►प्रणव मुखर्जी यांना उद्या संसदेत निरोप , तभा वृत्तसेवा…

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

►अमेरिकेचे दोन दिवसात दोन धक्के, वॉशिंग्टन, २१ जुलै –…

चिनी प्रसारमाध्यमे म्हणतात, स्वराज संसदेत खोटे बोलल्या

चिनी प्रसारमाध्यमे म्हणतात, स्वराज संसदेत खोटे बोलल्या

►चीनची भारताला पुन्हा युद्धाची धमकी, बीजिंग, २१ जुलै –…

शरीफ यांच्याविरोधातील सुनावणी संपली

शरीफ यांच्याविरोधातील सुनावणी संपली

►आता निकालाची प्रतीक्षा, इस्लामाबाद, २१ जुलै – पनामा पेपर्स…

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

►मुंबईतील दीड लाख शेतकर्‍यांना कर्ज माफी ►२८७ कोटी वाटले,…

विश्‍वजित कदम, अविनाश भोसले यांच्या कार्यालयांवर धाडी

विश्‍वजित कदम, अविनाश भोसले यांच्या कार्यालयांवर धाडी

►आयकर विभागाची कार्यवाही, पुणे, २१ जुलै – उद्योजक अविनाश…

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

मुंबई, १८ जुलै – यापुढे जर शेतकर्‍यांना ऊस लागवड…

इतिहास घडवणारी भेट

इतिहास घडवणारी भेट

अनय जोगळेकर | इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले…

दलित की भारतीय?

दलित की भारतीय?

रमेश पतंगे | खरे सांगायचे, तर आता राजकारणातून दलित…

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | जमाते पुरोगामीची देशातल्या…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:03 | अस्त: 19:01
अयनांश:
Home » सोलापूर » बार्शीला दत्तक घेवून कायापालट घडवू : मुख्यमंत्री फडणवीस

बार्शीला दत्तक घेवून कायापालट घडवू : मुख्यमंत्री फडणवीस

♦बार्शीच्या विकासासाठी पाहिजे तितका विकासनिधी
♦भाजपाच्या माध्यमातून नगरपालिका डिजिटल करणार,
प्रतिनिधी
बार्शी, २३ नोव्हेंबर –
cm-in-barshiभाजप, रासप, रिपाइंच्या ताब्यात सत्ता दिल्यास बार्शी दत्तक घेवून विकासासाठी पाहिजे तितका निधी देवून नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा कायापालट घडवू असे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. भाजप, रासप, रिपाइं उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित शहरातील पांडेचौकात सकाळी ११.३० वाजता झालेल्या विराट गर्दीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी राज्याचे सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष शहाजीराव पवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र मिरगणे, राजकुमार पाटील, जिल्हा सरचिटणीस धनंजय जाधव, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ऍड.वासुदेव ढगे, रासपचे संतोष ठोंगे, रिपाइंचे विरेंद्र कांबळे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
अतिशय उत्साहाने प्रचंड गर्दीत झालेल्या या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजेंद्र मिरगणे यांनी बार्शी शहर दत्तक घेण्याच्या विनंतीला तसेच शहरातील गरजूंना आणखी पाच हजार घरे प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर करावी या मागणीला मनापासून प्रतिसाद दिला. बार्शीतील सर्वचं झोपडपट्टी धारकांना तसेच कच्चे घर असलेल्या प्रत्येकाला प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्के घर मिळेल अशी हमी त्यांंनी दिली. बार्शीतील विकासकामांच्या नावावर यापुर्वी सत्ताधारी व विरोधकांनी कंत्राट कामांचे बजट वाढवून ६० आणि ४०% वाटून घेण्याच्या प्रवृत्तीवर मुख्यमंत्र्यांनी टिका केली. यापुढे नगरपालिकांचा कारभार डिजिटल करणार पालिकेत ई-गर्व्हनस आणणार. एका महिन्यात टेंडर काढून शंभर दिवसात वर्कऑर्डर देवून पुर्णपणे ई-टेंडरींग केले जाईल असे सांगितले. त्याचप्रमाणे कचरा विलगीकरण करुन त्यावर प्रक्रीया करुन शासनाने तयार केलेल्या खताला शेतकर्‍यांची सर्वाधिक पंसती लाभल्याचे सांगत राज्यातील सर्व पालिकांच्या माध्यमातून हा प्रकल्प पुढे नेला जाईल असे सांगितले. शहरातील मालमत्तांचे यापुढे सॅटॅलाईटवरुन मॅपिंग करुन योग्य कर निरधारण केले जाईल. पालिकांच्या कारभारात पारदर्शिता, गतिमानता आणि गुणवत्ता आणली जाईल. त्यामुळे नागरिकांची फसवणुक आणि भ्रष्टाचार टळेल असे मुख्यमंत्री म्हणाले. गुंडागर्दीचे राजकारण बार्शीत चालू देणार नाही. बार्शीकरांनी निर्भयपणे मतदान करावे. यापुढे बार्शीतील गुंडागर्दी चिरडून काढली जाईल असे सांगितले. यापुर्वीच्या सरकारने शहरांच्या विकासाचे नियोजन केले नाही. त्यामुळे शहरांमध्ये गरीबी, बेरोजगारी वाढून शहरे बकाल झाली. आज राज्यात निम्मी लोकसंख्या शहरात आहे. देशातही शहरीकरण वाढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने स्मार्ट सिटी, अमृत योजना, मुद्रा योजना, किमान कौशल्य विकास सारखे कार्यक्रम आखले. राज्यात मुद्रा योजनेत सर्वात जास्त प्रकरणे मंजूर झाली आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व शहरे स्वच्छ भारत मिशनअंतर्गत येत्या दीड वर्षात पुर्णपणे हगणदारीमुक्त होतील असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. नरेंद्र मोदी सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे तीनलाख कोट रुपये बँकांमध्ये जमा झाले. दशहतवादी, नक्षलवाद्यांनी गोळा केलेला हजारो कोटी रुपयांचा काळा पैसा एका रात्रीत वाया गेला. कर चुकवेगिरी करुन पैसा गोळा करणार्‍यांना मोठा हदरा बसला. पाकिस्तानमध्ये भारतीय बनावट नोटा छापण्याचा धंदा बंद झाला. या निर्णयामुळे सर्व सामान्यांचे हित मोदी सरकारने जपले आहे. येत्या पंन्नास दिवसात काही अडचणी आल्या तरी येत्या पंन्नास वर्षात या देशाचे कल्याण होणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी सहकार मंत्री देशमुख यांनी राजेंद्र मिरगणे यांनी बार्शीसाठी अतिशय तळमळीने केलेल्या कामाचा उल्लेख करत शहराता सत्ता नसताना भाजपने मोठी कामे केली आहेत. मतदारांनी परिवर्तन घडवावे असे आवाहन केले. यावेळी राजेंद्र मिरगणे यांनी राष्ट्रवादी व शिवसेनेवर कडाडून टिका केली. मिरगणे म्हणाले मराठा समाजात चांगले नेतृत्व निर्माण होवू नये यासाठी बारबोले बंधूना उमेदवारी शिवसेना नेतृत्वाने नाकारली. त्याचप्रमाणे आजपर्यंत मराठा व मुस्लिम समाजावर दाखल झालेल्या ऍट्रासिटीजला कोण जबाबदार आहे असा सवाल केला. पालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांचा ६० आणि ४०% भागीदारीचा एक कलमी कार्यक्रम सुरु असल्याची टिका त्यांनी केली. यावेळी संगमेश्‍वर भडुळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.आश्‍विनी बुडूख, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.पद्मजा काळे, तालुकाध्यक्ष बिभीषण पाटील, शहराध्यक्ष आश्‍विन गाढवे, प्रा.किरण गाढवे, सौ.शोभा बुटे, श्रीमती उज्जवला जाधव, जॉन चोप्रा, अतिश भिसेन, शशिकांत पवार, जांहगिर शेख, अशु सय्यद तसेच सर्व उमेदवार, पदाधिकारी व नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Posted by on Nov 24 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in सोलापूर (91 of 123 articles)


वार्ताहर, [सोलापूर, दि. १२ नोव्हेंबर ] - मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून रद्द ...