Home » सोलापूर » भाजप नगराध्यक्षपदाच्या जागेवर ठाम

भाजप नगराध्यक्षपदाच्या जागेवर ठाम

=आ. परिचारक यांच्या भूमिकेकडे लक्ष, आ.भारत भालके गटात अद्याप शांतता=
प्रतिनिधी
vijaykumar-deshmukhपंढरपूर, [दि. २७ ऑक्टोबर ] – पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.मोर्चे बांधणीला वेग आला आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख व शहर विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक यांची पंढरपुरात बैठक झाली. यामध्ये पालकमंत्री देशमुख यांनी पुन्हा नगराध्यक्ष भाजपचा असेल या भूमिकेवर ठाम राहिले.यामुळे आता आ.प्रशांत परिचारक यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.
गेली अडीच वर्षे वगळता २५ वर्षापासून नगरपरिषदेवर आ.प्रशांत परिचारक गटाचे वर्चस्व आहे.मात्र शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाही.यामुळे नागरिकात नाराजी आहे.अडीच वर्षे आ.भारत भालके गटाने सत्तेत काम केली मात्र त्यांनी संथ गतीने विकास केला.शहरात खड्ड्याचे व धुळीचे साम्राज्य असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.त्यातच नगरपरिषदेची निवडणूक सुरू झाली.यामुळे इच्छुक उमेदवारांनी नेत्यांच्या गाठीभेटी घेउन उमेदवारीची मागणी केली.जागा ३४ व इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे आ.प्रशांत परिचारक व आ.भारत भालके गटाने इच्छुकांकडून अर्ज घेउन नंतर मुलाखती घेतल्या.
विधान परिषद निवडणूकीत आ.प्रशांत परिचारक यांनी prashant-paricharakभाजपकडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढविली.यात त्यांना यश आले.आ.परिचारक अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी भाजप नेत्यांशी त्यांचा चांगला संंबंध आहे.ते भाजपचे म्हणून ओळखले जातात.यामुळे पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा नगराध्यपदाचा उमेदवार व नगरसेवकांच्या दहा जागा असा प्रस्ताव खा.शरद बनसोडे यांनी आ.परिचारक गटाकडे ठेवला.या प्रस्तावावर मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची आ.प्रशांत परिचारक यांच्या बरोबर चर्चा झाली.या बैठकीत नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाजपचा असेल यावर ठाम निर्णय घेण्यात आला.
या नंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख व शहर विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक यांची पंढरपूरात बैठक झाली या बैठकीत पालकमंत्री देशमुख यांनी नगराध्यपदाचा उमेदवार भापचा असेल मात्र दहा नगरसेवकांच्या जागेबाबत तडजोड स्थानिक पदाधिकारी करतील असे सांगितले.या नंतर भाजपचे सरचिटणीस बाबा बडवे व शहर विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक यांची बैठक झाली. जेष्ठ नेते बाबा बडवे, शहराध्यक्ष सौदागर मोळक यांनी उमेश परिचारक यांच्याकडे भाजपचा नगराध्यक्ष व दहा जागेचा प्रस्ताव दिला.या प्रस्तावावर परिचारक गट निर्णय घेणार आहेत.यामुळे आ.परिचारक यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
पंढरपूर नगरपरिषदेकडे भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.निवडणुकीची सूत्रे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहेत. दरम्यान आ. भालके गटात अद्यापही शांतता असून इच्छुक नगरसेवकांची धावपळ सुरु आहे. अद्याप काँग्रेस-राष्ट्रवादीकडून चर्चा झाली नसल्याचे समजते. यामुळे आघाडी होणार की स्वबळावर लढणार याबाबतचा निर्णय झाला नाही.

शेअर करा

Posted by on Oct 28 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in सोलापूर (97 of 119 articles)


  =प्रदुषणमुक्त दिवाळीच्या आवाहनाचा परिणाम = वार्ताहर सोलापूर, [दि.२६ ऑक्टोबर ] - सोलापूर शहरातील चार पुतळा पाठीमागील परिसर, आसार मैदान, होम ...