Home » सोलापूर » मनपाकडे शासनाचे ४७७ कोटी शिलकेत

मनपाकडे शासनाचे ४७७ कोटी शिलकेत

=निधी खर्च करण्याबाबत प्रशासन उदासीन, सत्ताधारी बेफिकीर=
=नगरसेवक सुरेश पाटील, नरेंद्र काळे यांचा आरोप=
suresh-patil-bjp-solapur1विशेष प्रतिनिधी
सोलापूर, [दि. २५ ऑक्टोबर] – नेहमीच दिवाळखोरीत सोलापूर महानगरपालिका आहे, अशी कुरकूर मनपा प्रशासन करते, पण शासकीय अनुदान प्राप्त होऊनही निधी खर्च होत नाही, ही वस्तुस्थिती असून गत ७ वर्षात केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त अनुदानातील १३०२ कोटीपैकी ४७७ कोटी रुपये अद्याप शिल्लक आहेत. यामध्ये स्मार्ट सिटीचे वगळता निव्वळ १९४.७७ कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत आहेत, अशी धक्कादायक माहिती भाजपा नगरसेवक सुरेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
विशेष म्हणजे भाजपा सरकारने सोलापूर मनपासाठी काय दिले, अशी तक्रार काँग्रेसजण करतात, पण या दोन वर्षात भाजपा सरकार आल्यापासून ७५८ कोटी रुपये मिळाले आहेत. परंतु मनपा प्रशासन आणि पदाधिकारी यांच्या कुरघोडीमुळे अनुदान खर्ची न पडता परत जाण्याची भीतीही पाटील यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे सध्या १९४ कोटी रुपये शिल्लक आहेत आणि दुसरीकडे शहर विकासापासून वंचित राहिले आहे, यासाठी सत्ताधारी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप पाटील यांनी याप्रसंंगी केला. तसेच भविष्यात आणखी २ हजार कोटी रुपये शासनाकडून प्राप्त होणार आहेत.
गत दोन वर्षापैकी काँगे्रसच्या पूर्वीच्या सरकारने सोलापूर मनपाला ५४४ कोटी दिले आहेत. आणि अवघ्या दोन वर्षात केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार काळात महापालिकेला ७५८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये २८३ कोटीचा निधी स्मार्ट सिटीचे आहेत. याशिवाय इतर रस्ते अनुदान, पाणी पुरवठा, अमृत योजना, नगरोत्थान योजना, एलबीटी थकबाकीपोटी १९९ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. डीपीडीसी तसेच १४ व्या वित्त आयोगातील मिळालेल्या ७१ कोटी निधींपैकी अन्य निधीही खर्च झालेला नाही, अशी माहिती विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांनी याप्रसंगी बोलताना दिली.
पालकमंत्री विजय देशमुख यांनी परत गेलेला १९ कोटींचा निधी पुन्हा प्राप्त करून दिला. पण तो निधीदेखील अजून खर्च झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. या संदर्भात डिसेंबरमध्ये आंदोलन करण्याचाइशारा पाटील, काळे यांनी याप्रसंगी दिला.

शेअर करा

Posted by on Oct 26 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in सोलापूर (99 of 118 articles)


  =• आक्षेप घेणार्‍यांमध्ये तीन माजी महापौर= =• कोल्हेंच्या प्रभागावर राष्ट्रवादीचा आक्षेप= विशेष प्रतिनिधी सोलापूर, [दि. २५ ऑक्टोबर] - सोलापूर महापालिका ...