Home » सोलापूर » मनपा निवडणुकीसाठी नवीन प्रभागात चाचपणी

मनपा निवडणुकीसाठी नवीन प्रभागात चाचपणी

=इच्छुक उमेदवारांची प्रभागात अशीही स्वारी =
=दिवाळीत साधली  प्रचाराची प्राथमिक फेरी=
smcविशेष प्रतिनिधी,
सोलापूर [१ नोव्हेंबर -]
दसरा, दिवाळीची पर्वणी साधून नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांनी मनपा निवडणुकीच्या प्रचाराची प्राथमिक फेरी पार पाडली. दिवाळीत ही पर्वणी साधल्यामुळे स्वारी भलत्याच खुषीत आहेती.
७ ऑक्टोबरला मनपा निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाले. त्याबरहुकूम इच्छुकांनी आपला मोर्चा नव्या प्रभागात  वळवला आहे. उपमहापौर प्रवीण डोंगरे, गटनेते आनंद चंदनशिवे, अनिल पल्ली यांच्यासह काही नगरसेवकांचे प्रभाग तीन ते चार ठिकाणी  विखुरले गेले आहेत. शिवाय आरक्षणही अनपेक्षित असे आले आहे.  त्यामुळे  या नव्या संकटावर मात करण्यासाठी इच्छुक मंडळी सरसावली आहेत. दसर्‍यापासून तशी पर्वणी साधून कालच्या दिवाळीपपर्यंत नव्या प्रभागाची ओळख करून घेतली. तत्पूर्वी काही बहाद्दरांनी या नव्या प्रभागात जुन्या प्रभागात सुचवलेली कामे तिकडे नागरी सुविधांची आवयश्यकता अशी कारणे दाखवून विकास कामांचा बार उडवून दिला आहे. तर काही नगरसेवकांनी सभागृहनेते संजय हेमगड्डी यांना पत्र देऊन कामातील  बदलास मान्यता मिळवण्याची खटपट सुरू केली आहे. उपमहापौर प्रवीण डोंगरे प्र. ९ आणि १३ मधून लढण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसचे मनपा प्रतोद अनिल पल्ली यांनी नवीन प्रभागांचा अंदाज घेऊन आपली काँग्रेसच बरी असे मानून प्र. १३ ऐवजी प्र. ९ साठी पसंती दिली. गेल्या आठवड्यात यंत्रमाग संरक्षण समितीच्या बॅनरखाली भद्रावती पेठेतील समाज मंदिरात एक बैठकही घेतली. अक्कलकोट रोड पाणी टाकीजवळील यंत्रमाग संरक्षण समितीचे त्यांचे कार्यालय आतापासूनच गजबजू लागले आहे.
बसपाचे आनंद चंदनशिवे यांनी दिवाळी पर्वात ६५०० दिवाळी भेटकार्ड  नवीन प्रभाग क्र. ५ मधील सर्व ६५०० उंबर्‍यापर्यंंत पोहोचवले आहे. आपले नाव आणि पक्षाचे चिन्ह (हत्ती) दिवाळीच्या  शुभेच्छा पत्रांवर होते.  तसेच सध्या या प्रभागात नागरी समस्या कोणत्या  याचा शोध घेण्यासाठी बुधवार पेठ सध्याचा प्र.८ ऐवजी नवीन प्रभाग  ५ मध्ये दररोज सकाळी भेटीगाठी सुरू केल्या आहेत.  डोंगरे प्र. १३ मध्ये राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष कय्युम बुर्‍हाण यांच्या मार्फत मुस्लिम मतांचा कानोसा घेत आहेत. तसेच प्र. २१ मध्ये सुचवलेली कामे नवीन प्र. ९ मध्ये हस्तांतरण करण्याची योजना आखली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 2 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in सोलापूर (93 of 118 articles)


  =सहकारमंत्री देशमुख यांचा पवारांना टोला= वार्ताहर सोलापूर, [दि. १ नोव्हेंबर ] सहकार क्षेत्र इतके कोणाच्या ताब्यात होते, त्याची दुरवस्था काय ...