Home » सोलापूर » माझे काम म्हणजे एक घाव दोन तुकडे!

माझे काम म्हणजे एक घाव दोन तुकडे!

=अजीत पवारांची सोलापुरात रोखठोक मुलाखत=
dsc_0558-12विशेष प्रतिनिधी
सोलापूर, [दि. २५ ऑक्टोबर] – लोकांच्या प्रश्‍नांची तड लागली पाहिजे, त्याला नाहक हेलपाटे मारायला लावणे माझ्या स्वभावात नाही, काम होत असेल तर करणे नसेल स्पष्ट सांगणे होत नाही. माझे काम म्हणजे एक घाव दोन तुकडे. त्यामुळे अधिकारी असो व नागरिक यांची कधीच गैरसोय होऊ दिली नाही, या शब्दात अजीत पवारांनी गप्पांचा फड रंगवला.
निमित्त होते, गप्पा रोखठोक दादांशी! मंगळवारी रात्री ८ वाजता हॉटेल बालाजी सरोवर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पत्रकार राजा माने यांनी अजीत पवार यांची मुलाखत घेतली. अधिकार्‍यांना आपण संपूर्ण माहितीसह येण्याचा आपला आग्रह असतो, तसेच सर्व खात्याच्या प्रमुखांना पाचारण केल्यामुळे जनतेच्या विविध स्वरूपाच्या तक्रारींचा निपटारा होणे शक्य होते, हे अजीतदादांनी अधोेरेखित केले. ७० हजार कोटी जलसिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू असून त्याविषयी अधिक़ बोलणे उचित नाही, असे म्हणत याचभोवती त्यांची गप्पा रंगली. आम्ही केलेल्या कामाचे मार्केटिंग केले नाही. मात्र विरोधक़ांनी केवळ मला बदनाम करण्यासाठी याचा वापर केला. याची मोठी किंमत मला मोजावी लागली. विरोधकांनी डॅमेज निती वापरल्याचेही अजीत पवार म्हणाले.

शेअर करा

Posted by on Oct 26 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in सोलापूर (99 of 119 articles)


  =निधी खर्च करण्याबाबत प्रशासन उदासीन, सत्ताधारी बेफिकीर= =नगरसेवक सुरेश पाटील, नरेंद्र काळे यांचा आरोप= विशेष प्रतिनिधी सोलापूर, [दि. २५ ऑक्टोबर] ...