Home » सोलापूर » शाब्दींच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे महादेव पाटील पक्षात ‘एकाकी’

शाब्दींच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे महादेव पाटील पक्षात ‘एकाकी’

=अक्कलकोटच्या राजकारणात नवे समीकरण=

संगमेश जेऊरे

सोलापूर [दि. २२ ऑक्टोबर] – sidramppa-patil-akkalkotराजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रु नसतो याची प्रचिती सध्या अक्कलकोट तालुक्यातील मतदार राजांना येत असून, गेल्या सहा महिन्यात तालुक्यात अनेक राजकीय उलथापालथ झाला आहे. तर शाब्दींच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे महादेव पाटील पक्षात एकाकी पडल्याचे चित्र आहे. याचा परिणाम येत्या नगरपालिका निवडणूका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत दिसून येणार आहे. मात्र तालुक्यातील काही मातब्बर राजकीय नेते आपले अस्तित्व टिकविण्यासाठी तळ्यात – मळ्यात भूूमिका घेत सर्वपक्षीय मित्रत्वाचा संबंध प्रस्थापित करतानाचे चित्र आहे. तर सत्तेच्या साठीमारीत खुन खराबा, पोलिस कारवाईला कायमचा मुठमाती देण्यासाठी मतदार राजा सुज्ञ झाल्याची चर्चा सध्या गावच्या पारावर सुरु आहे.
आरंभ सहकार क्षेत्रातून…
ज्यांचा सहकार क्षेत्रावर वर्चस्व त्यांचा तालुक्यातील राजकारणावर हुकमत अशी कैक वर्षापासून समीकरण आहे. गत सहा महिन्यांपूर्वी डिसीसी बँकेच्या निवडणूकीत हाड वैरीचा शत्रुत्व असलेले माजी आ.सिद्रामप्पा पाटील, आ.सिध्दाराम म्हेत्रे हे डिसीसी बँक संचालक मंडळाच्या निवडणूकीत एकत्र आले. शिवानंद पाटील, आ.म्हेत्रे हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक झाले. तर अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदावर सिद्रामप्पा पाटील यांनी पुत्र संजिवकुमार पाटील यांनी विराजमान केला. आता दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक प्रक्रीया सुरू असून, दोन दिवसांपूर्वी भाजपाकडून उमेदवारी अर्ज सादर करताना भाजपा तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, dsc00029यशवंत घोंगडे यांच्या उपस्थित अर्ज सादर करण्यात आला. सिद्रामप्पा पाटील यांची यावेळची अनुपस्थिती तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे उमेदवारी दाखल करताना शिवानंद पाटील हे आ.सिध्दाराम म्हेत्रे यांच्यासोबत असल्याने नेमके पाटील घराणा भाजपा पक्षात कि आ.सिध्दाराम म्हेत्रे यांच्या पाठीमागे आहेत अजून स्पष्ट झालेला नाही. भाजपाकडून शिवानंद पाटील, संजीवकुमार पाटील हे जि.प.मंगरूळ जिल्हा परिषद गटातून निवडणूकीसाठी इच्छूक असल्याची चर्चा आहे.
कमळ कल्याणशेट्टीच्या हातात
१९९५ साली बाबासाहेब तानवडे यांच्या रुपाने कमळ खुलला होता. त्यानंतर २००९ साली सिद्रामप्पा पाटील हे आमदार झाले. आता सिद्रामप्पांनी आपल्या मुलांकडे राजकीय सुत्रे सोपविली आहेत. गेल्या काही वर्षांपासून विवेकांनद मल्टिस्टेट, विवेकांनद प्रतिष्ठानच्या माध्यमातून भाजपात एक चांगला चेहरा समोर sachin-kalyanshetti-copyआला आहे. अक्कलकोट तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी भाजपाने सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे सोपविली आहे. गत महिन्यात अक्कलकोटमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. विशेष या मेळाव्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थिीत आ.सिद्रामप्पा पाटील यांच्यासह सर्वच नेत्यांनी कल्याणशेट्टीच्या मागे ताकद उभे करण्याची मागणी केली. त्यामूळे आगामी २०१९ मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणूक तयारीची बीजे या मेळाव्यातून रुजली आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपाचा सत्ता आणण्यासाठी कंबर कसले आहेत.
स्थानिक स्वराज संस्था निवडणूका
अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी या तीन नगरपालिकांसाठी येत्या २७ नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक मतदान होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने मैंदर्गी नगरपरिषदेत पहिल्यादांच गटतट बाजूला ठेवत भाजपा स्वतंत्र निवडणूका लढविण्याची तयारी केली आहे. तर आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर अक्कलकोट नगरपरिषदेवर सत्ता आणणे हे भाजपाच्या दृष्टीने निर्णायक आहे. सध्या अक्कलकोट नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता shabi-cmykअसून, पुन्हा काँग्रेसचीच सत्ता आणण्यासाठी काँग्रसनेही तयारी केली आहे. तर रासप, राष्ट्रवादी, मनसे या पक्षानी आपली भूमिका जाहिर केलेली नाही. तर दुधनी बाजार समितीत आपले खाते खोलण्याची भाजपला चालविली आहे. त्यामूळे येत्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूकीनंतर नवे राजकीय समीकरण तालुकात उदयास येणार हे निश्‍चित आहे.
शाब्दींच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला बळ
गत विधानसभा निवडणूकीत फारूख शाब्दी यांनी मनसेच्या इंजिनवरून निवडणूक लढविली होती. दोनच दिवसांपूर्वी अक्कलकोट येथे अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्या मेळाव्याला उपस्थित राहत त्याच दिवशी सायंकाळी सोलापुरातील राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्ता मेळाव्यात शाब्दी यांनी राष्ट्रवादीचा घड्याळ मनगटावर बांधून घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीला सर्वार्थाने एक तगडा उमेदवार मिळाला आहे. फारूख शाब्दी राष्ट्रवादी प्रवेशामुळे माजी आ.महादेव पाटील हे राष्ट्रवादी पक्षात एकाकी पडले आहेत. पुढील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच शाब्दी राष्ट्रवादीत आल्याची चर्चा आहे. तर जेऊर जि.प.गट हा सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने पुत्र मल्लिकार्जून पाटील यांना रिंगणात उतरविण्याचे तयारी सुरु केले आहे.
आतापर्यंत तालुक्याचे राजकारण भाजपा काँग्रेस आणि सिध्दाराम म्हेत्रे, सिद्रामप्पा पाटील यांच्या भोवतीच फिरल्याने शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, मनसे, राष्ट्रवादीचा फारसा बोलबाला नव्हता. अद्याप तरी या पक्षाने पुढील निवडणूकीबाबत युती, आघाडीची भूमिका जाहिर केलेली नाही.

तिसर्‍या पर्यायाचा शोधत जनता ?
अक्कलकोट तालुक्यातील राजकारण संवेधनशील आहे. दोन नेत्यांमधील वैरात्वामुळे त्यांच्या पाठीमागील अनेक कार्यकर्त्यांची घरांची दिवाळ निघाले आहे. अनेक पोलीस केस, खुन खराबा झाला आहे. त्यामुळे नेहमीच गट -तट, मारहाण, पोलीस ठाण्याची चकरा, कोर्ट कचेरीची कटकट याला येथील जनता कंटाळली आहे. त्यामुळे विकासाचा राजकारण करणारा स्वच्छ प्रतिमेला प्राधान्य येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेसह इतर निवडणूकीत मतदार देणार असल्याची चर्चा गावातील पारावर सुरु आहे.

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in सोलापूर (107 of 118 articles)


  प्रतिनिधी, सोलापूर [२२ ऑक्टोबर] - सोलापूर शहर भाजपाचे माजी अध्यक्ष व सेवानिवृत्त कर्नल प्रभाकर कोंडीबा लांडगे यांचे शुक्रवार दि. २१ ...