Home » सोलापूर » सद्गुरू कृपेशिवाय भक्ती नाही : घळसासी

सद्गुरू कृपेशिवाय भक्ती नाही : घळसासी

=दीपावलीपूर्व बौध्दिक मेजवानी असलेल्या अमृतवाणीचा समारोप=

vivekachiamrut-vani-02

प्रतिनिधी,
सोलापूर, [दि. २३ ऑक्टोबर] – परमेश्‍वराची भक्ती करायची असेल तर आपल्यावर सदगुरू किंवा महात्मा यांची कृपा झाली पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दक्षिण सोलापूर, रंगकर्मी प्रतिष्ठान आणि आर्यन क्रिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विवेकाची अमृतवाणी या प्रवचनमालेच्या तिसर्‍या दिवशीची पुष्पमाला गुंफताना ते बोलत होते. अ‍ॅम्फि थिएटरमध्ये गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाची सांगता यावेळी झाली.
महात्मा, सदगुरू स्वयंसिध्द असले पाहिजे आणि ते आपल्याला ओळखायला आले पाहिजे. सदगुरू शिवाय ज्ञान मिळत नाही ईष्ट देवताची साधना करताना प्रत्येकाच्या ह्दयात भक्ती विकसित झाली पाहिजे हेतू शिवाय प्रेम असले पाहिजे आणि भाव समर्पण असावे त्यातून जगणं अमृतमय होते प्रत्येकाने ध्येय घेऊन जगलं पाहिजे. नारद स्वयंभू साक्षात्कारी आहेत. महात्मा, सदगुरूंना ओळखण्यासाठी आपला जीवन प्रवास असला पाहिजे वेदना शुध्द रूपात समजली पाहिजे जाणीव जागृती क्षण महत्वा आहे. मनुष्य संघप्रधान आहे तीव्र आज्ञेने गुरू आज्ञा पाळली पाहिजे. दुसंगाचा त्याग करा भक्ती प्रेम गुण रहित आहे असे विचार निरूपणकार विवेक घळसासी यांनी सांगितले. रामप्रहरी भक्ती सरोवरातीरी या विषयावर नारद भक्ती सूत्रावरील विवेचन यंदाच्या या अमृतवाणीमध्ये करण्यात आले. दि. २१ ऑ्नटोंबर रोजी पासून सुरू झालेल्या या यंदाच्या विवेकाची अमृतवाणी कार्यक्रमाला सकाळी ६.३० वाजताही रसिक श्रोत्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
दि. २१ ते २३ ऑ्नटोंबर दरम्यान अ‍ॅम्फी थिएटर श्रोत्यांनी भरून गेले होते. पहिल्या दिवशी समर्थ बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे, दुसर्‍या दिवशी मंगळवेढ्याहून पहाटे या कार्यक्रमाला हजेरी लावणारा एक श्रोता आणि या कार्यक्रमाच्या तिसर्‍या दिवशी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते विवेक घळसासी यांना पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली होती. गेल्या ८ वर्षापासून अखंडपणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे..

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in सोलापूर (108 of 121 articles)


=न.प. निवडणुकीसाठी परिचारक गटाची व्यूहरचना= प्रतिनिधी पंढरपूर, [दि. २३ ऑक्टोबर] - आ. प्रशांत परिचारक प्रणित शहर विकास आघाडीच्यावतीने पंढरपूर नगर ...